Skip to main content

ताज्या घडामोडी- भाग ३३

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 15/05/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

वाचने 108904
प्रतिक्रिया 279

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

सर्वच वेळी proportionate participate झाले पाहिजे सत्ताधार्यानी अजेंडे रेटायचे आणि विरोधकांनी विरोध करायचा, सरकार बदलले तर तोंडे बदलतात, काम तेच राहाते

बॉबी डार्लिंगने नवरा आपल्याला मारहाण करतो आणि अनैसर्गिक सेक्स करतो असा आरोप केला. ज्यानंतर बॉबी डार्लिंगचा नवरा रमणीक शर्माला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी रमणीक शर्माला अटक करण्यात आल्याचे बॉबी डार्लिंगने सांगितले. बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रकाश झोतात आलेली बॉबी डार्लिंग आता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०१७ मध्येच तिने नवऱ्याविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळच्या रमणीक शर्मासोबत लग्न केले. स्पॉटबॉय इ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये केलेल्या तक्रारीत रमणीक दारु पिऊन मला मारहाण करतो, माझे दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचे खोटे आरोप करतो असे म्हटले होते. त्याने माझी प्रॉपर्टी बळकावली त्याला माझ्या मुंबईतल्या घरावरही हक्क हवा होता असाही आरोप बॉबी डार्लिंगने केला. या सगळ्या आरोपांनंतर बॉबी डार्लिंगने नवऱ्यावर हुंडा मागितल्याचाही आरोप केला आहे. एवढेच नाही तर रमणीक, त्याची आई आणि भाऊ या तिघांविरोधात बॉबीने तक्रार दाखल केली आहे. --------- हा पुरुषाचा बाई झाली . आता ह्याला हिंदू विवाह कायद्यातले पोटगी , कौटुंबिक अत्याचार 398 की काय ते हे सगळे फायदे स्त्रीप्रमाणे मिळणार का ?

In reply to by manguu@mail.com

ज्या विवाह कायद्यानुसार विवाह झाला असेल त्यानुसार कारवाई होणार

राज्यपालांना congress ने लिस्ट दिली नाही म्हणे जर congress ची लिस्ट द्यावी लागते , तर bjp ची लिस्ट कुठे आहे ? त्यांनी दिली का 113 ची लिस्ट ?

बहुमत होणार का आज? स्वतःच्याच जाळ्यात काँग्रेस अडकतंय का? हंगामी अध्यक्षांवर आक्षेप घेतला आहे तर त्यांना नोटीस बजावावी लागेल. आणि नोटीस बजावली तर सुनावणी पूर्ण होईपर्यंत बहुमत घेता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं पडलं आहे. -------------- हे लिहिता लिहिता हंगामी अध्यक्षांवर आम्ही काहीही करू शकत नाही असा निकाल कोर्टाने दिला आहे असे बातम्यात आहे. बहुमताचा मार्ग क्लिअर!

चला, शेवटी येडाअण्णांने राजीनामा दिलाच. विधानसभेत बहुमत सिद्ध करु म्हणून बढाया मारणारे, भाजपा नेते आता चांगलेच तोंडावर आपटले आहेत. -- कॉंग्रेसचे अभिनंदन !

रमजानची टिपू सुल्तानला भेट. काँग्र्सचे व जेडी चे अभिनंदन . कुत्र्याकडून देशभक्ती शिका, असे म्हणणार्या मोदीना आणि चार तुकडे टाकून कुत्र्यासारखे आमदार बोलवु , असे बोलणार्या शहाना काँग्रेस , जेडीच्या पक्षप्रेमी लोकांकडून सणसणीत चपराक. अभिनंदन

शेवटी भाजपचा बालीश खेळ त्यांच्या अंगाशी आला आहे, येडीयुरप्पांनी बहुमताआधी राजीनामा दिला आहे. ------------------------ आज ज्या परिस्थतीत भाजप आहे तिथे काँग्रेस-जेडीएसला आणता आलं असतं, स्वतःला राठी महारथी म्हणवणारे शेवयी उघडे पडले. नैतिक वरची लेव्हल घेण्याऐवजी सरकार स्थापन करण्याचा खटाटोप हे भाजपला अजून बराच पल्ला गाठायचा आहे याची जाणीव करून देईल एवढीच आशा करतो.

आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधीच भाजप नेते येडियुरप्पांनी राजीनामा दिला. पण त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच येडियुरप्पा, भाजपचे आमदार आणि कर्नाटक विधानसभेच्या सभापतींनी विधानसभेतून निघून जाऊन राष्ट्रगीताचा अवमान केला. यामुळे सगळीकडून भाजपवर टीका होते आहे. कर्नाटकामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण त्याला बहुमत मिळालं नाही. तरीही भाजपने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. पण सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांना शनिवारी दुपारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सगळे आमदार कर्नाटक विधानसभेत जमले. यावेळी आमदारांच्या शपथविधीनंतर येडियुरप्पांनी भाषण केले. हे भाषण झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. पण राष्ट्रगीताच्यावेळी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताला मान न देता येडियुरप्पांनी भाजप आमदारांसह सभात्याग केला. त्यांच्या या कृतीवर राहुल गांधींनी सडकून टीका केली. भाजप आणि संघ भारतातली संस्थाचं महत्त्व संपवू पाहत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरूद्ध लढत आहोत असं त्यांनी सांगितलं

In reply to by manguu@mail.com

भाजपे ना! त्यांना काही देणं घेणं नाही आहे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दल. पण सत्ता मिळण्यासाठी त्याबद्दल नाटकी प्रेम दाखवाय पुढे. त्या थेटर मधे राष्ट्रगीताला उभे नाही राहिले म्हणून देशाचा किती प्राईम टाईम घालवला याची गणतीच नाही.

In reply to by विशुमित

एक गोष्ट तुम्ही पहिली का.. यात भाजपा च्या लोकान्ची चुक नाही.. भाषण सम्प्ल्यावर येड्डी निघाले, अशोक गेहेलोत, गुआ ना भेटले आणि बाहेर पडले .. स्वतः सिध्दरामय्यान्ना देखील केव्हा राष्ट्रगीत सुरु झाल कळाला नाही..त्याना दुसर्या कोणीतरी उठवला.. ही चूक (बोपय्या) यान्ची आहे, त्यान्नी येड्डीन्चा भाषण सम्पल्या सम्प्ल्या वन्दे मातरम अस जाहीर करायला हव होता.. म्हणजे सगळ्याना कळाल असता .. राहता रहिला राहूल गान्धीन्चा विषय .. त्यान्ना कळाल ही नाही कि राष्ट्रगीत केव्हा सुरु झाला आणि वर त्यान्नी ते लवकर आटपायला सान्गितल..

भाजपास काँग्रेसी डिप्लोमसीचे स्किल आत्मसात करणे अजून बरेच बाकी आहे हे कर्नाटक घटनेवरुन दिसून आले. बहुमत नसताना सत्तेवर क्लेम करण्या पेक्षा त्यांना सत्तेवर येऊ दिले असते तर त्यांचे आमदार मोकळेच फिरले असते आणि काँटॅक्ट सोपा झाला असता. काँग्रेसने पत्रकार परिषदेतून जेडिएसला बाहेरुन पाठींबा दिला की दुसर्‍या पत्रकार परिषदेतून भाजपाने कोणी १५ जण जेडिएस मधून बाहेर पडा आणि तुमचेच मंत्रिमंडळ बनवा , आम्ही बाहेरुन पाठींबा देण्यास तयार आहोत असे जाहीरपणे सांगितले असते तर सगळे बुचकळ्यात पडले असते . आणि भाजपाच्या जागी काँग्रेस असती तर काँग्रेस ने तसे केले सुद्धा असते . शिकतील अनुभवातून एक एक करुन .

In reply to by माहितगार

कदाचित जेडिएसला विनाशर्त पाठींब्याची खेळीकरुन काँग्रेसच्या पाठींब्याचे महत्व कमी करता येऊ शकले असते .

In reply to by माहितगार

थोड्या अंशी सहमत पण आपण म्हणता त्या परिस्थितीत भाजप हालचाल करणार हे न समजण्याइतकी ७० वर्षांची काँग्रेस दूधखुळी नाही. अजूनही काँग्रेस आणि जेडीएस चे आमदार हॉटेल मध्ये बांधून ठेवले आहेत म्हणे :-) केवळ ७ जागांसाठी भाजपने जेडीएस गटाला बाहेरून पाठिंबा दिला असता तर पुढील निवडणुकीत जनतेने त्यांचा पाठिंबा नक्कीच काढून घेतला असता. येडियुरप्पांनी पुढील विधानसभेत १५० जागा आणि लोकसभेत सर्वांच्या सर्व २८ जागा मिळवण्याची प्रतिज्ञा करून उरली सुरली लाज राखली हे बरं केलं.

