महाभारताचा पुरावा ?
महाभारताचा पुरावा?
आढळले पाच हजार वर्षापूर्वींच्या महाभारत युद्धा चे अवशेष
भारतीय संस्कृती प्राचीन काळी किती पुढारलेली होती, नागरीकरण कसं होतं, जगातल्या अन्य संस्कृतींच्या इतकी प्राचीन भारतीय संस्कृती आहे का अशा अनेक प्रश्नांबद्दल अनेक मतं व्यक्त होत असतात. परंतु आता पुरातत्व खात्याच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून एक गोष्ट निश्चित स्पष्ट होत आहे ते म्हणजे चार हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये रथ होते, तलवारी होत्या, शिरस्त्राणं होती, खंजीरासारखी शस्त्रे होती आणि विशेष म्हणजे ही सगळी युद्धामध्ये लागणारी शस्रसंपदा तांबे व कास्य धातूंपासून बनवण्याची कला तत्कालिन भारतीयांनी साधली होती.
उत्तर प्रदेशातील बाघपतमधल्या सिनौली येथे पुरातत्व खात्याला कास्ययुगातील म्हणजे तब्बल 4000 वर्षांपूर्वीच्या या वस्तू सापडल्या आहेत.
गेले तीन महिने या जागी उत्खनन सुरू असून नुकतीच याबद्दलची माहिती पुरातत्व खात्यानं दिली आहे. तलवारी व खंजीरांसारख्या गोष्टींवरून त्या काळात या भागातील समाज योद्धा होते हे स्पष्ट होते. या उत्खननामध्ये एकूण आठ शव पुरण्याच्या जागा आढळल्या आहेत. कला कुसर केलेल्या अनेक वस्तू, तीन शवपेटिका, मोठ्या तलवारी, खंजीर, कंगवे आदी गोष्टी उत्खननात आढळल्या आहेत. शव पुरलेल्या जागी तीन रथ आढळले असून राजघराण्यातील व्यक्तिंच्या दफनाची शक्यता सूचित होत आहे. या ठिकाणी आढळलेल्या सगळ्या गोष्टी तत्कालिन समाज योद्धा होता असे दर्शवतात असे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“विशेषत: रथाच्या सापडण्यामुळे प्राचीन अशा अन्य संस्कृतींशी, नागरीकरणाशी नाळ जोडली जाते. मेसापोटेमिया, ग्रीस आदी देशांमध्येही रथांचा वापर याच सुमारास मोठ्या प्रमाणावर होत होता. या प्रदेशांमध्ये योद्धा समाज मोठ्या प्रमाणावर राहत होता असे मानण्यास जागा आहे,” पुरातत्व खात्याच्या उत्खनन विभागाचे सहसंचालक एस चे मंजूल यांनी सांगितले.
सदर उत्खनन हे अत्यंत उत्साहवर्धक असून शवपेटिंकावर तांब्याची पिंपळाचं पान असलेली कलाकुसर आहे, जे राजघराण्यातील दफन दर्शवतं असं मंजूल म्हणाले. पानाफुलांची नक्षी असलेली या प्रकारची शवपेटिका भारतीय उपखंडात प्रथमच मिळाली आहे. हडप्पा, मोहेंजोदरो, ढोलाविरा इथेही शवपेटिका आढळल्या होत्या, परंतु त्यांच्यावर कलाकुसर नव्हती, असे निरीक्षण मंजूल सांगतात.
