मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसालेदार हरबरा बटाटा उसळ.

कुंदन · · पाककृती
साहित्यः १ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. ) १ वाटी सुके खोबरे. १ मोठा कांदा. २ मिरच्या २ लसुण पाकळ्या ( सोलुन) छोटा आल्याचा तुकडा १ टि स्पुन लाल तिखट १ टि स्पुन मसाला. रात्र भर भिजत ठेवलेल्या हरबरे निथळुन घेणे. सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे. भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे. बटाटा धुवुन , सोलुन व कापुन घेणे. एका कुकर मध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे. मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा. त्यात हरबरे व कापलेला बटाटा टाकुन पुन्हा एकदा नीट मिक्स करा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कुकरचे झाकण नीट लावुन २-३ शिट्या मारा( काढा). कुकर उघड्यायची जास्त घाइ करु नका , ते गार झाल्यावरच उघडा. Harbara_batata_usal.jpg पाहिजे त्या प्रमाणे हादडा , नुसते / चपाती बरोबर / ब्रेडबरोबर

वाचने 12173 वाचनखूण प्रतिक्रिया 38

शेखर Fri, 03/25/2011 - 17:33
वा वा कुंदन.... मस्त दिसते रे... तोंडाला पाणी सुटले...

प्रसन्न केसकर Fri, 03/25/2011 - 17:36
हरभरे फारसे आवडत नाहीत मला पण त्याऐवजी मटार घालुन ट्राय करुन पहायला हवी ही रेसिपी.

In reply to by प्रसन्न केसकर

कुंदन Fri, 03/25/2011 - 17:39
धन्यवाद प्रसन्नदा. मटारच काय , त्याच्याही ऐवजी जर शिजवलेले चिकन टाकुन अजुनही चविष्ट लागेल ही भाजी. ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गणपा Fri, 03/25/2011 - 18:58
चुकुन माकुन पाणी/रस्सा राहिलाच तर बचकाभर फरसाण टाकुन पन ए१ चखणा तयार होइल. तेव्हा वरी नॉट. ;) कुंद्या (मजबुरीने का असेना पण) मार्गाला लागला एकदाचा. :)

In reply to by गणपा

प्राजु Sat, 03/26/2011 - 03:59
काय आनंद झालाय या गणपाला!! वा वा! कुंद्याभौ.. भाजी चांगली दिसतेय हो.. करा करा! अशाच छान छान भाज्या करा. :)

सुहास.. Fri, 03/25/2011 - 17:43
कुंद्या , लेका स्वंयपाक घरात काय करतो आहेस बे? ;) हार्ट अटॅक यायचा बाकी होता ;) पण हे { (१ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. ;) ) } वाचले आणि मग खात्री पटली की हा कुंद्या च आहे ;) पाकृ बद्दल : फालतु पाकृ ;) (आमच्या रेसिपीवर प्रतिसाद दिले नाहीत म्हणुन ;) )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बघून बरी वाटते आहे पण प्रत्यक्षात चवीला कितपत चांगली लागेल याबद्दल साशंक आहे.
चवीला अत्यंत थर्डक्लास लागणार, कारण पाकृ मध्ये मिठाचा बिलकुल वापर केलेला नाही =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

कुंदन Fri, 03/25/2011 - 18:03
अर्र ते विसरलोच की. मिठ वरुन घे ते पर्‍या. तुला साला सगळेच सांगावे लागते. कसे होणार ब्वॉ तुझे पुढे ;-)

टारझन Fri, 03/25/2011 - 17:50
आयला कुंद्या इकडे ? :) मस्त रे :) पाकृ कुंदु स्टाईल आहे काय ? अवांतर : आपल्या कडे थंब स्कॅनर असलेला लॅपटॉप आहे हे दाखवायचा .. ... ... प्रयत्न :) - वंदन

Nile Fri, 03/25/2011 - 17:53
गणपाने ह्या पुरुषांना बि-घडवुन टाकलं आहे ब्वॉ... बाकी ती भाजी काय लॅपटॉपला खाउ घालत व्हता की काय?? आणी हो पेंटच स्कील सुधारायला वाव आहे... ;-) अरे हो, पाकृ का.. चान चान.. :P

In reply to by Nile

कुंदन Fri, 03/25/2011 - 17:57
भौ , तिथे माझ्या पायांचा फोटु होता. काये नंतर तुम्ही लोके पायांच्या फोटुच्या झेरॉक्शी मागाल , म्हणुन ठेवला होता एकत्र. पण नंतर सुधरवला.

