Skip to main content

[शशक' २०२०] - लॉकडाऊन

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/04/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.

लॉकडाऊन




स्वयंफुर्तीने केलेली संचारबंदी झाली संध्याकाळी मस्त टाळ्या वैगरे वाजवल्या मज्जा आली ! घरी एकटाच होतोना तरी आज रात्री दिव्यांची आरास केली होती ! कंटाळा आला आता पण एकटेपणाचा , हि गेली सोडून गेल्या वर्षी शेजारच्या गॅलरीतून चिमुकली रोज आजोबा म्हणून हात करून फ्लयिंग किस देते लब्बाड गोबर्या गालांची बया मेडिकेकवाला मात्र न चुकता औषध देऊन जातो , तेवढाच मानवी सहवास ! का कोणजाणे छोटी आजकाल दिसेना गॅलरीत , तो मेडिकलवाला सुद्धा येत नाहीये , कुंड्यापण सुकत चालल्यात कसली तरी अनामिक हुरहूर आणि आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !! आता शेजाऱ्यांना कसला वास येतो म्हणे तो माझ्या घरून ? थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!


वाचने 17154
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

+१

द सिक्स्थ सेन्स !

+1 भीषण

भयंकर... उत्तम impact

+१

+1

In reply to by गणेशा

खरे तर जाणून बुजून मी करोना आणि त्या संबंधित कथांना +1 देत नव्हतो, कारण आताच्या वातावरणाला त्या संबंधित आणि मनाला लगेच स्पर्श करणाऱ्या होतात. कथेची सुरुवात ही मला तशी वाटली, पण तुमचा आयुष्य म्हणजेच एकप्रकारचे लॉकडाऊन हा कन्सेप्ट जबरदस्त.. मस्त.. कथा आवडलीच

+१ भारी मांडली आहे! &#128562

+१

+1

+1

+१

+1 णंतर प्रथेप्रमाणे रसग्रहन करण्यात येईल

+१ जबरदस्त मांडणी!

+१

+१

+१

+१

+१ काय बोलणार ?

+१ -गा.पै.

रत्नाकर मतकरी आठवले.

+1

+१

आपल्या जवळच्या लोकांना कमीत कमी ताप होईल इतकं बघावं. केरळला जाऊन करण्यापेक्षा घरच्याघरी हा उद्योग करता आला असता !

+१

In reply to by संजय क्षीरसागर

लेखकाकडून आलेले ऊत्तर:
कथेतील वृद्ध नायक लॉक डाऊनच्या काळात मरण मावतो , परंतु शेजाऱ्यांना मृतदेहातुन वास येई पर्यंत कळत नाही , अशा प्रकारे आत्म्याचा देहरूपी लॉक डाऊन संपतो असा थोडक्यात आशय आहे !!!

In reply to by साहित्य संपादक

नायकाला आपण गेल्याचा वास कसा येईल ? दुसरी मिस्टेक > आत्मा तर अकर्ता आणि कायम मुक्त आहे, तो दार उघडायला कशाला जातोय ? लोक्स मतदानापूर्वी करायची गोष्ट, सत्तास्थापन झाल्यावर का करतात ?

In reply to by संजय क्षीरसागर

कथेत म्हटलंय > आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !! आपले प्राणनाथ गेल्याचा खुद्द त्यांना वास लागलायं आणि नायिकेला पत्ता नाही ? आणि ती आहे म्हटल्यावर दार तोडून परत नुकसानी कशाला ?

In reply to by संजय क्षीरसागर

कथेत म्हटलंय, हि गेली सोडून गेल्या वर्षी म्हणजे नायिकेचा ऑलरेडी गेम झालाय. आत्मा तर अकर्ता आणि कायम मुक्त आहे, याचं काही प्रुफ आहे का.?

