Skip to main content

ताज्या घडामोडी- भाग ३३

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 15/05/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

वाचने 108904
प्रतिक्रिया 279

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

ये बात कूच हजम नही हुआ..! === (बघा, माझ्या सहवासाने तुमच्या प्रतिभेस कसे धुमारे फुटू लागलेत ते)>> ==>> म्हणून तर मी तुमचा फॅन आहे.

अशा परिस्थितीत काय करायचे याबद्दल आपल्या घटनेमध्ये याबद्दल स्पष्टता नाही. मोठ्या पक्षाला बोलवायचे की आघाडीला बोलवायचे ? पूर्वी वाजपेयीना सर्वात मोठा पक्ष असून बहुमत नव्हते तरीही सरकार स्थापनेला बोलावले होते . सध्या गोवा , मणिपूर मध्ये आघाडीला बोलावले होते. आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. सध्या दोन्ही पक्षाना भेटायला आहे . दोघांनी पत्रे दिली आहेत. मग मणिपूर गोव्यानुसार आता आघाडीला संधी हवी. त्यांचा मुख्यमंत्री कोण हे ते अंतर्गत प्रश्न आहे.

दोन्ही बाजू आहेत. भाजपाला सरकार स्थापन करायचे तर काही आमदार फोडावेच लाग्तील. मग अशावेळी घोडेबाजाराला उत्तेजन द्यायचे की जे स्थिर सरकार देऊ शकतात(किंवा तसा दावा करतात) अशांना आमंत्रण द्यायचे? ह्या दोन्ही पक्षांची युती निवडणूकीनंतर झाली आहे तेव्हा ह्यांचे सरकारही स्थीर शासन देइल ह्याची हमी नाही. वेळ आली की थातूर-मातूर कारण देऊन पाठिंबा काढून घ्यायचा हे धोरण इंदिरा गांधींच्या काळापासून चालत आले आहे. देवेगौडा ह्यांना त्याचा अनुभव आहेच.

In reply to by वीणा३

त्यांच्या गुजरात निवडणूक धाग्यावर 'सन्माननीय' सदस्यांनी काय दिवे लावले होते ते पाहिलं असेल तर असे प्रश्न पडणार नाहीत. 'आवरा यांना' म्हणून ३-४ दा संपादकांना हाळी दिलेली. 'ट्रोल अलर्ट' देणारं वॉचडॉग तेव्हा हड्डी चघळत बसलं होतं बहुतेक....

In reply to by एमी

पण गॅरी ट्रुमन ना आधी पण अशा लोकांकडे संपुर्ण दुर्लक्ष करताना बघितलंय. त्या धाग्या वरच्या गोंधळामुळे ते लिहीत नसतील तर खरंच वाईट आहे मिपासाठी :(

In reply to by mayu4u

संपादकांशी ओळख - नाय हो मी जेमतेम येते कशीबशी मिपा वर आवड म्हणून , कुठली कुणाची ओळख नाहीये माझी :P

लोकसभेचे निकाल भाजपच्या बाजुने लागल्यास काँग्रेसचा कर्नाटकात पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

वाराणसीत पूल पडला, नेहरूंच्या नावाने अजून कुणी कसे विव्हळले नाही ?

In reply to by manguu@mail.com

नेहरूंच्या नावे पप्पू विव्हळतोय म्हणून. -गा.पै. अवांतर : यालाच अच्छे दिन म्हणतात.

वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे ! मृृृतात्मानां श्रद्धांजली !! मा. संपादक मंडळ , mangoo ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!

वाराणसी मध्ये निर्माणाधीन पुलाचा बीम कोसळुन मोठा अपघात झालेला आहे. बरीच वहाने ह्या बीम खाली सापडल्याने मोठी जिवीत हानी झालेली आहे ! मृृृतात्मानां श्रद्धांजली !! मा. संपादक मंडळ , manguu ह्या सदस्याला वाराणसीत झालेल्या अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात यावी!

