Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३०

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/04/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-li…

वाचने 61528
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

अजून किती अधोगती.... "मी म्हणतो म्हणून", "मी हे करतो", "मी ते करतो" . . . ब्ला ब्ला . . . असा 'मी' 'मी' जप करून एकतर्फी पक्षपाती आरोप करणे या अधोगतीपेक्षा आमची तथाकथित अधोगती खूप बरी.

In reply to by श्रीगुरुजी

अरारारारा, स्वतःच विचारलात का खोटे म्हणून, एकदाच सांगितले तर जप वाटायला का आपल्याला? भलतंच हं. जप कशाला म्हनतात ते इतरांनी तुम्हाला सांगायला हवं का? आणि अधोगती कुठली, इन्सेन्टीव्ह मिळतील आता तुम्हाला. प्रगतीच आहे. आधी नुसते भांडायचात. आता खोटे पुरावे पण द्यायला लागलात.

In reply to by अभ्या..

एकदाच सांगितलं! LLRC! त्या तथाकथित "एकदाच" सांगण्यामध्ये "मी" "मी" ची जपमाळ किती वेळा ओढलीये ते मोजता आलं तर पहा. आणि "प्रगतीचं" म्हणाल तर सिलेक्टिव्ह आक्शेप, सिलेक्टिव्ह ट्रोलिंगचे आरोप, "मी" "मी" ची जपमाळ आणि पराकोटीचा त्रागा व आकांडतांडव ही "प्रगती" नक्कीच अभिनंदनीय आहे.

In reply to by अभ्या..

स्वधर्म - मी बिटाकाका आहे, श्रीगुरुजी श्रीगुरुजी आहेत. यात काही सिद्ध करण्यासारखं असेल तर बोला. खरंतर त्याची अजिबात आवश्यकता नाही पण सौजन्य म्हणून. ------------------ अभ्या, तुम्ही दुसऱ्या आयडीने निरपेक्ष लेखन वगैरे उल्लेख माझ्या आयडीसाठी केला आहे का? असेल तर स्पष्ट बोला, मग मी उत्तर देईन. ----------------- एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे.

In reply to by बिटाकाका

एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ झालेली अधोगती लक्षात येते पण एखाद्या पक्षाच्या विरोधासाठी झालेली लक्षात येत नाही हे अतिशय विस्मयकारक आहे. + १ एखाद्याने टाकलेले फोटो केवळ "मी म्हणतो म्हणून" त्याला तात्काळ ट्रोल ठरवून झोडपता येते. परंतु दुस-याने टाकलेल्या संदर्भहीन चित्रफितींकडे सोयिस्कर काणाडोळा करता येतो हे अजिबात विस्मयकारक नाही.

In reply to by बिटाकाका

अभ्या, तुम्ही दुसऱ्या आयडीने निरपेक्ष लेखन वगैरे उल्लेख माझ्या आयडीसाठी केला आहे का? असेल तर स्पष्ट बोला, मग मी उत्तर देईन.
स्पष्टपणा फक्त लोकांनी दाखवायचा अन तुम्ही गोल गोल घुमवायचे काय? बालिशपणा कुणी किती केला जरा ह्याचे स्पष्ट उत्तर अजून नाही दिले आपण. काही प्रॉब्लेम?

In reply to by अभ्या..

तुम्हाला मुद्दे आणि आरोप यातला फरक नक्की कळत असेल. बालिशपणाचं उत्तर वर दिलं आहे, वर नसेल पटत फाट्यावर मारा म्हणूनही सांगितलं आहे, ते तुम्हाला गोलगोल वाटत असल्यास तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही. मी श्रीगुरुजींचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप आपण करत आहात काय असे स्पष्ट विचारात आहे. मुद्दे संपले आहेत का तुमच्या जवळचे? मी स्पष्टपणा दाखवावा अशी अपेक्षा ठेवता तर मी न सांगता तुम्ही ठेवा कि स्पष्टपणा. का मी चिखलात लोळतोय म्हणून तुम्ही पण डबल लोळायला पाहिजे असे आपल्याला वाटते? ------------------------------------------------------ इतक्या अवांतर त्राग्याची तुमच्याकडून अपेक्षाच नव्हती. श्रीगुरुजींचे मुद्दे तुम्हाला पटोत न पटोत, तुमचा त्यांचा काय स्कोअर असो नसो, पण म्हणून तुम्ही उघडउघड्पणे मी त्यांचा डुप्लिकेट आयडी आहे असा आरोप करणार? आणि वरून दुसऱ्यांची अधोगती...भारीय की!

