Skip to main content

सदुपयोग

सदुपयोग

Published on 02/05/2018 - 10:46 प्रकाशित
फारश्या वापरात नसलेल्या वडिलोपार्जित घराचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे. ठिकाण: अहमदनगर शहर क्षेत्रफळ: साधारण 600 चौरस फूट, जुनं बांधकाम परंतु राहण्यायोग्य हेतू: not-for-profit and not-for-donation (कालसापेक्ष स्वार्थ) बरीच वर्षे कायमच राहत नसल्याने तिथे कार्यरत सामाजिक संस्थांबद्दल काहीही माहिती नाही. तसेच काही कायदेशीर सोपस्कारही पार पाडावे लागतील का? अनुभवी मंडळींनी कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.

याद्या 5877
प्रतिक्रिया 21

पण हल्ली कोणालाही आपले घर किंवा जमीन वापरायला देताना नीट विचार करावा. कितीही चांगली संस्था असेल तरी भाडेकरूंना काढून लावणे फार कठीण असते. त्याचे home stay टाईप काही करता येत असेल तर बघा.

In reply to by पैसा

homestay ही कल्पना नगरसारख्या छोट्या, पर्यटन मूल्य नसणाऱ्या शहरात तरी शक्य नाही. संस्थांविषयी काही विशिष्ट माहिती स्वानुभवातून/ऐकिवात असल्यास खूप मदत होईल.

In reply to by मार्मिक गोडसे

भाड्याने न देण्याची कारणे खाली प्रतिक्रियांमध्ये विशद केली आहेत. पण पर्याय चांगला... शिक्षण घेणाऱ्यांना नक्कीच कमी खर्चात/मोफत निवार्याची गरज अधिक असते

In reply to by कंजूस

बरोबर. वर्षातून १-२ वेळा जाणं-येणं होतं. नगरसारख्या छोट्या शहरात आपण सुचवलेला पर्याय उपयोगी नाही. खाली प्रतिक्रियांमध्ये अधिक माहिती दिली आहे.

घर विकून येणाऱ्या पैशातून काही उपयोगी सामाजिक काम करता येईल. (२ महिन्याआधी नगरमध्येच असलेले घर मी विकले). तुमचा हेतू चांगला असला तरी त्यातून डोक्याला फार ताप होतो आणि ते निस्तरण्यापेक्षा विकलेले चांगले.

In reply to by मनो

घर न विकण्याची कारणे खाली प्रतिक्रियांमध्ये विशद केली आहेत. नगरकर असल्याने आपल्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. काही विशिष्ट माहिती असल्यास सवडीनुसार इथे टाकावी.

घर भाड्याने देणे वा विकणे कधीही उत्तम. वापरात नसलेले किंवा नजीकच्या भविष्यात वापरण्याची शक्यता नाही अशी स्थावर मालमत्ता विकणे हेच मोठे सामाजिक कार्य आहे !!

प्रतिक्रियांसाठी सर्वांचे धन्यवाद. बराच विचार करून घर न विकण्याची किंवा भाड्याने न देण्याची खालील कारणे आहेत: १) हे घर वडिलोपार्जित आहे, साधारण ५० वर्षांपूर्वी बांधलेलं पण अजूनही ३० वर्षे व्यवस्थित राहील असं. २) घरातच छोटंसं मंदिर असून वर्षातून फक्त १-२ वेळा आणि तोही 'घरगुती' उत्सव साजरा केला जातो. आणि फक्त तेव्हाच घरी जाणं-येणं होतं. ३) मंदिर घरापेक्षाही जुनं (साधारण ४ ते ५ पिढ्यांपासून) आहे. त्यामुळे भावनिक गुंतवणूक सर्व कुटुंबाची आहे. ४) घर रिकामं ठेवलं तर त्याचं आयुष्य कमी होण्याची शक्यता. आणि मोबदला घेऊन दिलं तर आपुलकीने सांभाळ होण्याची शक्यता कमी. कोणीतरी विश्वासू (आणि मुख्य म्हणजे गरजू) माणसं भेटतील अशी आशा आहे. म्हणून हा 'मिपा'प्रपंच.

In reply to by गणेश.१०

३/४ विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना कमी पैशात राहायला देणे हा चांगला पर्याय आहे. ते सुटीला घरी जातील. एखाद्या संस्थेला वगैरे दिलं तर उत्सवाच्या वेळी तुम्हाला राहायला कसे मिळणार?

In reply to by गणेश.१०

प्रश्न भावनिक आहे म्हंटल्यावर मिपाचर्चेचा विशेष काही फायदा होईल असे वाटत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

मिपावरील चर्चेमुळे बरेच पर्याय (निदान माझ्या) समोर आले. आणि सर्वांच्या प्रतिसादामुळे थोडा हुरूप आला.

व्यविस्थीत मेंटेन करण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांना देणे केंव्हाही योग्य. ही ऑफर कॉलेजच्या प्राध्यापकांना सांगीतली तर ते गरजू आणि योग्य विद्यार्थी सुचवतील.

ओके तुमचा दृष्टीकोण लक्षात आला. मला खालील पर्याय सुचले १) चित्रकला / संगित अथवा छंद कलावर्ग साठी भाड्याने देणे २) एखाद्या स्थानिक महिला अल्प बचत गट वगैरेला घरगुती खाद्य पदार्थ किंवा मोक्याच्या जागी असल्यास विक्रि केंद्र म्हणून उपलब्ध करुन देणे . ३) एखादे वाचनालय ४ ) विद्यार्थी अभ्यासिका या पर्यायांमध्ये तुमच्या मंदिराचा उत्सवाच्या काळात छंदवर्ग किंवा महिला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवणे शक्य व्हावे . ( मी नगरचा नाही )

In reply to by माहितगार

राहण्याचा तसा प्रश्न नाही कारण उत्सव अगदीच घरगुती. एकंदरीतच मिपावरील चर्चेमुळे बरेच पर्याय समोर आले. धाग्यावर प्रगती कळवत राहील पुढे. सर्वांचे आभार.