ट्रेकींग क्षेत्रात 'घाटवाटा' हे प्रकरण थोडे अवघड समजले जाते आणि ते काहीसे खरेही आहे. कारण घाटवाटांच्या डोंगरयात्रांचे मार्गदर्शन होईल अशी कोणतीही साधने उपलब्ध नाहीत. जी काही थोडीफार माहिती मिळते ती असे ट्रेक्स करणार्या ब्लॉगर्सनी लिहिलेल्या ब्लॉगमधेच. त्यामुळे असे ट्रेक्स करण्यासाठी बहूतेक वेळा स्थानिक लोकांवरच अवलंबुन रहावे लागते. घाटवाटांची इत्यंभुत माहिती मिळाली तरीसुद्धा या प्रकारच्या डोंगरयात्रा अनुभवी आणि चांगली निर्णयक्षमता असलेले सोबती बरोबर असल्याशिवाय कधीही करु नयेत.
अशा या घाटवाटांबद्दल समग्र माहिती असलेली पुस्तके माझ्या माहितीत तरी कुठेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे घाटवाटांविषयी मला जी थोडीफार माहिती आहे तिचं एकत्रित संकलन कुठेतरी व्हावं अशी बर्याच दिवसांची इच्छा होती. मिपावरही त्याबाबत विचारणा झाली होती म्हणुन मीही खरडायचं थोडं धाडस केलं. अर्थात हे लिखाण परिपुर्ण नक्कीच नाही त्यामुळे अनुभवी मंडळींनी यात नक्की भर घालावी.
हा लेख एकूण तीन भागात विभागला आहे. पहिल्या भागात थोडा इतिहास आणि विषयप्रवेश आहे, दुसर्या भागात घाटवाटा म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार, नावं वगैरेची माहिती असणार आहे तर शेवटच्या भागात घाटवाटांची प्रशासन व्यवस्था कशी होती हे आपण पाहणार आहोत.
'इतिहास आणि विषयप्रवेश'
सतराव्या शतकात एक युगपुरुष जन्माला आला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांचा कालखंड हा सह्याद्रीतील दुर्गांचा सुवर्णकाळ होता. भोवतालच्या भूप्रदेशाचे सखोल ज्ञान आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे निश्चित आकलन साधणारा शिवाजीराजांसारखा महापुरुष एकूण जगाच्या संदर्भातही विरळाच. सह्यपर्वताच्या आकारविस्ताराचा, त्याच्या खडतर परिघरेषांचा आणि त्याच्यावरील दुर्गांचा लाभ उठवून राजकीय उद्दिष्टे गाठण्याचे श्रेय केवळ महाराजांचेच. त्यांच्या बालपणी सह्याद्रीतील बहुसंख्य किल्ले ओसाड पडल्याने नादुरुस्त, जीर्णावस्थेत होते आणि जे मोजके सुस्थितीत होते ते मोगल वा अदिलशाही किल्लेदारांच्या ताब्यात होते. मजबुत किल्ले जसे आपले सामर्थ्य तसेच ते आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे हे जाणुन त्यांनी आपले डावपेच आखले. मनुष्यबळ आणि साधनसामग्री अशा दुहेरी कसोटीवर इतकेच नव्हे तर संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्याही महाराजांचे शत्रू त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने बलाढ्य होते. पण केवळ सह्याद्रीच्या साह्याने जशी त्यांनी मोठी उद्दिष्टे मनाशी बाळगली तशीच ती गाठण्यातही ते यशस्वी ठरले. विशेष म्हणजे त्यांनी आपले मनुष्यबळ आणि साधनसामग्री यांचा किमान वापर वा विनाश होऊ देऊन हे यश साधले. महाराजांचा इतिहास वाचल्यावर हे जाणवते की त्यांच्यावर गुदरलेल्या प्रत्येक संकटास अनुरुप असे वेगवेगळे डावपेच त्यांनी आखले आणि त्यानुसारच त्यांनी संघर्षस्थळाची निवड केली. ....'सांगाती सह्याद्रीचा' या पुस्तकातूनघाटवाटेत शिरण्यापुर्वी--
