मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - गॅस चेंबर

वकील साहेब · · स्पर्धा
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता. "पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते. "जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला. "हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली. अन तशीच विरली. बाहेरून कुणाचाच प्रतिसाद नाही. अखेरीस कसोशीने दाबून ठेवलेला त्याचा बांध फुटला. "शेवटचा वडा उचलायलाच नको होता." तो मनोमन म्हणाला. "लिफ्ट उघडा लवकर," नाक मुठीत धरून सहाही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते. अन तो एकटाच उभा होता स्थितप्रज्ञाप्रमाणे.

वाचने 49646 वाचनखूण प्रतिक्रिया 82

योगी९०० 08/02/2019 - 11:56
+१ खूप हसलो...

सूर्यपुत्र 09/02/2019 - 12:42
+१. पहिल्यांदा वाटली की तो पॅनिक होऊन गेला की काय... पण बाकीचे नाक मुठीत धरुन का आहेत याचा अचानक उलगडा झाला.. -सूर्यपुत्र.

दादा कोंडके 09/02/2019 - 23:32
मस्त!

ज्योति अळवणी 10/02/2019 - 00:23
अफाट कल्पनाशक्ती

ट्रेड मार्क 10/02/2019 - 02:20
+१

जालिम लोशन 10/02/2019 - 14:54
lol

आनन्दा 14/02/2019 - 09:18
लय हसलो +१०००००००००००००००००००००००००००००००००

अमरप्रेम 14/02/2019 - 17:23
+१

लोथार मथायस 18/02/2019 - 04:44
+1

प्राची अश्विनी 18/02/2019 - 09:19
+1

अनुप ढेरे 22/02/2019 - 10:45
+१

एकविरा 22/02/2019 - 12:45
हा हा हा ,आधी वाटल लिफ्ट ची भीती की काय ,पण भलतेच झाले

विजुभाऊ 27/03/2019 - 13:29
https://www.bbc.com/hindi/international-47708384 हे असेही घडू शकते https://www.bbc.com/hindi/international-47708384