महाभारताचा पुरावा ?

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
6 Jun 2018 - 8:55 pm
गाभा: 

महाभारताचा पुरावा?

आढळले पाच हजार वर्षापूर्वींच्या महाभारत युद्धा चे अवशेष

भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजे ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.

उत्तर प्रदेशातील बाघपतमधल्या सिनौली येथे पुरातत्व खात्याला कास्ययुगातील म्हणजे तब्बल 4000 वर्षांपूर्वीच्या या वस्तू सापडल्या आहेत.
गेले तीन महिने या जागी उत्खनन सुरू असून नुकतीच याबद्दलची माहिती पुरातत्व खात्यानं दिली आहे. तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून त्या काळात या भागातील समाज योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत. कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी उत्खननात आढळल्या आहेत. शव पुरलेल्या जागी तीन रथ आढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“विशेषत: रथाच्या सापडण्यामुळे प्राचीन अशा अन्य संस्कृतींशी, नागरीकरणाशी नाळ जोडली जाते. मेसापोटेमिया, ग्रीस आदी देशांमध्येही रथांचा वापर याच सुमारास मोठ्या प्रमाणावर होत होता. या प्रदेशांमध्ये योद्धा समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता असे मानण्यास जागा आहे,” पुरातत्व खात्याच्या उत्खनन विभागाचे सहसंचालक एस चे मंजूल यांनी सांगितले.

सदर उत्खनन हे अत्यंत उत्साहवर्धक असून शवपेटिंकावर तांब्याची पिंपळाचं पान असलेली कलाकुसर आहे, जे राजघराण्यातील दफन दर्शवतं असं मंजूल म्हणाले. पानाफुलांची नक्षी असलेली या प्रकारची शवपेटिका भारतीय उपखंडात प्रथमच मिळाली आहे. हडप्पा, मोहेंजोदरो, ढोलाविरा इथेही शवपेटिका आढळल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कलाकुसर नव्हती, असे निरीक्षण मंजूल सांगतात.

या पुराव्यांमुळे भारतीय समाज चार हजार वर्षांपूर्वी किती प्रगत होता हे दिसत असल्याचं मंजूल म्हणाले. ज्यावेळी मेसापोटेमियामध्ये रथ, तलवारी, ढाली व शिरस्त्राण होती, त्याच सुमारास भारतातही या सगळ्या गोष्टी होत्या हे आता निश्चितपणे सांगता येईल. याखेरीज, मातीची व तांब्याची भांडी, कंगवे, तांब्याचे आरसे आदी गोष्टी आढळल्या असून या तत्कालिन समाजाचं राहणीमान दर्शवतात. या भागातल्या गोष्टी व हडप्पा येथे आढळलेल्या गोष्टींमध्ये साम्य नसल्याचे सांगताना दोन्ही संस्कृती व वंश वेगळे असल्याचे मत मंजूल यांनी व्यक्त केले आहे.

Source ; LetsUp Update

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jun 2018 - 10:28 pm | प्रचेतस

माझ्या माहितीप्रमाणे सदर अवशेष हे सुमारे १८०० ते २२०० वर्षापूर्वीचे आहेत.

खूपच उत्साहवर्धक आहे हे उत्खनन.

तुम्हाला कदाचित २००० ख्रिस्त पूर्व असे म्हणायचे असेल. म्हणजे ४००० साल पुराने. हे अवशेष फक्त २००० वर्षे जुने असते तर त्यांत काहीही विशेष नाही .

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

इसपूर्व १८०० ते २२०० वर्षांपूर्वीचे म्हणजेच आजपासून सुमारे ४००० वर्षांपूर्वीचे.

४००० वर्षांपूर्वीच्या तांब्याच्या मुकुटाचे अवशेष आणि इतर पुरातन वस्तू याआधीही (२०१५ मध्ये) उत्तर प्रदेशात सापडल्या आहेत.

प्रचेतस's picture

7 Jun 2018 - 8:28 am | प्रचेतस

राईट्ट,
ख्रिस्तपूर्व १८०० ते २२०० वर्षे हेच म्हणावयाचे होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहिती रोचक आहे. या महत्वाच्या संशोधनाबद्दल वाचुन लिहावे काय असे वाटत असतानाच तुमचा लेख पुढे आला. धन्यवाद !