देवाने मुद्दाम पूल मोडून तुम्हाला संदेश दिला आहे कि सत्ताधारी पक्षापासून तुम्ही बंगालला वाचवावे - मोदीजी जेंव्हा कोलकाता मधील पूल पडला तेंव्हा. वाराणसीत पूल पडून लोक मेले ह्याच दुःख आहे. - आपल्या मतदारसंघात पूल पडला तेंव्हा मोदीजी. https://www.independent.co.uk/news/world/asia/kolkata-flyover-collapse-…

In reply to by साहना

निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत. ------------------------------------ तरीही तुमची वरची तुलना पटली नाही. ज्या दिवशी कोलकत्यात अपघात झाला त्या दिवशी ते अमेरिकेत होते. तिथून त्यांनी काल जसा शोक व्यक्त केला आणि जे मत व्यक्त केले तेच मत व्यक्त केले होते. अपघाताच्या दिवशीची बातमी - https://www.ndtv.com/kolkata-news/pm-modi-expresses-shock-and-sadness-o… नंतर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात त्या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने पूल कोसळणे हे देवाचे काम (पक्षी-ऍक्ट ऑफ गॉड) आहे असे म्हटले होते. त्याला उद्देशून हे ऍक्ट ऑफ गॉड नसून ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे आणि असलाच काही मेसेज देवाचा तर तो असा कारभार करणाऱ्या सरकारला हटवण्याचा आहे असे मोदी म्हणाले. ----------------------------------- अर्थात हि फक्त पार्शवभूमी, याने मोदींच्या त्या वाक्यातला फोलपणा कमी होत नाही. फक्त त्या पुलाच्या वेळी प्रतिक्रिया वेगळी, आता वेगळी असं चित्र निर्माण करणे चुकीचे आहे.

In reply to by बिटाकाका

निवडणूक प्रचारात बऱ्याच वेळेस काहीही बरळतात मोदी, भाषणे ऐकावी पण वाटत नाहीत.
-- अगदी सहमत ! मागे ABP MAZA च्या चर्चेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, "निवडणुक प्रचारा दरम्यान जो माणूस मोदींची भाषणे लिहितो त्याला 'पोकळ बांबू' ने फटकावले पाहिजे", इतकी त्यांची भाषणे निराधार असतात.

In reply to by बिटाकाका

हिणकस बोलून सारवासारव करण्यात काही लोक पटाईत असतात दाभोलकरांच्या मृत्यूबाबतही त्यांना कर्माचे फळ मिळाले अशी वाक्ये लिहिली होती , नंतर सारवासारव केली

In reply to by कपिलमुनी

आसे म्हायतीविनाचे आकडे कश्ये शेंडी लावाय्ला वापर्तात ह्ये इतरांनी त्येंच्या परतिसादात लिवले हायेच. आनि आसं क्येला तर बाकी लोकं कपाटातली जुनी हाडे धडधडा बाहेर पाडतात आनि लईच पंचाईत व्हते रं बाबा ! जवापत्तूर कायदा वापरून काम व्हतंय तवापत्तूर कोनीबी फकस्तं 'आप्लं नुस्कान व्हतंय रे बाबा' म्हनून गळा काड्ला की लोकान्ला लै मज्जा येतीया रं बाबा ! हमाममे सबच नंगे है रं बाबा... When Vajubhai Vala watched Deve Gowda dismiss BJP government in Gujarat ह्ये काय लईच कानुनी व्हतं का ? इंदिराबाईंन्नी बिगरकाँग्रेसची लै सरकारं राष्ट्रपती व राज्यपालांना हाताशी पकडून घडधडा पाल्डी व्हती त्ये आटवतं का ?! त्ये तर जंक्शन गैरकानुनी व्हते रं बाबा !? =)) =)) =))

कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे. भाजपाकडे हा काळा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी विचारला आहे. बुधवारी कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर गंभीर आरोप केले. आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. ‘मी निकालावर समाधानी नाही. कर्नाटकात मोदी लाट नसून भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा त्यांनी केला. मला दोन्ही पक्षांनी ऑफर दिली होती. पण २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठीच मी काँग्रेससोबत जात आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.

