नोकरी मिळवताना २) रेस्युमे सर्वसामान्य माहिती - हेडर
मागील लेख
http://www.misalpav.com/node/42558
http://www.misalpav.com/node/42654
रेस्युमे मध्ये काही सर्वसामान्य माहिती द्यावी लागते. या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .
हे आहे
१)नाव ( पूर्ण) - हे मोठ्या फॉन्ट मध्ये बोल्ड करून लिहा
२) जन्मतारीख
३)वय ( हे जन्म् तारखे वरुन काढता येते - पण असलेले बरे)
४) लिंग
५) लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले
संपर्क -
६)मोबाईल फोन नंबर
७)इतर फोन नंबर ( असेल तर)
८)इ मेल
९)पत्ता ( लोकल )
१०)पत्ता ( मूळ )
सोशल मेडिया
११)लिंकडीन
१२) फेसबुक ( जरुरी नाही पण जर फेसबुक ठीक असेल तर लिंक द्यावी - अनेकदा उमेदवाराची सोशल प्रोफाईल बघतात. चुकीची प्रोफाईल बघण्य पेक्षा योग्य लिंक दिलेली बरी .)
१३) इतर सोशल नेटवर्क - जर कामाशी सम्बन्ध असेल तर. जर वाचनीय ब्लॉग लिहीत असाल तर लिंक द्यायला हरकत नाही
आता काही टिप्स
१)नाव - पूर्ण लिहा . मला एकदा एका मराठी इंटरव्युव्हर ने वडिलांचे नाव लावायला लाज वाटते का असे विचारले होते.
२)जन्मतारीख - फक्त आकड्यात लिहिल्यास गोंधळ होऊ शकतो . तारीख -अक्षरी महिना - मग वर्ष असे लिहा
३)वय - जवळची एक तारीख ( शक्य तो वाढ दिवसाची ) घेवून त्या दिवशी काय वय असेल ते लिहा उदा - . ( Age - 25 as Of July 15, 2018)
४)लिंग - खूप जण विसरतात . आपल्याला वाटते कि नावावरून कळेल कि नाही, पण इतर प्रांतातील लोक, विदेशी लोक, सोफ्टवेअर यांना कळत नाही,
५)Marital Status - Simple ठेवा – उदा - Unmarried / Married / Married with one son and one daughter
६)मोबाईल फोन नंबर - विदेशी नोकरी चा चान्स असेल तर पूर्ण लिहा - +९१- टाकून
७)इ मेल - प्रोफेशनल वाटेल असा आय डी घ्या . नाव - पुढे आकडा किंवा अर्थपूर्ण शब्द. शक्यतो जी मेल. आणि आपण काम करीत असतो तिकडचे मेल आजिबात नको! raunchyrahul, sensualdude असले आय डी मी बघितले आहेत ...
८)पत्ता ( लोकल ) पत्ता ( मूळ ) - पत्र येईल इतपत च द्या . मुलीनी डिटेल मध्ये पत्ता देवू नये. पण द्यावा . कोठले मूळ आहे वगैरे विचारले जाते अनेकदा.
सोशल मेडिया - लिंकडीन - नोकरी शोधताना अत्यंत म्ह्तेअचे सोशल नेटवर्क . या वर शक्यतो एक डिटेल प्रोफाईल टाका . नन्तर या वर एक लेखच टाकीन
फेसबुक - या वर पण डिटेल मध्ये लिहीन . फेसबुक प्रोफाईल अनेकदा बघितली जाते . जर ठीक प्रोफाईल असेल तर लिंक द्यावी या मताचा आहे.लिंक देताना ती छोटी आणि निट करता येते - तशी करावी.
https://www.facebook.com/help/329992603752372/
हि बरीच माहिती आहे जी जागा अडवते . तर मी एक फॉर्म्याट पहिले कि कमीत कमी जागेत हि सर्व माहिती बसवता येते . मला आवडले म्हणुन देत आहे .
खालील फोटो पहा. हे मी
Left Justified, Centre Justified and Right Justified अशा तिन्ही प्रकारे देत आहे.
https://photos.app.goo.gl/xPdATg7lWvPGoP2V2
आणि हा रेस्युमे वर रेस्युमे , बायो डेटा , करिक्युलम व्हिएटे असे काहीही टायटल देऊ नका , जागा महत्वाची आहे आणि रेस्युम हे डॉक्युमेंट पाहून रेस्युम आहे ते सहज कळते.
पुढील भागात आपण रेस्युमे चा महत्वाचा भाग म्हणजे माहिती कशी द्यावी हे बघू,
धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com
https://naukrishodh.blogspot.in/
वर्गीकरण
वाचने
6264
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
रेस्युमे चा फोटो टाकला आहे का
सहज सोप्या पद्धतीने माहिती
छान
खुपच महत्वाची माहिती देत आहात
मस्त माहिती आहे. अनेकजनांना
हे भारतातील नोकरीच्या शोधासाठी आहे का फक्त?
In reply to हे भारतातील नोकरीच्या शोधासाठी आहे का फक्त? by लंबूटांग
भारतात देखील मुले किती असे
Career Objective लिहावे कि
In reply to Career Objective लिहावे कि by कानडाऊ योगेशु
छान
In reply to छान by manguu@mail.com
Spot On - Perfect
रेझ्युमे, सी.व्ही., बायोडेटा यांत फरक काय?
In reply to रेझ्युमे, सी.व्ही., बायोडेटा यांत फरक काय? by चामुंडराय
lagn
In reply to lagn by manguu@mail.com
दुसरी बाजू
In reply to रेझ्युमे, सी.व्ही., बायोडेटा यांत फरक काय? by चामुंडराय
या लिहाव्यात?यातल्या काही गोष्टी कशा लपवणार ? फरक ?
डबल जॉब
In reply to डबल जॉब by manguu@mail.com
कामाचे स्वरूप
In reply to कामाचे स्वरूप by रानरेडा
छान
medical professionals doctors
In reply to medical professionals doctors by रानरेडा
हेच लिहिणार होतो.
In reply to हेच लिहिणार होतो. by manguu@mail.com
आपण ह्या विषयावर फोन वर बोलू या
एक सांगा मिपवर पडिक असतो ते
In reply to एक सांगा मिपवर पडिक असतो ते by माझीही शॅम्पेन
हॅ हॅ हॅ.
In reply to एक सांगा मिपवर पडिक असतो ते by माझीही शॅम्पेन
कन्टेन्ट ने प्रभाव ??
सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या नवख्या उमेदवारांसाठी