काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा. आधिच नास्तीक त्यात व्यासंगी शिवाय कोडगा. समोरच्याची बोलती बंद केली की याला आसुरी आनंद होतो. तर स्वारी घरी आली. बायकोने त्याला बसायला सांगीतले आणि आत येऊन मला वर्दी दिली. मी घाईने ऊठलो. देवघरातील भरपुर अंगारा तिन बोटावर घेऊन कपाळावर मोठा त्रिपुंड्र ओढला आणि मग बाहेर आलो. फार अगत्य असल्यासारखे विचारले “काय देवा, आज ईकडे कुठे पालखी आली तुमची?” आक्रमण हेच बचावाचे पहिले धोरण असते म्हणतात. पण माझा आक्रमक पवित्रा पाहून ‘देव’ काही गडबडले नाहीत. उलट हसत म्हणाला. “वा, यामुळेच आपल्याला आवडतो यार तू. माणसाला पोटाच्या भुकेबरोबर बौद्धीक भुकही असते. तुझ्याकडे आलो की ती भागते.” मरा. म्हणजे आज हा वेळ आणि डोके दोन्ही खायच्या तयारीने आला होता तर. आता माझा नक्की किती मेंदू खावून याची बौद्धीक भुक शमनार होती तेवढेच पहाणे माझ्या हातात होते. हताश होत, तसे भाव स्पष्ट चेहऱ्यावर दाखवत मी सोफ्यावर बसलो. बायकोला आवाज देऊन सांगीतले “चहा नको टाकूस गं लगेच, हा टळत नाहीये इतक्यात.” तर हा हसुन म्हणाला “वहिणी, थोडा चहा टाकाच. जाताना परत थोडा घेईन.” मग माझ्याकडे पहात, दोन्ही पाय वर घेऊन त्याने मस्त मांडी ठोकली आणि शेजारची छोटी ऊशी मांडीवर घेतली. मग मात्र तो आणि मी दोघेही चुपचाप बसुन राहीलो. बायकोने चहा आणुन दिला. चहा झाल्यानंतर रिकामे कपही घेऊन गेली. तरीही हा चुपच. मला जाणवलं की हा आज काहीतरी गंभीर विषयावर वाद घालणार. मी मनोमन ठरवलं की काहीही झाले तरी आज संयम सोडायचा नाही. मग गडी एक एक शब्द सावकाश ऊच्चारीत म्हणाला
“माझं असं मत आहे की ज्ञानेश्वरी लिहीणारे ज्ञानेश्वर आणि अभंग रचणारे ज्ञानदेव या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगावचा तर ज्ञानदेवांचा जन्म हा आळंदीचा. या शिवाय ज्ञानेश्वर हे योगी होते तर ज्ञानदेव हे भक्त होते. ज्ञानेश्वर हे शैव होते तर ज्ञानदेव वैष्णव होते. ज्ञानेश्वर योगी असल्याने त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत अनेक देवांचा ऊल्लेख असला तरी ‘विठ्ठलाचा’ कुठेही ऊल्लेख नाही. तसेच अनेक भाषांमधले शब्द ज्ञानेश्वरीत असले तरी एकही मुसलमानी शब्द ज्ञानेश्वरीत नाही.”
