Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३२

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 03/05/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67353
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by अनुप ढेरे

उद्योगांना चालना आणि परकीय चलन वाचावे म्हणून आपण आयातीवर भर देत नाही. जगात बर्‍याच गोष्टी भारतापेक्षा स्वस्त मिळतात . पण सरकार त्यावर आयात कर लावते.हा आयात कर लावला नाही तर भारतीय उद्योग बंद पडतील.

In reply to by कपिलमुनी

यंदाच्या बजेटमधे अरुण जेटलींनी संरक्षीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने असच काहितरी केलं होतं आयात करांच्या बाबतीत. पाकिस्तानातुन साखर का आयात केली हे स्पष्ट केलं नाहि अजुन सरकारने. मुख्य म्हणजे या प्रश्नाला राजु शेट्टी वगैरे मंडळी लावुन धरताहेत. काँग्रेस अजुनतरी आक्रमकपणे उतरली नाही या वादात. दोन्ही बाजुने आर्ग्युमेण्टची जुळवाजुळव सुरु असावी पडद्यामागे.

In reply to by अनुप ढेरे

अब आया पहाड उंट के नीचे. === सामान्य माणसाला तो फायदा पासऑन होणार का हे पाहणे रोचक राहील. === पाकिस्तान मधे चांगली मागणी असलेल्या भारतीय टोमॅटोची निर्यात थांबवली आहे ती सुद्धा चालू केली तर भारतीय शेतकरी दुवा देतील. ते देशभक्तीच्या आड येणार नाही हे सरकार ने पाहिले पाहिजे. === आपला व्यापारासाठी देव देश धर्माबाबत कोणतीच आडकाठी नाही आहे, हे पहिलं क्लियर करतो.

In reply to by अनुप ढेरे

जास्त पैसा मिळायचा चान्स असतो का आपल्या शेतकऱ्यांना? असला तर कांद्याचे भाव अस्मानाला भिडल्यावर सरकार 'निर्यातबंदी' करून शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाला भारतातच विकायची सक्ती करते ती तरी का म्हणून करायची?

In reply to by विशुमित

पाकिस्तानातून सगळी साखर इथे आणली की तिथे साखरेची कमतरता होऊन हायपोग्लायसेमिया होऊन लोक चक्कर येऊन पडतील. हा पंप्र महोदयांचा मास्टर स्ट्रोक आहे.

In reply to by विशुमित

वैयक्तीक व्हायची काही गरज नाही. पण जे वाटते ते परखडपणे लिहिणे आवश्यक आहे. सध्याच्या सरकार विरुद्ध ताज्या घडामोडी या धाग्यावर रान उठवले जात आहे. जर मिपा पक्षीय राजकारण करत नाही तर हे सगळेच थांबले पाहिजे. मला mangujeenchaa हा विनोद खरच बालिश वाटला.

भारतात बनवलेली साखर पाकिस्तान पेक्षा महाग विकायची पण शेतकर्यांना त्यांच्या ऊसाचा मोबदला द्यायचा नाही मग अश्या कारखान्यांना वठणीवर आणण्यासाठी पाकिस्तानातली स्वस्त साखर आणली तर बिघडल कुठे ? किमान ग्राहकांना तरी स्वस्त साखर मिळेल. शेतकर्यांचे पैसे कारखान्याने अडकवले आणी हे सरकारला जवाबदार ठरवतात " 3 आठवडे झाले 150 टनाचे बिल अडकले आहे "