'खरं म्हणजे भूगोलाची इत्यंभूत माहिती असल्याखेरीज इतिहास घडविताच येत नाही'. पुण्याला आल्यानंतर सुरवातीची पाच वर्षे महाराज सोबत्यांसह बारा मावळं अक्षरशः पिंजून काढत होते त्यामुळे महाराजांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जसं लेकरु आईला सोडून जात नाही त्याचप्रमाणं निदान दक्षिण दिग्विजयापर्यंत तरी महाराज सह्याद्री सोडून गेलेले दिसत नाहीत. म्हणूनच सह्याद्री म्हणजेच शिवाजी आणि शिवाजी म्हणजेच सह्याद्री असं म्हणणं वावगं ठरू नये. खरंच असं या सह्याद्रीत काय आहे ज्यामुळं महाराजांनी शुन्यातुन एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं? आणि त्याचा पायाही इतका भक्कम घातला की मराठ्यांचं संपूर्ण राज्य खालसा होण्यासाठी १८४८ साल उजाडावं लागलं. आपल्या कुणालाच इतिहास घडवायचा नाही, खरं सांगायचं म्हणजे आपण तसा तो घडवूही शकत नाही. पण या सह्याद्रीत घडलेला आपला ज्वलंत इतिहास जर का समजुन घ्यायचा असेल तर मात्र सह्याद्रीतील भटकंती अत्यावश्यकच ठरते. महाराजांच्या आयुष्याचा कालपट पाहताना एक गोष्ट बाकी सारखी जाणवत रहाते, ती म्हणजे स्वतःची क्षमता ओळखून शत्रू कल्पनाही करु शकणार नाही असे अजोड डावपेच आखणं आणि ते जसेच्यातसे प्रत्यक्षात उतरवणं. या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि कल्पनातीत डावपेच आखण्याची क्षमता या गुणांची पुष्टीच देतात. युद्धशास्त्रानुसार आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्दशास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतलं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. १६६१ सालच्या एका लढाईत महाराजांनी असंच एक स्वतःला अनुकूल असलेलं रणक्षेत्र निवडून काढलं आणि तेथे शत्रूला येण्यास अक्षरशः भाग पाडलं. बलाढ्य मोगल सरदार कारतलबखानाविरुद्धच्या या युद्धात महाराजांनी एका अनगड, अवघड घाटवाटेचा अतिशय समर्थपणे उपयोग करुन घेऊन खानाला त्याच्या मोठ्या सैन्यासह पूर्णपणे पराभूत केलं. शाहिस्तेखानाने चाकणच्या विजयानंतर कारतलबखानास कोकणची मोहिम सोपविली. कछप व चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन आणि त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, रायबागीण, जसवंत कोकाटे आणि जाधव असे सरदार मिळून त्याच्याकडे भली मोठी फौज होती. सोबत हत्ती, सामान-सुमान, तोफा आणि उंटही होते. शाहिस्तेखानाच्या मुख्य तळापासून ही फौज तुंगारण्यातुन उंबरखिंडीत आली आणि लढाईला तोंड फुटले. कोकणातल्या बाजूला मराठ्यांचा सेनापती (नेतोजी?) तर घाटमाथ्यावर स्वतः महाराज वाट अडवून उभे होते. आता कारतलबखानाचं सैन्य कात्रीत सापडलं. खरंतर तुंगारण्यातले लोहगड वगैरे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. कारतलबखानाच्या सैन्याला तुंगारण्यातुन जाताना का प्रतिकार झाला नाही? बरं पाणीसुद्धा उपलब्ध नसलेली, अत्यंत अडचणीची, दाट जंगलाची, अरुंद, निर्जन अशी उंबरखिंडीची अवघड घाटवाट त्याला कोकणात उतरायला कुणी सुचविली? एवढ्या मोठ्या सैन्याला ती योग्य होती का? हे त्याला कळलं कसं नाही? आपल्या विरुद्ध मराठ्यांचे मोठे सैन्य उंबरखिंडीत आधीच दबा धरुन बसलेय हे कारतलबखानाला कसं कळू नये? सैन्यासोबत असणारे त्याचे हेर काय करत होते? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आणि ते म्हणजे 'महाराजांचे अजोड डावपेच आणि त्यांचे युध्दकौशल्य'. कविंद्र परमानंदांनी शिवभारताच्या अठ्ठावीसाव्या अध्यायात याचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. ते म्हणतात... अथ पन्थानमाश्रित्य लोहाद्रेर्द्क्षिणोत्तरम् l वीतभी: स वतारेभे सह्यशैलावरोहणम् ll ६५ ll अर्थ - नंतर लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो (कारतलबखान) निर्भयपणे सह्याद्री उतरु लागला. एकपद्या तया यान्ती नलिकायंत्रतुल्यया l अभूदतीव स्थगिता वाहिनी सा पदे पदे ll ६६ ll अर्थ - नलिकायंत्रासारख्या(बंदुक) त्या पाऊल वाटेने जात असतां ती सेना पदोपदी अतिशय कुंठीत झाली. अस्मादवाङ्मुखीभूता पताम इति निश्चिता: l नरास्ताम्राननचमूचरा: सह्यमवातरन् ll ६७ ll अर्थ - "ह्या वाटेवरुन अधोमुख होऊन आपण पडूं" अशी खात्री झालेले मोंगल सैन्यांतील लोक सह्याद्रीवरुन खाली उतरले. या युद्धात शेवटी जे व्हायचं तेच झालं. रायबागीणच्या सांगण्यावरुन कारतलबखानाने महाराजांकडे पाठवलेला दुत काय म्हणतो हे एकोणतीसाव्या अध्यायात परमानंदांनी सांगितलेले आहे. हंत द्वित्राण्यहान्यतत्र मया लब्धंन जीवनम् l तस्मादभयदानेन देहि मे मम जीवनम् ll ३१ ll अर्थ - काय सांगावे! दोन तीन दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळालें नाही; म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे. तलातलमिवासाद्य सह्याचलतलस्थलम् l विररामश्चिरं चित्ते विस्म्रामश्च पौरुषम् ll ३२ ll अर्थ - सह्याद्रीच्या जणूं काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनांत दीर्घ काळ स्तिमित झालों आहोंत व पराक्रमसुद्धा विसरलो आहों! तद् वितीर्थ स्वसर्वस्वमात्मनमनवस्करम् l चिकीर्पामि महाबाहो जीवन् जिगमिषामि च ll ३६ ll अर्थ - म्हणून, हे महाबाहो, मी आपलें सर्वस्व आपणास अर्पण करुन आपल्या अपराधाचें क्षालन करुं इच्छितों आणि जिवंतपणे जाऊं इच्छितों. अशा या उंबरखिंडीच्या युद्धात शाहिस्तेखानाच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला. हा तडाखाच इतका जबरदस्त होता की पुढची दोन वर्षे म्हणजे अगदी महाराजांनी लालमहालावर छापा घालेपर्यंत त्याने अजिबात डोके वर काढले नाही. वर उल्लेखलेली 'उंबरखिंड' ऊर्फ 'आंबेनळी घाट' किंवा शिवाजी महाराजांनी ज्या घाटवाटेने उतरुन जावळी जिंकून घेतली तो 'निसणी'चा घाट वगैरे ठिकाणं खरं म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्यासारखीच आहेत. या सर्व घाटवाटा भटक्यांनी आणि इतिहास संशोधकांनी धुंडाळाव्या अशाच आहेत. तेथे असणार्या विपरीत परीस्थितीत लढून देखील ती युद्धे महाराजांनी कशी जिंकून घेतली असतील? याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर अशा घाटवाटांवरुन