बाहेरची भानगड

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 1:30 am

गोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला "affairs expert" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते.

लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ही ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता)

१. जोडीदारामध्ये एकमेकांच्या फोनचा पासवर्ड असतो का ? असला तर आपण कधी कधी फोन मेसेजेस पाहता का ?
२. आपला जोडीदार नक्की कुठे किती पैसे खर्च करतो/करते (मोठे खर्च जसे विमानाची तिकिटे इत्यादी) ह्याची माहिती आपणास असते का ?
३. एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांचे बाहेर काही प्रकरण होते असे ऐकू आले का ? मग जोडीदाराला त्याची माहिती कशी पोचली ?

आणखीन काहीही माहिती असली तरी इथे चिकटवून द्या .

धोरणभाषांतर

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jun 2018 - 12:53 pm | अविनाशकुलकर्णी

माझ्या बायकोचा नवरा ही शिरील टी व्ही वर लागते
ती बघा बहुतेक प्रष्णांची उत्तरे मिळतील

सुखी's picture

4 Jun 2018 - 6:46 pm | सुखी

खीक

सुबोध खरे's picture

4 Jun 2018 - 6:53 pm | सुबोध खरे

लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती
लग्न करा आपोआप बऱ्याच गोष्टी समजून येतील.

आणखीन काहीही माहिती असली तरी इथे चिकटवून द्या . >> मग या माहितीचे काय करणार ?

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2018 - 1:50 am | पिवळा डांबिस

मग या माहितीचे काय करणार ?

माहिती वाचवाचून "बहुश्रुत' बनणार!!!! ;)

यशोधरा's picture

5 Jun 2018 - 9:03 am | यशोधरा

=))

नाखु's picture

5 Jun 2018 - 9:28 am | नाखु

संकलन करून "सावध ऐक पुढल्या हाका" या नावाने प्रसिद्ध करण्यात येऊ शकतो

अखिल मिपा "धरलं तर चावतय, सोडलं तर पळवतंयच" या विवाहोच्छुक,लग्नाळू बधीर संघाच्या मुखपत्रातून साभार

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 8:21 pm | श्वेता२४

एकदम सहमत. यावर चर्चा करून काय निष्पन्न होणार?

१. जोडीदारामध्ये एकमेकांच्या फोनचा पासवर्ड असतो का ? होय. असला तर आपण कधी कधी फोन मेसेजेस पाहता का ? नाही. स्वतःचेच मेसेजेस वेळेवर पाहिले जात नाहीत तर दुसर्‍याचे कशाला बघणार?
२. आपला जोडीदार नक्की कुठे किती पैसे खर्च करतो/करते (मोठे खर्च जसे विमानाची तिकिटे इत्यादी) ह्याची माहिती आपणास असते का ? होय. कारण जोडीदारालाच ते आम्हाला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही!!
३. एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांचे बाहेर काही प्रकरण होते असे ऐकू आले का ? मग जोडीदाराला त्याची माहिती कशी पोचली ? नाही. आमची जोडीदार असल्या फालतू गोष्टी आमच्यापर्यंत आणत नाही.

गामा पैलवान's picture

5 Jun 2018 - 5:28 pm | गामा पैलवान

साहना,

ही घ्या काही उत्तरं :

१. जोडीदारामध्ये एकमेकांच्या फोनचा पासवर्ड असतो का ? असला तर आपण कधी कधी फोन मेसेजेस पाहता का ?

एकमेकांच्या फोनांचे पासवर्ड कशाला पाहिजेत? आपापल्या भानगडींसाठी जोडप्यांनी सामायिक फोन वापरावा. लपाछपी नकोच मुळी.

२. आपला जोडीदार नक्की कुठे किती पैसे खर्च करतो/करते (मोठे खर्च जसे विमानाची तिकिटे इत्यादी) ह्याची माहिती आपणास असते का ?

माहिती असली किंवा नसली तरी कोण काय उपटणार आहे?

३. एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांचे बाहेर काही प्रकरण होते असे ऐकू आले का ? मग जोडीदाराला त्याची माहिती कशी पोचली ?

हल्ली लोकांना आपापली प्रकरणं लक्षांत ठेवायला जड जातं. इतरांच्या लफड्यांना कोण विचारतो!

असो.

तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्नाचे बंधन नसल्याने या विषयाची तुमची माहिती शून्य आहे. परंतु लग्न न करता सुद्धा या विषयाची माहिती मिळू शकते. ती लफडा एक्स्पर्ट बाई हेच प्रशिक्षण पुरवते.

आ.न.,
-गा.पै.

अनन्त अवधुत's picture

6 Jun 2018 - 12:53 am | अनन्त अवधुत

इतके पैसे खर्च होत असताना कळले कसे नाही जोडीदाराला ??
तुमच्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर या एका घटनेत आहे. :D
सुंदर तरुणीसोबत डेटिंगसाठी विवाहित बँकरने मोजले १२ लाख

लग्नाचे बंधन नसल्याने >> छान. हुशार आहात!

===
३. एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांचे बाहेर काही प्रकरण होते असे ऐकू आले का ? मग जोडीदाराला त्याची माहिती कशी पोचली ? >> हो आहेत की. जोडीदाराला स्वतःच सांगितलं.

घटस्फोट न घेता दुसरं लग्न करणारेपण आहेत आमच्या ओळखीत ;)