या पुराव्यांमुळे भारतीय समाज चार हजार वर्षांपूर्वी किती प्रगत होता हे दिसत असल्याचं मंजूल म्हणाले. ज्यावेळी मेसापोटेमियामध्ये रथ, तलवारी, ढाली व शिरस्त्राण होती, त्याच सुमारास भारतातही या सगळ्या गोष्टी होत्या हे आता निश्चितपणे सांगता येईल. याखेरीज, मातीची व तांब्याची भांडी, कंगवे, तांब्याचे आरसे आदी गोष्टी आढळल्या असून या तत्कालिन समाजाचं राहणीमान दर्शवतात. या भागातल्या गोष्टी व हडप्पा येथे आढळलेल्या गोष्टींमध्ये साम्य नसल्याचे सांगताना दोन्ही संस्कृती व वंश वेगळे असल्याचे मत मंजूल यांनी व्यक्त केले आहे.
Source ; LetsUp Update
याद्या
16276
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
माझ्या माहितीप्रमाणे सदर
तुम्हाला कदाचित २००० ख्रिस्त
In reply to माझ्या माहितीप्रमाणे सदर by प्रचेतस
इसपूर्व १८०० ते २२००
In reply to माझ्या माहितीप्रमाणे सदर by प्रचेतस
राईट्ट,
In reply to इसपूर्व १८०० ते २२०० by डॉ सुहास म्हात्रे
माहिती रोचक आहे. या
ह्याविषयावर तुम्ही सविस्तर
In reply to माहिती रोचक आहे. या by डॉ सुहास म्हात्रे
किती वर्षं
मोदि/भाजप शेवटी या पातळीवर उतरले तर
कैच्याकै संबंध.
In reply to मोदि/भाजप शेवटी या पातळीवर उतरले तर by अर्धवटराव
उपरोध आहे तो.
In reply to कैच्याकै संबंध. by कंजूस
कल्प विग्रह
As an archaeologist I would
In reply to कल्प विग्रह by Deserter
This box and contents was
In reply to As an archaeologist I would by manguu@mail.com
Radicarbon dating
In reply to This box and contents was by Deserter
***26000 ख्रिस्त वर्षां जुनी
कार्बन डेटिंग बद्दल मला जास्त
शवपेटीवरील कलाकुसर
रामायणातील संदर्भ
In reply to शवपेटीवरील कलाकुसर by माहितगार
महाभारत कुंभकोणम आवृत्तीतील संदर्भ
In reply to शवपेटीवरील कलाकुसर by माहितगार
छान
सहमत
In reply to छान by कपिलमुनी
तुम्हाला
In reply to सहमत by माहितगार
एक मिपा टीम तिकडे जायला हवी.
कंकाका हा अभिप्राय मात्र एकदम
In reply to एक मिपा टीम तिकडे जायला हवी. by कंजूस
आम्ही तयार आहोत बुवा तुमच्या
In reply to एक मिपा टीम तिकडे जायला हवी. by कंजूस
मिपा टिम ला कुठेही जायची गरज
Comments of Dr Achar on
असो
In reply to Comments of Dr Achar on by साहना
महाभारत युद्ध ख्रि. पू. ३०६७ का ख्रि. पू. ५५६१?
In reply to Comments of Dr Achar on by साहना
पण याचा महाभारताशी कसा संबंध
पुरातत्व विशेषज्ञांनी अद्याप
In reply to पण याचा महाभारताशी कसा संबंध by शाली
याचे फोटो पण
या संशोधनासंबंधीची चित्रफीत
In reply to याचे फोटो पण by दीपक११७७
५००० वर्ष
५००० वर्ष
सन्यस्त खड्ग साहेबांची माफी
मी स्वत:स महर्षी व्यास म्हणून घोषित करतो
In reply to सन्यस्त खड्ग साहेबांची माफी by खिलजि
शकुनी कोण?
In reply to मी स्वत:स महर्षी व्यास म्हणून घोषित करतो by गामा पैलवान
:D:D:D:D
सैनीक आम्ही
विमाने
कुरुक्षेत्र ?
भीमाची गदा मिळाली कि मला आधी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारीदुर्योधनाची ?
शकुनीचे फासे मिळाले कि मला
द्रौपदची थाळी
संजयचा मोडेम
In reply to द्रौपदची थाळी by रमेश आठवले