मागे एका साहित्यिक चळवळीतील सदगृहस्थांनी गप्पा कट्टा नावाचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्याच्या सर्व बातम्या आम्ही सातत्याने देत होतो. एकदा मात्र, एक बातमी लागली नाही. तो अक्षरश: तणतणत आला, आणि भरपूर ज्ञान शिकवू लागला. तुम्ही फालतू बातम्यांना जागा देता, आणि साहित्यिक चळवळीतील या वेगळ्या उपक्रमासाठी तुमच्याकडे जागा नसते वगैरे बोलू लागला, म्हणून मी त्याला, एखादी फालतू बातमी दाखव असे म्हणाल्यावर त्याने पिशवीतून त्याच दिवशीचा अंक काढला व एका बातमीवर बोट आपटू लागला. मी बातमी पाहिली.
त्याला फालतू वाटणाऱ्या बातमीचा मथळा होता, ‘चाॅकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार’...
त्या दिवशी गप्पा कट्ट्यावर काहीतरी साहित्यिकाच्या एका कादंबरीवर परिचर्चा होती. ती बातमी लागली नव्हती, आणि त्यापुढे ही बातमी त्याला फालतू वाटली होती.
साहित्यक्षेत्रात बऱ्यापैकी नाव असलेल्या त्या माणसाची मला कीव वाटली.
मी म्हणालो, या बातमीमुळे आज हजारो आया सावध झाल्या असतील. ‘कुणी अनोळखी माणसाने काही दिले तरी घ्यायचं नाही’ असंही त्यांनी आपल्या लहानग्यांना सांगितलं असेल... आणि तुम्हाला ही बातमी फालतू वाटते!’...
त्यानंतर ते सदगृहस्थ मला भेटलेले नाहीत! अधूनमधून कुठेतरी त्यांचं नाव असलेली बातमी वाचायला मिळते!
वाचने
2654
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
" त्या दिवशी गप्पा कट्ट्यावर
उपसंपादकाचे निर्णय
तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रात