ह्याविषयावर तुम्ही सविस्तर लिहाच. वाचायला आवडेल.

नाखु's picture

6 Jun 2018 - 11:09 pm | नाखु

जुने असतील तर मिपावर दखलपात्र होतात हे अवशेष.

जुन्या जाणत्या लोकांनी प्रकाशझोत टाकावा हीच विनंती

"मिपा उत्खनन एक अभिशाप कि वरदान"" या चर्हाट समितीकडून विनम्र निवेदन

स्वतःच गढ्ढे खोदुन त्यात ग्रीक वगैरे देशाहुन चोरुन आणलेले रथ वगैरे अवषेश पुरले आणि आपल्या पुरातत्व खात्याला खोदायला लावले. निवडणुका खरच जवळ आल्या वाटतं आता. प्राचीन संस्कृतीचा जप करायला प्रणवबाबुंच्या नागपुर भेटीचा मुहुर्त बरोब्बर पकडला संघाने.

कंजूस's picture

7 Jun 2018 - 7:44 am | कंजूस

कैच्याकै संबंध.
सापडलेल्या वस्तुंचे श्रेय अमुक एक पक्षालाच देण्याचे/घेण्याचे प्रयोजन काय?

प्रचेतस's picture

7 Jun 2018 - 8:31 am | प्रचेतस

उपरोध आहे तो.

Deserter's picture

7 Jun 2018 - 7:28 am | Deserter

26000 ख्रिस्त वर्षां जुनी असलेली कल्प विग्रह नामक विष्णू मूर्ती CIA agents कडून काही वर्षांपुर्वी नेपाल भारत सीमेवरून हस्तगत केली गेली कार्बन डेटिंग नुसार त्या मुर्तीचे वय 28600 वर्षे आहे,यामुळे विष्णु शंकर आदि देवतांचे दोन- तीन हजार वर्षांपुर्वी काही अस्तित्व नव्हते या थियरी ला छेद बसतो.

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 7:44 am | manguu@mail.com

As an archaeologist I would like to point out that the wooden chests radiocarbon date of 26,000 years B.P. does not date the idol but rather dates the wood the chest is made from. This likely represents an “old wood” problem well known to archaeologists, where the date of the sample associated with the “target” item (the idol) varies greatly in age. The heartwood of old teak can be thousands of years older then the outer wood of the same tree. Even older wood cane be found in moraines at the base of glaciers.

Mustang, a small kingdom, that once controlled the mountain passes between India/Nepal and Tibet/ China. It is these passes through which the CIA supplied Tibetan fighters against the Chinese take over with weapons in the 1950’s. Mustang is quite well dated archaeologically, due to the presence of rock-cut “Sky Tombs”, where the cold dry air has preserved many Buddhist manuscripts, wooden objects and human remains. DNA analysis and dating of human remains have shown three distinct cultural periods of occupation.

The Chokhopani Caves provide the earliest date of 3100 to 2400 B.P. and appear to be a Tibetan populations, moving southward. Bronze artifacts from India and China/Tibet are present but there is no evidence these nomadic peoples practiced Hinduism.

The Mebrak tomb complex dated to 2400 to 1850 B.P. shows a Buddhist presence and a more complex artifact assemblage and indicates the locals were involved with trade from the Indian sub-continent to the Tibetan plateau.

The following Samdzong period with dates from 1750 to 1250 B.P. shows a more full participation in the Silk Road trading network. The practice of Tibetan Sky Burial becomes common, maybe indicating contacts with Zoroastrian cultures in Persia/Afghanistan, silk artifacts become common. and many Buddhist sutras are well preserved in the Tombs.

While no doubt a treasured artifact of one of the more recent Buddhist monasteries, the Kalpa Vigraha idol is not 26,000 years old even if the box might be. It is likely 2500 years old or less and may be an image of Shiva or of one of the Tibetan mountain gods that were transferred into Tibetan Buddhism

https://www.quora.com/Where-is-Kalpa-Vigraha-the-oldest-idol-ever-known-...

Deserter's picture

7 Jun 2018 - 8:03 am | Deserter

This box and contents was sent for
carbon dating . The idol , the lining, the
rivets, the wooden slat manuscript, the
box wood, the inner organic deposits in
crevices –all were carbon dated ( C14 )
by the University of California Radiation
Laboratory, Berkeley .
यात स्पष्ट म्हटलं आहे की मुर्तीचेही डेटिंग केले गेले आहे

रमेश आठवले's picture

7 Jun 2018 - 11:05 pm | रमेश आठवले

Radicarbon dating
Stones can not be dated by Radiocarbon method, which cannot date objects older than about 50,000 years. Stones are much older in age, although some of them have carbon in them, in the form of carbonates.

***26000 ख्रिस्त वर्षां जुनी असलेली कल्प विग्रह नामक विष्णू मूर्ती CIA ***

कार्बन डेटिंग पद्धत खडकाची होते. मूर्ती घडवलेल्या काळाची?

कार्बन डेटिंग बद्दल मला जास्त काही माहीत नाही पण
या वेबसाईट वर सविस्तर पाहू शकता
ajitvadakayil.blogspot.com/2013/05/kalpa-vigraha-vishnu-idol-carbon-dated.html?m=1

माहितगार's picture

7 Jun 2018 - 9:46 am | माहितगार

धागा लेखाच्या मुख्य विषयाकडे , सिनौली बागपत येथील नवीन उत्खननाची बातमी वाचली नव्हती त्याकडे लक्ष वेधण्यासाठी धागा लेखकाचे आभार.

सिंधू संस्कृती उत्तर कालीन पण प्राचीन उत्खनन आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होणे निश्चितच रोचक आहे. हे प्राचीन आहेत हे नक्कीच कदाचित महाभारत कालीन असूही शकतील , पण महाभारता च्या मागे पुढेही अनेक राजे आणि युद्धे झाली असणार , ते अवशेष त्यापैकी कोणत्याही राजवंशजांचे असू शकतात हे ध्यानात घ्यावयास हवे. नेमका काळ कोणता आणि व्यक्ति पार्श्वभूमीसाठी साठी कार्बन डेटींग आणि जेनेटीक अ‍ॅनालिसीस इत्यादी रिपोर्टसाठी थांबावे लागेल.

रथांचे साहित्यिक उल्लेख होते पण पुरातत्वीय पुरावे उपलब्ध नव्हते ती पोकळी या उत्खननामुळे नक्कीच भरुन निघाली. ईतर शस्त्रे मिळाली पण धनुष्य बाण याचा या अवशेषात समावेश का नसावा (चुभूदेघे) या बद्दल प्रश्न पडला .

या अवशेशातील शवपेटीका कलाकुसरयुक्त असल्याचे उल्लेख दिसताहेत. महाभारतात अशा शवपेटीकेचे उल्लेख आहेत का माहित नाही. सिनौली बागपत रामायण दिशेत बहुधा नसावे . वाल्मिकी रामायणातील शिबीका उल्लेख असलेले वर्णने बर्‍यापैकी प्राचीन काळात जोडली गेली असली तरी मला ती प्रक्षिप्त वाटतात. वाल्मिकी रामायणातील शिबीका उल्लेख नॉर्मल व्यक्तीस वाहून नेण्याची पालखी आणि शव वाहून नेण्याची व्यवस्था या दोन्ही अर्थानी येत असावेत . (संदर्भ वाल्मिकीरामायण.नेट , चुभूदेघे) . मुख्य म्हणजे या
वर्णनांमध्ये शिबीकांवर कला कुसर केली असल्याचे उल्लेख दिसतात. शिबिका शब्द शिवण (विणकाम ) पासूनच विकसीत झाला असण्याची एक शक्यता असू शकते तेव्हा कला कुसर असणे स्वाभावीक असावे. रामायण अथवा रामायण कालीन नसले तरी एखादा उल्लेख साधर्म्य नोंद घेण्या जोगे असू शकावे असे वाटते.

