कथेसाठी स्वतंत्र विभाग
मिपावर सर्वात जास्त लिखाण होते ते " लेख" या विभागात.
मुख्य पानावर प्रत्येक वर्गवारीत नवीन येणारे पाच लेख लिस्ट मधे दिसतात.
मात्र बरेचदा मिपावर "लेख" या वर्गवारीत प्रकाशीत होणार्या लेखनांची संख्या आणि वारंवारता ( फ्रिक्वेन्सी) जास्त असल्यामुळे नवे लेख लगेच खाली जातात .
काही वेळेस अगदी कमी कालावधीतच पाच पेक्षा जास्त लेख येतात आणि अगदी नवे लेख ही यादीमधे मागे पडतात.
यामुळे ते लिखाण वाचायचे राहून जाते.
सम्पादकाना एक विनंती करु इच्छीतो की मुख्य पानावर लेख , कविता चर्चा भटकंती या प्रमाणे " कथा " या साठी स्वतंत्र वर्गवारी / विभाग सुरू केल्यास नव्याने प्रकाषीत झालेल्या कथा मुख्य पानावर अधीक काळ दिसतील.
तुमचे काय मत आहे?
" कथा " या प्रमाणेच आणखी कोणत्ती नवी वर्गवारी / विभाग सुरू करावेत म्हणजे मिपा वरील लेखाणाची लज्जत अधीक काळ घेता येईल?
याद्या
2125
प्रतिक्रिया
6
वर्गीकरण
मिसळपाव
'कथा' यासाठी नक्की स्वतंत्र
+1
छान
हो कथा विभाग वेगळा असावा
कथा कवितांचे वाचन आणि त्याला
सदस्यांच्या मनाप्रमाणे