बोलणे थांबवून त्याने माझ्याकडे ऊत्तराच्या अपेक्षेने पाहीले. मी संयम सोडायचा नाही हे पक्के ठरवून बसलो होतो तरी मित्राने त्याचे पुर्ण कौशल्य वापरुन काडी टाकली होती आणि मी अस्वस्थ व्हायला सुरवात झाली होती. कॉलेजला असताना या विषयावर मी चर्चासत्रे गाजवली होती. हिरीरीने सगळी मते साधार खोडून काढली होती. पण हळू हळू जाणवायला लागले होते की ‘फलसफी को बहस के अंदर खुदा मिलता नही।” वडीलही एकदा म्हणाले होते की “तुम्हाला ज्ञानेश्वरी समजली की नाही याचे पहिले लक्षण म्हणजे वाद घालण्याची वृत्ती हळू हळू नाहीशी होते.” म्हणजे, “आपण किती अज्ञानी आहोत” हे कळायला लागले म्हणजेच तुम्हाला ज्ञान व्हायला लागले. वृत्ती शांत होने म्हणजेच ज्ञानेश्वरी कळणे. “तुम्ही म्हणता ते बरोबरही असेल, आम्ही धाकटे, आमची बुद्धीही धाकटी” असं म्हणने म्हणजे ज्ञानेश्वरी समजने. माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे की
म्हणौनि थोरपण पऱ्हाच सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।
जै जगा धाकुटे होईजे। तैं जवळीक माझी॥
काय करावे? शेवटी वडीलांची शिकवण हरली आणि मित्र जिंकला. मग मीही पाय वर घेवून भक्कम मांडी घातली आणि त्याला म्हणालो “हां बेटा, बोल. काय म्हणायचं आहे तुला? एक एक मुद्दा सांग, मी तुला सांगतो खरं काय आहे ते…”
मग मीही पाय वर घेवून भक्कम मांडी घातली आणि त्यालाम्हणालो “हां बेटा, बोल. काय म्हणायचं आहे तुला? एक एक मुद्दा सांग, मी तुला सांगतो वस्तूस्थिती काय आहे नक्की ते…”
हे बोलायला सोपं होतं पण समोर बसलेले महाशय काही ‘सोम्या-गोम्या’ कॅटेगरीत मोडणारे नव्हते. चौफेर व्यासंग असणारे होते. बरं ठरवून आला होता म्हणजे ‘बाळ’ अभ्यास करुन आलेलं असणार. आपला मुद्दा समोरच्याला पटवता नाही आला तर थोडा भावनेला हात घालून भडकवले की काम होते पण हा मित्र कोडगेपणा पुरता कोळून प्यायला होता, त्यामुळे तोही मार्ग बंद होता. अर्थात त्याचा प्रश्नच चुकीच्या मुद्द्यांवर आधारीत होता त्यामुळे मला फारसे कष्ट पडणार नव्हते. अडचण ही होती की माझ्या वाचनात असलेली ज्ञानेश्वरीची प्रत ही ‘दांडेकरांची’ १९६२ सालातली आहे. त्यामुळे ती जरा जपुन हाताळावी लागते. अर्थात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळे अध्याय माझ्याकडे PDF मध्ये ऊपलब्ध होते त्यामुळे फारशी चिंता नव्हतीच.
मित्र म्हणाला “ज्ञानदेव हे भक्त होते तर ज्ञानेश्वर हे योगी होते. या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. तुम्ही वारकरी हे ऐकूनही घेत नाही, कबुल करायचे दुरच. असे का?”
मी म्हणालो “हे बघ, जो कोणी ज्ञानेश्वरी निर्विकार मनाने वाचेल मग तो वारकरी असो नसो, आस्तिक असो वा नास्तिक, त्याला ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव वाचताना हे स्पष्ट जाणवेल की या दोन्ही व्यक्ती भिन्न नसून एकच आहेत. माझ्या साठी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर एकच असल्याने, मी माऊली शब्द वापरतो तेव्हढे समजून घे मग पुढचे बोलू”
मित्र “ठिके, बोल.”