In reply to by manguu@mail.com

हे नीट समजून घे की, हे

वरून कीर्तन आतून तमाशा आहे

हे न कळायला तू काय दुधखुळा नाहीस भावा. तुझं कौतुक केलं का तू काँग्रेसभक्ती करायला लागतो व्हय रं! तर, १०० कोटी/आमदार दर कमी वाटल्यामुळे उघड मीडियात असली नैतिक बोंब उठवणाऱ्या कुमारस्वामींवर जनतेने कितपत विश्वास ठेवायचा हे जनतेला नीट कळते म्हणून तर त्यो तिसरा मोठा पक्ष झालाय. शेवटी काय कुमारस्वामी जास्तीत जास्त बोली लावणार माणसाकडे जाणार, असे नाहीतर तसे.

एडीयुरप्पा उद्या शपथ घेणार

In reply to by manguu@mail.com

घेऊ द्या हो, कुठे बहुमत आहे त्यांच्याकडे? उद्या घेतील आणि परवा राजीनामा देतील. काँगेस आणि जेडीएसला घाबरायचं काहीच कारण नाहीये हो.

EVM problem मूळे हुबळीचा निकाल रद्द मशीनाच्य क्षमतेपेक्षा 200 मते जास्त नोंदल्याचे आढळले

काँग्रेसचे अध:पत्तन !! 'कर्नाटकच्या राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस आघाडीला सत्ता स्थापन्यासाठी आमंत्रण नाही दिलं तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे कर्नाटमध्ये राज्यपाल कुणाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी हा इशारा दिला आहे. 'राज्यपाल संविधानिक मूल्यांचं पालन करत नसतील आणि आम्हाला सरकार स्थापन्यासाठी आमंत्रित करणार नसतील तर कर्नाटकात रक्तपात होईल,' असा इशारा आझाद यांनी दिला. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. असं काहीच नाही. उलट भाजपचेच आमदार असंतुष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 'भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. भाजपकडे केवळ १०४ आमदार आहेत. तर काँग्रेस-जेडीएसकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यपाल पक्षपाती होणार नाहीत, अशी आशा आहे,' असंही ते म्हणाले. आणी हे म्हणतात काँग्रेस पक्ष म. गांधीजींच्या तत्वावर चालतात !! देशात पुर्वी झालेल्या व होणार्या दंग्याच मुळे ईथेच आहे हे कळायला वेळ लागणार नाही !!

karnataka: काँग्रेसचे १२ आमदार बैठकीला गैरहजर र्नाटकात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्याशिवाय चार आमदार गायब झाल्यानं या आमदारांना आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टर पाठविल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याच संपर्कात आमदार असल्याचा दावा केल्याने या पक्षांनी आपआपल्या आमदारांवर वॉच ठेवला आहे. आज सकाळी काँग्रेसने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी ७८ पैकी केवळ ६६ आमदाराच उपस्थित होते. काँग्रेसने आज बोलावलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिल्यानं काँग्रेस हादरलेली आहे !! आपल्या लोकांबद्दलच शंका आणी हे म्हणे राज्य चालवणार !

'आकांक्षांपुढे जिथे गगन ठेंगणे’ या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विद्यार्थ्यांना यश आले आहे. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. . या विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!

In reply to by खेडूत

सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!

In reply to by खेडूत

गिर्यारोहण आणि त्यातही एव्हरेस्ट सर करणे ही काही खायची गोष्ट नाहीये. त्यातही आदिवासी-बहुल भागासारख्या पुरेशा संधी-सुविधांची कमतरता असलेल्या भागातील या मुलांनी जे अविरत परिश्रम घेतले आणि ध्येय जिद्दीने साध्य करून दाखवले, त्याला त्रिवार मुजरा! जियो! तुम्ही महाराष्ट्राचे नाव अजूनच मोठे केले आहे.

