Skip to main content

आर्जव

लेखक अबोलघेवडा यांनी शनिवार, 12/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
गिरनारला दत्तगुरूंच्या दर्शनाला जाण्यापूर्वी केलेली कविता... तुझ्या दर्शनाची लागलिया ओढ, कधी भेटशील गुरुराया | उजाडला तो दिस येई अग्निरथे, भेटीचा योग सुखेनेची यावा ||१|| भेटशील गिरनारी कधी नच कल्पिले, कृपेनेची तुझिया झाला चमत्कार | मनी पाहे तुझिया त्या डोंगरावरी, बोलाविलेस का रे मजला तू उद्धराया ||२|| मानले या जन्मी तुज गुरुस्थानी, का लाविलास भेटी तू इतुका वेळ | आनंदाचा क्षण आला आता हाती, येतो तुझ्या चरणी माथा टेकवाया ||३|| डोईजड झाला मज पापांचा हा भार, करशील का हलका तुझिया कृपेने | असेना कसाही जरी मी या जन्मी, घेशील का उरी तू मला सावराया ||४|| देऊ नकोस अंतर लोटू नकोस दूर, हेच या जन्मी माझे रे मागणे | तुझ्याविना जगणे होईल कचकड्याचे, आता मजला उद्धारा कवी म्हणे ||५||
लेखनविषय:

वाचने 1133
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया