Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३१

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 28/04/2018 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-… देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

वाचने 57852
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

मला एक कळत नाहीये सर्व आयडींना झालेय काय?? एवढे वैयक्तिक का होतोय आपण? संपादक मंडळींना सतत कामाला लावायचा विचार आहे काय? आपण वेगवेगळ्या विचारसरणीला पाठिंबा देत असू, वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असू पण याबाहेर आपण सर्वसामान्य माणसे आहोत. याची जाणीव ठेवून फक्त मुद्द्यांवर बोलायचा पण केला तर काही बिघडणार आहे का? --------------------- प्रत्येकाला समोरचा आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षाचा पेड ट्रोल वाटत असला तरी जमिनीवर सगळ्यांना माहीत असते आपण या कंमेंट्स आपल्या घरी सोफ्यावर तंगड्या पसरून किंवा हाफीसात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकत असतो. तेव्हा जरा सबुरीने घेऊया, कसे??

सद्या काही राजकिय पक्षांनी आणि सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकीलांनी सर्वोच्च न्यायालय व विशेषतः त्याच्या मुख्य न्यायाधिशांवर जी चिखलफेक चालवली आहे ती "न भूतो" प्रकारची आहे. त्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकील असलेल्या व जागतिक स्तरावर वकिली करणासाठी प्रसिद्ध असलेल्या हरीश साळवे यांनी एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत प्रकट केलेले परखड मत, जितके थक्क करणारे आहे तितकेच सद्या चाललेल्या भारतिय न्यायव्यवस्थेच्या राजकियीकरण्याच्या प्रयत्नांबद्दल किळस आणणारे आहे. नेहमी शांतपणे बोलणार्‍या साळवे यांच्या मुलाखतीत, या परिस्थितीबद्दलची किळस व संताप बर्‍याचदा स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहे. ते या प्रकाराला न्यायव्यवस्थेला लागलेली बुरशी आहे असे म्हणतात आणि त्याबाबत जबाबदार असणार्‍यांना कैदेत पाठवावे असेही म्हणतात ! मुख्य म्हणजे साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे या परिस्थितीबद्दल एकमत असल्याचेही कळते. एका मान्यवर भारतिय घटनातज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रिय कायदेतज्ज्ञाचे हे सद्य परिस्थितीवरचे मत जाणून घेण्यासाठी ही सर्व मुलाखत मुळातूनच पाहणे आवश्यक आहे... (चित्रफीत युट्युबवरून साभार)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भाजप ने परत सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर दिली असेल म्हणून ते असे बोलत असतील. ;).

In reply to by बिटाकाका

साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी सहसा एकमत न होणार्‍या मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे एकमत झाले आहे... तेव्हा सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर त्या सगळ्यांना एकत्रितपणे दिली जाणार असेल तर मग ती एक अभूतपूर्व घटना होईल, नाही का !!! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अंध विरोधकांनी तो मुद्दा वापरायच्या आत मी वरून घेतला;);). --------------------- जोक्स अपार्ट, पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? कि विरोधकांना याचे भांडवल करता येऊ नये म्हणून दुर्लक्ष करण्यात येत आहे? खरच उद्या साळवे म्हणतात तसं प्रत्येकाने प्रत्येक निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली तर मग कसे? फक्त आरोपी सुटल्यावरच आरोप करणार की दोषी ठरवल्यावर पण आरोप करणार?

In reply to by बिटाकाका

पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? हा सरळ सरळ कैदेत टाकण्याइतका गंभीर आरोप आहे. कारण, यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या सर्व न्यायप्रक्रियेवर आणि सर्व न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर आधात केला गेला आहे. पण, तो आरोप करणार्‍यांकडे मोठे राजकिय उपद्रव मुल्य (political nuisance value) असल्याने उच्च न्यायालय जरा मवाळपणे वागते आहे असे वाटते. कदाचित् ... (अ) जर कोर्टाने त्वरीत कारवाई केली तर त्याविरुद्ध आकांडतांडव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल व त्याचा केंद्रातल्या सद्य सरकारवर ठप्पा ठेवून (केंद्र व न्यायालयाचे साटेलोटे आहे, इत्यादी) कर्नाटक निवडणूकीत त्याचा फायदा उपटता येईल, त्यामुळे ही कारवाई आताच हेतूपुर्रसर केली गेली आहे हे म्हणण्यास बराच वाव आहे. कदाचित् हा, राजकिय फायद्यासाठी न्यायालयाला प्यादे बनवण्याचा, कावा ओळखून उच्च न्यायालय सबुरीचे धोरण अबलंबत असावे, किंवा (आ) कोर्ट शंभर गुन्हे पूर्ण होण्याची वाट पहात असावे... (या आरोपांच्या कारस्थानांमागचा कावा स्पष्टपणे लोकांपुढे आल्यावर कारवाई झाल्यास आरोप करणार्‍यांना लोकांची सहानभूती मिळविणे कठीण होईल.) नक्की काय आहे हे महिन्याभरात समोर येईलच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जोशींच्या न्यायव्यवस्थेच्या धाग्यावर बरीच चांगली आणि माहितीपूर्ण मते वाचायला मिळाली. बघुयात पुढे काय होते. पण हा सगळा थिल्लरपणा २०१९ नंतरच थांबेल असे मनात कुठेतरी वाटते.

In reply to by बिटाकाका

२०१९ मध्ये मोदी परत पंतप्रधान झाले नाहीत तर कदाचित थांबेल. अन्यथा दुप्पट जोमाने सुरूच राहील.

In reply to by श्रीगुरुजी

मी खोटे फोटो टाकत नाही , त्यामुळे मी ट्रोल नाही तुम्ही स्वतः कडे बघा ! स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याचा कुसळ दिसतं अशी पण म्हण आहे मराठीत

In reply to by कपिलमुनी

का तुमच्या गाढवपणाचे नमुने वारंवार सादर करता? सदर ट्वीट भाजपने केले आहे का? मग का उगाच मिपाकरांची दिशाभूल करत आहात? ========================= १. हे ट्वीट जानेवारी २०१४ चे आहे. आता तुम्ही टाकायचं लॉजिक काय? २. हे ट्वीट प्रिती गांधी नावाच्या बाईचे आहे. तिचे ट्विटर प्रोफाइल म्हणते कि ती भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची सदस्या आहे. (२०१४ ला होती असा अर्थ निघू शकतो.) असली कोणतीही बया कधीही या कार्यकारणीची सदस्या नाही, नव्हती. महिला मोर्चाची पण नाही. http://www.bjp.org/images/jpg_2014_1/hindi_mc_office_bearers.pdf ३. तिचा ट्विटर आय डि व्हेरिफाइड आहे म्हणजे तिची कार्यकारिणीची सदस्यता व्हेरिफाइड आहे असा गाढवासारखा अर्थ अनेकांनी काढला आहे. या गाढवांत विकिलिक्स एक आहे. ४. गुगल सर्च मधे कोणतीही तारखांची रेंज घातली तरी एकाही बिजेपीच्या साईटवर तिचं नाव येत नाही. ४. तरिही सर्वच्या सर्व ट्वीट्स वैयक्तिक आहेत असं तिनं स्पष्ट लिहिलं आहे. =========================== अनेक उत्साही लोकांनी (किंवा केंब्रिज अनालिटिकाने) असे फेक मथळे फेकले आहेत. त्याला बर्‍याच पक्षांचे बरेच नेते बळी पडले आहेत. त्याची शेकडोनी उदाहरणे आहेत. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचा अधिकृत अजेंडा खोटी माहिती पसरावणे आहे असा होत नाही.

In reply to by arunjoshi123

https://timesofindia.indiatimes.com/home/sunday-times/deep-focus/The-re… ही बया स्थानिक नगरसेवकाला मदत करणारी उत्साही भाजपची सपोर्टर आहे. आणि ही तिची प्रगती २०१५ ची आहे. २०१४ ची राष्ट्रीय कार्यकारीनीची सदस्या २०१५ मधे महाराष्ट्र भाजप कम्यूनिकेशन सेलची को-कन्व्हिनर आहे!!! वा वा! काय प्रगती आहे. एकदम उलटी. मिडियाला किती अक्कल आहे हे जाणूनच ठाम मत बनवावीत. ====================================== https://www.youtube.com/watch?v=3uIEMs2D6DI इथे या बयेचं स्पष्टीकरण देखील आहे. विकिलिक्स आणि असान्ज हे सिनॉनिमस आहेत हे सोयिस्कर असलं तरी "धडधडीत खोटं" या सदरात तरी येत नाही ना? ======================================== https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorrup… इथे विकिलिक्सच्या मूखातून ऐकायला मिळेल. वरच्या व्हिडिओत बयेने विकिलिक्सच्या कोणत्या म्हणण्याचा काय अर्थ काढला हे स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या नेत्याने विकिलिक्सला म्हटले आहेत मोदींबद्दल हे आदरवाचक उद्गार! विकिलिक्स पण स्वतः म्हणतंय कि त्यांची तशी प्रतिमा आहे (खरं माहित नाही.) मग आता पुरे. ============================= कपिलमुनी, केव्हाचे मुद्दे केव्हाही काढणे ही घाण सवय आहेच. तुम्ही स्वतः का हातभार लावताय सोशल मिडियावरच्या खोटारडेपणाला?

In reply to by arunjoshi123

Reacting to the tweets, BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." https://www.firstpost.com/politics/never-said-narendra-modi-is-incorrup… =========================== २००६ - US ambassador and Mumbai consular general Michael S Owen met Congress leader Yuraj Digvijay Sinhji. "Modi's reputation for being completely incorruptible is accurate, and if he were to become a national leader he would crack down on corruption throughout the BJP," he supposedly told Owen. --------- ...even Muslims are now supporting him to some extent because he is viewed as someone who is completely incorruptible and can deliver the goods," the cable quotes him as saying. २०१४ - भक्तांनी किंवा केंब्रिज अनालिटिकाने एक ट्वीट बनवले. "America is scared of Narendra Modi as America knows Modi is incorruptible." २०१४ (जान.) - एक उत्साही "स्वघोषीत" भाजप राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्या" तसेच भाजप महिला मोर्चाची सदस्या तसेच भाजपच्या कम्यूनिकेशन सेलची निमंय्रिका तसेच नगरसेवकाची मदतनिस तसेच राष्ट्रीय प्रवक्ती (वेगवेगळ्या डाव्यांची वेगवेगळी पदे, कोणतंही गोड मानून घ्या.) हिने हा रिट्वीत केला. २०१५ - ह्या ट्वीटची शहनिशा जबरदस्त चालली. २०१५ - BJP spokesperson Mukhtar Abbas Naqvi told news agency ANI that no endorsement from Wikileaks was needed for their PM candidate. "We don't need a certificate from Wikileaks or Assange on Modiji." त्यावर वरील उत्तर मिळाले. २०१८ - कपिलमुनींना खाज सुटली.

कोणताच विधायक कार्यक्रम देऊ न शकणारे राज ठाकरे व त्यांचा पक्ष- मनसे. बहुतांशी राज्यस्तरीय पक्ष व त्यांचे राजकारण त्या त्या राज्यापुरते सीमीत असते किंवा असावे अशी अपेक्षा असते. मनसे अपवाद आहे. मागे राज ठाकरे ओबामा-मनमोहन भेटीवरही भाषणात बोलले होते. २०१४ च्या तडाख्यानंतर हे सुधारतील अशी अपेक्षा होती. पण फोल ठरली. https://www.loksatta.com/mumbai-news/raj-thackeray-addressing-people-at… अमराठी लोकांवर बेताल बडबड करायची... व लोक पेटतात का ते पहायचे. ७०च्या दशकात ह्यांच्या काकांचा हा प्रयोग काही महिने चालला.. आता तो चालेल असे वाटत नाही.

भाजपाच्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न सगळ्या देशालाच पडला आहे. याचे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे या नेत्यांची एकामागोमाग एक समोर येणारी वक्तव्ये. बिपल्ब देब, विजय रुपाणी यांच्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी दलितांच्या घरी जेवण करत नाही, मी काही प्रभू रामचंद्र नाही की त्यांच्या घरी जेवल्याने ते पवित्र होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटणार यात काहीही शंका नाही. मध्यप्रदेशातील छत्तरपूर या ठिकाणी असलेल्या ददरी गावात लोकांशी संवाद साधत असताना उमा भारती यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/uma-bharti-says-she-never-eat…

In reply to by manguu@mail.com

गाढवांना आणि पुरोगाम्यांना नको तिथे वादग्रस्तता पाहायची सवय लागली आहे. कृपया अनपढ लोकांनी चालवलेला लोकसत्ता वाचत जाऊ नकात. https://khabar.ndtv.com/news/india/uma-bharti-says-dalits-should-come-h…
उमा भारती बोलीं, 'जब दलित हमारे घर आकर साथ बैठकर भोजन करेंगे तब हम पवित्र हो जाएंगे' उमा भारती ने दलितों के घर जाकर भोजन करने की बजाय अपने घरों पर उन्हें आमंत्रित करने का सुझाव दिया है.
आपण दलितांच्या घरी जाऊन जेवलो तर त्यांचा सन्मान वाढणार नसून ते आपल्याघरी येऊन जेवले तर आपलं पावित्र्य परत येईल असं त्या म्हणाल्यात. यात अजिबात काही वादग्रस्त नाही. --------------- डावे चेकाळलेत. पुरोगामी चेकाळलेत. त्यांची बुद्धी बधीर झालेली आहे. त्यांचा मेंदू कुजला आहे. (शब्द सौजन्य - यनावाला).