In reply to by बिटाकाका

हेहेहेहेहे. फाट्यावर कसे मारले गेला आहात तेही कळेना तुम्हाला. श्रीगुर्जी व मी घेतोच हो बघुन. तुम्ही का पेटलात एवढे? आणि त्यांच्या अधोगतीचे तुम्हाला का लागले इतके? तुम्हाला कुठे म्हणलेय अधोगती? आणि डुआयडीचे स्वत:हून ओढवून घेतलेय तुम्ही. दाखवा पाहू तुम्हाला मी कुठे डुआयडी म्हणलेय ते. चिखलात एका आयडीने लोळायचे, ते कसा घाणेरडा चिखल आहे असे दाखवले की दुसर्‍याने त्याचा समर्थनार्थ डबल लोळायचे हे चुकीचे आहे असेच वाटते मला. . आणि त्रागा बिगा नाही हो, काय जळणारे आमचे म्हणून त्रागा करायचा? मला तर वाटते इतके दिवस बिनदिक्कत चालू असलेल्या गोष्टींना सडेतोड उत्तरे मिळताहेत म्हनून काही जणांचा त्रागा आणि डुआयडींची वावर वाढला असावा. बाकी कै नाही

In reply to by अभ्या..

हाहाहा, पेटलीये माझी विडी!! --------------------------- स्वधर्म यांच्या डुप्लिकेट आयडीच्या प्रतिसादावर तुमचा प्रतिसाद आहे म्हणून तुम्ही डू आयडी म्हणालात का एवढा साधा प्रश्न होता आणि साधं उत्तर होतं "नाही". तुमचा "लोळ" प्रतिसाद बाकी सगळं सांगून देतो. त्यामुळे चिल्ल माडी! --------------------------- मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे थोड्या कालावधीतील. कायेकी आपल्याला दोन्ही अधोगती तेवढ्याच लागतात, त्यामुळे मी पण चिल्ल माडी! --------------------------- बाकी शुभेच्छा तर आहेतच, चालुद्या निवांत!

In reply to by बिटाकाका

मुद्दे आटोपले कि डू आयडी, समर्थन वगैरे फालतू मुद्दे बाहेर यायला लागतात हे एक निरीक्षण आहे + २० लाख याबरोबरीने त्रागा, आदळआपट, आकांडतांडव, "मी" "मी" ची जपमाळ इ. फालतू मुद्दे सुद्धा पुढे येतात.

दक्षिणेत एक सदगुरू(जग्गी वासुदेव) क्रिया योग, ईनर इंजिनियरिंग वगैरे वर क्लासेस घेत असतात. जगातल्या जवळपास कोणत्याही विषयावर ते अधिकारवाणीने बोलतात. कुणा मिपाकरास अनुभव आहे का ?

In reply to by मार्मिक गोडसे

कुठलेही अर्धवट ज्ञान वाईटच. इंडिया फर्स्ट पीएम सर्च केल्यावर गूगल त्यांच्या अल्गोरिथम नुसार विकिपीडियाच्या "लिस्ट ऑफ इंडियन पीएम्स" या पेजवर असलेला फर्स्ट पीएमशी निगडित नेहरूंचा उतारा हायलाईट मध्ये दाखवत आहे. या पेजवर एकच फोटो आहे "भारताचे सध्याचे पंतप्रधान मोदी" असा. आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. पण भक्तांना नाचायला लागतेच काय??