In reply to by डँबिस००७

भारतात बनवलेली साखर पाकिस्तान पेक्षा महाग विकायची पण शेतकर्यांना त्यांच्या ऊसाचा मोबदला द्यायचा नाही>>> ==>> तुमच्या या विधानाला ग्राह्य मानायला कृपया सपोर्टींग डेटा देता का ? आम्हाला तरी आमचा कारखाना FRP एवढा किंवा अतिरिक्त फायदा झाला तर त्यापेक्षा अधिक दर देतो. === अश्या कारखान्यांना वठणीवर आणण्यासाठी पाकिस्तानातली स्वस्त साखर आणली तर बिघडल कुठे ?>>> ==>> मला वाटते बरेच कारखाने हे सहकारी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीची (आक्षेप असेल तुमचा की राजकारण्यांनी कंट्रोल केलेत वगैरे पण शेयर्स मुळे किंमत आहे सभासदांना). म्हणजे आम्हाला वठणीवर आण्यासाठी तुम्ही (पक्षी भाजप सरकार) पाकिस्तान कडून साखर आणणार. वाह्ह क्या बात है ! === किमान ग्राहकांना तरी स्वस्त साखर मिळेल.>>> ==>> स्वस्त कशी मिळणार ते जरा विस्कटून सांगाल का ? === शेतकर्यांचे पैसे कारखान्याने अडकवले आणी हे सरकारला जवाबदार ठरवतात " 3 आठवडे झाले 150 टनाचे बिल अडकले आहे ">>> ==>> पुढे साखर विकली गेली तर कारखाने बिल काढणार ना ? Debtors -Creditors Management हे माहित असावे आपल्याला बहुतेक. आणि कारखाने चालू करायला देखील महाराष्ट्र सरकारने दीड महिना चालढकल केली. त्यामुळे एका पिकाचे नुकसान झाले ना. गहू झाला असताना. तोडणी उशिरा झाली त्यामुळे उंदराने ऊस खाल्ला ते तर वेगळेच. इथे सरकार जबादार आहे हे तुम्ही सोयीस्कर गाळू नका.

जर पकिस्तनि साखर स्वस्त पडत असेल भारतीय कारखान्यातल्या साखरेपेक्षा तर सामान्य माणसाला महाग भारतीय साखर खरेदी करायची सक्ती का म्हणुन करायची? परकीय चलन जास्त झालंय का? असेही बर्‍याच परदेशी वस्तू भारतापेक्षा स्वस्त मिळतात,मग उधळा हा पैसा त्यावर.

In reply to by मार्मिक गोडसे

असेही बर्‍याच परदेशी वस्तू भारतापेक्षा स्वस्त मिळतात,मग उधळा हा पैसा त्यावर.
उधळु दे की. जास्तं आयात केली तर रुपया पडेल. निर्यात अजुन किफायती होईल. चांगलं आहे की ते. सामान्य जनतेला मुद्दाम महाग माल का विकायचा?

सामान्य जनतेला मुद्दाम महाग माल का विकायचा? फक्त साखरच कशाला? बर्‍याच स्वस्त गोष्टी आहेत रुपया पाडायला.

In reply to by मार्मिक गोडसे

अजुन एक उदाहरण आहे. भारतात वापरली जाणारी बहुतांश सोलर पॅनेल ही चीनमधुन येतात. जी स्वस्त असतात भारतीय पॅनेलपेक्षा. म्हणजे बघा जर हे पॅनेल आयात नाही करू दिले सरकारने तर इथल्या लोकांना सौर उर्जा महाग मिळणार. सोलर वॉटर हीटर वगैरे उपयुक्त गोष्टी महाग होणार. हे कसकाय चांगलं आहे? === वर टोमॅटोचं उदाहरण दिलं आहे. निर्यात खुली करायला हवी याच्याशी सहमत आहेच.

पण तज्ञांनी जरा यावर प्रकाश टाकावा. शहरात साखर ३५ते४५ रुपये किलो पडते. (भाव अन्दाजे) हा भाव योग्य आहे काय? साखरेचे निर्मीती मुल्य(एका किलो साठी) किती असते? भारतातली साखर स्वस्त कशी होइल? पाकिस्तानी साखरेपेक्शा!!

महाराष्ट्रात उसाचा उतारा सरासरी १०-११% इतका असतो. म्हणजे १००० किलो उसापासुन अंदाजे १००-११० किलो साखर तयार होते. कारखाने शेतकर्‍याकडुन उस रु.२७०० - ३०००/ टन दराने खरेदी करतात. ह्याचा अर्थ साखर निर्मितीचा खर्च रु.३४- ३५/किलो इतका असावा.

In reply to by मार्मिक गोडसे

बऱ्याच कारखान्यांचे वीजनिर्मिती संच, डिस्टिलरी प्लांट, बगॅस - मळी विक्री हे सुद्धा अतिरिक्त उत्पन्न असते त्यामुळे खर्च आणखी थोडा कमी होऊ शकतो. लॉन्ग टर्म उद्योग टिकाव यासाठी या पैशाचा रिजर्व ठेवलेला चांगलेच असते.

 केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यवर्धन राठोड यांची वर्णी लागली आहे. राज्यवर्धन राठोड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. त्यांची वर्णी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपदी लागली आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. अर्थमंत्री अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून अर्थ खात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल सांभाळणार आहेत. तर स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग खातेच राहणार आहे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आज (दि.१४ मे) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. जेटली (वय ६५) शनिवारी (दि.१२) रूग्णालयात दाखल झाले होते. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले जेटली मागील एक महिन्यांपासून डायलिसिसवर आहेत. त्याचमुळे अर्थ खात्याची जबाबदारी आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे. अरूण जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत पियुष गोयल अर्थ खात्याचा पदभार सांभाळतील. ---------------------------------------- काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे, भाजपावाल्यांची पाच वर्षात एकेकाची ३-४ डिपार्टमेंट फिरून होतात.

In reply to by manguu@mail.com

काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे, भाजपावाल्यांची पाच वर्षात एकेकाची ३-४ डिपार्टमेंट फिरून होतात. काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे ? नव्हे खुर्चीला चिटकुन बसायचे 10-15 वर्ष खुर्चीला चिटकुन बसायचे , लाखो करोडोचे घोटाळे करायचे देश विदेशात बेनामी मालमत्ता निर्माण करायची !! हेच केल ना काँग्रेस ने !!

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री,
काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे, भाजपावाल्यांची पाच वर्षात एकेकाची ३-४ डिपार्टमेंट फिरून होतात.
दहापंधरा वर्षं तळ ठोकून राहायचे ते भ्रष्टाचार करण्यासाठीच. आम्हांस माहितीये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाजपेयीच्या ५ व मोदींच्या ४ वर्षात कुणीच 'आत' गेला नाही... शिवाय कितीतरी छोटे मोदी बाहेर पळाले ते वेगळेच.

In reply to by manguu@mail.com

लालू प्रसाद काश्मीरला फिरतायत असं ऐकलं का तुम्ही? आणि भुजबळ साहेबांचं आता तर बाहेर येणं होतंय. असं का याचं उत्तर सापडताय का पहा? ते सापडलं कि चर्चा करू.

PM's Language Unacceptable, Manmohan Singh and Co. १० वर्षे सत्तेत असताना ह्यांच्या तोंडातुन भ्रष्टाचार करणार्या विरुद्ध ऐक शब्द सुद्धा आला नाही , तो माणुस त्याच भ्रष्टाचारी पक्षाच्या विरुद्ध मा. पं प्र मोदीजींनी बोललेले शब्द विखारी समजतो ? त्याला मा मोदीजींचे शब्द सहन होत नाहीत ? कमालच आहे !! असेही आता ह्यांच्यां टाहोंना व ह्यांना विचारतोय कोण ?

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच पहिलाच मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येडियुरप्पांचा शपथविधी झाला असला तरी, अद्याप मंत्रिमंडळ गठित झालेलं नाही. इतकंच काय तर येडियुरप्पांनी विधानसभेत बहुमतही सिद्ध केलेलं नाही. त्यामुळं त्यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातोय.

In reply to by manguu@mail.com

त्यामुळं त्यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातोय. काय सांगताय? धाडसी वगैरे काही नाही. धूर्तपणाचा निर्णय आहे. ( रुग्णांसाठी लबाडपणा) सरकार निवडून आलं तर कर्जमाफी देऊन खुंटा बळकट करता येईल. कारण मधेच आमदार सोडून गेले तर मी शेतकरी हिताचा निर्णय घेणारा माणूस आहे म्हणून मते मिळवता येतील. पैसे कमी पडले तर केंद्रात आपलेच सरकार आहे २०१९ पर्यंत पैसे घेता येतीलच. आणि सरकार आले नाही तर विरोधी पक्षात बसून सरकारच्या नावाने ठणाणा करता येईल. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी तो आमचाच निर्णय राबवला म्हणून लोकांना सांगायला मोकळे. कर्जमाफी केली नाही तर राजकीय फायदा उपटता येईल. याला म्हणतात छाप पडला तर माझा विजय आणि काटा आला तर तुझा पराभव

In reply to by सुबोध खरे

बघा, खरे डॉक्टर, तुमच्या विधानांत मी-तू, छापा-काटा, विजय-पराभव ह्या साऱ्या बाजूंचा साकल्याने विचार झालेला आहे. म्हणजेच ते सर्वसमावेशक आहे. आ.न., -गा.पै.