In reply to by जव्हेरगंज

कथेत वरती म्हटलंय गेली आणि खाली म्हटलंय : >आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !! म्हणजे लेखक नायिकेला वरुन पाहातोयं का ? शिवाय आत्म्याची भानगड लेखकानं काढली आहे > तो मुक्त आणि अकर्ता आहे हा माझा अनुभव आहे > आणि मान्यताप्राप्त अध्यात्मिक ग्रंथांचा त्याला आधार आहे. किमान आत्मा दार उघडायला तरी जाणार नाही !

In reply to by जव्हेरगंज

संजय भाऊ, तुमचे सगळे रिप्लाय पाहुन, कथा लेखक स्वता:चे लॉकडाऊन आणि स्वता:चा दरवाजा दोन्ही तोडून पार वरच जाईल :) बहुदा. मला असे वाटते : कथेतील म्हतारा नायक, लॉकडाऊन मध्ये घरी एकटाच बंद आहे... त्या नायकाची बायको गेल्या वर्षी गेली आहे. फक्त मेडिकल वाला माणुस त्याच्याकडे येतो, तेव्हडेच काय माणसाचे सानिध्य थोड्यावेळेसाठी. तो मेडिकल वाला येत नाही आता कदाचीत लॉकडाउन मुळे ( किंवा त्याचे लॉक्डाउन पण सुटले असु शकते :)) नंतर काही दिवसाने नायक घरात मरतो ( औषध न मिळाल्याने पण असे होउ शकते ) तो मेल्याने त्याच्या १ वर्षाभरा पुर्वी मेलेल्या बायकोला स्वर्गात आनंद झालेला असतो ( बायको स्वर्गातच म्हणायचे, नरकात म्हणणे पाप असते ) हे याला पण मेल्यामुळे कळते. (मेल्या नंतर पण बायको आपला पिच्छा सोडत नसते हा गहन अर्थ यातुन दिसतो आहे) आणि ह्या नायकाला मेल्याने जीवनाचे लॉकडाऊन सुटले असे वाटते.. मजेने : १. आता येथे पण शंका घेऊ नका , की वास येइ पर्यंत आत्मा तेथे काय करत होता.. कदाचीत आत्मा पण वास घेतो, म्हणुनच आत्म्याचा वास आहे या जागेत असे बोलले जात असावे.. २. बायको कशी दिसते आनंदी, ही शंका बाकीच राहिली असली तरी, बायको वर्च्युली स्वर्गातुन मन की बात बोलली असेल आनंदाने.. डिजीलयाज्ड असेल स्वर्ग पण .. --------- मुळ कथा लेखकाने माझ्या येव्हड्या कष्टाबद्दल लॉकडाउन उठल्यावर ( जीवनाचे नाही) चहा तरी द्यावा राव मला.. +१ तर आधीच दिलाय आपल्याला जीवनाचा लॉकडाऊन हाच कन्सेप्ट भारी वाटला एकदम.. आणि १-२ वाक्य सोडली तर कथा पण मस्त आहे

In reply to by गणेशा

गेलेली बायको दिसते हा कथेचा क्लायमॅक्स आहे ! कथेचं नांव आत्मवास असतं तर विजय नक्की होता ! इतके गोंधळ झालेली कथा केवळ बहुमताच्या जोरावर विजयी होणं हे देशातल्या परिस्थितीचं प्रतिबिंब असेल !

+१

+१

+१

+१

In reply to by गामा पैलवान

पण शेवट बघा > थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!! म्हणजे जो गेलेला असतांना दरवाजा उघडायला जातो त्यालाच आपण गेल्याचा वास शेजाऱ्यांना लागला हे कळतंय !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, याचाच अर्थ लेखक गोंधळलेला आहे. हे गोंधळणं वय झाल्याचं आहे की मृत्यू झाल्याचं ते ही त्याला कळंत नाहीये. प्रत्यक्षात तो 'गेलेला' आहे. वाचकाने वाचक म्हणून कथा वाचावी की लेखक बनून अनुभवावी हे मी तुमच्यावर सोडतो. आ.न., -गा.पै.