Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३०

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/04/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसारामबापू ऑगस्ट २०१३ पासून तुरूंगात आहे. सध्या तो ७८ वर्षांचा आहे. या शिक्षेमुळे तुरूंगातच त्याची अखेर होणार हे नक्की. भारतात असे अनेक भोंदूबाबा आहेत. यांच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत आहे. या सर्वांना पकडून अशीच शिक्षा मिळणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी राम रहीम सिंग या भोंदूबाबाला सुद्धा शिक्षा झाली होती. परंतु अनेकजण अजून मोकळेच आहेत. http://indianexpress.com/article/india/asaram-bapu-rape-case-verdict-li…

वाचने 61527
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

या केसला अनेक पैलू आहेत... ... ज्या अभागी बालिकेवर या आसारामाने स्वतस लादले ती या आश्रमात शिक्षणासाठी राहत होती. २०१३ सालच्या १५ ऑगस्टच्या रात्री तिला या आसारामाने आपल्या कक्षात बोलावून लैंगिक अत्याचार केले. तिला बाधा झाली आहे आणि बापूंच्या ‘खास प्रसादा’ने ती दूर होईल असे सांगत आसारामच्या महिला सहकाऱ्याने या मुलीस बाबाकडे जाण्यास भरीस पाडले. हे घृणास्पद कृत्य येथेच संपत नाही. त्यानंतर या मुलीने तक्रार दाखल करू नये म्हणून त्याने जंगजंग पछाडले. अनेकांना धमकावले, तिच्या कुटुंबीयांना दरडावले, इतकेच नव्हे तर या प्रकरणातील काही साक्षीदारांना यमसदनास पाठवले गेले. परंतु तरीही हे कुटुंब दबले नाही. ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकास धमकावण्यापर्यंत आसाराम आणि त्याच्या भक्तगणांची मजल गेली. या मुख्याध्यापकावर दबाव कसला? तर सदर मुलीची जन्मतारीख अशी बदलायची की ती सज्ञान ठरू शकेल. आणि तशी ती सज्ञान ठरवली गेली की अल्पवयीनांवरील अत्याचार या आरोपाचे रूपांतर दोन सज्ञानींत परस्परांच्या संमतीने झालेला व्यवहार असे करता येईल. परंतु या शाळेच्या मुख्याध्यापकांनीदेखील कच खाल्ली नाही. अशा तऱ्हेने सर्व संबंधितांच्या निर्धाराने हे प्रकरण धसास लागले आणि आसारामवरील आरोप सिद्ध झाले. या खेरीज आणखीही दोन महिलांनी आसारामवर बलात्काराचा आरोप केलेला आहे

 मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती. खून, जातीय हिंसाचार यासारखे तब्बल १३१ खटले मागे घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आता साध्वी प्राची आणि भाजपाच्या दोन नेत्यांवरील प्रक्षोभष भाषण केल्याप्रकरणी दाखल असलेले खटले मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि श्यामली जिल्ह्यातील जातीय हिंसाचारप्रकरणी खुनाच्या १३ प्रकरणांसह तब्बल १३१ खटले मागे घेण्याची प्रक्रिया योगी सरकारने सुरु केली आहे. यापाठोपाठ आता मुझफ्फरनगरमध्ये दंगलीपूर्वी आयोजित महापंचायतीत साध्वी प्राची, भाजपाचे खासदार कुँवर भारतेंद्र सिंह आणि संजीव बालयन तसेच आमदार उमेश मलिक, संगीत सोम आणि सुरेश राणा यांनी द्वेष पसरवणारी जहाल भाषणे केली होती. बालयन हे २०१७ पर्यंत केंद्रात तर राणा हे उत्तर प्रदेशमध्ये मंत्री होते. कावल गावात शाहनवाझ याच्या हत्येनंतर सचिन आणि गौरव यांची बेदम मारहाणीत हत्या झाली होती. त्या मुद्द्यावरुन ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या तीन हत्यानंतर ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्ह्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.  या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/muzaffarnagar-violence-yogi-g…

