Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३२

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 03/05/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67673
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by manguu@mail.com

काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे, भाजपावाल्यांची पाच वर्षात एकेकाची ३-४ डिपार्टमेंट फिरून होतात. काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे ? नव्हे खुर्चीला चिटकुन बसायचे 10-15 वर्ष खुर्चीला चिटकुन बसायचे , लाखो करोडोचे घोटाळे करायचे देश विदेशात बेनामी मालमत्ता निर्माण करायची !! हेच केल ना काँग्रेस ने !!

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री,
काँग्रेसचे लोक 10-15 वर्ष पद सांभाळायचे, भाजपावाल्यांची पाच वर्षात एकेकाची ३-४ डिपार्टमेंट फिरून होतात.
दहापंधरा वर्षं तळ ठोकून राहायचे ते भ्रष्टाचार करण्यासाठीच. आम्हांस माहितीये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाजपेयीच्या ५ व मोदींच्या ४ वर्षात कुणीच 'आत' गेला नाही... शिवाय कितीतरी छोटे मोदी बाहेर पळाले ते वेगळेच.

In reply to by manguu@mail.com

लालू प्रसाद काश्मीरला फिरतायत असं ऐकलं का तुम्ही? आणि भुजबळ साहेबांचं आता तर बाहेर येणं होतंय. असं का याचं उत्तर सापडताय का पहा? ते सापडलं कि चर्चा करू.

PM's Language Unacceptable, Manmohan Singh and Co. १० वर्षे सत्तेत असताना ह्यांच्या तोंडातुन भ्रष्टाचार करणार्या विरुद्ध ऐक शब्द सुद्धा आला नाही , तो माणुस त्याच भ्रष्टाचारी पक्षाच्या विरुद्ध मा. पं प्र मोदीजींनी बोललेले शब्द विखारी समजतो ? त्याला मा मोदीजींचे शब्द सहन होत नाहीत ? कमालच आहे !! असेही आता ह्यांच्यां टाहोंना व ह्यांना विचारतोय कोण ?

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच पहिलाच मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येडियुरप्पांचा शपथविधी झाला असला तरी, अद्याप मंत्रिमंडळ गठित झालेलं नाही. इतकंच काय तर येडियुरप्पांनी विधानसभेत बहुमतही सिद्ध केलेलं नाही. त्यामुळं त्यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातोय.

In reply to by manguu@mail.com

त्यामुळं त्यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातोय. काय सांगताय? धाडसी वगैरे काही नाही. धूर्तपणाचा निर्णय आहे. ( रुग्णांसाठी लबाडपणा) सरकार निवडून आलं तर कर्जमाफी देऊन खुंटा बळकट करता येईल. कारण मधेच आमदार सोडून गेले तर मी शेतकरी हिताचा निर्णय घेणारा माणूस आहे म्हणून मते मिळवता येतील. पैसे कमी पडले तर केंद्रात आपलेच सरकार आहे २०१९ पर्यंत पैसे घेता येतीलच. आणि सरकार आले नाही तर विरोधी पक्षात बसून सरकारच्या नावाने ठणाणा करता येईल. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी तो आमचाच निर्णय राबवला म्हणून लोकांना सांगायला मोकळे. कर्जमाफी केली नाही तर राजकीय फायदा उपटता येईल. याला म्हणतात छाप पडला तर माझा विजय आणि काटा आला तर तुझा पराभव

In reply to by सुबोध खरे

बघा, खरे डॉक्टर, तुमच्या विधानांत मी-तू, छापा-काटा, विजय-पराभव ह्या साऱ्या बाजूंचा साकल्याने विचार झालेला आहे. म्हणजेच ते सर्वसमावेशक आहे. आ.न., -गा.पै.