या पृथ्वीवर माणसांची एवढी गर्दी का आहे ?

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
27 May 2018 - 9:52 am
गाभा: 

नमस्कार मंडळी
सदरहू लेख स्वामी विश्वरूपानन्द यान्चा आहे . त्यान्च्या परमिशन ने इथे देत आहे ...

अव्हेन्जर्स इन्फिनिटी सिनेमाच्या शेवटी ठानोस कडून पृथ्वीवरील बहुतांश मानवजातीचा अंत होतो असे दाखवले आहे ... त्यावरून विचारचक्रे फिरू लागली व जे विचारमंथन झाले त्याचा हा परिपाक ;

चौदाव्या शतकात spanish आणि portugese लोकांनी नवे आणि त्यांच्या दृष्टीने अज्ञात प्रदेश धुंडाळायाला सुरुवात केली . सोळाव्या शतकात वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर औद्योगिक क्रांती झाली . आणि एकोणीसाव्या -विसाव्या शतकातील वैद्यकीय शोधांमुळे आरोग्य उंचावून आयुर्मर्यादा वाढली . या व अशा अनेक घटकांमुळे गेल्या ३/४ शतकात विश्वाची लोकसंख्या बेसुमार वाढली .

Table 1. World population milestones. Source: United Nations Secretariat, Department of Economic and Social Affairs, The World At Six Billion (1999), p. 8. World population reached: Year Time to add 1 billion
1 billion 1804
2 billion 1927 123 years
3 billion 1960 33 years
4 billion 1974 14 years
5 billion 1987 13 years
6 billion 1999 12 years
7.2 billion 2018 19 years

तर मुद्दा असा की सतराव्या शतकापर्यंत अतिशय मर्यादित लोकसंख्या असूनही जगाचे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आज फक्त दोनशे वर्षात लोकसंख्या सातपट वाढल्याने नैसर्गिक साधानसामुग्री वर अतोनात ताण येत आहे . एका अर्थाने मनुष्य अक्षरश: पृथ्वी ओरबाडून खातो आहे . अशा परिस्थितीत लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्य अंधारमय आहे . आपल्या क्षुद्र स्वार्थ अन हव्यासापोटी मनुष्यप्राणी आपल्या भावी पिढ्यांसाठी आणि मानवेतर प्राण्यांसाठी भविष्यात पृथ्वीवर जगणे मुश्कील करत आहे .

मॅट्रिक्स सिनेमातील एजन्ट स्मिथ च्या तोण्डी असलेले वाक्य खरे अहे की काय असा भास होतो ,
I'd like to share a revelation I've had during my time here. It came to me when I tried to classify your species. I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with their surrounding environment, but you humans do not. You move to another area, and you multiply, and you multiply, until every natural resource is consumed. The only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. Do you know what it is? A virus. Human beings are a disease, a cancer of this planet. You are a plague, and we are the cure.

खरोखरच मंड्ळी , विचार करा ... आपण नक्की कुठे जात आहोत ?

प्रतिक्रिया

डॅन ब्राऊनची 'इन्फर्नो' ह्या विषयावरच आधारित आहे.

परिस्थिती किती विदारक आहे माहित नाहि, पण नैसर्गीक संसाधनं आणि पर्यावरणाची अवस्था खरच वाईटाकडे चालली आहे असं म्हणायला वाव आहे.

टवाळ कार्टा's picture

27 May 2018 - 11:19 am | टवाळ कार्टा

शांततेचा धर्म 4-5 मुले पैदा करायला सांगतो की.....आपले भारतीय हिरीरीने भाग घेत आहेत त्यात

manguu@mail.com's picture

27 May 2018 - 6:07 pm | manguu@mail.com

100 children ?

Deserter's picture

27 May 2018 - 3:37 pm | Deserter

अवांतर प्रतिसाद पण पर्यावरणाशी सम्बन्धित बेसुमार वृक्षतोडी पेक्षा ही भयानक समस्या डोंगर उतारावरील मातीचे केले जाणारे उत्खनन आहे हे असेच चालू राहिले तर पावसाचे पाणी पडणार कुठे आणि जमिनीत मूरनार कुठे अशा प्रकारे उत्खनन करून उघडे बोडके केले गेलेले डोंगर पठार यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.महाराष्टचा विचार केला तर सरकार खाणमाफियावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे.थोड्याशा मिळणार्या महसूलापायी डोंगर पठारावरील निसर्ग नष्ट केला जात आहे याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही रायगड व ठाणे परिसरात हा प्रश्न अतिशय गम्भीर बनत चालला आहे काही वर्षांनी याचे परिणाम दिसू लागतील जेव्हा भूजल पातळी निचंक गाठेल वृक्ष वनस्पती यांना पाण्याची समस्या चालू होईल त्यामुळे झाडांची संख्या कमी होईल आणि पावसाचे प्रमाणही.

manguu@mail.com's picture

27 May 2018 - 6:28 pm | manguu@mail.com

आजची नवी पिढी , आजचे खाणकाम , आजचे प्फुदारी सगळे आजचेच लोक जबाबदार !