एखादा माणूस किंवा संत हिंदू आहे म्हणून त्याचा गुन्हा किंवा तो मुसलमान आहे म्हणून त्याचा गुन्हा जास्त होत नाही. दुर्दैवाने डावे आणि काँग्रेस यांनी मुसलमान (किंवा अल्पसंख्याक) यांच्या मतपेटीसाठी त्यांच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची आणि हिंदू गुन्हेगारांचे गुन्हे बटबटीत पणे पुढे आणण्याची वृत्ती बाळगली. उदा याकूब मेमन किंवा अफझल गुरु चे समर्थन आणि अस्तित्वात नसलेला हिंदू दहशतवाद आता कडवे हिंदुत्ववादी तीच उलट तर्हेने वापरताना दिसतात. गुन्हेगार हा गुन्हगारच आहे मग तो कोणत्याही जातीधर्माच्या असो. त्याचे समर्थन करणे हि चूकच ठरेल.

In reply to by सुबोध खरे

+१०० गुन्हेगार मग तो कोणत्याही धर्म, पंथ, जात इत्यादीचा असला तरी त्याला एकाच तराजूत मोजले गेले पाहिजे. पूर्णविराम. याबाबतीत, भारतिय पुरोगामी व माध्यमे फार तोकडी... किंबहुना सक्रियपणे एकांगी (partial) आहेत यात अजिबात वाद नाही. गेल्या सहा महिन्यांत अनेक दुदैवी घटना घडलेल्या असताना राजकिय सोईच्या केवळ निवडक दोन घटना घेऊन त्यांच्यावरून भारतात व परदेशात (केवळ पंतप्रधानांचा दौरा चालू असलेल्या काळात व दौरा असलेल्या दोनच देशांत) आकांडतांडव केले गेले आणि दौरा संपताच एकाएकी सामसून झाली, हे का केले गेले ते कळायला फार मोठी बुद्धी लागणार नाही ! :( अश्या राजकारणाने प्रेरित कृतीमुळे, बलात्कारासारख्या निर्घृण गुन्ह्यांच्या खरेपणा/महत्वाबद्दल सर्वसाधारण जनमानसात संशय/उदासिनता निर्माण होते. त्याचबरोबर, त्याच काळात घडलेल्या इतर अनेक व विशेषतः खालील दोन घटना केवळ राजकियदृष्ट्या सोईच्या नसल्याने, त्यांची मुख्य माध्यमांत फारशी दखलही घेतली गेली नाही, इतका एकांगीपणा तथाकथित पुरोगामी लोकांच्या नैतिक दिवाळखोरीचे लक्षण तर आहेच, पण, ते ज्या लोकशाहीच्या नावाने गळे काढतात त्याच लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. Lured to Ghaziabad, survivor says she was raped by juvenile and maulvi Catholic priest in Kerala arrested for raping minor girl

ह्या खटल्यात ती मुलगी, तीचे कुटूंबीय, वकील, मुख्याध्यापक हे खंबीर राहीले त्या मुळेच शिक्षा होउ शकली.

वरील साध्याशा पोष्टमध्ये दोन गोष्टी समजल्या नाहीत. १. >>स्वयंघोषित भोंदू गुरू आसारामबापूवर… त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी त्यांना गुरू केले अाहे. मोठमोठे लोक, अाजी माजी प्रधानमंत्र्यांबरोबर त्यांची छायाचित्रे जालावर दिसत अाहेत. त्यामुळे ’स्वयंघोषित’ म्हणजे काय? २. तुंम्हाला ‘स्वयंघोषित’ नसलेला व भोंदू नसलेला कोणी बाबा, महाराज माहिती अाहे का? प्रश्न गंभीरपणे विचारलेले अाहेत. तुमच्या उत्तराची अपेक्षा अाहे.

In reply to by स्वधर्म

ते ट्रोलिंगवरून भांडणाचं सोडा. अामच्या सिन्सिअर प्रश्नांना पण उत्तरे द्या की जरा. का फक्त भाजपा, मोदी हे शब्द असले तरच उत्तरे देता?