मी “तु ज्ञानेश्वरी वाचलीच आहे, त्यामुळे तुला हे मान्यच करावे लागेल की ज्ञानेश्वर हे सगळ्यांचा समन्वय साधणाऱ्या वृत्तीचे होते. धर्मातील सर्व साधने ही साधकाला एकाच मुक्कामाला घेवून जातात असे ज्ञानेश्वर मानतात. आणि ती सर्व साधने एकाच ध्येयाला घेवून जात असतील तर त्यांची योग्यता मानायलाच हवी. आता याला पुरावा म्हणजे माऊलींनीच नवव्या अध्यायात म्हटले आहे की
तरी कीर्तनाचेनि नटनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें। ऐसें केलें॥
म्हणजे येथे माऊली किर्तनाचे महत्व सांगतात. दुसर्या ओविमध्ये अष्टांग योगमार्गाचा ऊल्लेख करतात. तर याच अध्यायत ते ‘नमन’ आणि ‘ज्ञानयज्ञाचेही’ महत्व सांगतात. चारही साधनांचे वर्णन करतात. तेही अतिशय ऊत्कटपणे. पण तरीही माऊलींना याची जाणिव होती की ईतर साधनाने साधकाचा जरी ऊद्धार झाला तरी सर्वसामान्यांना ही साधने जमतिलच असे नाही. म्हणजे रहाता राहीला एकच मार्ग, तो म्हणजे किर्तनाचा, नामस्मरणाचा, भक्तीचा. वरच्या ओवित माऊली ज्या किर्तनाचे वर्णन करतात ते ‘वैष्णवसंकीर्तन’ आहे. त्यांनी केलेले कीर्तनाचे आणि कीर्तनकाराचे वर्णन वाचण्याजोगे आहे. नवव्या अध्यायात माऊली म्हणतात
तरी कीर्तनाचेनि नटनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें। ऐसें केलें॥
यमदमां अवकळा आणिली। तीर्थें ठायांवरुनि उठविलिं।
यमलोकीं खुंटिली। राहटी आघवी॥
यमु म्हणे काय यमावें। दमु म्हणे कवणातें दमावे।
तीर्थें म्हणती काय खावें। दोष ओखदासि नाहीं॥
ऐसे माझेनि नामघोषें। नाहीं करिती विश्वाचीं दुःखें।
अवघें जगचि महासुखें। दुमदुमित भरलें॥
किती सुंदर आणि ऊत्कट वर्णन केले आहे कीर्तनाचे आणि नामस्मरणाचे. तु म्हणतोस तसे ज्ञानेश्वर जर फक्त योगी असते तर वरील वर्णन करु शकले नसते. अजुन एक ओवी सांगतो, ऐक.
ते पाहांटेंवीण पाहावित। अमृतेंवीण जीववित।
योगेवींण दावित। कैवल्य डोळा॥
किंवा
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें।
ऐसें नामघोष गौरवें। धवळलें विश्व॥
नुसता योगी 'योगेंवीण दावित। कैवल्य डोळां’ असे व्याख्यान करु शकणारच नाही. जर ग्रंथकर्ता हा नुसता योगीच असता व त्यास भक्तिमार्ग पसंत नसता तर, त्याने या ओव्या लिहिल्याच नसत्या. ज्ञानेश्वरी ही ‘योगी ज्ञानेश्वरांनी’ लिहिली हे तुझंच म्हणने आहे. मग योगी ज्ञानेश्वर भक्तिमार्गाचे ईतके ऊत्कट वर्णन कसे करु शकतील? अनन्य भक्ति म्हणजे ईश्वरावर प्रेम करणे. यावर माऊली अकराव्या अध्यायात म्हणतात
परि तेचि भक्ति ऐसि। पर्जन्याची सुटिका जैसी।
घरावांचूनि अनारिंसी। गतिचि नेणें॥
कां सकळ जळसंपत्ती। घेऊनि समुद्रातें गिंवसती।
गंगा जैसी अनन्यगती। मिळालीचि मिळे॥
तैसें सर्वभाव संभारे। न धरत प्रेम एकसरें।
मजमाजीं संचरें। मीचि होऊनी॥
माऊली वर जे वर्णन करतात ते योगाचे फळ नाही तर भक्तिमार्गाचे फळ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ‘अर्जुन’ व ‘संजय’ यांची जी वर्णने आहेत ती ज्यांना भक्त म्हणतात त्यांची आहेत. कैवल्याकरता रागद्वेषशुन्य होऊन ‘तहाने तहानचि पियावी’ असे योगाची साधना करणाऱ्या योग्यांची नाहीत. हे सगळं का सांगतोय मी तुला? तर ज्ञानेश्वरीचे लेखक श्रीज्ञानेश्वर हे जसे योगी होते तसेच भक्तही होते. त्यांचे ह्रदय प्रेमभक्तिने ओसंडून वहात होते. म्हणजे निदान तुला एवढे तरी मान्य आहे का की जे योगी ज्ञानेश्वर होते ते भक्तही होते? हे मान्य असेल तर पुढे बोलू, नाहीतर तुला अजुन काही ओव्यांचा दाखला देऊ?