भाजपाचं उद्दिष्ट येनकेनप्रकारे सत्ता होतं हे उघड आहे. येडियुराप्पाना तर शेवटपर्यंत घोड-चमत्काराची आशा होती. राजीनामा नाटय हे अति उशीरा सुचलेलं शहाणपण. side effect असा झाला की काँग्रेसला गुडघ्यावर यावं लागलं. जेडीएसने मात्र वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. भविष्यात जेडीएसला स्वतःला मजबूत करण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. आणि काँग्रेसला पश्चाताप. भाजपाला देशात आणि इतर राज्यात सत्ता असल्यामुळे खूप मोठा फटका बसण्याची शक्यता कमी. हाता-तोंडाशी आलेला घास मात्र हिरावला गेल्याची रुखरुख भाजप राज्य नेतृत्वाला राहील.

खरे तर भाजपाने क्लेम केला नसता तर अधिक बरे झाले असते असे वाटते. आताही काँग्रेस्/जेडीएस जास्त काळ एकत्र राहण्याची शक्यता कमीच आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीने शाळेमध्ये ऑप्शनला टाकलेल्या राज्यशास्त्र विषयामधील बारकावे समजण्यास खूप मदत झाली. सर्वांचे हार्दिक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा...!!

आता काँग्रेस + जद , सप + बसप , राजद + काँग्रेस , काँग्रेस + राष्ट्रवादी अशा अनेक आघाड्याची शक्यता वाढल्या आहेत

ईतके दिवस एक्मेकांना खाउ की गिळू करणारे भाजपा-काँग्रेसवाले विधानभवनाबाहेर एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसले तेव्हा ह्यांनाही बरे वाटले. हे आम्हाला धमकावता आहेत, ते आम्हाला १०० कोटीची ऑफर देत आहेत.. हे मजेसाठीच होते हे सिद्ध झाले. photo

भाजपाला एक चांगला धडा मिळाला. आता याच प्रमाणे काँग्रेस ने गोवा, मेघालय आणि मणिपूर मध्ये पण सत्ता काबीज करावी. नंतर २०१९ मध्ये सुद्धा एकदाची काँग्रेसला सत्ता मिळाली की संपूर्ण देशात कसं सगळं आलबेल होईल.

In reply to by ट्रेड मार्क

काँग्रेसने फार्स न करता हिंमत असेल तर गोवा, मणिपूर मध्ये आणि तेजस्वीने बिहारमध्ये अविश्वास प्रस्ताव आणावा. आम्हाला बोलवा म्हणून स्वतःचे हसे करून घेऊ नये. ----------------- बाकी या कर्नाटक प्रकरणात कोर्टाने कुठेही राज्यपालांनी काही चुकीचे केले असे म्हटले नाहीये, आणि बोलावलेल्या पक्षाचा बहुमत नापास होण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यामुळे भाजपचा पराभव हा स्वतःचा विजय मानून हा बोगस विजय साजरा करणाऱ्यांचं कौतुक! ----------------- कर्नाटकमध्ये किती दिवस स्थिर सरकार असेल हे बघणे औत्सुक्याचे आहे.

स्वतंत्रपणे लोकांना सामोरे गेल्यानंतर, २२२ लढवून ७८ जिंकणाऱ्या, मुख्यमंत्र्यांसह १७ मंत्री हरलेल्या काँग्रेसला आणि निकालानंतर ५ दिवस गायब असलेल्या अधक्ष्यांना पराभवाचा हिशेब देण्याऐवजी परत बिनबुडाचे आरोप करण्याची संधी भाजपच्या कर्नाटकातील अपरिपकव राजकारणाने मिळाली आहे. उघड उघड जनतेने लाथाडल्यानंतरही उजळ माथ्याने विजयी अविर्भावात बोलणाऱ्या अध्यक्षांबद्दल काय बोलावे. भविष्यकाळ उज्वल आहे. ---------------------- मिळालेला विजय नैतिक पराभवात रूपांतरित करणाऱ्या शहांना याचा जाब विचारून जबाबदारी घ्यायला लावण्याची वेळ आली आहे हे भाजपने जाणले तर बरे होईल. शहांना जेवढा स्वतःवर विश्वास आहे तेवढे ते चाणाक्ष राजकारणी नाहीत आणि त्यांना अतिआत्मविश्वास नडतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तेव्हा भाजप आतातरी हे गंभीरपणे घेईल का? ---------------------- काँग्रेस जेडीएस ला बहुमत आवाजी मतदानाने सिद्ध न करता चॅनेलच्या कॅमेरांच्या गराड्यात विभागणी पद्धतीने करायला सांगण्यात येईल का?