गंमतच.

आजजाला वीस एकर शेती होती, त्याने चार मुले काढून पाच एकरावर आणले, मग त्याच्यापुढची पिढी एक एकरावर !

आणि व्हाट्सअपवर मेसेज फिरवतात ... पूर्वी म्हणे पाणी 20 फुटावर लागायचे , मग 40 फुटावर गेले , मग 60 फुटावर गेले ,

पाणी कमी वापरा ( कमी प्यायचे की काय ?)

शॉवर वापरू नका ( का ? आमच्या घरात नदी नाही, शॉवर भिजण्याचा आनंद देतो , बिनधास्त लावणार . )

स्विमिंम्ग पूल वापरू नका ( का म्हणून ? मला वाटले तर सगळ्या घरात मागेपुढे दोन दोन pool बांधीन )

20 चे 60 आमच्यामुळे गेले का ?

चौकटराजा's picture

27 May 2018 - 7:21 pm | चौकटराजा

माझ्या आजीला १० मुले झाली तीन जगले. माझ्या आईला ५ मुले झाली ३ जगली मला दोन मुली झाल्या दोन्ही जगल्या. १७ व्या शतकात मी जन्माला आलो असतो तर माझ्या १४ भावन्डातील मेलेल्या १२ पैकी मी एक असतो. आज देखील भावाला बहीण ही हवीच या हट्टापायी दोन मुले अनेकाना आहेत. ज्याना एकच मुलगा पहिला झाला असे अनेक ( बहुदा आपला मिपाकर बुवा त्यात आता समाविष्ट होईल )))) ) एका मुलावरा समाधान मानतील पण जोवर सासरी गेलेली माझी मुलगी माझी नीट काळजी वार्धक्यात घेईल का या विषयी संदेह मनात राहिल्यास पुन्हा दुसर्या आपल्याचा चान्स घेतला जाईल व लोकसंख्या वाढत राहिल. लोकसत्ताक राज्यांचे खूळ आता जगात पसरले आहेच सबब मुलांच्या संख्येवर कायद्याने मर्यादा घालताच येणार नाहीत . सेकंड होम अशा कल्पनामुळे शेतीची जमीन बांधकामास वापरली जात आहे. अशा हव्यासाला देखील लोकशाहीत बंदी घालता येत नाहीच . सार्या दुखांचे मूळ लोकशाही नावाची चैन असणार आहे !

मंदार कात्रे's picture

28 May 2018 - 9:35 am | मंदार कात्रे

सार्या दुखांचे मूळ लोकशाही नावाची चैन असणार आहे !

तुम्ही हे वाक्य उपहासात्मक लिहिले आहेत का कळण्यास मार्ग नाही परन्तु मला सीरियसली असे वाटते की लोकशाही ही न परवडणारी चैन आहे . भारतीय घटना लिहिताना अभ्यासकानी ब्रिटिश राज्यव्यवस्थेचा ढाचा थोडेफार बदल करून इकडॅ कॉपी पेस्ट केला पण तसे करताना भारताच्या प्रचंड लोकसंख्या अथवा आकारमानाचा , डेमोग्राफिक्स चा अधिक खोलवर विचार करून ब्रिटिश घटनेच्या तुलनेत घटनेत काही पायाभूत बदल अथव सुधारणा करणे अत्त्यावश्यक होते . ते झालेले नाही ...

माझ्यामते भारतच नव्हे तर असंख्य देशात डेमॉक्रसी हे एक खेळणे बनून राहिले आहे !

टवाळ कार्टा's picture

28 May 2018 - 10:08 am | टवाळ कार्टा

लोकशाही चंगली कि वाईट हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण लोकशाही आहे म्हणून वरचा प्रतिसाद लिहिता येतोय

नशिबवान's picture

13 Jul 2018 - 8:34 pm | नशिबवान

ब्रिटिशांची राज्यघटना अशी काही नाही सर. तपासुन बघा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2018 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण, वरच्या वाक्यरचनेमुळे वाचकांचा जरासा गोंधळ होण्याची शक्यता आहे असे वाटते. म्हणून, थोडेसे स्पष्टीकरण...

ब्रिटन याबाबतीत इतर आधुनिक लोकशाही राष्ट्रांच्यापेक्षा वेगळे आहे. ब्रिटनकडे (युके) कोणतीही लिखीत राज्यघटना नाही. तिथे, संसदेने पारित केलेले नियम/कायदे, न्यायालयाचे निर्णय/प्रथा, मॅग्ना कार्टा, इत्यादींच्या पायावर राज्यव्यवस्था चालते.

हितसंबंधांवर आधारलेल्या तात्कालिक राजकिय फायद्यासाठी, कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी विपर्यास करण्याची राजकारण्यांची जागतिक आहे आणि ती तिथेही आहे. पण, आपल्या इतकी ती टोकाची खराब नसल्याने वरची व्यवस्था चांगले काम करत आहे. ही नियत टोकाची खराब नसल्याची दोन मुख्य कारणे आहेत : (अ) सुजाण नागरिकांच्या विपरित प्रतिक्रियेची भिती (पक्षी : निवडणूकीत आपटी खाण्याची दाट शक्यता) आणि (आ) आपल्या राजकारण्यांत प्रकर्षाने अभाव असलेली पण तिथल्या राजकारण्यांत अजूनही व्यवहारात दिसणारी 'जनाची नाही तर मनाची लाज'.

तरीही, या व्यवस्थेवर आक्षेप घेऊन, "लिखित राज्यघटना असावी" असाही एक विचारप्रवाह तेथे मूळ धरून आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकशाही आदर्श व्यवस्था नाही... मानवी स्वभाव पाहता ती तशी कधी होण्याचीही शक्यता नाही !

मात्र, 'मानवी कल्पनेच्या सद्य आवाक्यात' असलेल्या शासकीय व्यवस्थांच्या संकल्पनांमध्ये, व्यावहारिक दृष्ट्या ती सर्वोत्तम आहे, यात संशय नाही. तिला एकच पर्याय आहे तो म्हणजे "नि:स्वार्थ उदार हुकुमशाही (selfless benevolent dictatorship)". आतापर्यंतच्या मानवी इतिहासात हुकुमशहा पैशाला पासरी दिसतात, पण शासकांमधले औदार्य अत्यंत विरळ दिसते आणि नि:स्वार्थिपणा तर अत्यंत दुर्मिळपणे दिसतो. शिवाय, या सगळ्यांचा संगम असलेले एखाद दुसरे उदाहरणही, ते होऊन गेल्यावरच सिद्ध होते. बाकी वेळेस "सत्ता भ्रष्ट होते आणि निरंकुश सत्ता अतीभ्रष्ट होते" हाच नियम दिसतो. ही वस्तूस्थिती पाहता, लोकशाहीपेक्षा जास्त चांगली व्यवस्था बहुदा केवळ दिवास्वप्न ठरण्याचीच शक्यता आहे !

प्रकाश घाटपांडे's picture

28 May 2018 - 1:50 pm | प्रकाश घाटपांडे

अगदी बरोबर
लोकांना हुकुमशाहीचे सुप्त आकर्षण हल्ली वाटू लागले आहे. विकास,सुरक्षितता अशा मुद्द्यांवर एखादा कल्याणकारी हुकुमशहा आला तर लोक आपले स्वातंत्र्य गहाण ठेवायला तयार असतात

हुकूमशहा हवा असं बहुमत असेल तर ते मान्य करणं ही लोकशाही आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 9:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे होईल असे वादासाठी मानले तरी, "खर्‍या लोकशाहीत" त्या (हुकुमशहासदृश) नेत्याला ठराविक मुदतीने होणार्‍या मुक्त आणि न्याय्य (free and fair) निवडणूकीद्वारे परत परत निवडून यावे लागेल. म्हणजे, नेता निवडण्याचा हक्क शेवटी लोकांच्याच हातात राहील. ती निवड घराणेशाहीने आणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारे लोकांची दिशाभूल करून केलेली नसावी. अन्यथा, त्या व्यवस्थेला लोकशाही म्हणणे चूक ठरेल.

manguu@mail.com's picture

28 May 2018 - 9:31 pm | manguu@mail.com

नवे काय अन घराणेशाहीवाले काय , सगळे निवडूनच येतात

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणे सगळा प्रतिसाद न वाचता, किंबहुना, वाचूनही महत्वाच्या मजकूराकडे हेतुपुर्रसर दुर्लक्ष करून तिरकस शेरा मारण्याची सवय परत एकदा अधोरेखीत झाली आहे. =))

मिपाकरांचे सतत मनोरंजन करण्याच्या चिकाटीबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा ! स्वतःला इतके विनोदी बनवणे योग्य नव्हे. त्यासाठी खास विशिष्ट विरळा मनोवस्था असावी लागते, हे मात्र नक्की ;) :)

manguu@mail.com's picture

28 May 2018 - 11:10 pm | manguu@mail.com

घराणेशाहीला फक्त ३ लोक विरोध करतात...
१. ज्याना बायको नाही
२. बायको आहे , पण मुले नाहीत
३. मुले अजुन अज्ञान आहेत.