In reply to by एस

हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.

In reply to by एस

हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.

खालची पोस्ट वाचनात आली. त्यातले आरोप सोडून दिले तरी आकडे खरे आहेत का? असे असेल तर नक्की कोण सत्तास्थापन करू शकतो? कुणाला राज्यपाल आधी बोलावतात? *Goa (March 2017)* Assembly Strength - 40. Congress - 17. BJP - 12. BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition BJP+MGP+GFP. ------------------------------------- *Manipur (March 2017)* Assembly Strength - 60. Congress - 28. BJP - 21. BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition. _(So much so, 1 independent MLA was detained at Imphal Airport through security agencies & handed over to BJP.)_ ------------------------------------- *Meghalaya (March 2018)* Assembly Strength - 60. Congress - 21. BJP - 2. BJP was invited to form the Govt by Governor in post poll coalition with NPEP+UDP+PDF+HSDPDP. ------------------------------------- *Karnataka (May 2018)* Assembly strength - 224 (222 elections held) Congress + JDS - - > 78 + 38 = 116 BJP - 104 Inspite of Post poll coalition of Congress and JDS having enough number surpassing the half way mark was not invited to form the Government. On the other hand BJPee was given a week's time to prove the strength in floor test in a weeks time. On the basis of single largest party. Now this is Called DEATH OF DEMOCRACY... Vala is facilitating Kharidanewallas.

In reply to by पिलीयन रायडर

अजून कोणालाच बहुमत सिद्ध करायला सांगितलेले नाही , आणि हे एकांगी आहे. आधी बरेच दाखले आहेत जिथे राज्यपालांनी / राष्ट्रपतींनी सर्वात मोठ्या पक्षाला आधी आमंत्रित केलं आहे.

In reply to by पिलीयन रायडर

गोव्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता भाजपाच्या आधी. भाजपाने केला. राज्यपालांनी भाजपला बोलावलं हा मोठा फरक आहे. आणि ही उदाहरणं गेल्या दोन वर्षातली आहेत. गेल्या वीसेक वर्षातली पाहिली तर कोंग्ग्रेसने जे अनेक वर्ष केलं त्याचीच फळं मिळत आहेत आता त्यांना. हे एक.

नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो? मोठा पक्ष आधी जाणार की जो दावा करणार स्वतःच जाऊन त्याला संधी मिळणार? तसा काही कायदा नसेल तर असायला हवा ना? (आणि मोठ्या पक्षाला आमंत्रण जायला हवे असे माझे मत. भाजप ला टुकार मतं पडली तरी अनेक राज्यात सत्ता आहे. किंवा काँग्रेसनेही हे केले असेलच. पण जनादेश बघता मोठ्या पक्षाला संधी मिळायला हवी.)

In reply to by पिलीयन रायडर

मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक पूर्व आघाडीला. तरीपण सर्व प्रकारच्या शक्यता विचारात घेऊन १००% लिखीत घटना बनवणे अवघड आहे. हाच विषय मायबोलीवर चालू आहे. काय हाॅरिबल भाषा वापरताहेत. मिपा खरच खूप गुणी आहे.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत, मुद्देसूद व संयत शब्दांत प्रतिवाद करणाऱ्या सदस्यांना हाकलून दिल्यावर भाषेची पातळी कशी होते त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते. तिथल्या लोकांची काय लायकी आहे ते जगजाहीर आहे. मात्र अशीच लोकं कुंपणावरच्या मतदारास मोदींकडे ढकलतात. त्यामुळे जे चाललंय ते चांगलंय. आ.न., -गा.पै.