खरंच भाजप ने इतका बावळटपणा करायची गरज नव्हती. करू द्यायचं सरकार स्थापन आणि बघायची मजा. मला नाही वाटत कुमारस्वामी टिकतील. अर्थात गेल्या चार दिवसात मी जे नागरिकशास्त्र ह्या धाग्यातून शिकलेय, त्यातून आलेलं हे अभ्यासपूर्ण मत!

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई, तुमच्याशी जवळजवळ सहमत. जवळजवळ अशासाठी की भाजपचा डाव थोडा वेगळा आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर दावा सांगितला म्हणून गळा काढायला येदि मोकळे. आता सत्ता राबवायची जबाबदारी जदसे व पप्पूपक्षाची आहे. सत्ता स्थापणं सोपं असलं तरी चालवणं अवघड आहे. हे येदिंना देखील माहित आहे. योग्य वेळेस जदचे आमदार फोडून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील. ही 'योग्य वेळ' २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची असेल हे वेगळे सांगणे नलगे. मोदी, शहा व येदी पक्के लबाड आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ही 'योग्य वेळ' २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची असेल हे वेगळे सांगणे नलगे. तोपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरांनी १०० री पार केलेली असेल. इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी करण्याची नामुष्कीची वेळ येईल तेव्हा ह्यांच्यावर.

In reply to by मार्मिक गोडसे

लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही. सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया. 2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये महागाई च्या दराने वडापाव 12 ते 15 झाला आहे म्हणजे 250 ते 300 टक्के भाववाढ आणि पेट्रोल 85 होईल हे गृहीत धरले तर 30% भाववाढ 5 वर्षात आहे. हा दर इतर महागाईपेक्षा नक्कीच कमी आहे. वाहतुकदारांनी डिझेलचे भाव कमी झाल्यावर आपले दर कधीच कमी केलेले नाहीत. तेंव्हा त्यांच्या रडारडी कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या करून घ्याव्यात आणि भाव वाढवावेत. उगाच जाळून प्रदूषण करणाऱ्या लोकांची पत्रास बाळगायचे कारण नाही

In reply to by सुबोध खरे

लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही. कोण ठणाणा करतय? भविष्यात विद्यमान सरकार इंधन दराविषयी काय भूमिका घेईल ह्याचा अंदाज वर्तविला आहे. सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया. 2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये कशासाठी हे लंगडे समर्थन करत आहात?काहीही तुलना करून स्वतःचे हसू करून घेत आहात. २०१३ साली कच्च्या तेलाचे रुपयात प्रती बॅरल काय दर होता आणि आज काय दर आहे ह्याची तुलना करा, मगच बोला.

In reply to by मार्मिक गोडसे

लोक पेट्रोलच्या किमतीचा एवढा ठणाणा का करतात हे समजत नाही. सध्या मोदी विरोध बाजूला ठेवूया. 2013 साली भाव 65 रुपये लिटर होता आणि वडा पाव 5 रुपये महागाई च्या दराने वडापाव 12 ते 15 झाला आहे म्हणजे 250 ते 300 टक्के भाववाढ आणि पेट्रोल 85 होईल हे गृहीत धरले तर 30% भाववाढ 5 वर्षात आहे. हा दर इतर महागाईपेक्षा नक्कीच कमी आहे. वाहतुकदारांनी डिझेलचे भाव कमी झाल्यावर आपले दर कधीच कमी केलेले नाहीत. तेंव्हा त्यांच्या रडारडी कडे लक्ष देण्यात अर्थ नाही. त्यांना पायाभूत सुविधा चांगल्या करून घ्याव्यात आणि भाव वाढवावेत. उगाच जाळून प्रदूषण करणाऱ्या लोकांची पत्रास बाळगायचे कारण नाही

In reply to by सुबोध खरे

हे लॉजिक तर त्यापूर्वीही तितकेच खरे असणार ना ? की अचानक 2014 नंतर वडापावची महागाई पेट्रोलच्य महागाईच्य तुलनेत अचानक वाढली ? मग 2014 पूवी तेल दरवाढ झाल्यावर भाजपे आंदोलनाला रस्त्यावर का नाचायचे ?