In reply to by स्वधर्म

सध्याच्या काळात असे निस्वार्थी, स्वयंघोषित नसलेले कोणी आहेत का याची कल्पना नाही. पूर्वी असे अनेकजण होऊन गेले आहेत.

In reply to by स्वधर्म

१. वैयक्तिकरित्या ते स्वयंघोषित वगैरे बकवास वाटते. एक दिवस अचानक उठून एखाद्या बाबाने उठून मी देव/देवाचा माणूस आहे म्हणून घोषणा केली आणि भक्त मागे लागले असे प्रतीत होते. २. तस्मात, सयंघोषीत तर माहित नाही पण भोंदू बरेच जण वाटतात.

In reply to by manguu@mail.com

तुम्हाला "शून्य" कळलं आहे का? कोठेही हिंदु धर्म शब्द आला कि पिचकारी मारायची हि वाईट खोड सोडून द्या.

भारतीय मिडीयात जो पर्यंत बाबा, गुरु, स्वामी व इतर बाबा लोक एकाद्या गुन्हेगारी प्रकरणात अडकत नाहीत तो पर्यंत ते स्वंयभू असतात, मात्र असे लोक जेंव्हा गुन्हेगारी प्रकरणात अडकतात त्यावेळी ते स्वयंघोषित भोंदू वगैरे होतात. आता याच भारतीय मिडीयाने ह्या आसारामच्या सत्संग वगैरेचे जाहिराती करुन काय कमी पैसा मिळवलाय. -- आता नरेंद्र मोदी ज्यावेळी या आसारामला भेटले व त्याची स्तुथी केली, त्यावेळी त्याच्यावर सध्या असलेल्या आरोपांपैकी एकही आरोप नव्हता. मात्र आता त्याच व्हिडीओ क्ल्पिप व्हायरल करुन नरेंद्र मोदींनी बलात्कारी बाबा आसारामाची कशी स्तुथी केली होती, हे मिडीयात दाखवत नरेंद्र मोदीं बलात्कार्‍यांचे समर्थक आहेत असे चित्र आज काही मिडीया चॅनेल व काही वर्तमानपत्र पसरवत आहेत.

आसारामांनी गुन्हा केला, त्यांना शिक्षा मिळाली, आनंद आहे. असे अजून अनेक बाबा बुवा कसले कसले गुन्हे करत असतील, सगळ्यांना आत घातला पाहिजे. ---------------------------------------------- त्यांनी हा गुन्हा केला त्यानंतर त्यांना फॉलो करणे, त्यांचे समर्थन करणे वगैरे आक्षेपार्ह्य असू शकते पण हा गुन्हा घडायच्या आधी कोणी त्यांना मानत असेल तर आज तुम्हाला लाज वाटते का तुम्ही अशा माणसाला फॉलो करता वगैरे विचाराने अत्यंत बालिशपणाचे आहे असे मला वाटते. सोशल मीडियावर वर फिरत असलेली ती मोदींची चित्रफीत, गांधींचे फोटो वगैरे सगळं थिल्लरपणा वाटतो. असल्या बाबतीत कसलाही विचार नसणारे लोक इतर लोकांच्या विचारांची दिशा ठरवणार? --------------------------------------------- एका बाजूला न्यायव्यवस्था मोदींच्या इशाऱ्यावर चालते म्हणायचं, दुसऱ्या बाजूला मोदींनी आसारामांची स्तुती केली आहे आणि ते त्यांचे गुरु आहेत म्हणायचं आणि मग मोदींनी स्वतःच्या गुरुलापण वाचवले नाही म्हटले कि गुन्हा २०१३ ला दाखल झाला, ते मुख्याध्यापक, कुटुंबीय स्ट्रॉंग होते म्हणून मोदींना पॉसिबल झाला नाही म्हणायचं. कशाचा कशाला मेळ नाही. -------------------------------------------- सुप्रीम कोर्टात हे महाशय सुटले तर त्यांना निर्दोष मानायचं कि नाही? म्हणजे जसजसं वरच्या कोर्टात जाल तसतसं जेष्ठ न्यायमूर्ती असतात आणि म्हणून योग्य न्याय मिळू शकतो अशी माझी धारणा होती. ती चुकीची आहे काय?