चौकस भटकंती करणे क्रमप्राप्तच आहे. कारण भूगोलाच्या जवळ गेल्याने इतिहास जरा जास्त चांगला समजतो, असा निदान माझा तरी अनुभव आहे. मुकर्रबखानाने संभाजीराजांना संगमेश्वर येथे अटक केली. त्याची ती मोहीम फक्त त्यांना पकडण्यासाठीच होती. मुकर्रबखान नेमक्या कोणत्या घाटवाटेने कोल्हापुर भागातून कोकणात उतरला आणि कोणत्या घाटवाटेने चढून घाटावर आला या विषयी इतिहासकारांत मतभेद आहेत. आपल्यासारख्या इतिहासाची आवड असलेल्या डोंगर भटक्यांना ही शोधमोहीम खास संभाजीराजांसाठी एकदा तरी राबवायला हवी. नाही का? क्रमशः
वाचने
27777
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिवधरित्र का घाटवाटा नक्की
अगदी बरोबर
In reply to शिवधरित्र का घाटवाटा नक्की by कंजूस
*शिवचरित्र*
पहिला भाग काहीसा त्रोटक वाटला
माझी घाटवाटांची भटकंती
In reply to पहिला भाग काहीसा त्रोटक वाटला by प्रचेतस
**या लेखाकडे बघताना
In reply to माझी घाटवाटांची भटकंती by दिलीप वाटवे
दोनतीनच असाव्यात महाराष्ट्रात
प्राचीन वाटा? बर्याच आहेत.
In reply to दोनतीनच असाव्यात महाराष्ट्रात by कंजूस
आवडले. मात्र प्रचेतस
घाटवाटा
बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं
In reply to घाटवाटा by कपिलमुनी
बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं
In reply to घाटवाटा by कपिलमुनी
असहमत. पण आता या धाग्यावर वाद
In reply to बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं by प्रचेतस
एक शंका ..
In reply to बैलगाड्याच आल्या पाहिजेत असं by प्रचेतस
१) अगदी हेच सांगायचं आहे.
In reply to एक शंका .. by चौकटराजा
२) अगदी मोठ्या प्रमाणावर माल
In reply to १) अगदी हेच सांगायचं आहे. by कंजूस
**पठारावरुन निर्यात केल्या
In reply to २) अगदी मोठ्या प्रमाणावर माल by प्रचेतस
उत्पादन होत असलेल्या शहरांची
In reply to **पठारावरुन निर्यात केल्या by कंजूस
वाचतोय
अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातल्याबध्दल धन्यवाद.
((उंबरखिंडीच्या लढाईत नेतोजी
In reply to अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातल्याबध्दल धन्यवाद. by दुर्गविहारी
काही नोंदी
३) भारत इतिहास संशोधन मंदिराने काही दशकांमागे सह्याद्रीतील घाटरस्ते आणि चौक्या ह्या विषयावर एक छोटेखानी - सुमारे ५०-६० पानांचे - पुस्तक प्रकाशित केले होते. त्याची प्रत एकेकाळी मजजवळ होती. पुस्तक आता बहुतेक कोठेच मिळायचे नाही, असल्यास भाइसंमंच्या ग्रन्थालयात असू शकेल. थोडा प्रयत्न करून हे पुस्तक मिळविल्यास बरीच माहिती पदरात पडेल. ४) ह्यामध्येहि सर्वपरिचित असे पसरणी (वाई-महाबळेश्वर), रडतोंडी (महाड-महाबळेश्वर, वरंधा (भोर-महाड) हे घाट आलेलेच नाहीत.
वाचत आहे.
लेखक महाशय तुमचा पुढील भाग
येतोय लवकरच. पण चर्चा तर
In reply to लेखक महाशय तुमचा पुढील भाग by कंजूस
खरंय तुमचं.
In reply to येतोय लवकरच. पण चर्चा तर by दिलीप वाटवे
चर्चा करण्याइतकं वाचन माझं
४) वदप (कर्जत) - ढाक ताव
उत्तम लेख आणि चर्चा