In reply to by manguu@mail.com

मोगा खान तुम्हाला साधी तुलना पण कळेनाशी झाली आहे. 2005 साली वडापाव 3 रुपये होता तेंव्हा पेट्रोल किती होते तेही पाहून घ्या. मोदी द्वेष बाजूला ठेवा असे मी वर लिहिलेच आहे. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवताच येत नाही इतकी तुमची विचारसरणी गढूळ झाली आहे का?

In reply to by manguu@mail.com

मोगा खान तुम्हाला साधी तुलना पण कळेनाशी झाली आहे. 2005 साली वडापाव 3 रुपये होता तेंव्हा पेट्रोल किती होते तेही पाहून घ्या. मोदी द्वेष बाजूला ठेवा असे मी वर लिहिलेच आहे. पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवताच येत नाही इतकी तुमची विचारसरणी गढूळ झाली आहे का?

In reply to by सर टोबी

मी निस्पृह आहे असा कधी दावा केलेला नाही आणि तसे मला कुणी म्हणो की नाही मला पाच पैशाचा फरक पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

महागाई निर्देशांक हा शेकडो विविध गोष्टींच्या किमतीवरून ठरवतात, तुम्ही एक वडापाव हे स्वतः:च्य सोयीसाठी वापरून काहीतरी हास्यस्पद लिहीत आहात असेच करायचे तर सबप्राईम , रियाल इस्टेटची मंदी या काळात घराच्य किमती ढासळतात, मग हे उदाहरण घेऊन वा वा स्वस्ताई आली म्हणून नाचायचे का ?

In reply to by सुबोध खरे

आणि तुलना करताना क्रूड ऑईलच्य किमती हेही विचारात घ्या, पण , क्रूड किमतीतील फरकामुळे मोदीजिना भारताचे रिजर्व वाढवण्याची संधी मिळाली , लोकाना फायदा देऊन त्यांना राजकीय आत्महत्या करायची नव्हती इ इ त्यावरचे युक्तिवाद पुन्हा लिहायची गरज नाही ,

मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तरी, उपमुख्यंमत्रीपद आणि २० मंत्रीपदांची मागणी करून काँग्रेसने थोडी तरी इज्जत राखली आहे. असा फॉर्मुला शेवटास गेला तर काँग्रेसचे अभिनंदन! --------------------------------- परमेश्वरा बहुतेक उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील.

