Skip to main content

गौरीपूजेचा नैवेद्य- घावन-घाटले

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 05/09/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य घाटले: एका नारळाचे घट्ट् दुध एक वाटीभर चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून तांदुळपिठी कोरडीच भाजून १/२ टीस्पून जायफळपूड १ टीस्पून वेलचीपूड . पाकृ: मंद गॅसवर भांडयात नारळाचे दुध घालून ढवळावे. त्यात चिरलेला गुळ घालून एकत्र गुळ विरघळेपर्यंत ढवळावे. . गुळ विरघळला की त्यात कोरडी भाजलेली तांदुळपिठी घालून एकत्र करणे. . घट्ट्सर झाले की त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालणे. . साहित्य घावनः २ वाटया तांदुळपिठी दुध लागेल तसे चवीपुरतं मीठ . पाकृ: तांदुळपिठीत लागेल तसे दुध घालणे व मीठ घालणे व सरसरीत भिजवावे. . नॉन-स्टीक तवा तापवून , थोडे तेल सोडून डावाने घावन घालावे. . झाकून शिजवणे, झाले की घडी घालून काढणे. गरमा-गरम घाटल्यासोबत घावने सर्व्ह करावेत. .

वाचने 9006
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

घावने पाहून तोँपासु

व्वा! कोकणात गेल्यासारखे वाटले! (काही ठिकाणी गौरीला तिखटाचा नैवेद्य करतात बर्र्का! तेव्हा त्याचीही पाकृ येउदे! )

आज गौरींच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळी असते. ती केलिये. पुढच्या विकांताला घावन घाटल्याचा घाट घालते. मी हा पदार्थ एकदाच खाल्लाय पण फोटू पाहून मस्त वाटलं!

तो कुठेच दिसत नाहीये, खरोखरच तिजोरीत प्याक करून ठेवला असेल. :)

In reply to by प्रचेतस

हो असेच समजा...कारण तो बिचारा आता वापरण्याच्या लायकीचा राहीलेला नाही ओ...तुटला बिचारा (तरी मी त्याला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावत असे)...म्हणून त्याला आठवण म्हणून जपून ठेवला आहे :)

In reply to by सानिकास्वप्निल

अरेरेरे.... खुप वाईट झालं... चांगला होता बिचारा.. किती जणांच्या मनात भरला होता... @५० फक्त - शोकसभेला कधी जायचं???

In reply to by सानिकास्वप्निल

अरेरेरे.... खुप वाईट झालं... चांगला होता बिचारा.. किती जणांच्या मनात भरला होता... @५० फक्त - शोकसभेला कधी जायचं???

In reply to by Mrunalini

हो ना माझ्यापेक्षा ५० फक्त ह्यांना खुप वाईट वाटेल ... असो मी अगदी तसाच आणेन हा लवकरच म्हणजे त्याची उणीव भासणार नाही ;)

In reply to by सानिकास्वप्निल

प्रतिसाद्कर्त्यांनी फक्त तो हे सर्वनाम वापरून नक्की कोण याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या पाकृमधील प्रतिसादांचे एक मोठं शक्तीस्थान आहे.

फोटोवरुनच पदार्थ किती सात्विक वाटतो नैवेद्यासाठी! चवीलाही छानच लागत असेल.

मालवणात घावन अन नारळाची चटणी खाल्ली होती त्याची आठवण झालि, अगदि घरी चुलीवर केलेली घावनं जाम भारी होती, ही पण तशीच असतील, पाह्तो करुन कधितरी.

चाबूक पाकृ एकदम. फटू पण एकदम खल्लास.

मस्तं :)

In reply to by कवितानागेश

का गं? क्यानमधे मिळते ना! ते चालेल नाही का गं सानिका? निदान मी तरी क्यान आणीन असा विचार करत होते.

व्वा पाकृ.तर छान आहेच पण ताटाखालचा तो मोत्यांचा रुमालही सह्हीच आहे !!