Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 18/08/2015 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली शतशब्दकथा स्पर्धा पहिली फेरी १५ दिवस ८३ कथा २४३८ मतं शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार! आणि.... वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः
क्रमांक शीर्षक लेखक Wordcount Revised Votecount
1 लोकमान्य मृत्युन्जय 100 88
2 निकाल मधुरा देशपांडे 100 65
3 ईवाईन नाव आडनाव 100 58
4 वन नाईट इन द ट्रेन प्राची अश्विनी 99 55.44
5 अंतर अभ्या.. 100 55
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही. शतशब्दकथेच्या नियमानुसार बरोब्बर शंभर शब्दांत कथा बसवणं गरजेचं होतं. स्पर्धेतल्या एकूण ८३ कथांपैकी ४७ कथा बरोब्बर १०० शब्दांच्या होत्या. कथा शंभर शब्दांची नसेल तर स्पर्धेबाहेर ठेवावी असा एक मतप्रवाह होता. परंतु ही पहिल्याच स्पर्धेची पहिलीच फेरी असल्याने १०० शब्दांचा नियम काटेकोरपणे अंमलात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला. प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः
  • मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
  • मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
  • प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
हार्दिक अभिनंदन! आता प्रतीक्षा आहे परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांची!

वाचने 21218
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.
असेच म्हणतो, अभिनंदन!

In reply to by पिलीयन रायडर

आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु इच्छिते की अनेक कथा उत्तम होत्या. थोड्याफार कमी +१ ने पहिल्या ३ मध्ये नसतील तरी त्यांनी सिक्वल जरुर लिहावा.

त्याचबरोबर "आदूबाळ" ह्यांनी मनापासून घेतलेल्या परीश्रमाबद्दल त्यांचे पण मनापासून अभिनंदन....

In reply to by मुक्त विहारि

असेच म्हणते. आदूबाळ आणि इतर सासंमं सदस्यांनी धडाडीने स्पर्धा पार लावली आहे !

आणि सर्व लेखकांचे अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने अनेक उत्तम कथा वाचायला मिळाल्या आणि अनेक लेखक पुन्हा लिहिते झाले हे स्पर्धेचे महत्वाचे आणि मोठेच यश आहे. आता पहिल्या ३ स्पर्धकांनी पुढचा भाग लिहून झाल्यावर अंतीम निकाल जाहीर होईल. ही स्पर्धा संपली की बाकी सगळ्यांनी आपआपल्या कथेचा उत्तरार्ध लिहावा ही विनंती.

In reply to by सुहास झेले

+१ सर्वांचे अभिनंदन. आता मिपा बंद न पडता परिक्षकांचे निकाल आणि सिक्वल पटपट येवोत म्हणजे झाले. ;)

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. आदूबाळ तसेच संपुर्ण संपादक मंडळाचे त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीसाठी आभार..

सर्व विजेत्या बंधुभागिनी चे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील मेजवानी च्या तयारी ला लागा कसे

प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य) मधुरा देशपांडे (कथा: निकाल) प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
आँ ? मतं कमी केली आहेत तरी त्या नंबरात कशा ?

In reply to by द-बाहुबली

टोटल मतसंख्या प्रथम विचारात घेतली. त्यातून जास्तीत जास्त मते मिळवणारे ५ कथांच्या शब्द संख्या विचारात घेतल्या. बरोबर १०० शब्द असल्यास गुण कमी केले नाहीत. १०० ला जेवढे शब्द कमी असतील तेवढ्या % ने गुण कमी केले. आता पुन्हा हिशेब करा बघू. ;)

In reply to by अन्या दातार

अजुनही प्राची अश्विनी अंतीम ३ मधे कशा पोचल्या कोणी स्पष्ट करेल का ?

In reply to by बबन ताम्बे

फार साधा प्रश्न मला पडलाय ज्याचे उत्तर अजुनही कोणी देत नाहीये. नक्किच मला काहीतरी समजले नाहीये फक्त ते काय इतकेच जाणून घ्यायचे आहे. बाकी माझा प्रश्न फार सोपा व समजण्यास सुलभाजे असा अजुनही आशावाद आहे. प्रश्न असा आहे की...
प्राची अश्विनी अंतीम ३ स्पर्धकांमधे कशा पोचल्या कोणी स्पष्ट करेल का ?

In reply to by द-बाहुबली

वाच की दाद्या हे
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.

In reply to by द-बाहुबली

नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
हे वाचायचं राह्यलं का?