क्रुडचे भाव उतरत्या पातळीवर गेले ४ वर्षांपासून सतत राहीले आहेत. त्याचा मोदींशी संबंध नाही. उतरत्या दरांचा संबंध अमेरिकेतील शेल क्रांती, इराणवरील निर्बंध उठणे, ओपेकला दर दिवशीचे उत्पादन कमी करण्यासंबंधी एकमत निर्माण करण्यात सुरुवातीला आलेले अपयश, एकूणच जागतीक अर्थव्यवस्थीत आलेली मंदी, रशीयन ऑइल रिफायनरीजचे वाढलेले उत्पादन, युरोपातील अनेक देशांत क्लिन एनर्जीसंबंधी होत असलेली प्रगती अश्या अनेक जागतीक घटनांशी होता. तेलाचे भाव घसरते असल्याने त्याचा फायदा लोकांपर्यम्त पेट्रोल- डिझेलचे भाव कमी करून पोचवला असता तर ते योग्य ठरले असते असे म्हणण्यात अर्थ नाही कारण पेट्रोल, डिझेलचे दर आवाक्यातच राहिले होते, ते आणखी कमी होऊ दिल्याने लॉजिस्टिक्स कॉस्ट्स जरी कमी झाल्या असत्या तरी तो फायदा ग्राहकापर्यंत पोचलाच असता असे नाही शिवाय महागाई दर या सबंध काळात कमीच होता(CPI India 2017-4.00 %, CPI India 2016-2.23 %, CPI India 2015- 6.32 %, CPI India 2014-5.86 % ). उलट कमी दराचा फाय्दा घेऊन सबसिडीज नष्ट करून वाचलेल्या पैश्यातून देशाची राजकोशीय परिस्थिती(विशेषतः राजकोशीय तूट) सुधारणे योग्य होते. तो तसा अलोकप्रिय निर्णय घेऊन मोठीच रिस्क सरकारने घेतली, माझ्या मते तो योग्य निर्णय होता. तसेच घसरत्या दरांचा फायदा घेऊन तीन स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह्स निर्माण केले गेले, जो भविष्यवेधी उत्तम निर्णय होता, सरकारमध्ये असेच रिझर्व्हस आणखीही निर्माण करण्याचे घाटत आहे. त्यामुळे आतापर्यंत आपली ऑईल पॉलिसी योग्यच राहिली आहे असे दिसते. आता, पुन्हा क्रुड ८०-९० च्या पातळीवर काही काळ तरी स्थिर राहील असे दिसते. त्याचाही मोदींशी संबंध नाही. मध्यपुर्वेतील अशांतता, व्हेनेझुएलातील अस्थिरता, रशीया व ओपेकचा तेल उत्पादन कमी करण्याचा दृढनिश्चय, शेल कंपन्यांचा कमी दरात तेल पुरवण्यातला कमी झालेला उत्साह, जागतीक अर्थव्यवस्थेत आलेली धुगधुगी अशी अनेक कारणे त्यासाठी आहेत. आपल्याला आता आपली पॉलिसी या बदलत्या परिस्थितीप्रमाणे रिअलाइन करावी लागेल. माझ्या मते सरकार जास्त आडमुठी भुमिका न घेता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी मार्केटमध्ये हस्तक्षेप करेल आणि ते योग्य असेल. पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ करण्याची गरज नाही हा युक्तिवाद चुकीचा आहे, सरकारमधील लोकही असा विचार करणार नाहीत असा विश्वास वाटतो.
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/rising-oil…

In reply to by पुंबा

निवडणुकांच्या तोंडावरही पेट्रोल दराच्या लोकप्रिय निर्णयापासून दूर राहून सरकारने धाडस दाखवले आहे खरे पण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसमोर असेच करता येईल कि नाही माहित नाही. कदाचित त्यावेळी सरकारच्या फायद्याच्या गोष्टी बाजूला ठेवून हस्तक्षेप करून किमती खाली आणल्या जातील. डिसेंबर पर्यंत तरी किमती कमी होतील असे दिसत नाही.

In reply to by पुंबा

पेट्रोलच्या वाढत्या दराचा बाऊ करण्याची गरज नाही हा युक्तिवाद चुकीचा आहे, हे पटले, पण डॉ. खरेंचे म्हणणेही खरे आहे, असे वाटत आहे. पेट्रोल डिझेलचे दर जरी कमी केले तरी वाहतूकदार त्यांचे दर कमी करणार नाहीत, ते कमी झाले नाहीत तर कोणत्याच वस्तूंचे दर कमी होणार नाहीत. सेवा पुरवणारेदेखील दर कमी करणार नाहीत या सगळ्याला accountibility असणार नाही तुला नाही अन मला नाही , घाल कुत्र्याला , असे होईल, त्यापेकशा सरकारच्या तिजोरीत गेले तर देशाच्या कामी येईल, असे त्यांचे मत असणार , असे वाटते

In reply to by manguu@mail.com

असेही इंधनावरील करांमुळे सरकारी तिजोरीत भर पडतच असते, इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केल्यावर जरी वाहतूकदारांनी त्यांचे दर कमी केले नाही तरी त्यांचा नफा वाढल्याने सरकारच्या तिजोरीत प्राप्तिकराच्या रूपाने भर पडणार आहे. सरकार फिस्कल डेफीसीट कमी करण्यासाठी फक्त एकाच कमोडिटीवर इतका भर देते हे चुकीचे वाटते. CAD कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे. कच्च्या तेलाच्या आयाती नंतर सोन्याच्या आयातीवर देशाचे परकीय चलन खर्च होते, त्यामुळे रुपयाची किंमत कमी होते व आयात महाग होते. त्याकरता सोने आयात धोरणा बाबत कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.