In reply to by बिटाकाका

>>>आता यात गुगल आणि विकिपीडिया दोन्ही साईट्स आपापल्या जागी बरोबर असून हा कसलाही एरर नाही. एका अर्थाने हा ग्लिच आहे, कारण सर्च जर पहिल्या पंतप्रधान (किंवा कोणताही मंत्री) यासाठीचा असेल तर फोटोसुद्धा त्याप्रमाणे फेच व्हायला हवा होता, पण तो मात्र सध्याच्या पदावरील व्यक्तीचा होतोय. कारण गुगल या क्वेरीसाठी विकीपिडीयावरून "List of Prime Ministers of India" फेच करत होते आणि सर्वात पहीला फोटो दाखवत होते जो सध्याच्या पंतप्रधानांचा (किंवा ज्या पदाची यादी आहे त्यातील सध्याच्या व्यक्तीचा) असतो. इथे गुगलने त्याच पेजवरील खालच्या यादीतून फोटो उचलायला हवा होता. ग्लिच नसता तर गुगलने फिक्स केला नसता.

In reply to by थॉर माणूस

असेलही, ग्लिच होता आणि तो गुगल ने फिक्स केला की विकी पेज अपडेट झाले कळले नाही. ****************** पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. मोदी दिसले की जल्ला ऍसिडीटीच होते काही लोकांना. मंग गुगल पण मोदीला सामील...लै मज्जा!!

In reply to by बिटाकाका

गुगलने फिक्स केला तो, आता ते फोटोसाठी वेगळी युआरएल वापरतायत (अमेरीकन प्रेसिंडेंटसाठी असलेल्या स्टेप्ससारखी). विकीपेज पाहीले की कळते ना लगेच, पेज तसेच आहे अजून म्हणजे विकीपेजचा काहीच संबंध नाही, सोपं आहे फार पडताळणे. त्यामुळे कसलाही एरर नाही वगैरेला काहीही अर्थ नाहीये, जिथून कुठून माहिती मिळाली आहे त्याकडे कृपया दुर्लक्ष करा. >>>पण तरीही यात अगदी गुगलला "यु आर सो फुल ऑफ जंक" म्हणण्यासारखे काय कळले नाही. असते हो एकेकाची सवय, धड काय झालंय हे कळलेलं नसताना अर्धवट ज्ञानावर काहीही दावे करतात लोक. काय माहिती गुगलला योग्य आणि अचूक माहितीचा एकमेव स्त्रोत समजणारे बरेच लोक असतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील कदाचित. आपण उगाच अर्थ काढायचे नाहीत त्यातून. जमेल तशी योग्य माहिती पुरवायची आणि शांतपणे बाजूला बसायचं.

In reply to by थॉर माणूस

बादवे, आता परत चेक केलं तर तो ग्लिच फिक्स झालेला दिसत नाही. अजूनही सर्च तोच फोटो दाखवत आहे.

In reply to by बिटाकाका

अमेरिकेचे पहिले अध्यक्ष किंवा इंग्लंडचे पहिले पंतप्रधान गुगलून बघा. तिकडे अगदी शिस्तीत दाखवतो.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्ही भक्त आहात का? मंग बळजबरी स्वतःवर का ओढून घ्यालाव? आन वरून धमकी पण... ------------------------ मी सर्वज्ञानी आहे असा माझा अजिबात दावा नाही. भारी पडलं तरी माझं अर्ध ज्ञान पूर्ण करायला आवडतं आपल्याला. त्यामुळे निवांत रहा.

In reply to by मार्मिक गोडसे

मी पंतप्रधानांची यादी पहायला ते पेज पाहिले होते. त्यात विद्यमान म्हणून मोदीजींची माहिती सर्वात वर आहे. बाकी यादी खाली आहे. असो. वाचणारा नुसता फोटो पहायला ते पेज तसेही बघणार नसतो. बाकी माहिती बरोबर आहे. शिवाय , विकि अपडेट हे जनता करत असते. कुणीतरी अतीप्रेमाने केले असेल.

In reply to by मार्मिक गोडसे

https://www.mypetrolprice.com/3/0/Mumbai-Petrol-Price-Chart हे घ्या गेल्या १७ वर्षाच्या किमती पेट्रोल डिझेल सी एन जी आणि ऑटो एल पी जी च्या सर्व देशातील सर्व शहरातील किमती. एकदाचा आत्मा थंड होउ दे.

In reply to by सुबोध खरे

चार पाच दिवसांपूर्वी ह्या साईटवर ही माहिती नव्हती, लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.

In reply to by मार्मिक गोडसे

लोकांनी आवाज उठवला आता एक एक साईट लपवलेले दर दाखवू लागले.
-- इतर लोकांचे जाऊद्या, मिसळपाव साईटवर, गतकाळच्या पेट्रोल-डीजेलच्या दराबाबत तुम्हीच इतका जोरात आवाज उठवलात की, सरकारला घाबरुन मागचे सर्व दर प्रत्येक साईटवर जाहिर करावे लागले. :)) --- तुमचे, अभिनंदन !

In reply to by मार्मिक गोडसे

तुमचं शिक्षण किती झालंय विचारायची सोय नाही कारण सामाजिक संकेत म्हणतो कि तो वैयक्तिक हल्ला ठरेल. पण तोच सर्वात उचित प्रश्न आहे. विचारावा कि विचारू नये?

In reply to by मार्मिक गोडसे

गोडसे बुवा कशाला थापा मारताय? मी अगोदरही पाहिले होते. म्हणूनच तुम्हाला लिहिलं होतं कि चमच्याने भरवायची अपेक्षा कशाला?

In reply to by सुबोध खरे

तुम्हीही तेव्हा काही दुवे दिले होते इकडे टिचकी मार तिकडे टिचकी मार ,मग मिळेल मागील ४ वर्षाचे इंधन दर. जेव्हा तेथे उपलब्ध नाही असं सांगितले तेव्हा तुम्ही गप्प बसलात. आज त्या साईटने खुले केले तेव्हा आले उड्या मारत मला दाखवायला. एकदा चमच्याने भरावयाचे नाही हे ठरवलं तर ठाम राहायचं होतं ना. तुमचा खोटेपणा उघडकीस आला. सरकार खोटे आणि त्याचे समर्थकही खोटे.

In reply to by मार्मिक गोडसे

हायला झक मारली आणि तुम्हाला दुवे शोधून दिले असे वाटायला लागले आहे. वर तुम्ही म्हणताय माझा खोटेपणा उघडकीस आला? काय खोटेपणा केला आणि कुठे सरकारचे समर्थन केले आहे ते एकदा कळेल का? बाकी माझ्याबद्दल "अशी टिप्पणी' केल्याबद्दल धन्यवाद

धाग्याचं नाव काय, तर ताज्या घडामोडी. इथे चाललेला राडा ताजा नाहि, घडामोडीचं तर बोलायलाच नको. व्युत्पन्न मिपा, जागा हो !!

१९३० ते १९५० चा मिडीया आजच्यासारखा सनसनीप्रिय राहिला असता तर महात्मा गांधी सुद्धा आसारामासारखेच कुख्यात म्हणून प्रसिद्धी पावले असते.

In reply to by arunjoshi123

हे आजच्या कायद्यानुसार बलात्कारात मोडेल का? कसे ? का? जर मोडणार नसेल तर आसाराम अन मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्यात साम्य कसे?

In reply to by arunjoshi123

गांधीजी आपल्या मायनर नातींसोबत नागडे झोपायचे.
तो एक प्रयोगाचा भाग होता व ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही. कविता करणारे माजी पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री असताना फक्त बाई,बाटलीत मग्न असायचे असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते. भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एका माजी कविताकाराच्या घरी कुणी राजकन्या रहायची म्हणे. आणि हेच भाजपे काँग्रेसवाल्यांच्या घराचे कौल काढून आत बघतात !

In reply to by manguu@mail.com

हा हा हा. खरे आहे रे ते मंगू. http://www.rediff.com/news/report/mrs-kaul-here-you-dont-know-who-i-am/… असो. हा 'ताज्या घडामोडींचा' धागा आहे. शिळ्या घडामोडी येथे नकोत असे ह्यांचे मत.

In reply to by manguu@mail.com

लोकांची "प्रकरणे" असू नयेत हा अजबच मूर्खपणा ऐकत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष सामूहिक बलात्कार करतात ते चूक आहे. प्रकरण असण्यात काही चूक नाही.

In reply to by arunjoshi123

मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची... नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना मारले.. काँग्रेस सरकार गुप्त कागदपत्रे जाहीर करीत नाही.. आता चार वर्षे सत्तेवर आहेत.. काय झाले?
१. बोस कोण्या विमान अपघातात मेलेले नाहीत २. नेहरू त्यांच्यावर पाळत ठेवत

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मग राहूल गांधींना अटक का करत नाहीत राजनाथांचे पोलिस?सी,बी.आय? की ते राहूलला घाबरतात? अफवा पसरवायच्या, विकृत आनंद मिळवायचा व प्रकरण अंगाशी आले की धूम ठोकायची...
राहुलच्या केसमधे काँग्रेसने पेरलेल्या जजांनी केसदेखील अ‍ॅडमिट करून घेतली नाही. (ह्या जजांनी आजही न्यायव्यवस्थेची सगळी आब्रू विकून काँग्रेसची सेवा चालू ठेवली आहे.). न्यायव्यवस्था काँग्रेसच्या काळात इतकी दुबळी होती.

In reply to by arunjoshi123

खोट्या चकमक प्रकरणात अमित शहांना दिलासा देणारे न्यायाधीश पी. सदाशिवम केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात हा योगायोग ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ती बाब गांधीनी कधीही लपवून ठेवली नाही.
म्हणून ती योग्य ठरत नाही.
असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते.
ह्यांनी म्हटलेले सगळे खरे मानता का?
भाजपाचे 'मोबाईल' नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक नेते पत्नीस सोडून एका महिला पत्रकारासमवेत जगाच्या सफरीवर गेले होते. दुसर्या एकाचे तमाशा नर्तकीबरोबर संबंध होते. हे तिघेही संघाच्या खास 'राष्ट्रवादाच्या' मुशीत वगैरे तयार झालेले..
ह्या बायका १८+ असतील तर हे सगळं आधुनिक आधुनिक नव्हे काय?

In reply to by arunjoshi123

प्रश्न आधुनिकतेचा नाही रे अरूण. नैतिकतेचा टेंभा मिरवत 'गिरी तो भी टांग उपर' करणार्या लोकांचा आहे. सुब्रमण्यम स्वामीच नव्हे तर अनेकांनी ह्याविषयी लिहिले आहे. भाजपाच्या आतील गोटातल्या लोकांना(आता बरेचसे मार्गदर्शी मंडळात असतील!) ह्यापेक्षा अधिक माहिती असेल ह्यात शंका नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुमच्याकडे ४० वर्षापासून एक नोकर आहे. पत्रकार निकमाने लावलेला फोन नेहमी तोच उचलतो याचा अर्थ तुमचे नि नोकराचे अनैतिक संबंध आहेत असं होतं का? लोकांना काय काहीही म्हणतात. इंदिरा गांधी एका माणसाकडून एकांतात योग शिकायच्या. धिरेंंद्र ब्रह्मचारी म्हणून लिहिलं तर चिकार कहाण्या मिळतात. मग? =================== गांधीजींची केस एक लोकवंदता नाही. ती एक सत्य कथा आहे म्हणून तिच्यावर बोलताना मध्येच दुसरा विषय आणू नये. नग्न स्त्रीच्या शेजारी नग्न झोपून ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येत असेल तर अजून एक पायरी पुढे जाऊन पुढे बरे काही काही करून देखील त्यापुढची ब्रह्मचर्याची परीक्षा घेता येईलच की. पहिली पास पुढची परीक्षा घ्यायचे का गांधीजी? आणि एकदा पास झालं कि झालं कि मोप. वारंवार भिन्न भिन्न स्त्रीयांशी, भिन्न भिन्न जागी तीच तीच परीक्षा कशाला घेत होते ते? स्त्री काय पुरुषाच्या परीक्षेचे साधन आहे का?

In reply to by arunjoshi123

वाजपेयी विवाहित दांपत्याबरोबर एकत्र का राहत होते? संघाची शिकवण आहे का ती? एक पत्नी असताना तमाशा नर्तकीबरोबर संबंध ठेवणे.. हे संघाने शिकवले का भाजपाच्या दिवंगत नेत्याला ? ह्या प्रकरणांची चर्चा समाज्माध्यमांवर काँग्रेस्वाल्यांनी केली तर चालेल का? गांधी द्वेष एका मर्यादेपर्यंत समजू शकते पण बौद्धिके घेणार्या ह्या मंडळींची चारित्र्ये बरबटलेलीच आहेत हे विसरू नकोस.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या प्रकरणांची चर्चा समाज्माध्यमांवर काँग्रेस्वाल्यांनी केली तर चालेल का?
पाहिजे तेवढी करावी. ========================
गांधी द्वेष एका मर्यादेपर्यंत समजू शकते
काही गरज नाही. ========================
संघाची शिकवण आहे का ती?
देशातली लफडी शून्य करणे हे संघाचं अजिबात टार्गेट नाही.

In reply to by arunjoshi123

देशातली लफडी शून्य करणे हे संघाचं अजिबात टार्गेट नाही.
मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये. गांधींचे टार्गेट स्वातंत्र्य मिळवून द्यायचे हे होते. ते साध्य झाले..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये.
पटेल, नेहरू, इ इ नी देखील हा विकृत आनंंद घेतला आहे तर? श्योर?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मग दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून विकृत आनंद मिळवणे हे तरी टार्गेट असता कामा नये.
वर जी तमाशा नर्तकी, परराश्ट्र दौर्‍यावरची मैत्रीण, आणि फोन उचलणारी बाई ही उदाहरणं दिलीत ती अत्यंत सात्विक आनंद देणारी होती वाटतं.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण बौद्धिके घेणार्या ह्या मंडळींची चारित्र्ये बरबटलेलीच आहेत हे विसरू नकोस.
दोन्ही बाजूंनी मान्य असलेली प्रेम प्रकरणे किंवा प्रकरणे म्हणजे बरबरटलेले चारित्र्य नव्हे. हे मला इथेच आल्यावर इथल्या पुरोगाम्यांकडून शिकायला मिळाले आहे.

In reply to by arunjoshi123

एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे? की हे असे असूनही गांधींना महात्मा म्हणतात म्हणून ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे?
आपलं या विषयावरचं ज्ञान आणि वाचन शून्य दिसतं. बधाई हो. ========================================== गांधीजी मॉडर्निटीचे सर्वात मोठे शत्रू होते (विरोधक शब्द टाळला आहे) त्यामुळं विधान बाद आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

एवढे 'मॉडर्न' विचार आहेत तर मग गांधी जे प्रयोग करायचे त्यावर प्रॉब्लेम काय आहे?
लफडी करणं वेगळं आणि अज्ञान बालिकांवर लैंगिक प्रयोग करणं वेगळं. ते चूक नाही का वाटत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तो एक प्रयोगाचा भाग होता
हा प्रयोग नसून एक विकृती आहे आणि तुम्ही तो सत्वर सोडा असे नेहरू, पटेल इ इ नी त्यांना सांगीतले. ============ त्यांच्या आश्रमातल्या कितीतरी बायका यामुळे आश्रम सोडून गेल्या. ============== कितीतरी बापये सोडून गेले. ================== त्यांनी ज्यांच्यावर प्रयोग केला ते शेवटी इस्पितळात वेडे म्हणून भरती झाले. ==================== आणि आश्रमात अगदी पती-पत्नीस संबंध अलाउड नव्हते. कोणी पुरुषाने कोण्याही स्त्रीला स्पर्श नको करायला असा नियम होता. नेमका गांधीजिंनाच सर्व प्रयोग अलाउड होते? हे तर बर्‍यापैकी राम रहीम सारखं वाटतंय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कविता करणारे माजी पंतप्रधान ,परराष्ट्र मंत्री असताना फक्त बाई,बाटलीत मग्न असायचे असे सुब्रमण्यम स्वामीनी म्हंटले होते.
हे विधान सोनिया सीआयए ची हेर आहे या विधानाइतकेच सत्य आहे हे जनतेला कळते.