Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रदीप on Sat, 04/28/2018 - 11:56
कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे गाडी माणसांना तुडवते आहे हाडांच्या चिंध्या करते आहे शब्द हवेत फेकते आहे कल्पनांचे भुंगे सोडते आहे कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून गेला एक येडा त्या येड्याला काय ठावी जालाची किमया नाही गावी आता वाराही न दवडावी फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे

Submitted by पैसा on Sat, 04/28/2018 - 12:04

Permalink

गाडी कसली!

जेसीबी आहे तो!! पुन्हा काही बोलले तर फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sun, 04/29/2018 - 09:50

Permalink

एक टायर तुटला आहे

एक टायर तुटला आहे हेडलाईट फुटला आहे बंम्पर ठोकला आहे धुराळा उठला आहे तरीही, कवि गाडीत बसला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Sun, 04/29/2018 - 20:22

Permalink

गाडी कवीवर बसली आहे

गाडी कवीवर बसली आहे कवी सुसाट धावतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 04/30/2018 - 19:01

Permalink

कवी

तोच चंद्रमा आहे फक्त हौस म्हणून गाडी रणगाडा ते जैसीबी व्हाया डंपर बदलत आहे. गाडी सुसाट वेगाने पुढे जात आहे, सांडलेल्या शब्दांतून नवकविता (ऊ) जुळून येत आहे प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 05/02/2018 - 13:06

Permalink

:D:D:D:D

मस्तय गाडी,,, जेसीबी डंपर ट्रक आणि बरंच काही सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 05/02/2018 - 15:17

Permalink

मस्त गाडी

मस्तय गाडी किवा जेसीबी किवा ट्रक किवा डंपर आमच्यासारख्या फुकट्या वाचकांचे मनोरंजन चाललेय जोवर
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2321 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com