मराठी टेलिव्हिजन सृष्टीत सध्या चर्चेचा विषय असलेला 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो हळूहळू आणखी रंगतदार होऊ लागला आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक वादग्रस्त सदस्यांपैकी एक असलेल्या राजेश शृगांरपुरे याला घराबाहेर जावं लागलं आहे. राजेश बाहेर गेल्यामुळं आता पुढच्या आठवड्याची सगळी समीकरणं बदलली आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. या आठवड्यात त्यासाठी पुष्कर, रेशम टिपणीस, जुई गडकरी आणि राजेश शृगांरपुरे नॉमिनेट झाले होते. त्यातही जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांपैकी रेशम आणि जुई सेफ झाल्या. मात्र, राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याने सगळेच दु:खी झाले. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताना महेश मांजरेकरांनी त्याला घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी दिली. तेव्हा त्यानं आपल्या भावना काही सदस्यांकडं व्यक्तही केल्या. रेशम टिपणीस हिच्यासोबतच्या जवळीकीमुळं राजेश हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र, त्याच्यामुळं बिग बॉसची चर्चाही बरीच झाली. आता तो बाहेर पडल्यानं पुढं काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss…
बाकी, विकेंडचा वारमध्ये आमची लाडकी सई टवका दिसत होती..

In reply to by पुंबा

बीग-बॉसनेच शेवटी आता 'शृंगार पुरे' असे राजेशास म्हंटले असावे. रंगीबेरंगी थत्ते पण बाहेर पडले ना?

बिगबॅासचे समिक्षण थत्तेंनी केलेय. --------- भावाकडे वळून - पुर्वी टिव्हि फ्रिज लोनवर कुणी घेत असत व्याज देऊन. आता झिरो पर सेंट लोन पसरून त्यांचे भाव क्याश पेमेंटवाल्यांनाही उगाच द्यावे लागतात. वाण्याकडून उधार घेतात म्हणून ते भावच जास्तीचे लावतात. डी मार्टवाले मोठे भाव लिहून तुमच्यासाठी फक्त एवढेच परंतू तेही जास्तीच आहेत. बाहेर काही दुकानात बय्राच स्वस्तात वस्तू मिळतात. लोकांना समज करून दिलाय स्वस्त म्हणून.

In reply to by कंजूस

थत्ते म्हणाले की मी सेलिब्रेटी आहे , मोठा माणूस आहे..म्हणून मग माझ्याशी भांडण करण्यात लोकांना इंटरेस्ट आहे. मी गेलो तर उषा नाडकर्णी ला कोणी विचारणार नाही... इथे मी युट्युब बंद केलं.

सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात बऱ्याच नाटयमय घडामोडी घडल्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने सहा ऑडियो क्लिप जारी केल्या. या ऑडियो क्लिप जारी करणे त्याच रणनितीचा एक भाग होता असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपा मध्यस्थाच्यावतीने काँग्रेसला आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत असल्याचे समजले होते. त्यामुळे तीन दिवस आधीच ऑडियो क्लिप रेकॉर्डिंगचा प्लान बनवला होता असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाने मध्यस्थावर आमदार शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. जे आमदार निष्ठाबदलाला तयार होणार त्यांच्याशी स्वत: भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याचे आम्हाला मध्यस्थाकडून समजले होते. आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा केली आणि भाजपाला जाळयात अडकवायचा प्लान आखला असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते तो भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता त्यासाठी काँग्रेसने हे सर्व केले. भाजपा नेत्यांशी चर्चा करुन त्यांना जाळयात अडकवू शकतील अशा आमदारांची आम्ही निवड केली असे या नेत्याने सांगितले. काँग्रेसने या सौदेबाजीसाठी आमदार बी.सी. पाटील यांची निवड केली. माजी पोलीस निरीक्षक राहिलेल्या पाटील यांनी अनेक कन्नड चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अभिनय कौशल्यामुळे काँग्रेसने त्यांची निवड केली. बी.सी.पाटील निष्ठा बदलून भाजपाला साथ देऊ शकतात हे मध्यस्थामार्फत भाजपा नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. ते आपल्यासोबत काही आमदारही आणू शकतात हे संदेश भाजपा नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानुसार हे ऑपरेशन आखून अंमलबजावणी करण्यात आली. १७ मे रोजी काँग्रेस आमदारांना बसने बंगळुरुबाहेर नेण्यात येत होते. त्यावेळी पाटील यांच्या मोबाइलवर भाजपा नेत्यांचे फोन आले. त्याचवेळी कॉल रेकॉर्ड करण्यात आले. एकदा येडियुरप्पा आणि त्यानंतर श्रीरामलु राव यांच्याबरोबर बोलणे झाल्याचा त्यांचा दावा आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-trap-in-congress-plan-168…

In reply to by manguu@mail.com

एका चोराने दुसर्या चोराला पकडले म्हणायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

इतर वेळेला भाजप ऑडिओ व्हिडीओ द्यायचे - भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून, यावेळी त्यांचीच ऑडिओ क्यासेट आली.