उदा. ते कुणीतरी होते ते काँग्रेसच्या घराणेशाहीला फार्फार विरोध करायचे. त्यांची पुढची आणि त्याच्यापुढची पिढी सज्ञान झाल्यावर आता तो पक्ष इतरांच्य घराणेशाहीबद्दल हल्ली बोलत नाही.

दुसरी गोष्ट , घराणेशाही दिसायला किमान २५ वर्षे सत्ता तरी हवी ना ? २५ वर्षे सलग सत्ता ज्या आमदार खासदाराना मिळेल , ते २५ वर्षानी कुणाला गादी देतात , हे लगेच कसे कळणार ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुन्हा एकदा छान विनोद ! =)) =)) =))

परत एकदा (या वेळेस डोळे उघडून) माझा मूळ प्रतिसाद वाचला तर तो राजकारण-विरहित आणि मानवशास्त्रसंबंधित असल्याचे ध्यानात येईल. मग, तुमचे सगळे प्रतिसाद तुमच्या नेहमीच्याच विशिष्ट मनोवस्थेमुळे ओढून ताणून निर्माण केलेले आहेत हे (कदाचित्) ध्यानात येईलही.

तसे होईपर्यंत मनोरंजनाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा आणि राम राम !

तसे न झाल्यास, तुम्हाला तुमच्या भ्रमात राहण्यास मोकळीक देऊन इग्नोरास्त्र वापरले आहे असे समजावे ! =)) =)) =))

manguu@mail.com's picture

29 May 2018 - 12:15 am | manguu@mail.com

हजारो वर्षांची राजेशाही 47 ला 'फेकू'न दिल्यावर पुन्हा लोकांना त्याचेच attraction वाटू लागले आहे , हे फारच गमतीशीर आणि भयानक आहे

manguu@mail.com's picture

29 May 2018 - 12:22 am | manguu@mail.com

एकाच वेळी लोकशाही हवी , हुकूमशहाही हवा , तो दर 5 वर्षानी निवडूनही यायला हवा , तो संसारी नसावा , असला तरी घराणेशाही नसावी , इतके सगळे सांभाळून gdp पाकिस्तान , चीन अन जर्मनीपेक्षा जास्त हवा ....

हे म्हणजे त्या thermodynamic च्या ideal machine सारखे आहे , आउटपुट भागीले इनपुट बरोबर 1.0

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2018 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

हांग अश्शी ! आता कशी गाडी वळणे घेत घेत मार्गावर आली !!!

पहिल्या प्रतिसादाचे सार त्याच्या शेवटच्या वाक्यात असे लिहिले आहे... "ही वस्तूस्थिती पाहता, लोकशाहीपेक्षा जास्त चांगली व्यवस्था बहुदा केवळ दिवास्वप्न ठरण्याचीच शक्यता आहे !"

जर पहिला प्रतिसाद (परत परत सांगतोय तसा) नीट वाचला असता, तर असे तोंडावर पडण्याची वेळ आली नसती ! =)) =)) =))

विचित्र वाटत असले तरी तुमचे प्रतिसाद एखाद्या बुद्धीमान (किंबहुना, चलाख किंवा काकदृष्टीच्या) आयडीकडून येत असावेत असा समज होता. पण, तो समज खोटा ठरवण्याचे काम तुम्ही जोराने करत आहात... आणि त्यात तुम्हाला उत्तम यशही मिळाले आहे, हे इतरांच्या प्रतिसादांवरून दिसत आहेच ! :)

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 6:59 pm | मराठी कथालेखक

लोकशाहीला टाकवू ठरवण्यात अर्थ नाही.. सुधारत राहणे महत्वाचे.
शासनाने शिक्षणपद्धती आणि न्यायव्यवस्था या दोन गोष्टी अतिमहत्वाच्या मानून त्यावर काम करत रहायला हवे. त्यामुळे सामाजिक सुधारणा होतील. शिक्षण व न्याय या विषयाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती स्वच्छ चारित्र्याचा , निष्ठेने काम करणारा असावा असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारे सरकार हवे.

नीलकांत's picture

29 May 2018 - 1:56 am | नीलकांत

लोकशाही आजच्या घडीला उत्तम पर्याय आहे. याशिवाय उत्तम पर्याय सध्यातरी दिसत नाही.