In reply to by पिलीयन रायडर

नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो?
माझ्या माहितीप्रमाणे घटनेत असा कोणताही नियम नाही की अमुक एका सिक्वेंसने बोलवाले म्हणुन. त्यामुळेच ही लफडी उद्भवतात. प्रत्येक राष्ट्रपती (केंद्र सरकारसाठी)/राज्यपाल आपापले निर्णय घेतात.

In reply to by पिलीयन रायडर

जर बहुमत असेल तर प्रश्नच नाही. पण बहुमत नसेल आणि नुसताच मोठा पक्ष असेल पण बहुमत मिळण्यासाठी लागणारा पाठिंबा जमा करू शकत नसेल तर काय उपयोग? उदाहरणासहित बघू - मणिपूर (६० सीट्स) - काँग्रेस २८ सीट्स आणि भाजप २१ सीट्स. पण निकाल लागल्याबरोबर भाजपने बाकीच्या छोट्या पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्रक देऊन सत्तेसाठी आधी अर्ज केला. आता गव्हर्नरच्या दृष्टीने काँग्रेस २८ आणि भाजप+इतर मिळून ३२ सीट्स होतात. मग सगळ्यात मोठी बाजू कुठली झाली? एकदा इतर पक्षांनी लिखित पाठिंबा दिल्यावर जर ते गट बदलून काँग्रेस कडे गेले तर नियमाप्रमाणे त्यांची निवड रद्द होते आणि त्या सीट साठी परत निवडणूक होते (हा नियम असाच आहे का यावर तज्ज्ञ प्रकाश टाकू शकतील). मग या परिस्थितीत जरी गव्हर्नरांनी मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला बोलावलं तरी ते बहुमत कसं सिद्ध करणार? या ठिकाणी सविस्तर माहिती आकडेवारीसकट दिलेली आहे. या वेळेला काँग्रेसने हुशारी दाखवून आधीच जेडीपी बरोबर हातमिळवणी केली. पण त्यातही एक गडबड करून बसले. तिसऱ्या नंबरवर असलेल्या पक्षाच्या सदस्याला मुख्यमंत्रीपद देण्याचं मेनी केलं. म्हणजेच स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना डावललं गेल्याची भावना होणं आणि सगळ्यात मोठा पक्ष असूनही दुय्यम भूमिका स्वीकारायला लागल्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. एकूणच काँग्रेसमध्ये सत्ता एका व्यक्तीभोवती एकवटल्यामुळे हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना कितपत विश्वासात घेतलं गेलं असेल याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सत्ता स्थापन होईपर्यंत बऱ्याच गमतीजमती बघायला मिळतील असं वाटतंय. हा प्रकार काँग्रेसनेही आधी बऱ्याच वेळेला केलेला आहे (म्हणून भाजपने करावा असं नाही आणि त्याचं समर्थनही करत नाहीये) पण आपली कर्म फिरून आपला पाठपुरावा करतात हे परत एकदा खरं ठरतंय.

In reply to by पिलीयन रायडर

फोडाफोडी करावी लागेलच असं नाही. कारण बहुमत मिळवूनही तिसऱ्या नंबरच्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करणे ज्या काँग्रेसवाल्यांना पटणार नाही ते आपोआपच फुटतील. काठावर असलेल्यांना खेचायला (फोडायला) थोडेफार प्रयत्न करायला लागतील. पण मला तरी असं वाटतंय की काँग्रेसने हे चुकीचं पाऊल उचललं. कुमारस्वामींना उपमुख्यमंत्रीपद देणं ठीक आहे, पण स्वतःला कमीपणा घेऊन त्यांना मुख्यमंत्री करणे हे अगतिकता दर्शवते. ना तुला ना मला, घाल....... तिसऱ्यालाच या म्हणीचा प्रत्यय आला. काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.

