लेक होती घरामध्ये
दारी गजबज होती
लेक सासरी गेली अन
सुनी झाली ही ओवरी
लेक नटते थटते
हौस पुरविते आई
आत्ता संक्रांतीची मेंदी
कशी रंगतच नाही
गौर पुजतसे माय
जणु लेकच साजिरी
दोन दिवस पाहुणी
लेक येतसे माहेरी
बाप कणखर मोठा
जीव गुंते लेकीपाशी
सारा मानमरातब
ठेवी लेकीच्या दाराशी
लेक सुखात सासरी
सुखी माहेरी माउली
काय भाग्य त्या लेकीचे
सासरी आईची सावली
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3540
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेक
छान.
अहाहा !!!
वाहवा!
कविता
In reply to वाहवा! by राघव
भारी
+१
In reply to भारी by सहज
सुरेख..
माहेरची आठवण आली!
सुरेख !!
अगदी बापाचे मन पण उघडले आहे...
सुंदर लिहिले आहे..
सुंदर