In reply to by नगरीनिरंजन

कुंदन Fri, 03/25/2011 - 18:23
मी नुसताच कांदा भाजला. भारतात असाल तर गोडेतेलावर , अन हिरव्या अथवा तत्सम देशात असाल तर ऑलिव्ह तेलावर जशी चवा पायजेल तसा भाजु शकता तुम्ही कांदा.

रेवती Fri, 03/25/2011 - 18:09
चक्क कुंदनभाऊजींनी स्वयंपाक केला? फोटू छान आणि पाकृही समजली. ही उसळ माझ्या सासूबाई एकदम मस्त करतात. मला रेशिपी त्यांनी सांगितली नव्हती........मीही विचारली नाही हे वेगळे सांगत बसत नाही.;) तुम्ही वापरलेले हरभरे हिरवे दिसतायत. ते नाही कधी वापरले पण चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला अश्याच काळ्या हरभर्‍यांनी ओटी भरली जाते. आम्ही सासूसुना अश्या चार ठिकाणी हळदीकुंकवाला जाऊन आलो तरी बरेच हरभरे यायचे. आता याचे काय करावे? हा प्रश्न ही पाकृ चटकन सोडवते.

सहज Fri, 03/25/2011 - 18:31
कुकरमधे एकापेक्षा जास्त माणसाला पुरेल इतका स्वयंपाक होउ शकतो असे तर 'कोणाला' दाखवून द्यायचे नव्हते ना हो कुंदनभावोजी? असो आता स्वतापुरते चार स्लाईस घेउन येईल.. कोणीतरी..

In reply to by सहज

कुंदन Mon, 03/28/2011 - 12:26
>>असे तर 'कोणाला' दाखवून द्यायचे नव्हते नाही. एकदा भाजी केली तर २-३ वेळा ओरपता यावी हा सेहेज सोपा उद्देश होता भरपुर भाजी करण्यामागे. बाकी तुम्हाला खायची असेल तर स्वागतच आहे , फक्त नीट लायनीत यावे ही विनंती. ;-)

निवेदिता-ताई Fri, 03/25/2011 - 18:33
आम्ही ही भाजी फक्त चैत्र महिन्यातच करतो...चैत्रगौरीचे हळदीकुंकू अस्ते,त्यातले बरेच हरबरे शिल्लक राहतात.(मुद्दामच जास्त टाकलेले असतात)..पण चटपटे हरबरे करतो.....अशी रस्सा भाजी नाही आवडत. असे भिजवलेले हरबरे..वांग्याच्या भाजीत एकदम छान लागतात.करुन पहा..

कच्ची कैरी Fri, 03/25/2011 - 19:21
पाकृ छान वाटतेय ,अजुन येऊ द्या. बाकी ती उसळ कूकरमधुन काढुन घेऊन फोटो काढण्याची कृपा मिपाकरांवर का नाही केलीत ?;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुंदन Fri, 03/25/2011 - 21:01
एव्हरेस्ट चे "तिखा लाल" वापरल्या गेले आहे.रस्सा चा रंग फक्त तांबडा आहे, जास्त तिखट नाहिये. अन्यथा मी तसा योग्य तो वैधानिक इशारा दिला असता. तेव्हा तांबड फुटायच्या आत उठायची काळजी न करता मनसोक्त ओरपा. अवांतर : हल्ली "घड्याळा"त तांबड फुटल्या शिवाय तुम्ही उठत नाही म्हणे. किती हा वक्त्शीर पणा गुरुजी. ;-)

In reply to by कुंदन

एव्हरेस्ट चे "तिखा लाल" वापरल्या गेले आहे.रस्सा चा रंग फक्त तांबडा आहे, जास्त तिखट नाहिये. अन्यथा मी तसा योग्य तो वैधानिक इशारा दिला असता. माहितीबद्दल आभारी. काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला? सहमत आहे. ;) -दिलीप बिरुटे

दीप्स गुरुवार, 05/05/2011 - 11:37
कुंदनभाऊ, मि आधि चने कुरला शीजवुन घेते. आणि नन्तर फोडनी घालते. बाकि भाजिचा रन्नग सेम आहे. एक एक दिवस मन्तरलेला | नव्या पदाथाने भरलेला खावुन घ्यावे सारे सारे | मिसळ पाववरील सर्व पादार्थ