In reply to by आदूबाळ

होय ते वाचलं न्हवतं म्हणून माझा गोंधळ झाला. स्वारी
.

सगळ्या लेखकांचे मनापासून अभिनंदन! विजेत्यांचे विशेष अभिनंदन! या पाच कथा खरोखर सकस होत्या. आणि बाकी बहुतांश कथा चांगल्याच होत्या. अतिवास यांचे खूप आभार. त्यांनी शोधलेला हा साहित्यप्रकार लेखकाच्या लेखनक्षमतेचा कस पाहणारा आहे. आदूबाळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांना धन्यवाद. सं मं चे देखील आभार मानायलाच हवे.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! १०० शब्दांत लिहिताना खरेच कस लागतो. नवीन अनुभव मिळवून दिल्याबद्दल मिपाचेही आभार! सिक्वलच्या तयारीत असलेला.. Sandy

In reply to by चांदणे संदीप

सर्व विजेत्यांचे आभार.. लय कसा लागतो राव.. आता जबरा सिक्वल येऊ द्या ..

स्पर्धेची कल्पना खूप छान होती. आदुबाळ ह्यांचे अभिनंदन सर्व विजेत्यांचे देखील अभ्नंदन आणि पुढील लेखनाला शुभेच्छा !

प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.
१. समजा त्यांची कथा १०१ शब्दांची असती तर तुम्ही त्यांना १ % जास्त गुण दिले असते का ? २. माझा असा समाज होता की ९९ पैशे हे ९९ पैशेच असतात, बंदा रुपया नव्हे. पण शेवटी तुमचंच राज्य आहे, हे जाणून गप्प राहतो .

In reply to by पगला गजोधर

जाऊ द्या ओ पग्बुवा. चिडायला मी पाहीजे. तुम्ही का चिडताय? ;) ह. घ्या. हं. बाकी तुमच्या कथांनी आम्हाला खूप आनंद दिला. तुमच्या शतशब्दकथावर्षावानेच मिपाला स्पर्धा घ्यायची सुबुध्दी झाली त्यामुळे मी पगबुवांना सेपेरेट लाईफ टाईम अचिव्हमेंटचे सर्टिफिकेट द्यायची शिफारस करीत आहे.

In reply to by पगला गजोधर

तरी बरोब्बर १०० शब्दांत कथा लिहिणार्‍या लेखकांना न्याय मिळावा म्हणून १०० पेक्षा कमी/जास्त शब्द असलेल्या कथांची मतं त्याप्रमाणात कमी करायचा निर्णय घेण्यात आला.
१०१ शब्द असते तरी १/१०० = १% कमी झाले असते. गणिती फॉर्म्युलाच मांडायचा असेल तरः अंतिम मतसंख्या = मूळ मतसंख्या * (१ - (| कथेतले शब्द - १०० | / १००))
माझा असा समाज होता की ९९ पैशे हे ९९ पैशेच असतात, बंदा रुपया नव्हे.
खरं आहे तुमचं. वर म्हटल्याप्रमाणे असा एक मतप्रवाह होतादेखील. पण पहिलीच स्पर्धा, पहिलीच फेरी आहे म्हणून ही सवलत देण्यात आली. अर्थात, ही सवलत देण्या-न-देण्यामुळे निकालात फरक पडला नसता हे वरच्या टेबलवरून स्पष्ट आहे.

In reply to by आदूबाळ

अर्थात, ही सवलत देण्या-न-देण्यामुळे निकालात फरक पडला नसता हे वरच्या टेबलवरून स्पष्ट आहे.
No.४ would have been disqualified, otherwise.

In reply to by आदूबाळ

What is being indirectly said by you, its okay to give story with Ten, twenty, fifty words, as long as one is okay to sacrifice appropriated percentages of votes, (even though, their chances of winning is bleak) but such story is not अ फोउल.

In reply to by पगला गजोधर

सर, आपण सगळे मिपाकर आहोत ना, मग सोडून द्या वाद. संपादक मंडळाला सर्वांना सोबत घेऊन जायचय ना. :) लोकल मधे चवथी सीट शोधणाशो, मी-सौरभ

In reply to by आदूबाळ

स्पर्धेचे नियम जर रिजिड ठेवायचे नसतील तर अजून बर्‍याच शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत. कथा किती तारखेला टाकली, शुद्धलेखनाच्या चुका किती प्रमाणात ग्राह्य धरायच्या, वाचतांना कथा एकाच परिच्छेदात उरकली आहे की मांडणी पण व्यवस्थित आहे वगैरे वगैरे. आणि जर नियमा प्रमाणे निकाल लावायचा असेल तर ४. वन नाईट इन द ट्रेन ही कथा रद्द करायला पाहिजे होती. निकाल पटला नाही..

