मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.

आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.

आलमगिर · · पाककृती
खुपदा असं होत की नुस्ता वरण भात खायचा कंटाळा येतो त्यासाठी ही वरणाचीच पाककृती. वरण- १वाटी तूप ३ते ४ चमचे जिरे , मिरची,मीठ चवीनुसार. कृती एकदम सोप्पी तुप-जिरे-मिरचीची फोडणी करुन वरणावर घालायची मिश्रण एकजीव करायचे आणी गरम भात/पोळीशी खावयाचे.

श्वेता२४ 03/06/2018 - 15:42
आमच्याकडे नुसतं वरण म्हणजे डाळ शिजवायला लावतानाच त्यात जिरे हळद तेल घालतात आणि डाळ शिजल्यावर त्यात हिंग हळद मीठ किंचित गुळ घालतात . मी तर हे सगळंच एकदम घालून डाळ शिजवते म्हणजे भातावर डाळ आणि तूप घेतलं कि पूर्णान्न! तुमची मिरचीच फक्त नाही यात

In reply to by आलमगिर

श्वेता२४ 03/06/2018 - 23:20
तूप जिरे मीरचिची फोडणी जमणे हाच जर main twist होता तर पा कृ मध्ये सविस्तर फोटोसाहित टाकलं असतं तर या ट्विस्ट मध्ये आम्हिही पारंगत झालो असतो

अभ्या.. 03/06/2018 - 15:46
आज्जी मॅगी करायच्या का? असल्यास ती पाकृ कितव्या नंबराला येणारे? मला पुरणपोळीपासून सावजी मटणापर्यंत सारे येते फक्त मॅगी शिकायचे राहिलेय...तेंव्हा जरा..

In reply to by अभ्या..

निशाचर 04/06/2018 - 04:59
मला पुरणपोळीपासून सावजी मटणापर्यंत सारे येते फक्त मॅगी शिकायचे राहिलेय
मग आम्हाला सावजी मटण शिकवून दुवा घ्या की...

प्रचेतस 03/06/2018 - 15:53
खुपदा असं होत की नुस्ता चहा करायचा कंटाळा येतो त्यासाठी ही चहाचीच पाककृती. चहापत्ती - अर्धा चमचा साखर - १ चमचा कृती एकदम सोप्पी-चहापत्ती आणि साखर एकत्र करायची आणि हातावर घेऊन एकदम तोंडात टाकून चावायची. चहाची तल्लफ भागते.

श्वेता२४ 03/06/2018 - 16:30
कुणी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत कस करायचं याची पाकृ टाका

श्वेता२४ 03/06/2018 - 23:25
चहा शेजारी जाऊन प्यायचा , सरबत गाड्यावर जाऊन प्यायचं. तरी बरं फोडणीचा ट्विस्ट जमलं नाही तर हा वरण भात हॉटेलात जाऊन खा म्हणून नाही सांगितलंत

जागु 04/06/2018 - 11:29
१) वरणाची डाळ शिजत लावून त्यात जिरे, हिंग हळद घालून शिजल्यावर मिठ घालून मिरच्या कोथिंबीर घालायची. कधीतरी चेंज म्हणून लसुण व टोमॅटोही टाकते. २) एक फोडणीच वरण त्यात फोडणीला लसुण, राई, जिर, हिंग हळद, मिरची, कढीपत्ता घालून शिजल्यावर टोमॅटो, मिठ, कोथिंबीर, थोड ओल खोबर घालते ३) आंबट वरण करताना थोडी तुरडाळ व थोडी मुगडाळ शिजवून त्यात हिंग, हळद, मसाला घालून हवे ते जिन्नस म्हणजे बटाटा किंवा सुरण घालून मग त्यात चिंच किंवा कोकम, गुळ, मिठ घालून शिजल्यावर वरून फोडणी देते. फोडणीत राई, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे घालूण थोडी करपट फोडणी घालते. ही खमंग असते फोडणी.

In reply to by जागु

श्वेता२४ 04/06/2018 - 12:27
आंबट वरण करताना थोडी तुरडाळ व थोडी मुगडाळ शिजवून त्यात हिंग, हळद, मसाला घालून हवे ते जिन्नस म्हणजे बटाटा किंवा सुरण घालून मग त्यात चिंच किंवा कोकम, गुळ, मिठ घालून शिजल्यावर वरून फोडणी देते. फोडणीत राई, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे घालूण थोडी करपट फोडणी घालते. ही खमंग असते फोडणी. वरुन फोडणी कधी दिली नव्हती . करुन बघते. धन्यवाद वेगळी टीप दिल्याबद्दल

मनिमौ 04/06/2018 - 15:54
मॅगीचि कृती मिळाली तर मला बी हवीच आहे. झालच तर बोर्नविटा, टॅन्ग सरबताची पाकक्रुती मिळाली तर धागालेखकाचे जाहीर आभार मानण्यात येतील

वाचने 9495 वाचनखूण