माहितगार's picture

7 Jun 2018 - 4:45 pm | माहितगार

वालीच्या अंत्य संस्काराच्या साठीच्या शिबिकेवरच्या कलाकुसरी वर्णन किष्किंधा कांडात ४-२५-२२
ते ४-२५-२६
येते पण ते क्रिटीकल एडीशन मध्ये नसल्याची खाली नोंद आहे.

सुंदरकांडात विवीध आकाराच्या शिबीका उपयोगात असल्याची नोंद आहे. संदर्भ ५-६-३६

महाभारत कुंभकोणम आवृत्तीतील संदर्भ

रुक्मपङ्कजपुष्पाणि शिबिका मणिभूषिताः.
मुकुटानि महार्हाणि रत्नगर्भांश्च कङ्कणान् ||२-३४-८१ (१२८००)

(डिसक्लेमर : अर्थ आणि काँटेक्स्ट जाणकारांनी उपलब्ध करावा; अर्थ आणि काँटेक्स्ट मला माहित नाही, क्षमस्व )

कपिलमुनी's picture

7 Jun 2018 - 10:06 am | कपिलमुनी

माहिती चांगली आहे.
पुरातत्व खाते आणि पुराण यात गल्लत करू नये.

माहितगार's picture

7 Jun 2018 - 12:55 pm | माहितगार

पुरातत्व खाते आणि पुराण यात गल्लत करू नये.

सहमत ( मी अशी गल्लत करतोय असा आपला समज नसावा असे वाटते .)

कपिलमुनी's picture

8 Jun 2018 - 12:55 am | कपिलमुनी

प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही . धागाकर्त्याने महाभारताचा जो संबंध जोडला आहे त्याशी आहे.
2005 मध्ये या साईटच्या आसपास या पद्धतीचे उत्खनन होऊन अशा वस्तू सापडल्या आहेत.

एक मिपा टीम तिकडे जायला हवी.

कंकाका हा अभिप्राय मात्र एकदम भारी आहे . जब्बरदस्त बोले तो एकदम जब्बरदस्त . मी लगेच ते अनुभवून बघितले . मिपा टीम आणि त्यांचे वादविवाद , त्यांचे विश्लेषण , त्यांचे प्रतिसाद इ इ .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आम्ही तयार आहोत बुवा तुमच्या सोबत टिममध्ये जॉईन होण्यासाठी :))

डँबिस००७'s picture

7 Jun 2018 - 12:34 pm | डँबिस००७

मिपा टिम ला कुठेही जायची गरज नाही, महाभारतातल्या संजय सारख ईथे बसुनच त्यांना सर्व दिसत व कळतही !

साहना's picture

7 Jun 2018 - 12:38 pm | साहना

Comments of Dr Achar on Bhatnagar's and Rejoinder by Bhatnagar published in IJHS
http://insa.nic.in/writereaddata/UpLoadedFiles/IJHS/Vol53_1_2018__Art09.pdf
INSA IJHS Link for Published MB Paper of Ashok K. Bhatnagar
http://insa.nic.in/writereaddata/UpLoadedFiles/IJHS/Vol52_4_2017__Art01.pdf

महाभारताच्या कालावधीला ह्या शोधामुळे थोडी फार बळकटी मिळते. अनेक संशोधकांनी महाभारताचा कालखंड २०० ख्रिपु ते ८००० ख्रि पूर्व पर्यंत मांडला आहे पण डॉक्टर आचार ह्यांच्या संशोधना प्रमाणे हा कालावधी ३०६० होय.

Krishna’s departure (Revati)->Full Moon(Kartika, Lunar eclipse)-> Krishna-Karna ride(Uttaraphalguni)->Amavasya (at Jyeshtha, solar eclipse)-> war (does not begin on an amavasya).

This peculiar and rather unique sequence of events is simply not replicable in any other Date other than 3067 BCE.