In reply to by बिटाकाका

त्यांनी हा गुन्हा केला त्यानंतर त्यांना फॉलो करणे, त्यांचे समर्थन करणे वगैरे आक्षेपार्ह्य असू शकते पण हा गुन्हा घडायच्या आधी कोणी त्यांना मानत असेल तर आज तुम्हाला लाज वाटते का तुम्ही अशा माणसाला फॉलो करता वगैरे विचाराने अत्यंत बालिशपणाचे आहे असे मला वाटते. सोशल मीडियावर वर फिरत असलेली ती मोदींची चित्रफीत, गांधींचे फोटो वगैरे सगळं थिल्लरपणा वाटतो. असल्या बाबतीत कसलाही विचार नसणारे लोक इतर लोकांच्या विचारांची दिशा ठरवणार?
हा ना, फोटो वगैरे थिल्लरपणा सोडा, ते जुने असले तरी असली तरी आहेत, काहीजण तर चक्क असल्या थिल्लर गोष्टींसाठी फोटोशॉप वापरुन सोशल मिडीयावर वापरतात हो असले खोटे पुरावे म्हणून. काय बोलायचे सांगा त्यांना?

In reply to by कपिलमुनी

लेका धंदेवाला आहेस, शब्दाला वजन असते शूट मध्ये धंदा करणाऱ्याच्या, उगाच ते खर्च करून अडग्यांची मार्केट व्हॅल्यु कश्याला वाढीवतोस मर्दा!

जेव्हा आसाराम वर कोणतेही गुन्हे दाखल नव्हते त्या काळातले एकत्र असण्याचे व्हिडीओ पब्लिश करणे चुकीचे आहे. आसारामचे किंवा राम रहीम चे लाखो फॉलोअर होते , त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे किंवा त्याला बोलवणे ही नॉर्मल गोष्ट आहे . त्यावरून दंगा करायची गरज नाही. सध्या त्यांनी आसारामचे समर्थन केलेले नाही ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by कपिलमुनी

असेच म्हणतो फॉलोअर असायची गरज नाही. एकदा कधीतरी आस्था चॅनेल लागला होता आणि रिमोट सापडत नव्हता तेंव्हा आसाराम बापूंचे कीर्तन लागले होते . कुतूहल म्हणून मी ते पाहिले. ते बोलतात अतिशय चांगले हि वस्तुस्थिती. बाकी अध्यात्म हे मला कळत नाही किंवा त्यात रस हि नाही. पण केवळ उत्तम वक्ता आहे म्हणून एखादा त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेला आणि त्यांच्या पाया पडला तर तो त्यांचा भक्त झाला असे सिद्ध करण्याची लोकांना एवढी खाज का?

In reply to by सुबोध खरे

पण मी काय म्हणतो, भक्त असला तरी काय प्रॉब्लेम आहे? तो त्यांच्या प्रवचनाचा किंवा अध्यात्मिक गोष्टींचा भक्त असू शकेल ना? पण भक्त आहे म्हणून तो लगेच त्यांच्या बलात्काराच्या कृतीला समर्थन देईल काय? मग ते सिद्ध करण्याची एवढी उर्मी का?

In reply to by सुबोध खरे

पण केवळ उत्तम वक्ता आहे म्हणून एखादा त्यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेला आणि त्यांच्या पाया पडला तर तो त्यांचा भक्त झाला असे सिद्ध करण्याची लोकांना एवढी खाज का?
हा ना, आणि चक्क तेही फोटोशॉप केलेले फोटो टाकून सिध्द करतात हो, काय म्हनायचे आता सांगा.

सर्व धर्मातले सध्याचे बाबा , संत ,मुल्ला लोकांना चुत्या बनवत असतात .

पुरोहित ते कोदलानी यांच्या सुटकेवर भाऊ तोरस्करानी भरपूर लिहिले होते. आता आसारामाच्या शिक्षेवर काही लिहिले नाही का ?

In reply to by मार्मिक गोडसे

त्यांच्या ब्लॉग वरची हि ओळ वाचा:
वैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.
ते अत्यंत एककल्ली लिहितात.

In reply to by manguu@mail.com

तसं नव्हं, ते उबरला मुस्लिम ड्रायवर आहे म्हणून कॅब कॅन्सल केली तर तुम्ही लगीच शिक्का मारला. पण नंतर कोन्तर हनुमानाचं चित्र आहे म्हणून भीती वाटते अशी तक्रार केल्याची बातमी टाकली तर तुम्ही कायबी बोलला न्हाव. चालायचंच, कुणाला कशावर बोलावं वाटतं तर कुणाला कशावर!

In reply to by बिटाकाका

तपशील हुकला, मुसलमान ड्रायव्हर - ओला हनुमान चित्र - उबर xxx दोन्ही वर आमचे वैयक्तिक मत - हनुमानाचे चित्र आहे म्हणून उबर कॅन्सल करणारी पोरगी अन ड्रायव्हर मुसलमान आहे म्हणून ओला कॅन्सल करणारे पोरगे दोघेही अस्सल हाहाकारी गाढवे होत. निवेदन समाप्त

In reply to by जेम्स वांड

ओह्ह्ह असं झालं होय...पण मत माझंपण तुमच्यासारखंच आहे. तर सांगायचा मुद्दा हा होता कि जिनके अपने घर शिशेंके होते है वो.......

In reply to by बिटाकाका

बर्बाद गुलिस्ताँ करने को बस एक ही उल्लू काफ़ी था हर शाख़ पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा
-शौक बहराईची

In reply to by manguu@mail.com

बाबा राम रहीम आणि आसाराम एकाच माळेचे मणि नाहीत. ==================== हाय कोर्टात किंवा सुप्रिम कोर्टात आसाराम निर्दोष सुटतील अशी आशा आहे.

In reply to by arunjoshi123

मी वर एका प्रतिसादात हे विचारले होते, काही उत्तर मिळाले नाही. http://www.misalpav.com/comment/993190#comment-993190
सुप्रीम कोर्टात हे महाशय सुटले तर त्यांना निर्दोष मानायचं कि नाही? म्हणजे जसजसं वरच्या कोर्टात जाल तसतसं जेष्ठ न्यायमूर्ती असतात आणि म्हणून योग्य न्याय मिळू शकतो अशी माझी धारणा होती. ती चुकीची आहे काय?

धाग्याचे नाव गिरे तो भी टांग उपर असे ठेवण्यात यावे :)

In reply to by अभ्या..

गुरुजींचा विषय संपला असेल तर लगे हाथ ते चित्रफीत टाकण्याचा उद्देश काय हे पण विचारून घेऊ म्हणजे मग परिपूर्णपणे धाग्याचे नाव गिरे भी तो ठेवता येईल.

In reply to by अभ्या..

मला नाही संपवायचा, तसे काही कारण नाही. फोटो चित्रफिती टाकणे हा बालिशपणा आहे हे मी वर माझे मत सांगितलेच. पण फोटो टाकणाऱ्याला ट्रोल ठरवून झाले कि चित्रफितीवाल्याला विचारात येईल ना कि काय म्हणायचे काय आहे? काय आहे कि त्याआधी विचारले तर मग फोटोवाल्याबद्दल काय वाटते वगैरे विचारलं जाऊ शकतं!

In reply to by बिटाकाका

फोटो चित्रफिती टाकणे हा बालिशपणा आहे हे मी वर माझे मत सांगितलेच. पण फोटो टाकणाऱ्याला ट्रोल ठरवून झाले
नुसते फोटो टाकणे बालिशपणा आहे ना, मग मॉर्फड फोटो टाकणार्‍याला काय करायचे? त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.

In reply to by अभ्या..