In reply to by ट्रेड मार्क

बरोबर, भाजपला लांब ठेवणे हा एकच हेतू आहे. भाजप वाले सहजा सहजी हे होऊ देतील असं वाटत नाही. (जस्ट अंदाज, मला फार कळत नाही ह्यातलं!)

In reply to by पिलीयन रायडर

भाजपला निमंत्रण मिळालंय बहुतेक! -------------------- कायदा असा काहीच नाहीये हाच मूळ प्रॉब्लेम आहे. वरील उदाहरणे फक्त एक बाजू दाखवतात. दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मिर आणि वर सांगितलेली उदाहरणे आहेतच. -------------------- भाजपने या केसमध्ये दावा करू नये असे मनापासून वाटते. हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं. -------------------- जर भाजपकडे बहुमत नाही असा जेडीएस काँग्रेसचा दावा आहे तर मग डर कायेका? भाजप तोंडावर पडेलच!!

In reply to by बिटाकाका

,हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं.>> ==>> सहमत. हरीश साळवे यांचे पण काल या प्रकारचंच मत व्यक्त केले होते.

In reply to by बिटाकाका

बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी कसा काय होऊ शकतो पण? आणि बहुमत सिद्ध करायला वर 15 दिवस देणार. हे भाजप साठी अति सोयीस्कर नाही होते का? काँग्रेस आणि जेडीसचं अजून नक्की होईना म्हणून असं होतंय का?

In reply to by पिलीयन रायडर

नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ नुसार, राज्यपाल त्यांच्या विवेकानुसार सरकार तयार करू शकेल अशा पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री नेमतात. जर त्या नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहुमतावर कुणाला संशय असेल तर राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगतात. बहुमत हे फक्त विधानसभेतच (पक्षी फ्लोअरवरच) सिद्ध करणे गरजेचे आहे आणि माझ्या माहितीनुसार विधानसभा ही फक्त सरकार स्थापन झाल्यावरच बोलवता येते. मग एकतर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव आणतात किंवा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात. या केसमध्ये विश्वासदर्शक ठराव येईल. ------------------- भाजप आमदार फोडून स्वतःला जोडू शकणार नाही कारण काँग्रेस व जेडीएस व्हिप काढतील. त्यानुसार आमदारांना त्यांच्या पक्षाला मतदान करणे बंधनकारक ठरेल. पण आमदार गैरहजर राहू शकत असल्याने भाजप त्यादृष्टीने प्रयत्न करेल. सद्यस्थितीत भाजपकडे १०४ संख्याबळ असल्याने ते २०९ च्या सभागृहात बहुमत सिद्ध करू शकतात. म्हणजेच कमीत कमी १३ आमदार गैरहजर राहणे गरजेचे आहे. ------------------- एकदा बहुमत सिद्ध झाले की परत सहा महिने बहुमत सिद्ध करायची गरज नसते. त्यामुळे भाजपला एकदा सिद्ध केले की फोडाफोडी/जुळवाजुळवी/घोडेबाजार करायला सहा महिने मिळू शकतात. ------------------- चुकभुल देणे घेणे, काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी.

In reply to by बिटाकाका

तुम्ही अगदी नेमका प्लॅन सादर केला :ड उ.प्र. मधे कल्याणसींग सरकारचे वेळी हि असली नाटकं खुप झाली होती.

In reply to by बिटाकाका

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रेस्पॉंसीबीलिटी! रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये, सत्ता (तूर्तास) सोडली असती तरी ही युती येत्या वर्षभरात किंवा दीड वर्षात तुटलीच असती (बिहारचे उदाहरण). आता मात्र जरा वेगळंच विचित्र वाटलं.