माहितगार's picture

7 Jun 2018 - 1:03 pm | माहितगार

ग्रह तार्‍यांवरुन केलेल्या भाकीतांना पूर्ण नाकारता येत नाही, कारण उल्लेख खरे आणि भाकीते अचूक असूही शकतील; -खास करुन प्रक्षिप्तता विषयावर संस्कृत ग्रंथां बद्दल मनमोकळे संशोधन करण्यास भारतीय लोक फारसे उत्साही नसतात, तेव्हा - त्याच वेळी ग्रह तार्‍यांवरुन केलेल्या भाकीतांना पूर्ण स्विकारणे कठीण जाते कारण संस्कृत ग्रंथात प्रक्षिप्तता शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहेत, कोणतेही शुभाशुभ मुहुर्ताचे किंवा शुभाशूभ न पाहता ग्रह तार्‍यांचे उल्लेख काल्पनिक रित्या जोडले गेले नसतील हे ही सांगणे कठीण जाते ..

प्रा नरहरी आचार यांचा माझा परिचय २० वर्षांपासून आहे. गेल्या वर्षी मुंबईला झालेल्या एका परिषदेत त्यांनी 'महाभारत युद्ध' या विषयावर शोध निबंध वाचला व त्यात ख्रि. पू. ३०६७ हा महाभारताचा काळ हे मत पुन्हा प्रतिपादित केले. या विषयावरील त्यांचे एक पुस्तकही त्यांनी मला तेव्हा भेट म्हणून दिले. प्रा आचार यांच्या या मताला जाणकार मंडळीत मान्यता आहे. परंतु गेल्या काही वर्षात निलेश नीळकंठ ओक या नावाचे एक स्वतंत्र अभ्यासक पुढे येत आहेत. पुण्याचे प. वि. वर्तक यांनी मांडलेली ख्रि. पू. ५५६१ हि तारीख त्यांना अधिक योग्य वाटते. या विषयावर ते आणि प्रा. आचार यांच्यात बराच वादही चालू आहे. श्री.ओक यांच्याशी माझी गाठ मागील वर्षी चेन्नई येथे झालेल्या स्वदेशी इंडोलॉजी ((Organized by Rajiv Malhotra) पर्रिषदेत झाली. महाभारत युद्ध या विषयावरील त्यांच्या पुस्तकाची pdf प्रत त्यांनी मला तेव्हा दिली. माझा स्वतःचा या विषयावर अभ्यास नसल्यामुळे या दोघात कोण बरोबर आहे हे सांगता येत नाही. सूज्ञ व जाणकार मिपाकरांनी प्रा. आचार यांचा पुढील लेख वाचावा-- (http://www.pragyata.com/mag/mahabharata-war-date-rebuttal-to-claim-of-55...). श्री. ओक यांच्या पुस्तकाची pdf प्रत मला व्य. नि. पाठवला तर मी ती email ने पाठवू शकतो.

पण याचा महाभारताशी कसा संबंध यतो? फक्त ऊत्सुकता म्हणून विचारतो आहे?

पुरातत्व विशेषज्ञांनी अद्याप असा कोणताही दावा निष्कर्ष काढलेला नाही, एवढ्या मर्यादीत महितीवर अशी अपेक्षा करणेही रास्त नसावे. काही उत्साही लोकांचा उत्सुक उत्साहा मुळे होणारे दाव्यातील भावनिकता समजून घेण्यास हरकत नसावी.

दीपक११७७'s picture

7 Jun 2018 - 3:20 pm | दीपक११७७

याचे फोटो पण पाहावयास मिळले तर बरे होईल.

दीपक११७७'s picture

11 Jun 2018 - 12:11 pm | दीपक११७७

सन्यस्त खड्ग साहेबांची माफी मागून , चला आपण या महाभारताची नाळ जरा मिपाशी जोडून बघूया . थोडा विरंगुळा म्हणून . अशा करतो कि आपण सारे कुणालाही ना दुखावता , महाभारतातील पात्र , या इथे मंचावर जे प्रतिसाद देतात , त्यांच्याशी जोडून बघूया .. तर मी सुरुवात करतो

मला माझा मित्र अभ्या.. , हा महाभारतातल्या कृष्णाप्रमाणे वाटतो . खोडकर , मुत्सद्दी आणि बराच काही .. आता त्याने किंवा इतरांनी महाभारतातील पात्र , या इथे मिपाकरांशी जोडून बघावं आणि सांगावं . काळजी घ्या कुणी दुखावलं जाणार नाही याची . फक्त पात्रापुरतंच मर्यादित राहू द्या हे ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मी स्वत:स महर्षी व्यास म्हणून घोषित करतो आहे. कारण मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे.

