Skip to main content

[शशक' १९] - गॅस चेंबर

लेखक वकील साहेब यांनी मंगळवार, 05/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता. "पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते. "जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला. "हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली. अन तशीच विरली. बाहेरून कुणाचाच प्रतिसाद नाही. अखेरीस कसोशीने दाबून ठेवलेला त्याचा बांध फुटला. "शेवटचा वडा उचलायलाच नको होता." तो मनोमन म्हणाला. "लिफ्ट उघडा लवकर," नाक मुठीत धरून सहाही जण जीवाच्या आकांताने ओरडत होते. अन तो एकटाच उभा होता स्थितप्रज्ञाप्रमाणे.

वाचने 49649
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

+१

+१ खूप हसलो...

+१. पहिल्यांदा वाटली की तो पॅनिक होऊन गेला की काय... पण बाकीचे नाक मुठीत धरुन का आहेत याचा अचानक उलगडा झाला.. -सूर्यपुत्र.

+१

मस्त!

अफाट कल्पनाशक्ती

+१

+1

lol

.

लय हसलो +१०००००००००००००००००००००००००००००००००

.

+१


+1

+1

+१

+१

+१

+१

हा हा हा ,आधी वाटल लिफ्ट ची भीती की काय ,पण भलतेच झाले