हाहाहाहा!! आता एक काम करू एक दुसऱ्यापेक्षा कसा जास्त बालिश आहे हे सिद्ध करण्यासाठी बालिशपणाच्या लेवल ठरवू, कसे? अहो बालिशपणा म्हणजे बालिशपणा! खरे फोटो टाकले काय आणि मॉर्फ टाकले काय, मूळ मुद्द्यातच काही दम नाही ना! त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलेनात.

In reply to by बिटाकाका

खरे फोटो अन मॉर्फ फोटो ह्यांच्यात फरक कसा नाही? उद्या कोणी काहीही आक्षेपार्ह फोटोत कोणाचेही चेहरे मॉर्फ करून वाटेल ते क्लेम मांडेल त्याला अन ओरिजिनल फोटो टाकण्याला एकाच तागडीत तोलाल का? मी तरी नाही टाकलेले ओरिजिनल फोटो/विडिओ टाकण्यामागचे कार्यकारणभाव इत्यादी स्वतंत्र विषय होय, पण त्यांना उत्तर म्हणून मॉर्फ फोटो ही डबल व्हॅमी होय, म्हणजे समोरच्याने अंगरखा काढला म्हणून आपण पूर्ण नागवं होणे वगैरे वगैरे, आपल्याच्याने एकाच चुकीचे समर्थन होत नाही डबल व्हॅमीचं समर्थन करण्याइतका मी तरी कोण्या एका राजकीय/सामाजिक/धार्मिक विचारसरणीचा मिंधा नक्कीच नाही बुआ. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

In reply to by जेम्स वांड

हाहाहा! अहो वांडसाहेब, फोटो कशाचे आहेत यावर बरंच काही अवलंबून आहे हो :), मुद्दा नं १. मुद्दा नं २, ना मी त्या फोटोना समर्थन दिलाय ना ते टाकण्यामागच्या मताला. पण ते असो. मी त्यांच्या आयडीचे नाव घेऊन बालिशपणाची लेवल सांगणे अपेक्षित असेल तर, माफ करा मला आन फाट्यावर मारा. त्या दोघांनीही काही "गुन्हा" केलेला नाहीये कि ज्याची तीव्रता ठरवावी. एकाने काहीही कारण नसताना फक्त मोदी कसे एका बलात्कारी बाबाला मानतात हे सिद्ध करण्यासाठी एक चित्रफीत टाकली आणि दुसर्याने मग काँग्रेसला काय म्हणाल हे सिद्ध करण्यासाठी फोटो टाकले. ह्या दोन्हीही कृती बालिशपणाच्या आहेत एवढेच माझे मत आहे. प्रत्येकाने आपापली बालिशपणाची व्याख्या वापरून लेवल ठरवावी. हाय काय अन नाय काय! ------------------------------------------ श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कितीही एखाद्या पक्षाचा समर्थक असतो तरी इतक्या बेसिक मॉर्फ्ड इमेजेसचा वापर स्वतःचा मुद्दा सिद्ध करायला केला नसता (खरतर असला मुद्दाच आणला नसता). ------------------------------------------ तर मुद्दा असा होता कि, आता "एकाच" चुकीचा विरोध करून झाला असेल तर दुसऱ्या चुकीचा विरोधही करावा. नाहीतर दुसऱ्या मोठ्या चुकीचा विरोध करण्यात पहिली (कदाचित तितकीच मोठी) चूक राहून जाईल. कसे?

In reply to by बिटाकाका

आता कसे परफेक्ट बोललात काका. सांगा बरं कोण बालिश सगळ्यात? कुणाची लेव्हल कीती ते पण साम्गायचं बरं का. बिनधास्त सांगायचं हं. त्यात काय एवढं. आपलेच तर आहेत सगळे. बर मूळ मुद्द्यात दम नाही हा साक्षात्कार कधी आणि कसा झाला म्हणे तुम्हाला? का टांगा उपर करायची ही आणखी एक मेथड?

In reply to by अभ्या..