-गा.पै.

भंकस बाबा's picture

11 Jun 2018 - 7:14 pm | भंकस बाबा

यावर सर्व मिपाकारांचे एकमत असावे.

खिलजि's picture

11 Jun 2018 - 5:38 pm | खिलजि

गा पै तुम्हीतर सिक्सर मारलात सुरुवातीलाच . मला वाटत इथेच सामना संपला आहे . पहिल्या चेंडूंतच समाप्त .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सोमनाथ खांदवे's picture

12 Jun 2018 - 8:26 am | सोमनाथ खांदवे

युद्धाची पार्श्वभूमी असलेले चित्रपट / सिरीयल पाहताना सैनिकांवर लक्ष केंद्रित केले की मजा येते .
कुठल्याही ऐतिहासिक चित्रपट / टी व्ही सिरियल मध्ये दिसणारे दृश्य .मुख्य योध्ये त्वेषाने एकमेकांवर तलवारीने वार करत असतात , दोघेही रक्तबंबाळ झालेले असतात , त्यांच्या संवादातून एकमेका बद्दल द्वेष दिसत असतो .

अशा संघर्षमय प्रसंगी मुख्य कलाकारांच्या आजूबाजूला लढत असलेले सैनिक एकमेकांशी तलवारीने टुकू टुकू खेळत असतात व हावभाव मात्र कसा तरी दिवस भरून रोजंदारी कधी भेटतेय असे असतात . " काल 500 रु देतो म्हणाले होते , आणि संध्याकाळी 300 च दिले ना राव " "जाऊ दे तीनशे तर तीनशे "
असे सैनिक आम्ही .

धर्मराजमुटके's picture

12 Jun 2018 - 9:42 am | धर्मराजमुटके

हवेतून उडणारी विमाने, पर्जन्यास्त्रे, आग्नेयास्त्रे, मारुतीच्या भू:भुकाराने शत्रुकळपातील स्त्रियांचे नाश पावणारे गर्भ याकडे चर्चा वळल्यानंतरच धाग्याचे संपुर्णपणे महाभारत झाले असे म्हणता येईल :)

रमेश आठवले's picture

12 Jun 2018 - 9:34 pm | रमेश आठवले

कुरुक्षेत्र या सध्याच्या हरयाणात असलेल्या स्थानी महाभारतातील युद्ध झाले असे आपण मानतो. पण तेथे हत्ती, मनुष्य, घोडे यांच्या अस्थी अथवा रथाची चाके , तलवारी, बाण, गदा या सारख्या वस्तुंचे महाभारत कालीन अवशेष सापडल्याचे वाचनात आलेले नाही.

भीमाची गदा मिळाली कि मला आधी कळवा ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी

रमेश आठवले's picture

13 Jun 2018 - 7:08 am | रमेश आठवले

दुर्योधनाची मिळाली तर चालेल का ?

शकुनीचे फासे मिळाले कि मला कळवा ? परत द्यूतक्रीडा चालू करायच्या विचारात हाय .

रमेश आठवले's picture

13 Jun 2018 - 8:41 pm | रमेश आठवले

द्रौपदची थाळी सापडली तर ती लाखो शाळकरी मुलांना दुपारचे जेवण देणाऱ्या अक्षय पात्र या संस्थेला देण्याचा मनसुबा आहे.
https://www.ndtv.com/video/shows/walk-the-talk/walk-the-talk-with-founde...

रमेश आठवले's picture

18 Jun 2018 - 8:59 pm | रमेश आठवले

कौरव पांडवांच्या युद्धाचे वर्णन दूर बसून आंधळ्या धृतराष्ट्राला सांगणाऱ्या संजयच्या मोडेम साठी कोणी मिपाकर मागणी करेल असे वाटले होते.