बाकी धाग्याच्या विषयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास निसर्गाचा असमतोल झाल्यावर निसर्गाने तो अगदी सहज जागेवर आणल्याचे दिसते. मागे एक व्हिडीओ पाहिला होता की जर उद्या मानवजात पृथ्वीवरून नष्ट झाल्यास किती दिवसांत काय काय होईल. त्यामध्ये असा सुर होता की पृथ्वी आपल्या जागेवर येईल.

थोड्या गंमतीने एक अपडेट देतोय की आपला एलन मस्क आहे ना... तोच हो तो... स्पेस एक्स कंपनीवाला. तो निघालाय मंगळावर साधारणतः एक दशक भरात मानव बहुग्रहीय प्राणी होणार अशी अपेक्षा आहे.

ss_sameer's picture

29 May 2018 - 7:34 pm | ss_sameer

सर
हा विषय छोटा नाहीच,

लेख टंकेन यावर उद्या परवा,

पण लोकशाही(च) हवी...!

दशानन's picture

27 May 2018 - 9:41 pm | दशानन

DP

सिरुसेरि's picture

28 May 2018 - 7:23 am | सिरुसेरि

" पृथ्वीवर माणुस उपराच " या नावाचे एक पुस्तक पाहिले आहे . ते याच विषयावर असावे .

माझीही शॅम्पेन's picture

28 May 2018 - 4:20 pm | माझीही शॅम्पेन

" पृथ्वीवर माणुस उपराच " या नावाचे एक पुस्तक पाहिले आहे . ते याच विषयावर असावे .

नाही हो लोकसंखेचा काही सबंध नाही , माणूस हा पृथ्वी वरचा प्राणी नसून , परगरहावरुन इथे पाठवला गेला आहे अश्या आशयाचा आहे

प्रकाश घाटपांडे's picture

28 May 2018 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

हणुनच स्वेच्छामरणाची चळवळ ही मजबूत झाली पाहिजे असे मला राहून राहून वाटत. विवेक बेळेंच जरा समजून घ्या हे डॉक्टर पेशंट च्या नात्यावर असलेले नाटक असेच या विषयावर भाष्य करते. जरुर पहा.

लोनली प्लॅनेट's picture

28 May 2018 - 10:16 am | लोनली प्लॅनेट

माझ्या एका ओळखीत त्याचे लग्न 38 व्या वर्षी झाले तेही खोटे वय दाखवून 15 वर्षांनी लहान मुलीशी एक मुलगी झाली सर्वांनी सांगितले होते एक बास कारण आर्थिक परिस्थिती जेमतेम वरून आई वडलांची जबाबदारी पण मला म्हातारपणी कोण सांभाळेल म्हणून पुन्हा एक पोरगं...
दुसऱ्या एका केस मध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली वंशाचा दिवा का काय म्हणतात ते पण झाला पण 4 वर्षांनी पुन्हा दुसरा कारण काय तर एकाला दुसरा पाहिजे आणि घरात लहान लेकरं पहिजेतच म्हणे ते काय कायम लहान राहणारे काय
या विषयावर चर्चा करून काही उपयोग नाही प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतो

एक बरयं माणूस बायो डिग्रेडेबल आहे :) (ह.घ्या.)

अनुप ढेरे's picture

28 May 2018 - 5:36 pm | अनुप ढेरे

https://humanprogress.org/
असले विचार यायला लागल्यावर ही साईट बघावी. मानव जात कशी कशी प्रगती करत आहे यावर लेख असतात. आत्ता होम पेजवर स्टीवन पिंकर यांचा एक व्हिडो आहे. इज द वल्ड गेटिंग बेटर ओर वर्स. अवश्य बघा.

