Skip to main content
लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 05/05/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सायरनचे भणभणणारे आवाज येताहेत, ‘जी’ सुट घालून हातात हेलमेट घेऊन वावरणारे पायलट एकदम लढाऊ विमानांच्या दिशेने धावताहेत, पुढच्या काही क्षणात विमाने अवकाशात झेपावतात, गोळ्यांचा वर्षाव, विमानांच्या जीवघेण्या डॉग फाईट्स, अचुक वेध. लाल बटणावर अंगठा, पुढल्या क्षणी विमानाचा पेट. कॉकपिटातून अंगठा वरकरून ‘थम्प्स अप’ खुणेने कामगिरी फत्ते, असे हवाईदलातील विजयी वीराचे चित्रीकरण आपणाला पाहून पाहून हवाईदलातील लोक नेहमी विमानातून संचार करत असावेत असे सामान्यांना वाटणे साहजिक आहे. पण एरव्ही हवाईदलातील कर्मचाऱ्यांच्या नशिबी बहुचक्रवाहनाचाच प्रवास असतो. त्यात अनेक मजा मजा होतात. त्यातल्या काही माझ्या वाट्याला आल्या. त्यांची कथा...

टारगट मुलामुलींचे फाजिल चाळे!

एकदा झाशी–कानपूर रात्रीच्या प्रवासात फर्स्टक्लासच्या कूपेत खालच्या बर्थवर सुरे घेऊन बसलेल्या टारगट पोरापोरींचे फाजिल चाळे पहायचे नशीबी आले! दादा कोंडकेंच्या सिनेमातील पाचकळ भाषेतील ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ वगैरे प्रकार, पूर्वीच्या फर्स्ट क्लास मधील कूपेत खाली चाललेल्या चाळ्यांचे आवाज मला वरच्या बर्थ वरून सहन करावे लागत होते. लोक हौशीने बर्थडे साजरा करतात. मला ती ‘बर्थ नाईट’ म्हणजे झोप उडवणारी होती. मधेच कुठेतरी ते टोळके काम झाल्यावर उतरले. कानपूरला टीसीला गाठून तक्रार दिली. तर तो म्हणाला, “साब, आप की शामत थी कि आपके पैसे वगैरह नही लूटे. ये लूटपाटी लडकों की चहीती गाडी है. हम रातभर आते ही नहीं चेकिंग को”!
असे अनेक प्रसंग आठवून मजा वाटते. हे सर्व घडायला माझी हवाईदलातील कारकीर्द कारणभूत होती. त्या शिवाय असे थ्रिल कसे अनुभवायला मिळाले असते?
नुकत्याच चायवाली किस्सा वाचून लिहावेसे वाटले... काही किस्से सादर केल्यानंतर नवे लिहिले होते ते सादर करायला आजचा दिवस आला!
शिवाय वांड जेम्स नी बोट दाखवून अवलक्षण केले कदाचित!

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2497
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया