कोऽहम् ?

मी न शांता, मी न बहिणा ।
मी न इंदिरा, मी न जना ॥
नाही अभंग, नाही गाथा ।
माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥
माझ्याच पंक्ती, माझ्याच ओठी।
शब्दही स्तब्ध, माझ्याच साठी ॥
माझीच गाणी,गुंफिली तराणी ।
माझीच कहाणी, रचिली विराणी॥
अहो,कसले छंद, कुठल्या मात्रा ।
रिजवतील फक्त माझ्याच गात्रा ॥
नसेल सम्यक, माझे यमक ।
मीच सुचक, मीच वाचक ॥

वाचने
16371
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
यमकाने परिपूर्ण झालेली कविता आवडली
भारी +१
भारी

+१
+१
आवडली
वाह! आवडलीच..
+१
+१
+१
मस्त
+1
+1
निशब्द झालो वाचून....
+१
+१
अन् मी अनुमोदक.
+१
+१
आवडली
+१
+१
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
स्वान्त:सुखाय कविता, आवडली.
+१
+१.
+१.
आरब्ध व सम्यक ह्या दोन (माझ्यासाठी) नवीन शब्दाांचे अर्थ या कवितेमुळे कळले.
कविता छान आहे.
"आरब्ध" हा शब्द "वाटा...." या
In reply to +१. by पलाश
"आरब्ध" हा शब्द "वाटा...." या दुसर्या कवितेतील आहे. इथे चुकून लिहिला गेला.
कविता ठीकच!
पण गुण देण्याइतकी नाही आवडली. पण ही कविता वाचून फार पूर्वी वाचलेल्या स्नेहलता किनरे यांची अशाच अशयाची, कमीत कमी शब्दांची पण भावपूर्ण कविता आठवली. ती इथे देतो.
माझाच मी ग्रंथ... काढीन वाचून
काढीन वेचून... उणे दुणे
काढीन झाडीन... धुवून पुसून
घेईन लावून... पान पान
मानवी लांबणं... काढून टाकीन
हवे ते लावीन... हवे तसे
नंतर पाहीन... प्रवाही सफाई
छपाईची शाई... अक्षरांत
अक्षर अक्षर... होईल साक्षर
असे नीरक्षीर... वेगळीन!
- सौ. स्नेहलता किनरे
सं - दी - प
काढीन वेचून... उणे दुणे
In reply to कविता ठीकच! by चांदणे संदीप
ही ओळ सोडल्यास या कविते.पेक्षा येथील मुळ कविता कधी ही सरस वाटली.
नाही अभंग, नाही गाथा ।
माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥
वा काय लिहिले आहे
कविता विजेती झाली नाही झाली तरी आतापर्यंत ची माझी आवडती कविता.
चालायचचं
In reply to काढीन वेचून... उणे दुणे by गणेशा
गोविंद घ्या.... कुणी गोपाळ घ्या.
कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!
तुमच्या मताचा आदर आहेच!
सं - दी - प
कविता गोष्टच अशी आहे. कुणाला
In reply to चालायचचं by चांदणे संदीप
दिलखुष, आज वाचलेल्या या सर्वोत्तम ओळी.. भारीच.
भेटूया नक्की..
अगदी,
In reply to कविता गोष्टच अशी आहे. कुणाला by गणेशा
अगदी,
संदीपशेठ, मस्त लिहिलेत एकदम
कविता गोष्टच अशी आहे. कुणाला
In reply to कविता गोष्टच अशी आहे. कुणाला by गणेशा
सहमत!! माझ्याकडून एक मिसळ लागू....
+१ जणू शब्द - अर्थांची खाणच!
In reply to कविता गोष्टच अशी आहे. कुणाला by मनिष
+१ जणू शब्द - अर्थांची खाणच!
+१
+१
आपल्यासाठी लिहीणे खरे आहे.
आपल्यासाठी लिहीणे खरे आहे. अभिनंदन!