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 7:28 pm | मराठी कथालेखक

वर काही प्रतिसादांत प्रत्येक जोडप्यास फक्त एकच मूल असावे असे सुचवले आहे. दोन मुलांना जन्म देणार्‍या पालकांवर काहीशी टीका केली गेली आहे.
पण मला वाटते असे सरसकटीकरण करणे योग्य होणार नाही. जर क्ष पिढीतील बहुसंख्य जोडप्यांनी केवळ एकाच मुलाला जन्म देण्याचे ठरवले तर लोखसंख्या फार झपाट्याने कमी होईल. त्यातही तरुणांची संख्या कमी आणि वृद्ध मोठ्या संख्येने असे होईल. असे होण्याने समाजाच्या उत्पादकतेवर, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. पण त्याचवेळी क्ष+१ पिढीतील मुलांच्या आयुष्यातून बहीण-भाऊ ही नाती पुर्ण नाहीशी होतील. म्हणजे क्ष+१ पिढीतील मुलाला बहीण असणार नाहीच पण त्याच्या आसपास वावरणार्‍या समवयस्क अशा कोणत्याच मुला/मुलीला भावंड नसेल. भावंड ही संकल्पना त्याला आई वडीलांकडे पाहूनच थोडीबहूत कळेल. अशा संकल्पनेपासून बरीच दूर असणारी क्ष+१ मुले पुढे जावून लग्न करतील तेव्हा ते एकापेक्षा अधिक अपत्यांना जन्म देतील अशी शक्यता खूपच कमी. परिणामी क्ष+२ पिढीतील मुलांच्या आयुष्यातून भावंडांबरोबरच काका, मामा, मावशी , आत्या ह्या सगळ्या कल्पना हद्दपार होतील. अशी मुले अधिक एकलकोंडी होण्याची शक्यता आहे. कुटूंबव्यवस्थेतील मुल्यांचा -हास होण्याचा धोकाही मोठा आहे. अर्थात काही सुपरिणामही संभवतात.. जसे अशी स्थिती जातिव्यवस्थेची बंधनं सैलावण्यास पूरक ठरु शकेल. पण तरीही एकंदरीतच हा मोठा सामाजिक/ सांस्कृतिक बदल तितकासा आकर्षक वाटत नाही.
आता प्रश्न आहे की यावर उपाय काय ? जर सगळ्याच जोडप्यांनी दोन मुलांना जन्म दिला तर लोकसंख्या कमी कशी होणार ?
तर काही जोडप्यांनी एकाही मुलाला जन्म न देणे...त्या ऐवजी त्यांनी आपल्या आसपास असणार्‍या कुटूंबातील बालसंगोपनात जमेल तशी मदत करत त्यांचा भार हलका करणे. अशा प्रकारे ते आपल्या भावंड, शेजारी, मित्र-मैत्रिणी यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष मदत करु शकतील. याद्वारे ते अनेक लोकांशी जोडले जातील. मुलांनाही काका , मामा, मावशी ई चे प्रेम जास्त मिळत राहील.
तर कोण असावी अशी जोडपी - ज्यांचे लग्न काही कारणाने उशीरा झाले आहे , ज्या जोडप्यातील एकाला वा दोघांना पालकत्वाची फारशी जास्त आवड नाही, ज्यांची अर्थिक परिस्थिती बेताची आहे वा ज्यांच्यावर इतर कौटुंबिक जबाबदार्‍या खूप जास्त आहे (जसे आजारी असलेले मातापिता वा भावंड ई) , ज्यांना विविध छंद वा कला यांना अधिक वेळ द्यायची इच्छा आहे. ई ई ...
जर अशा जोडप्यांचे प्रमाण १०% असेल असे मानले आणि इतर ९०% जोडप्यांपैकी ८०% जोडपे तरी दोन अपत्यांना जन्म देवू शकतील आणि १०% जोडप्यांनी एकाच अपत्याला जन्म दिला असे झाले आणि असेच प्रमण पुढेही चालत राहिले तरी पिढीगणीक लोकसंख्या हळूहळू कमी होईल.

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 7:34 pm | मराठी कथालेखक

भावंड ही संकल्पना त्याला आई वडीलांकडे पाहूनच थोडीबहूत कळेल.

म्हणजे आई वडीलांना बहीण अथवा भाऊ असल्याने मुलांना या संकल्पना कळतील असे म्हणायचे आहे.. गैरसमज नसावा :)

अर्धवटराव's picture

28 May 2018 - 7:38 pm | अर्धवटराव

स्वतःचं एक अपत्य आणि बाकि ऐपतीप्रमाणे दत्तक घेणं शक्य झालं तर तुम्ही म्हणताय तसे प्रॉब्लेम सुटायला मदत होईल. पण सध्या अ‍ॅडॉप्शन प्रोसेस, त्यातही मुलगी अ‍ॅडोप्ट करणं कर्मकठीण आहे.

उगा काहितरीच's picture

28 May 2018 - 7:44 pm | उगा काहितरीच

काहीसं पटलं . एक किंवा फार फार तर दोन अपत्य ठीक वाटते (आपापल्या ऐपतीप्रमाणे , आवडीप्रमाणे ) पण दोनपेक्षा जास्त अपत्य नसावेत(च).

कुमार१'s picture

28 May 2018 - 8:53 pm | कुमार१

आहे, चांगली सूचना.

शिव कन्या's picture

28 May 2018 - 10:06 pm | शिव कन्या

माहित आहे, या आमच्या एकल निर्णयाने एकूण लोकसंख्येत फार मोठा फरक पडणार नाही!
पण जेव्हा, चाईल्ड फ्री राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हा, सगळीकडून असा मारा झाला....
पण त्यातून तगलो. स्वतः च्या निर्णयावर ठाम आहोत. बरीच वर्षे झाली, आणि आता सगळे शमले आहे.
अधून मधून काही जोडप्यांनी असा निर्णय घ्यायला काहीही हरकत नाही.
अर्थात हे फार व्यक्तिगत मत आणि निर्णय आहेत.

मराठी कथालेखक's picture

29 May 2018 - 1:07 pm | मराठी कथालेखक

बरोबर..
हा अगदी व्यक्तीगत निर्णय आहे. पण अजून ज्यांना अपत्य नाही अशा जोडप्यांनी 'आपल्याला खरंच मनापासून अपत्य संगोपन करायचे आहे का ? त्यासाठी लागणारा वेळ / श्रम देण्याची आपली तयारी आहे का ?' ई गोष्टींचा विचार करावा. जर या विचारांती अपत्यप्राप्ती हवी असेच वाटत असेल तर जरुर अपत्यांना जन्म द्यावा. पण फक्त इतर लोक काय म्हणतील म्हणून मुलांना जन्म देवू नये. तसेच कुटूंबातील एखाद्या जोडप्याने विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला तर इतर कुटूंबियांनी उगाच त्यांच्यावर दबाव न आणता उलट हे जोडपे समाज हिताचेच काम करीत आहेत असे समजून घ्यावे.

अनिता's picture

29 May 2018 - 7:26 pm | अनिता

प्रत्येक मुलासाठी परवाना हे लोकसंख्या कमी करण्यास मदत करेल.

डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या-अभ्यास हे माझे आवडीचे क्षेत्र आहे. बरेच काही लिहिण्यासारखे आहे. परंतु तितका वेळ नाही. केवळ एक-दोन तथ्ये मांडतो.

१. जे लोक लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करत असतात, ते खरे तर लोकसंख्येच्या वाढत्या घनतेबद्दल चिंतित असतात. परंतु त्यांना स्वतःला प्रश्न नीटसा समजलेला नसतो. मूळ प्रश्न हा अति-लोकसंख्या किंवा अति-लोकसंख्या-घनता नसून मागणी आणि संसाधने यांच्या ताळमेळाचे चुकीचे व्यवस्थापन हा असतो.

२. प्रत्येक जोडप्याने जर दोन मुले जन्माला घातली तर जगाची किंवा त्या प्रदेशाची लोकसंख्या घटेल, तर तीन मुले जन्माला घातल्यास लोकसंख्या वाढेल.

३. ज्याप्रमाणे बेसुमार लोकसंख्यावाढीने अनेक समस्या निर्माण होतात, तद्वतच लोकसंख्या अतिवेगाने घटल्यास वेगळ्या, पण अधिक गंभीर समस्या निर्माण होतात.

४. वाढत्या महागाईचा म्हणजेच चलनवाढीचा आणि रोजगारनिर्मितीच्या वेगाचा अप्रत्यक्ष पण समप्रमाणात संबंध असतो. अतिस्वस्ताई किंवा चालनवाढीचा दर शून्यावर आल्याने नवीन रोजगारनिर्मितीला खीळच बसते. हे बऱ्याच जणांना समजणार किंवा पटणार नाही. परंतु हे सत्य आहे.

वेळ मिळाल्यास अधिक चर्चा करू. तूर्तास इतकेच.

(स्वसंपादन : 'लोकसंख्या अतिवेगाने घातल्यास' येथे 'घटल्यास' असे दुरुस्त केले आहे.)

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2018 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

जरा समजून घ्या या नाटकात या प्रश्नाचा उहापोह केला आहे.
इथे त्याविषयी https://www.facebook.com/prasad.shir/posts/10156247353221411

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2018 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे

मूळ प्रश्न हा अति-लोकसंख्या किंवा अति-लोकसंख्या-घनता नसून मागणी आणि संसाधने यांच्या ताळमेळाचे चुकीचे व्यवस्थापन हा असतो.

लोकायत म्हणून जी सुलभा ब्रह्मेंची चळवळ होती/ आहे त्यात लोकसंख्या वाढ हा प्रश्नच नाही या विषयावर एक पुस्तिका होती. त्यात अशी मांडणी होती. महात्मा गांधी म्हणायचे 'Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed. अस एका पर्यावरणाच्या कार्यक्रमात ऐकले होते. या ग्रीडच्या मागणीचे काय करायच. व्यवस्थापन हे काही परपेच्यअल मशीन नाही.

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 9:48 am | सुबोध खरे

+१००
हेच लिहिणार होतो
परंतु काथ्याकूट करायचा टंकाळा आला होता.
एक आईबापाच्या जागी दोन मुले आली तर लोकसंख्या स्थिर राहते.

शाम भागवत's picture

30 May 2018 - 11:30 am | शाम भागवत

२. प्रत्येक जोडप्याने जर दोन मुले जन्माला घातली तर जगाची किंवा त्या प्रदेशाची लोकसंख्या घटेल.