In reply to by जेम्स वांड

एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात भाजपचं समर्थन करावं वाटतंय ते म्हणजे कुमारस्वामींचं मुख्यमंत्री होणं. २०१ पैकी फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही. काँग्रेसने स्वतःचा मुख्यमंत्री बनवला असता, वाटाघाटी केल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. कसंही करून भाजपला बाहेर बसवायचंय हे जर नैतिक असेल तर काहीही करून भाजपने सत्तेत येणंही (दुर्दैवाने) नैतिक म्हणावं लागेल. ------------------------------------ या संपूर्ण सत्ताकारणाच्या गोंधळात कोणीही काहीही संविधानाच्या बाहेरचं करत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपण कसं बरोबर आहोत हे सांगत सुटला आहे. विचित्र आहे हे सगळं. ------------------------------------ २०१९ मध्ये काँग्रेस जेडीएस एकत्र लढण्याच्या शक्यतेला गृहीत धरून भाजपने कर्नाटकची सत्ता सोडणे परवडणार नाही हे ताडले असावे. २०१९ च्या निवडणुकीआधी पॉप्युलर निर्णय घेऊन प्रभाव पाडता येईल वगैरे विचार असेल.

In reply to by manguu@mail.com

मंग तेच तर म्हणतोय, भाजपने पण काय पण करुदेकी कायद्यात राहून, काय फरक पडतोय. ----------------------------- काँग्रेसचे १२ आमदार या अशा आघाडीने नाराज आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत हे विधानसभेत बहुमताच्या वेळी कळेल तोपर्यंत वाट बघायला पाहिजेकी!

In reply to by बिटाकाका

फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही.
सरकारच्या स्टेबिलिटीबद्दल हे लॉजीक असेल तर ठीक. अन्यथा या न्यायाने तर मग राज्यसभा/विधानपरिषदच्या सदस्याने मंत्रीमंडळात यायलाच नको.

In reply to by अर्धवटराव

काही कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते (किंवा मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले नाही). २०१ जागांवर जनतेसमोर जाऊन ज्याला ३७ जागा मिळालेल्या त्याला जनतेने नाकारले आहे हे उघड आहे. जनादेश भाजप, काँग्रेस आणि मग जेडीएस असा आहे. भाजपला सरकार स्थापता येत नसेल, जोडाजोडी करता येत नसेल तर दुसरा पर्याय हा काँग्रेसच असायला हवा ना या परिस्थितीत? ---------------------------------- विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यांचा निवडीचा मार्ग आणि गरज आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, त्याचा इथे काय संबंध तेही कळले नाही.

In reply to by बिटाकाका

पण युती झाली की दुसरा व तिसरा हे एकत्र मिळून पहिल्यापेक्षा मोठे होतात. तुमचे लॉजिक लावायचे तर गोवा, बिहार, मणिपुरातून भाजपाने तोंड काळे करायला हवे.

In reply to by manguu@mail.com

उगाच सेन्सेशनल वक्तव्य करण्यापेक्षा गोवा/मणिपूर/बिहार (नक्की बिहार?) आणि कर्नाटक यात काय साम्य यावर बोला. तुम्ही म्हणता त्या राज्यांमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला होता का? दोन पैकी एक निवड झाली की एक पैकी एक याची माहिती असेल तर द्या. मुळात स्वतः दावा केला नाही कारण तशी जुळवाजुळवच करता आली नाही.

In reply to by बिटाकाका

सर्वात कमि सदस्य निवडुन आलेल्या पार्टीला मुख्यमंत्रीपद देऊ नये असं जर लॉजीक असेल तर जो व्यक्ती प्रत्यक्ष लोकांमधुन निवडुनच आला नाहि (विधान परिषद/राज्यसभा ) त्याला सरकारमधे काहिच स्थान असुन नये. विधानसभा/लोकसभेच्या सदस्यांनी निवडुन दिलेल्या राज्यसभा/विधानपरिषद सदस्याला जर सरकारी उच्चपद भुषवता येत असेल तर त्याच सदस्यांनी ठरवलेला, अल्प निर्वाचीत सदस्य असलेल्या पार्टीचा का असेना, व्यक्ती मुख्यमंत्री होण्यात काहिच जैर नाहि.