[कविता' २०२०] - कोऽहम् ?

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 May 2020 - 3:04 pm

कोऽहम् ?

मी न शांता, मी न बहिणा ।
मी न इंदिरा, मी न जना ॥
नाही अभंग, नाही गाथा ।
माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥
माझ्याच पंक्ती, माझ्याच ओठी।
शब्दही स्तब्ध, माझ्याच साठी ॥
माझीच गाणी,गुंफिली तराणी ।
माझीच कहाणी, रचिली विराणी॥
अहो,कसले छंद, कुठल्या मात्रा ।
रिजवतील फक्त माझ्याच गात्रा ॥
नसेल सम्यक, माझे यमक ।
मीच सुचक, मीच वाचक ॥

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 2500px;
}

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 May 2020 - 3:29 pm | प्रचेतस

+१

यमकाने परिपूर्ण झालेली कविता आवडली

जव्हेरगंज's picture

4 May 2020 - 3:54 pm | जव्हेरगंज

भारी
+१

श्वेता२४'s picture

4 May 2020 - 4:14 pm | श्वेता२४

आवडली

मन्या ऽ's picture

4 May 2020 - 6:22 pm | मन्या ऽ

+१

प्रशांत's picture

4 May 2020 - 6:29 pm | प्रशांत

+१
मस्त

गणेशा's picture

5 May 2020 - 12:21 am | गणेशा

+1

+१

तुषार काळभोर's picture

5 May 2020 - 8:01 am | तुषार काळभोर

मीच सुचक, मीच वाचक ॥

अन् मी अनुमोदक.

स्वलिखित's picture

5 May 2020 - 8:31 am | स्वलिखित

+१

किसन शिंदे's picture

5 May 2020 - 10:11 am | किसन शिंदे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2020 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

पलाश's picture

5 May 2020 - 11:48 am | पलाश

+१.
आरब्ध व सम्यक ह्या दोन (माझ्यासाठी) नवीन शब्दाांचे अर्थ या कवितेमुळे कळले.
कविता छान आहे.

"आरब्ध" हा शब्द "वाटा...." या दुसर्‍या कवितेतील आहे. इथे चुकून लिहिला गेला.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:44 am | चांदणे संदीप

पण गुण देण्याइतकी नाही आवडली. पण ही कविता वाचून फार पूर्वी वाचलेल्या स्नेहलता किनरे यांची अशाच अशयाची, कमीत कमी शब्दांची पण भावपूर्ण कविता आठवली. ती इथे देतो.

माझाच मी ग्रंथ... काढीन वाचून
काढीन वेचून... उणे दुणे
काढीन झाडीन... धुवून पुसून
घेईन लावून... पान पान
मानवी लांबणं... काढून टाकीन
हवे ते लावीन... हवे तसे
नंतर पाहीन... प्रवाही सफाई
छपाईची शाई... अक्षरांत
अक्षर अक्षर... होईल साक्षर
असे नीरक्षीर... वेगळीन!

- सौ. स्नेहलता किनरे

सं - दी - प

गणेशा's picture

9 May 2020 - 10:37 am | गणेशा

काढीन वेचून... उणे दुणे

ही ओळ सोडल्यास या कविते.पेक्षा येथील मुळ कविता कधी ही सरस वाटली.

नाही अभंग, नाही गाथा ।
माझ्याच व्यथा, सा-याच कथा ॥

वा काय लिहिले आहे
कविता विजेती झाली नाही झाली तरी आतापर्यंत ची माझी आवडती कविता.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 10:51 am | चांदणे संदीप

गोविंद घ्या.... कुणी गोपाळ घ्या.
कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!

तुमच्या मताचा आदर आहेच!

सं - दी - प

कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!

दिलखुष, आज वाचलेल्या या सर्वोत्तम ओळी.. भारीच.

भेटूया नक्की..

प्रचेतस's picture

9 May 2020 - 2:24 pm | प्रचेतस

अगदी,
संदीपशेठ, मस्त लिहिलेत एकदम

कविता गोष्टच अशी आहे. कुणाला काय सापडेल सांगता येत नाही. ज्याला सापडले त्याच्यासाठी झळाळते कांचन, इतरांसाठी रंगहीन, 'अर्थ'हीन धातू!

सहमत!! माझ्याकडून एक मिसळ लागू....

पाषाणभेद's picture

27 May 2020 - 6:49 pm | पाषाणभेद

+१ जणू शब्द - अर्थांची खाणच!

निओ's picture

21 May 2020 - 1:16 pm | निओ

+१

पाषाणभेद's picture

25 May 2020 - 7:25 pm | पाषाणभेद

आपल्यासाठी लिहीणे खरे आहे. अभिनंदन!