माझी समजूत की लोकसंख्या स्थीर राहील.

मराठी कथालेखक's picture

1 Jun 2018 - 5:30 pm | मराठी कथालेखक

एका दिवशी समजा १००० मुले जन्माला आली म्हणजे त्यात नेमके ५०० मुलगे आणि ५०० मुली असतील . आणि पुढे जावून ते जोडपे झालेत व प्रत्येक जोडप्याने दोन मुलांना जन्म दिला तरी ती मुले १००० नसतील कारण एक तर सगळे ५०० मुलगे वा मुली लग्न करणार नाहीत, लग्न झालेल्या १००% जोडप्यांना मुल होईलच असे नाही , कुणाला दुसरे मूल होवू शकणार नाही. क्वचित कुणाला तीन मुलेही होतील (तिळे वा एक+जुळे झाल्याने वा कुटूंबनियोजन अयशस्वी ठरल्याने )पण तरी एकूणात १००० मुले होणार नाहीत.
त्यामुळे साधारणपणे सर्व (म्हणजे बहुसंख्य) जोडप्यांनी दोन मुलांना जन्म द्यायचे ठरवले असेल तर लोकसंख्या किंचीत कमीच होईल, स्थिर राहणार नाही. याचा सांख्यिकीय अभ्यास केलेले तज्ञ याबाबत आणखी नेमकी माहिती पुरवू शकतील.

मार्मिक गोडसे's picture

30 May 2018 - 8:33 am | मार्मिक गोडसे

मूळ प्रश्न हा अति-लोकसंख्या किंवा अति-लोकसंख्या-घनता नसून मागणी आणि संसाधने यांच्या ताळमेळाचे चुकीचे व्यवस्थापन हा असतो.
+100

संन्यस्त खड्ग's picture

2 Jun 2018 - 8:08 am | संन्यस्त खड्ग

स्वामीजीनी सदर चर्चा वाचून हा प्रतिसाद दिला आहे ...(ते मिपावर नाहीत )

आपण मिपाकरांनी विस्तॄत्पणे चर्चा केलीत त्याबद्दल आभार ...

एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की अजूनपर्यन्त झालेल्या चर्चेत समस्त प्रतिसादकांनी केवळ माणसाच्या दॄष्टीकोणातूनच विचार करूनच प्रतिक्रिया दिल्या आहेत . त्यात नवल काहीच नाही !

परंतु एकदा स्वतःला निसर्गाच्या / धरती मातेच्या जागी कल्पून विचार करा !
धरती सगळ्यांची माता आहे. हो, अगदी सायन्टिफिकली विचार केला तरी आप्ण सर्व प्राणिजात सूर्य व पॄथ्वीपासूनच जन्मलो. मग ८४ लक्ष योनी प्राणिमत्रानी नटलेल्या या विश्वात केवळ मानवाची बेफाम लोकसंख्यावाढ अन मनमानी का सहन करावी?

वेस्टर्न अध्यात्मात असलेल्या "गय्या" या मातॄदेवतेच्या संकल्पनेची ज्याना ओळख आहे त्याना माझा मुद्दा पटकन लक्षात येइल.
म्हणून भवितव्याचा विचार करता पॄथवीवरील मानवी जनसंख्या किमान तीन चतुर्थांश कमी होणे क्रमप्रप्त ठरेल . मग ते युद्ध अथवा नैसर्गिक आपत्ती अथवा अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकते .
असो
शुभं भवतु!

मदनबाण's picture

14 Jul 2018 - 8:57 am | मदनबाण

भवितव्याचा विचार करता पॄथवीवरील मानवी जनसंख्या किमान तीन चतुर्थांश कमी होणे क्रमप्रप्त ठरेल .
ThanosDidNothingWrong
Redditors love Infinity War’s Thanos so much, 300,000 of them just faked their own internet deaths
Thanos subreddit successfully bans half its community
The Real Villain in ‘Avengers: Infinity War’ Is Overpopulation Panic

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailamos ( Original version ) :- Enrique Iglesias

संन्यस्त खड्ग's picture

2 Jun 2018 - 8:14 am | संन्यस्त खड्ग
संन्यस्त खड्ग's picture

2 Jun 2018 - 8:14 am | संन्यस्त खड्ग
संन्यस्त खड्ग's picture

2 Jun 2018 - 8:15 am | संन्यस्त खड्ग

Mother

मंदार कात्रे's picture

15 Mar 2020 - 6:09 am | मंदार कात्रे

https://www.worldometers.info/coronavirus/

करोना व्हायरस मुळे जगातील 1 % लोकसंख्या नष्ट होऊ शकते .- चिनी शास्त्रज्ञ