मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)

आदूबाळ · · स्पर्धा
पहिली शतशब्दकथा स्पर्धा पहिली फेरी १५ दिवस ८३ कथा २४३८ मतं शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार! आणि.... वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
क्रमांक शीर्षक लेखक Wordcount Revised Votecount
1 लोकमान्य मृत्युन्जय 100 88
2 निकाल मधुरा देशपांडे 100 65
3 ईवाईन नाव आडनाव 100 58
4 वन नाईट इन द ट्रेन प्राची अश्विनी 99 55.44
5 अंतर अभ्या.. 100 55
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही. शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला. प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
  • मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
  • मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
  • प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
हार्दिक अभिनंदन! आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!

वाचने 21136 वाचनखूण प्रतिक्रिया 104

In reply to by श्रीरंग_जोशी

नंदन Tue, 08/18/2015 - 14:31
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.
असेच म्हणतो, अभिनंदन!

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर Tue, 08/18/2015 - 02:55
आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु इच्छिते की अनेक कथा उत्तम होत्या. थोड्याफार कमी +१ ने पहिल्या ३ मध्ये नसतील तरी त्यांनी सिक्वल जरुर लिहावा.

आदिजोशी Tue, 08/18/2015 - 15:10
आणि सर्व लेखकांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने अनेक उत्तम कथा वाचायला मिळाल्या आणि अनेक लेखक पुन्हा लिहिते झाले हे स्पर्धेचे महत्वाचे आणि मोठेच यश आहे. आता पहिल्या ३ स्पर्धकांनी पुढचा भाग लिहून झाल्यावर अंतीम निकाल जाहीर होईल. ही स्पर्धा संपली की बाकी सगळ्यांनी आपआपल्या कथेचा उत्तरार्ध लिहावा ही विनंती.

In reply to by सुहास झेले

अभ्या.. Tue, 08/18/2015 - 15:44
+१ सर्वांचे अभिनंदन. आता मिपा बंद न पडता परिक्षकांचे निकाल आणि सिक्वल पटपट येवोत म्हणजे झाले. ;)

चिगो Tue, 08/18/2015 - 16:03
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. आदूबाळ तसेच संपुर्ण संपादक मंडळाचे त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीसाठी आभार..

द-बाहुबली Tue, 08/18/2015 - 16:12
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य) मधुरा देशपांडे (कथा: निकाल) प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
आँ ? मतं कमी केली आहेत तरी त्या नंबरात कशा ?

In reply to by द-बाहुबली

अन्या दातार Tue, 08/18/2015 - 18:32
टोटल मतसंख्या प्रथम विचारात घेतली. त्यातून जास्तीत जास्त मते मिळवणारे ५ कथांच्या शब्द संख्या विचारात घेतल्या. बरोबर १०० शब्द असल्यास गुण कमी केले नाहीत. १०० ला जेवढे शब्द कमी असतील तेवढ्या % ने गुण कमी केले. आता पुन्हा हिशेब करा बघू. ;)

In reply to by बबन ताम्बे

द-बाहुबली Tue, 08/18/2015 - 20:08
फार साधा प्रश्न मला पडलाय ज्याचे उत्तर अजुनही कोणी देत नाहीये. नक्किच मला काहीतरी समजले नाहीये फक्त ते काय इतकेच जाणून घ्यायचे आहे. बाकी माझा प्रश्न फार सोपा व समजण्यास सुलभाजे असा अजुनही आशावाद आहे. प्रश्न असा आहे की...
प्राची अश्विनी अंतीम ३ स्पर्धकांमधे कशा पोचल्या कोणी स्पष्ट करेल का ?

In reply to by द-बाहुबली

प्रचेतस Tue, 08/18/2015 - 20:11
वाच की दाद्या हे
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.

In reply to by द-बाहुबली

आदूबाळ Tue, 08/18/2015 - 20:13
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
हे वाचायचं राह्यलं का?

समीरसूर Tue, 08/18/2015 - 16:14
सगळ्या लेखकांचे मनापासून अभिनंदन! विजेत्यांचे विशेष अभिनंदन! या पाच कथा खरोखर सकस होत्या. आणि बाकी बहुतांश कथा चांगल्याच होत्या. अतिवास यांचे खूप आभार. त्यांनी शोधलेला हा साहित्यप्रकार लेखकाच्या लेखनक्षमतेचा कस पाहणारा आहे. आदूबाळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांना धन्यवाद. सं मं चे देखील आभार मानायलाच हवे.

चांदणे संदीप Tue, 08/18/2015 - 16:30
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! १०० शब्दांत लिहिताना खरेच कस लागतो. नवीन अनुभव मिळवून दिल्याबद्दल मिपाचेही आभार! सिक्वलच्या तयारीत असलेला.. Sandy

अरुण मनोहर Tue, 08/18/2015 - 17:16
स्पर्धेची कल्पना खूप छान होती. आदुबाळ ह्यांचे अभिनंदन सर्व विजेत्यांचे देखील अभ्नंदन आणि पुढील लेखनाला शुभेच्छा !

पगला गजोधर Tue, 08/18/2015 - 17:36
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
१. समजा त्यांची कथा १०१ शब्दांची असती तर तुम्ही त्यांना १ % जास्त गुण दिले असते का ? २. माझा असा समाज होता की ९९ पैशे हे ९९ पैशेच असतात, बंदा रुपया नव्हे. पण शेवटी तुमचंच राज्य आहे, हे जाणून गप्प राहतो .