In reply to by बिटाकाका

भाजपावाले जाळ्यात अडकले. ह्यापुढे घोडेबाजार करताना प्रत्येक राजकीय पक्ष दहावेळा विचार करेल.

In reply to by बिटाकाका

भाजपयांच्याही सगळ्या व्हिडीओ क्लिप्स खोट्याच निघाल्यात. एकालाही शिक्षा झाली नाही.

In reply to by manguu@mail.com

चला लिस्ट करा बरं कोणकोणते विडिओ मग! मग ठरवू खरे कोणते होते आणि खोटे कोणते. उगा हवेत गोळीबार कशाला?

१०५- १०६ च्या आसपास राहण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे काय पर्याय राहतात? मलातरी वैयक्तिकरित्या कुमारस्वामींना लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अभिनन्दन..तुमच अन्दाज खरा ठरला..

काँग्रेसने सुप्रीम कोर्टाला पहाटे कामाला लावलं तेव्हा कारण होतं राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्याचं नाकारल्यावर राहुल गांधीनी कोर्टाची किंवा संपूर्ण भारताचीच पाकिस्तान बरोबर तुलना केली. तेव्हा कुठल्या पुरोगामी विचारवंताने त्याचा विरोध केला? सगळी शक्ती फक्त भाजप कसा चुकीचा आहे हे दाखवण्यातच लागली होती. अगदी लोकशाही बरबाद झाली म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. नंतर त्याच कोर्टाने आणि त्यातूनही ज्या चीफ जस्टीस विरुद्ध इतके महिने कारस्थानं चालली होती, त्यांनीच दिलेल्या बेंचने जेव्हा फक्त बहुमत सिद्ध करण्याची मुदत कमी केली तेव्हा मात्र लगेच सुप्रीम कोर्ट चांगलं झालं? म्हणजेच काय आम्हाला पाहिजे तसा निकाल नाही लागला तर आम्ही सुप्रीम कोर्टाला देखील चुकीचं ठरवणार, शिव्या घालणार. बहुमताला फक्त ८ आमदार कमी असताना सरकार स्थापनेसाठी दावा करणं म्हणजे लोकशाहीचा खून ठरतो. पण ७४ आणि ३५ सीट्स कमी असलेल्या पक्षांना संधी दिली की मात्र सगळं आलबेल असतं? त्यातही सगळ्यात कमी सीट्स मिळालेल्या पक्षाचा नेता, म्हणजेच ज्याला जनतेने नाकारलं आहे, असा नेता मुख्यमंत्री होतो तेव्हा मात्र कोणत्या पुरोगाम्याला जनतेचा कौल आठवत नाही? उपलब्ध पर्यायांपैकी सगळ्यात स्थिर सरकार कोण देऊ शकतो हा विचारच नाही, फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं हाच एक अजेंडा आहे का? आतापर्यंतचा इतिहास आहे की काँग्रेसने असा पाठिंबा दिलेली सरकारं फार काळ टिकली नाहीत. म्हणजे समजा आत्ता जदसे आणि काँग्रेसचं कोण कुठलं मंत्रिपद घेणार यावरून फाटलं किंवा ६-८ महिन्यांनी दोघांचं पटलं नाही तर काय करणार? काँग्रेस आणि जदसेला सरकार स्थापण्यासाठी बोलावलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू हे म्हणणं कोणाला ब्लॅकमेल वाटत नाही. एवढंच काय भाजप सत्तेवर आलं तर दंगे देशभरात होतील असे सुद्धा काँग्रेस नेते याआधी सुद्धा म्हणाले आहेत. तेव्हा ते या पुरोगाम्यांना किंवा फक्त भाजपचा विरोध करणाऱ्या कोणालाच चुकीचं वाटत नाही? गम्मत आहे!