In reply to by कहर

मी या स्पर्धेतला एक स्पर्धक आहे तरीही मंडळाची माफी मागून ह्या अपेक्षा व्यक्त करीत आहे. सुरुवातीला ठरवलेले निकष, वाचकांची मतसंख्या अन परिक्षकांचे निकष निसंदिग्ध असावेत. तिथे कुणाला, कशी अन का सूट दिली हे कळावे म्हणजे अशा शंका उद्भवणार नाहीत. जवळपास सगळ्या कथा दोन भागाचा प्रथम भाग अशा होत्या. एक स्वतंत्र कथेला जास्त खुलाशांची गरज नसावी. कथावस्तू स्पष्ट असावी असा आग्रह वाचकांनी धरला नव्हताच. किंबहुना कथा म्हणजे काय हे लक्षात न घेता एखाद्या छान पॅरॅग्राफ, छान किस्सा, रंजक संवाद असेच स्वरुप बहुतांशी प्रवेशिकांचे होते. आता परिक्षकांचे निकाल येतील तेंव्हा निदान निकष स्पष्ट करावेत ही आग्रहाची विनंती. ह्या निकषांवरच पुढे येणार्‍या शतशब्दकथांचा दर्जा मोजता येणार आहे.

In reply to by अभ्या..

आमच्या अभ्याचा नंबर अगदी थोडक्यात हुकला याचं दु:ख वाटतंय. हत्तीनं माकडाला धु धु धुवून सुद्धा माकडाचा नंबर पहिला येतो कारण माकडाला जास्त एसेमेस येतात हा एक विनोद आठवला आणि स्वतःचं समाधान करुन घेतलं. (खुलासा: नंबरात आलेल्या आणि न आलेल्या बर्‍याच कथा आवडलेल्या आहेत. न आवडलेल्यांना -१ आणि काहींना मत नाही वगैरे ..... कुणालाही कु ठल्याही प्राण्याची उपमा दिलेली नाही वगैरे.... जौ दे. श्या देणारे श्या देणार, समजून घेणारे समजून घेणार.)

In reply to by अभ्या..

शिवीसंग्रहात भर टाकल्याबद्दल आभारी आहे. खात नाही. लागली नाही. ;) -निरागस

धन्यावाद मित्रांनो. परिक्षक, प्रतिसाद देणारे, वाचणारे, आदूबाळ आणि आतीवास ताई यांना धन्यवाद.

अरे वा सर्वांचे अभिनंदन! किती दिवसांमध्ये किती मत मिळाली हा देखील एक वेरिएबल असायला हवा होता असे वाटले. काही कथा उशीरा आल्यामुळे मतांच्या रेसमधे मागे पडल्या असतील तर त्यांना न्याय मिळाला असता. पोय्ये, डिझाइन, अंगार या कथादेखील उत्तम होत्या. अर्थात या कथांमधे परीक्षक निवडून देण्याचे पोटेन्शियल आहेच.पण ती सब्जेक्टिव मेथड वाटते. (आता परीक्षक मला मारतील काय?)

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मला वाटले १०० शब्दांच्या आत कथा लिहायची. (कदाचित नियम व्यवस्थित वाचले नव्हते. चक्क १४ शब्द कमी पडले). बाकी कुठली कथा अधिक सरस होती, हे सांगणे अत्यंत दुष्कर कार्य होते. परीक्षकांनी हे कार्य पार पडले, त्यांचे हि अभिनंदन.

मृत्युन्जय (कथा: लोकमान्य) मधुरा देशपांडे (कथा: निकाल) प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन! आता सिक्वेलची प्रतीक्षा आहे.

छान झाली स्पर्धा! एक नियम थोडा सैल केला आहे तर आणखी एक नियम थोडा सैल करुन अंतिम फेरीत ३ एव़जी ४ स्पर्धक घ्यावेत असे वाटते.

स्पर्धेचे आयोजक आदूबाळ आणि सर्व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार!! आतिवासताईंना या अनोख्या संकल्पनेसाठी धन्यवाद, बरोब्बर १०० शब्दात कथा लिहिताना सतत जे शब्दांचे खेळ करावे लागले, त्यात मजा आली. एकाहुन एक उत्तम शशक लिहिणार्‍या सर्व शशक लेखकांचेही अभिनंदन!! सगळ्यांनीच सिक्वेल लिहावा याबद्दल सहमत.