मित्र म्हणाला “येथपर्यंत पटले. योगी ज्ञानेश्वर भक्त असू शकतात पण मग अभंग रचणाऱ्या ज्ञानदेवांचे काय?” मी आज चंगच बांधला होता की याच्या सर्व शंकाचे आज नुसते निरसनच करायचे नाही तर याला आज वारकरीच करुन सोडायचे. या आषाढीला खांद्यावर भगवी गुढी घेऊन याला वारीला पाठवायचेच.
त्याला विचारले “येवढे मान्य आहे ना? मग आता ज्यांनी अभंग रचले त्या तुझ्या ज्ञानदेवांकडे वळू.”
क्रमशः
वाचने
9629
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक , पुभाप्र
भारीच होऽऽ
वेगळ्या व्यक्ती
कशाला एव्हढा उपद्व्याप...
निसटत्या बाजू १
In reply to कशाला एव्हढा उपद्व्याप... by अर्धवटराव
निसटत्या बाजूं १ ला पुरवणी
In reply to कशाला एव्हढा उपद्व्याप... by अर्धवटराव
सगळं मान्य.
In reply to निसटत्या बाजूं १ ला पुरवणी by माहितगार
माझे मत
In reply to सगळं मान्य. by अर्धवटराव
मला वाटतं आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतोय.
In reply to माझे मत by माहितगार
छान पु भा प्र
सुंदर लेख ! मुद्देसूद व
प्रत्येक ? नास्तिक नसावे
In reply to सुंदर लेख ! मुद्देसूद व by डॉ सुहास म्हात्रे
मनोगत नव्हे मायबोली !
In reply to प्रत्येक ? नास्तिक नसावे by माहितगार
अजून एकदा सॉरी, मनोगतावर
In reply to प्रत्येक ? नास्तिक नसावे by माहितगार
मनोगतवरची चर्चा वाचली.
In reply to अजून एकदा सॉरी, मनोगतावर by माहितगार
माझे मत
In reply to मनोगतवरची चर्चा वाचली. by शाली
डॉ सुहास म्हात्रे. आपल्याला
In reply to सुंदर लेख ! मुद्देसूद व by डॉ सुहास म्हात्रे
खूप छान लिहिलंय
site:shodhganga.inflibnet.ac
फार सुरेख लिंक दिली माहितगा.
In reply to site:shodhganga.inflibnet.ac by माहितगार
प्रा. केतकी मोडकांनी यांचा
In reply to फार सुरेख लिंक दिली माहितगा. by शाली
* प्रा. केतकी मोडक यांचा
In reply to प्रा. केतकी मोडकांनी यांचा by माहितगार
संपुर्ण प्रबंधाचे दुवे
In reply to फार सुरेख लिंक दिली माहितगा. by शाली
ते सर्व बाजूला राहू दे
ज्ञानेश्वरीचा अर्थ कसा समजून
In reply to ते सर्व बाजूला राहू दे by रविकिरण फडके
डॉ रवीन थत्ते
बेलसरेंचा दासबोधाचा अनुवाद
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित
In reply to बेलसरेंचा दासबोधाचा अनुवाद by माहितगार
माझी वेगळीच शंका
माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या
In reply to माझी वेगळीच शंका by अरविंद कोल्हटकर
तुकारामांचे माहित नाही पण आज
In reply to माझी वेगळीच शंका by अरविंद कोल्हटकर