मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा]: प्रतिबिंब

विशाल कुलकर्णी · · स्पर्धा
अनुने हळुच समोरच्या आरशात पाहीले. आरशात तिच्याबरोबरच आणखी तीन माणसे पाठमोरी उभी होती. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात काहीतरी बोलत होते. ती स्त्री म्हणत होती, "अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी कुणाचातरी धक्का लागला. उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन ! त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. पलंगावर इतर कोणीही नव्हते. आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही वळुन आरशाकडे पाहायला लागले होते. ती स्त्री आरशाकडे बोट दाखवत त्या पुरुषाला काहीतरी सांगत होती. आणि आरशातले अभी-अनु आता पुर्णपणे विरघळुन गेले होते. विशाल...

वाचने 5724 वाचनखूण प्रतिक्रिया 33

टवाळ कार्टा 10/08/2015 - 10:53
+१

नितिन५८८ 10/08/2015 - 10:59
+१

टवाळ कार्टा 10/08/2015 - 10:59
+१

जडभरत 10/08/2015 - 11:00
हं भुते आहेत तर ही!!! छानंय!!! +१ छानंय म्हणजे भुते नव्हे कथा. पुभाप्र.

In reply to by जडभरत

नाखु 10/08/2015 - 12:06
स्वगत : विशालला कोपच्यात घ्यायला सांगायला पाहिजे सगळ्याप्रांतात घुसतोय लेकाचा!!

विशाल कुलकर्णी 10/08/2015 - 11:48
:)

प्यारे१ 10/08/2015 - 12:21
+१

नीलमोहर 10/08/2015 - 20:07
ह्याला म्हणतात इंटरेस्टिंग शशक !! भारी..

एक एकटा एकटाच 10/08/2015 - 20:07
+१

पैसा 10/08/2015 - 20:36
+१ मस्तय! विस्तार करून पण लिही नंतर.

In reply to by पैसा

विशाल कुलकर्णी 10/08/2015 - 21:13
तायडे, ऑलरेडी आहे विस्तृत कथा. वर कुणीतरी म्हटलय मिपावर वाचल्यासारखी वाटतेय. खरेच आहे ते. मधुचंद्र या नावाची कथा आहे. :)

मुक्त विहारि 10/08/2015 - 20:58
+१

योगी९०० 10/08/2015 - 22:23
+१ घ्यावा... यावरून डिंपलचा "हम कौन है" हा चित्रपट आठवला...नक्की कोण भुतं आहेत हे पुढच्या भागात काय? य

In reply to by योगी९००

हं पण काय बकवास चित्रपट होता हो. अगदी वाट लावली सगळ्यांनी मिळून. मूळ हाॅलीवूड मूव्हीच्या तुलनेत काहीच नाही.

सुहास झेले 10/08/2015 - 22:33
+१

असा मी असामी 11/08/2015 - 09:37
+१

प्रचेतस 11/08/2015 - 10:08
+१

पद्मावति 11/08/2015 - 11:01
+१

तुमचा अभिषेक 13/08/2015 - 23:02
+१

अनन्त अवधुत 14/08/2015 - 01:38
+१

निमिष सोनार 14/08/2015 - 14:07
कन्सेप्ट आवडला पण एक समजले नाही - ती स्त्री म्हणजे "अनु" का? आरशांत अनु आणि अशोक बघत होते का? पलंगावर अभी जोप्ला होता की नव्हता? अनु आणि अशोक हे दोघे भूत होते का?

चाफा 14/08/2015 - 16:52
जियो गुर्जी, मधुचंद्र चा राहीलेले ट्विस्ट वाटतं ;)