In reply to by arunjoshi123

म्हणजे पवित्र तुम्हाला व्हायचे आहे आणि त्यासाठी त्यानी तुमच्या घरी येऊन जेवावे ? हे म्हणजे डॉक्टर सिरियस पेशंटला होम व्हिजिट करतात , तसे दलितानी ह्यांच्या घरी होम व्हिजिट करून जेवून त्याना पवित्र करायचे की काय !!!! पवित्र तुम्हाला व्हायचे ना ? तुम्ही जा त्यांच्याकडे.

In reply to by manguu@mail.com

मंगू साहेब, (संपादित) वाचून वाचून तुमच्या डोक्यातलं सर्कीट इथे उलटं चालत आहे. ------------------------- दलितांना पवित्र करणारे सवर्ण कोण? उलट दलितच सर्वणांना पवित्र करण्याची पात्रता ठेऊन आहेत. असा तो आशय आहे. -------------------------- ते असो. शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.

In reply to by विशुमित

प्रोफेशनल जर्नल्स वाचत चला. त्यात राजकारण, धर्मकारण हा अँगलच नसतो. पण त्याची माहीती असते. उदा. इंफ्रा इंडिया. -------------------- लोकसभा टीवी, राज्यसभा टिवी, अल जजिरा, विऑन हे चॅनेल पहा. (तिथल्या जाहिराती इग्नोर करा.) न चेकाळलेले पत्रकार न आक्रस्ताळलेल्या तज्ञांसोबत अत्यंत शांतपणे चर्चा करतात. --------------------- तुम्ही स्वतः द हिंदू आणि द हिंदू बिझनेसलाईन आणि बिझनेस स्टँडर्ड हे पेपर वाचा. हे दाहक सरकारविरोधी, मोदीविरोधी, संघविरोधी, अस्तिकताविरोधी, इ इ आहेत. पण खोटारडे अजिबात नाहीत. शिवाय तोडमरोड करणारे नाहीत. अशाच प्रकारचे उजव्या बाजूची माध्यमं वाचू नकात. डावी माध्यमं वाचूनच बरेच उजवीकडे सरकाल. --------------------- बाकी प्रतिष्ठीत म्हणवली जाणारी माध्यमं निव्वळ खोटारडी आहेत. Communal peace is not the responsibility of the Hindus, says Ram Madhava of BJP असं इंडीया टूडे म्हणतो नि लिबरल डावेही प्रचंड सोशल मिडिया गदारोळ होऊन अरे हा तरी बरा होता पासून हा ही असलाच या लेवला जातात. मूळात ते विधान Communal peace is not the responsibility of the Hindus alone असं असतं. ------------------------------------- वृत्तपत्राला बायस असणं वेगळं. पण पेपरच खोटारडा असणं वाईट. म्हणून लोकसत्ता तशास तसा चेपत जाऊ नये. त्यांना अनेक मूर्ख वाचक लाभलेत, त्यांना एंजॉय करू द्या. पण इथे किस पाडला जातो, तेव्हा अजून १-२ स्रोतांमधून माहिती चेक केलेली बरी.

In reply to by arunjoshi123

मीही त्याच आशयाने बोललो आहे. जरा नीट वाचा . दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.

In reply to by manguu@mail.com

तुमची मूळ पोस्ट वाचा. त्यात वादग्रस्त (मंजे जातीयवादी?) मसाला आहे हा जो अविष्कार तुम्हाला झाला होता तो कशामुळे? ------------------ तुमची मूळ पोस्ट नीच वाचल्याने गैरसमज होताहेत. ==========================================
दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
विचारलं आहे हो, पण ते चूक आहे असं पण सांगीतलंत ना लगेच. शेवटी सवर्णांनीच दलितांना पवित्र करावे असा आठमूठा स्टँड घेताय.

In reply to by manguu@mail.com

दलितानी सवर्णांच्या घरी होम व्हिजिट करून सवर्णाना पवित्र करावे का ? असे मी विचारले आहे.
मग यात गैर काय आहे ? त्यानिमित्ताने त्या बिचार्‍या लोकांचा पोटा-पाण्याचा प्रश्न मिटेल. उद्यापासून त्या उमाभारती जिथे कुठे राहत असतील तिथे त्यांच्या घरी दलितांनी जेवणाकरता रांगा लावाव्यात.

In reply to by manguu@mail.com

मंगूसाहेब, त्यांच्या खऱ्या वक्तव्यावर आपले काय म्हणणे आहे? "आपण त्यांच्या घरी जाऊन जेवलो तर ते पवित्र व्हायला आपण काय देव आहोत का, त्याना आपल्या घरी बोलवा" या वक्तव्यात काय चुकीचे वाटते तुम्हाला? ---------------------------------- पेड न्यूज असेल काय? अत्यंत सरळ वक्तव्याचा असा अर्थ काढण्याने फायदा होईल?

