Skip to main content

[कविता' २०२०] - कोऽहम् ?

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

कोऽहम् ?




मी न शांता, मी न बहिणा । मी न इंदिरा, मी न जना ॥ नाही अभंग, नाही गाथा । माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥ माझ्याच पंक्ती, माझ्याच ओठी। शब्दही स्तब्ध, माझ्याच साठी ॥ माझीच गाणी,गुंफिली तराणी । माझीच कहाणी, रचिली विराणी॥ अहो,कसले छंद, कुठल्या मात्रा । रिजवतील फक्त माझ्याच गात्रा ॥ नसेल सम्यक, माझे यमक । मीच सुचक, मीच वाचक ॥


वाचने 16310
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

+१ यमकाने परिपूर्ण झालेली कविता आवडली

आवडली

+१ मस्त

+1

मीच सुचक, मीच वाचक ॥
अन् मी अनुमोदक.

+१

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

+१. आरब्ध व सम्यक ह्या दोन (माझ्यासाठी) नवीन शब्दाांचे अर्थ या कवितेमुळे कळले. कविता छान आहे.

पण गुण देण्याइतकी नाही आवडली. पण ही कविता वाचून फार पूर्वी वाचलेल्या स्नेहलता किनरे यांची अशाच अशयाची, कमीत कमी शब्दांची पण भावपूर्ण कविता आठवली. ती इथे देतो. माझाच मी ग्रंथ... काढीन वाचून काढीन वेचून... उणे दुणे काढीन झाडीन... धुवून पुसून घेईन लावून... पान पान मानवी लांबणं... काढून टाकीन हवे ते लावीन... हवे तसे नंतर पाहीन... प्रवाही सफाई छपाईची शाई... अक्षरांत अक्षर अक्षर... होईल साक्षर असे नीरक्षीर... वेगळीन! - सौ. स्नेहलता किनरे सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

काढीन वेचून... उणे दुणे
ही ओळ सोडल्यास या कविते.पेक्षा येथील मुळ कविता कधी ही सरस वाटली. नाही अभंग, नाही गाथा । माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥ वा काय लिहिले आहे कविता विजेती झाली नाही झाली तरी आतापर्यंत ची माझी आवडती कविता.

In reply to by गणेशा

गोविंद घ्या.... कुणी गोपाळ घ्या. कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू! तुमच्या मताचा आदर आहेच! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!
दिलखुष, आज वाचलेल्या या सर्वोत्तम ओळी.. भारीच. भेटूया नक्की..

In reply to by गणेशा

कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!
सहमत!! माझ्याकडून एक मिसळ लागू....

+१