बर मूळ मुद्द्यात दम नाही हा साक्षात्कार कधी आणि कसा झाला म्हणे तुम्हाला? का टांगा उपर करायची ही आणखी एक मेथड?
मी काही समजलो नाही, नीट सांगाल इस्कटून? टांगा उपर करणे म्हणजे काय? आणखी एक मेथड? मग आधीच्या कुठल्या? कि असंच काहीतरी बोलायचं आहे म्हणून?

In reply to by बिटाकाका

असं कसं बरं? कुणी कुणी लोकांचे बांबू घेऊन कित्येक दिवस फिरतायत इथे मिसळपाववर. मागे कुणाचा तरी ट्रक महिनो महिने चालवलेला, मग हे असे कष्ट घेऊन बनवलेले फोटोशॉप लगेच का बरे सोडून द्यायचे? त्याला काहीतरी मान द्यायलाच हवा.

बाकी काही म्हणा श्रीगुरुजींचे दोन गुण साठी १०० मार्क , १ ) पॉलीटीकली करेक्ट भूमिका पुर्वी संघ आ भाजपात काँग्रेसच्या मानाने क्षमता कमी होती अजूनही मागे आहेत पण श्रीगुरुजी मागे नाहीत हे नक्कीच २) विरोधी पक्षाला आपण निवडलेल्या मैदानाच्या भागात / खिंडीत खेळवून मेन गोलपोस्ट / किल्ला सुरक्षीत राखणे

In reply to by माहितगार

या प्रकाराला म्हणतात "आपलं ठेवायचं झाकून दुसर्या च बघायचं वाकून वाकून." लोक मुद्दे मांडून मोकळे होतात. नळावरची भांडणे करण्यात कोणाला इंटरेस्ट आणि वेळ ही नसतो. चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा असला म्हणजे त्यांनी मैदान मारले असा अर्थ होत नाही. हे अनेकांच्या लक्षात आले असेलच.

In reply to by विशुमित

...चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्‍याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,

In reply to by विशुमित

...चर्चेतील शेवटचा प्रतिसाद गुरुजी चा
शेवटच्या प्रतिसादांच माहित नाही , मी चर्चा तेवढा काळ फालो करत नाही, ते खेळण्याचा टर्फच असा निवडतात की विरोधक गोल करायचा गोलपोस्ट विसरुन तिसर्‍याच मुद्द्यावर झुंजतात , आणि गुरुजींचा मुख्य किल्ला शाबुत असतो ,

In reply to by श्रीगुरुजी

मिपावर एखादे उद्दिष्ट पुरे केले म्हणून हार तुरे शाल नारळ द्यायचा रिवाज हल्ली कोणी करताना दिसत नाही. त्यातला हा प्रकार आहे.

In reply to by विशुमित

असं होय? मग हरकत नाही. सत्काराबद्दल विनम्र धन्यवाद!! सत्कारमूर्ती जेपी दिसत नाहीत अलिकडे?

In reply to by माहितगार

बाकीचं माहिती नाही, पण गुरूजींना मी दोन साधे प्रश्न विचारले होते, त्याचं काहीच उत्तर न देता ते इतरच प्रतिक्रियांचा सवाल जवाब करत अाहेत. गुरूजी सोडून बिटाकाकांनी उत्तर दिले, त्यामुळे तेच गुरूजी अाहेत काय, अशी शंका अाली.

In reply to by स्वधर्म

आरारारा, एकतर फोटोशॉप केलेल्या खोट्या इमेज टाकून बिनधास्त ट्रोलिंग करायचे, दुसऱ्या आयडीने निरपेक्ष आहे असे मिरवत चुचकारायचे, सगळे खोटे दिसत असताना लोकांकडे बोटे दाखवायची. विरोधकांना पोलिटिकल परफेकट शब्दात उचकावून बॅन व्हायला लावायचे. अरारा, सगळे कशासाठी तर एका पक्षाच्या प्रचारासाठी. अजून किती अधोगती....

In reply to by जेम्स वांड

मला मिपा सं.मं. च्या न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील अशी आशा करतो. देर हो सकता है लेकिन अंधेर नही.