In reply to by manguu@mail.com

पुरोगाम्यांनी चालवलेल्या मिडियाची गत इतकी घाण का झाली आहे? लोकसत्ताच्याच लिंकेत दिलेला व्हिडियो पाहिला तर सरळ कळतं उमा भारतीला काय म्हणायचं आहे.
मात्र काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याची माहिती मला नव्हती.
आपण काय बोलून बसलो याची किंचितही उपरती उमाला झालेली नाही स्पष्ट दिसतं. ती काहीही गैर बोलली नाही. समरसता भोजन वेगळं आणि दलितांच्या घरी जाऊन जेवण करणं वेगळं. ================== (संपादित) भाजपच्या नेत्यांना बदनाम करायचा असा प्रयत्न का करत आहे?

महाभारत काळापासून इंटरनेट होते असा अजब दावा करणाऱ्या बिप्लब देव यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू नये, कोणीही नख लावण्याचाही प्रयत्न करू नये असे झाले तर एकेकाची नखे उपटून काढेन अशी धमकीच बिप्लब देव यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातला एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जनतेशी संवाद साधत असतानाच बिप्लब देव यांनी हा धमकीवजा इशारा दिल्याचे स्पष्ट होते आहे. नखं संभाळा ! https://www.loksatta.com/desh-videsh-news/fingernails-will-be-cut-says-…

In reply to by manguu@mail.com

भाजपाच्या ह्या नेत्याना कर्नाटकात काँग्रेस जिंकावी असे वाटू लागले आहे की काय? अशी दाट शंका आहे.

In reply to by manguu@mail.com

१. महाभारत सत्य आहे असं मानणारा बराच मोठा वर्ग आहे. त्यातही त्यातल्या असंभव गोष्टींसहित ते सत्य आहे मानणारा वर्ग देखील भारतात खूप मोठा आहे. त्यामुळं याला वैज्ञानिक दावा इ म्हणण्यात येऊ नये. हा मूर्खपणा सार्वत्रिक आहे. स्वर्गात मधाचा पाऊस पडतो असं बिप्लबच्या वयाचे असताना नेहरू म्हणायचे. माणसाचा पुनर्जन्म होतो हा हेका सावरकरांनी शेवटपर्यंत सोडला नाही. शिवाय दिव्यदृष्टीपेक्षा इंटरनेट थोडं प्रॅक्तीकल वाटतं. एका बी ए माणसाकडून असले दिव्य निष्कर्ष निघणारच. २. मेकॅनिकल ऐवजी सिविल इंजिनिअर्स नी प्रशासकीय सेवेत असावं हे म्हणणं अतिशय योग्य आहे. हे या माणसाला कळतं म्हणजे हा प्रचंड अनुभवी नि हुशार आहे.

In reply to by arunjoshi123

"One should not opt for civil services after studying mechanical engineering. Civil engineers have the experience and knowledge to help build administration and society. Civil engineering gives that kind of knowledge.I did not say that mechanical engineers must not go for civil services. I said that civil engineers should join civil services as they have experience about administration" बिप्लब देब. https://www.dailyo.in/politics/biplab-deb-modi-meet-tripura-cm-bjp-cow-… हा माणूस काहीही निष्कर्ष काढतो... मुख्यमंत्र्याने विचार करूनच बोलले पाहिजे. काहीही बडबडतो म्हणूनच मोदीनी दिल्लीला बोलावून घेतले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रिय माईसाहेब, त्यांचे इंजिनिअरींग बद्दलचे वचन अगदी सुयोग्य आहेत. नागरी अभियांत्रिकी हा शब्द फुकट नाही वापरत. सिविल इंजिनिअर आय ए एस असेलेला मेकॅनिकल पेक्षा १०० पट इष्ट. ===================================== बाय द वे, मोदींनी त्यांना का बोलावले आहे हा डाव्या माध्यमांचा निष्कर्ष आहे. पुन्हा सल्ला - शिकलेल्या लोकांचे पेपर वाचत चला.

In reply to by arunjoshi123

ते मिलिटरी/नेव्ही सर्विसमध्ये काम करीत नाहीत म्हणून सिविल सर्विस. He said that if civil engineers enter civil services, they can help with construction projects, whereas mechanical engineers will not be able to do so. अत्यंत भंकस व पोकळ विधान आहे हे. असो. वाटेल ते करून ते योग्यच बोलले असा दावा असेल तर प्रश्न मिटला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

महाभारताच्यावेळी इंटर्नेट होते.. सिविल सर्विस सिविल अभियंत्यांसाठी जास्त योग्य.. अशीच विधाने राहूल गांधीने केली असती तर भक्तांच्या विनोदांनी वोट्स-अ‍ॅप्/फेसबूकचा सर्वर भरून घेला असता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुम्हाला विनादाच्या दर्जाची जाण नाही. इस्पितळांतले एमाराय मशिन्स जोडले तर जगातील सर्व ज्ञान सर्वांना होईल असे म्हणणार्‍या पुरोगामी गांधीची तुलना बिप्लबशी होऊ शकत नाही. १. महाभारत कालीन घटनांना वैज्ञानिक मानणे हा सार्वत्रिक भारतीय आजार आहे. २. कोणी आय ए एस करणं अधिक उत्तम हे एक मत आहे. आणि हे पहा https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk काय तुलना आहे का? ================== मूळात त्रिपूरा हे राज्य आहे हेच लोकांना माहीत नसायचं. मग तिथला मुख्यमंत्री कोण हा दूरचा भाग. त्याचं एखादं वक्तव्य हे तर असंभव. पण हा राजा येऊ घातलेला शहाण्यांचा पंतप्रधान आहे!!!!!!!!!!!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललात माई !

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी भंकसच विधान आहे. सिव्हिल सर्विसला माणूस ग्रॅजुएट लागतो. BA , BCom , BSc , MBBS .... इ इ इ इ काहीही चालते. तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.

In reply to by manguu@mail.com

सिव्हिल सर्विसेस आणि सिव्हिल इंजि. यात दोन्हीतल्या सिव्हिलमध्ये क्रॉस सर्किट झाल्यागत वाटते आहे.

In reply to by manguu@mail.com

स्वतःला वाचता येत नसेल तर इतरांची दिशाभूल करू नये. ---------------------- "नागरी विकास आणि बांधकाम प्रकल्प यांचेकरिता मेकॅनिकल पेक्षा सिविल इंजिनिअर हे असलेले लोक प्रशासकीय अधिकारी झालेले बरे" असं ते विधान आहे. या विधानात दोनदा येणारा सिविल शब्द बरोबर आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

हे काम त्यामानाने सोपे आहे. स्क्र्रू शोधणे, पाना शोधणे, स्क्रू ड्रायवर शोधणे, डोक्यात ते घट्ट बसवणे हे संभव आहे. पक्षाचा जो विस्तार आहे त्यामानानं सुरुवातीला सत्ता मिळाली की प्रत्येकाने या पक्षात विवादित बयानं दिली आहेत वा डाव्या माध्यमांनी तसा अर्थ काढला आहे. पण अनेक जण हळूहळू निवाले आहेत. पुढेही असंच चालू राहिल. ========================= पण अगदी सर्वोच्च पातळीला नेत्याचे डोकेच नसताना डोके नसणारांनी डोके असणारांसमोर डोके असल्याचा आभास उत्पन्न करणे किती अवघड काम आहे???!!!! https://www.youtube.com/watch?v=iD5gUFsRQDk मोदीला मत न देऊन ह्या गाढवाला पंतप्रधान करणारे कोणत्या पातळीचे गाढव? ओ भाऊ, ते पद देशाच्या पंतप्रधानाचं आहे .... लै मोठ्ठं पद आहे ते. आणि मोदीला मत न देणं म्हणजे सरळ या गाढवाला त्या खुर्चीवर बसवणं आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. विश्वे . . . विश्व . . . विश्वराया! बिंगो!!!!!!

In reply to by श्रीगुरुजी

पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही. तुम्हाला कुठे तसं आढळल्यास दाखवून देणे. उगाच मन की बात ठोकू नका.

In reply to by मार्मिक गोडसे

आमचे असे कोणतेही लाडके नेते नाही.
२०१४ मध्ये आपण नरेंद्र मोदींना मतदान केलंत तेव्हा आपण बर्‍याच मुक्त मनाचे आहात हे मान्य आहेच. पण आज मोदीला मत नाही म्हणजे राहुलला आहे हे स्पष्ट समीकरण आहे. मोदी तुमचे लाडके नाहीत इतकंच पुरे. राहुल तुमचा लाकडा हा त्याचा ऑटोमॅटिक अर्थ आहे. मत तुम्ही मतदान सातव्या नि आठव्या आघाडीला करा नैतर नोटाला करा. ----------------------- ताटातला भात मी अजिबात खाणार नाही असं म्हणण्यात अर्थ नाही. दुसरं काहीतरी खालच ना? कितीवेळ उपाशी बसणार आहात? ---------------------------- कि मोदी तुमचे नावडत्यांत सर्वात आवडते नेते आहेत? दुसर्‍या कुणाचं नावही घ्यायला तयार नाहीत म्हणून विचारलं.

In reply to by arunjoshi123

युक्तिवाद करताना लॉजिक पार गंडलय तुमचे. स्क्रू ढिले झाले असले तर घट्ट करता येतील, पण तुमच्या लाडक्या नेत्याच्या बाबतीत ते सुद्धा अशक्य आहे. नोटाला मत दिल्यास कसं काय बुवा कोणत्या लाडक्या नेत्याला मत दिलं असं तुम्ही सिध्द करणार. उगाच कोणालातरी वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःच गटांगळ्या खाऊ लागलात. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन हैl तुम्ही एकदा असा अयशस्वी प्रयत्न करून बघितला होता, परंतू उगाच हट्टीपणा चालू आहे.

In reply to by manguu@mail.com

तिथे मेकॅनिकलपेक्षा सिव्हिल जास्त चांगला असे म्हणणे हास्यास्पद आहे.
का रे भाऊ? कॉमर्स सेक्रेटरी हा बी ए इतिहास पेक्षा एम बी ए इंटरनॅशनल ट्रेड बराच ना? कॉमर्स वाढण्यासाठी इतिहास पेक्षा ट्रेड वाल्यांनी आय ए एस केलेलं बरं म्हटलं तर काय चूकलं?

In reply to by arunjoshi123

सिव्हिल सर्विसेसवाला फक्त 'सेतु बांधा रे ! ' इतके एकच काम करत असतो की काय ? https://www.quora.com/What-are-the-powers-and-responsibilites-of-an-IAS… उदाहरण म्हणून IAS घेतले आहे , इतरांचे शोधून पहावे.

In reply to by manguu@mail.com

अरे भाऊ, त्याने वाक्यरचना "बांधकाम प्रकल्पांसाठी" अशी चालू केली आहे. ------------------ इतर गोष्टींसाठी कुणी करावं हे तो बोलत नव्हता.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, तुम्हाला आभास व्हायचं बंद झाल्यावर ते नक्की काय म्हणाले नि नंतर त्यांनी नक्की काय स्पष्टीकरण दिलं ते सांगा.
He said that if civil engineers enter civil services, they can help with construction projects, whereas mechanical engineers will not be able to do so.
हे विधानही अत्यंत उचित आहे. खूप शासकीय सेवा या सिविल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मोडतात. एक तर मेकॅनिकल इंजिनिअर नि वर आय ए एस असल्यावर ही मंडळी बांधकाम प्रकल्पांची वाटच लावून टाकतात. अर्थात या महाशयाने फक्त मेकॅनिकल इंजिनिअर्सना का टार्गेट केलं आहे हे कळत नाही. नाहीतर मैथीली भाषा शिकून "काहीही" सांभाळणारे लोकही असतात म्हणा. त्या अर्थाने यांचे विधान चूकीचे मानता येईल. https://byjus.com/free-ias-prep/how-many-optional-subjects-in-ias-mains

In reply to by arunjoshi123

एक तर मेकॅनिकल इंजिनिअर नि वर आय ए एस असल्यावर ही मंडळी बांधकाम प्रकल्पांची वाटच लावून टाकतात.
अनेक आय.ए.एस. अधिकारी अर्थशास्त्र किंवा ईतिहास विषय घेऊन पदवीप्राप्त आहेत्/होते.अनेक कॅबिनेट सेक्रेटरी(सर्वोच्च पद) अर्थशास्त्र्/ईतिहास घेऊन मग आय.एस.एस. झाले आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Cabinet_Secretary_of_India ह्या लोकांनी तर अनेक बांधकाम प्रकल्पाचे वाटोळेच केले असणार मग कारण ते अभियंतेही नाहीत. उगीच भाजपाचा नेता काहीतरी बोलला म्हणून लंगडे समर्थन नको. १) बी.कॉम पदवीधर अधिक चांगला आय.आर.एस. होऊ शकेल. २) जास्त मित्रमंडळी असणारा चांगला मार्केटिंग मॅनेजर होऊ शकेल. ३) उत्तम पोहणारा बोटीचा चांगला कॅप्टन होऊ शकेल.. असे विचार कट्ट्यावर बोलायला बरे .. नीट अभ्यास केल्याशिवाय मोठ्या पदावरील माणसाने बोलू नये असा संकेत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई असे बघा, त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. तसे करावेच असा अध्यादेश नाही काढला. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहास बदलला तरी त्याबद्दल बोलू नका असं म्हणणारा आपला देश! घेऊ द्या कि जरा स्वातंत्र्य देब ना पण! एवढी असहिष्णुता काय कामाची? ------------------------------------- डिग्र्यांवरून खाते ठरवणाऱ्या महाभागांना तूर्तास माफ करू!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मी गेली १७ वर्षे नागरी सेवा नि बांधकाम प्रकल्प याच विषयांवर टेक्नोकमर्शियल काम करत आलेलो आहे. माझा केंद्रातल्या नि राज्यातल्या किमान ५०-६० आय ए एस अधिकार्‍यांसोबतचा काम करायचा अनुभव आहे. ही मंडळी सगळं काम (आमच्या सारख्या) कंसलटंट्सना आउटसोर्स करतात. सरकारनी दट्टा केलेल्या नमामि गंगेचे साधी टेंप्लेट काँट्रॅक्ट डॉक्यूमेंट बनायला ४ वर्षे लागतात. आजही ती सर्वमान्य, सर्वस्वीकृत नाहीत !!! मंजे निरुपयोगी आहेत. बजेट असून (संस्थागत) क्षमता नाही ही नेहमीचीच बोंब आहे. याला वाट लावणे नाहीतर काय म्हणावे? याबद्दल सांगायसारखं बरंच आहे, पण मी हे काम केवळ रिटायर झाल्यावर करू शकतो. ============================
उगीच भाजपाचा नेता काहीतरी बोलला म्हणून लंगडे समर्थन नको.
उगीच भाजपाचा नेता बोलला म्हणून अंध मतप्रदर्शन नको. ============================= काहीही ज्ञान नसलेल्या आय ए एस अधिकार्‍यांना डिपार्टमेंटचा प्रमुख करण्याचा सपाटा सरकार नेहमी लावते. म्हणून शेकडो कंपिटंट लोक भारतात सरकारी सेवाच सोडून गेलेले आहेत. सिविल रिफॉर्म्सची आवश्यकता अनेकांनी मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना दलित बहुल भागात जाऊन तिथे वेळ व्यतीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षापासून दलित समाज दूर जाऊ नये हा यामागचा उद्देश आहे. मोदींचा आदेश तात्काळ अंमलात आणणारे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा आता यावरून एका वादात अडकले आहेत. राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबाने केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे. राणा आणि भाजपाचे अनेक नेते अलिगढ जिल्ह्यातील लोहगढ येथे राहणारे रजनीश कुमार यांच्या घरी रात्री ११ च्या सुमारास गेले. मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने रजनीश यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व काही पुर्वनियोजित पद्धतीने करण्यात आले. मला घरी बसण्यास सांगण्यात आले होते. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/uttar-pradesh-yogi-adityanath…

In reply to by manguu@mail.com

एकाच बातमीतील दोन परस्परविरोधी वाक्ये - मंत्री आपल्या घरी येणार आहेत, याची रजनीश यांना काहीच माहिती नव्हती. आणि राणा हे सोमवारी एका दलिताच्या घरी जेवण करण्यास गेले होते. परंतु, दलित कुटुंबाने केलेल्या स्वयंपाकाऐवजी त्यांनी हॉटेलमधून मागवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आरोप आता केला जात आहे. Presstitutes!

In reply to by श्रीगुरुजी

http://m.lokmat.com/national/minister-visits-dalit-house-eats-food-cook… भाजपाचे नेते आपल्याला न कळवताच घरी येऊन धडकले. मला घरी थांबायला सांगितले होते, परंतु असे काही होईल, याची मला कल्पना नव्हती. रात्रीचे जेवण बाहेरून मागवण्यात आले. जेवणात दाल मख्खनी, मटार पनीर, पुलाव, तंदुरी रोटी आणि गुलाब जामून मागवण्यात आले होते. त्याचबरोबर पाणीही बाहेरून आणले होते. हे सर्व काही पूर्वनियोजित आणि एकप्रकारचा दिखावा होता, असे रजनीश यांनी सांगितले. मात्र, सुरेश राणा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी घराच्या हॉलमध्ये बसून रजनीश यांच्या घरात बनवलेले जेवण खाल्ले. परंतु, माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते, असे राणा यांनी सांगितले.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्यासोबत तब्बल 100 कार्यकर्ते असल्याने आम्ही जवळच्याच एका हॉटेलमधून काही पदार्थ मागविले होते
ही शक्यता जास्त आहे. मिडियापण डँबिस आहेच. बाहेरून पदार्थ मागवले नसते तर "भाजपा मंत्र्याचा दलित नागरिकास १०० लोकांचे जेवण बनवायचा आदेश' अशा मथळ्याची बातमी आली असती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी मंगूसाहेबांना केव्हाचा सांगतोय की तो पवित्र पेपर वाचू नकात. बहुतेक त्या पवित्र पेपराचे संपादक तत्त्वज्ञ गिरिश कुबेर आहेत. आणि पुढल्या खेपेला राज्यसभेचं तिकिट मिळण्यासाठी कोणती पातळी सुयोग्य ते ते चाचपत असतील. ----------------- हाच पातळीशोध उजवीकडे चालू झाला तर मज्जाच मज्जा येईल.