कर्नाटक विधानसभा निवडणुक १२ मे या दिवशी आहे. निकाल १५ मे या दिवशी जाहीर होतील. कर्नाटक विधानसभेत २२४ आमदार असून बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज आहे.
कर्नाटकात ३ मुख्य पक्ष आहेत. काँग्रेस, भाजप व निधर्मी जनता दल. या तीन पक्षातच मुख्य लढत आहे. निजदचे फारसे आमदार निवडून येत नसले तरी दक्षिण कर्नाटक व म्हैसूर च्या आजूबाजूच्या भागातील वोक्कलिंग मतदारांमध्ये या पक्षाला चांगले समर्थन आहे. या निवडणुकीसाठी निजदने बसपशी युती केली आहे.
इतर सर्व राज्यांप्रमाणेच कर्नाटकमध्ये सुद्धा जातींचे प्राबल्य आहे. लिंगायत (१७%), वोक्कलिंग (१२%) या दोन प्रमुख जाती आहेत. त्या व्यतिरिक्त मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. दलित व ब्राह्मण यांचाही काही प्रमाणात प्रभाव आहे. केरळला लागून असलेल्या मेंगलोर मध्ये ख्रिश्चनांचा प्रभाव आहे. निजदचे अध्यक्ष देवेगौडा वोक्कलिंग आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा लिंगायत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागासवर्गीय आहेत.
निजद पक्षाला मिळणारी बहुसंख्य मते वोक्कलिंगांची आहेत. मागील ३ निवडणुकीमध्ये या पक्षाची कामगिरी तिसर्या क्रमांकाची होती (२००४ मध्ये ५६ जागा, २००८ मध्ये २८ व २०१३ मध्ये ४०). भाजपने २००४ मध्ये ८०, २००८ मध्ये ११० तर २०१३ मध्ये फक्त ४० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने २००४ मध्ये ६५, २००८ मध्ये ८० तर २०१३ मध्ये १२२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते.
मागील ८ दिवसात ३ वृत्तसंस्थांनी आपल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज जाहीर केले. त्यानुसार यावेळी कर्नाटकात अधांतरी विधानसभा येण्याची शक्यता असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही.
१) इंडिया टुडे - कार्वी
https://www.financialexpress.com/elections/karnataka-assembly-elections-2018/karnataka-opinion-poll-india-today-karvy-bjp-congress-siddaramaiah-bs-yeddyurappa-check-results-here/1132155/
१३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९६ (९०-१०१), भाजप ८२ (७८-८६), निजद + बसप ३९ (३४-४३) व इतर ५ (४-७) जागा जिंकू शकतील.
२) एबीपी - सीएसडीएस
https://www.bloombergquint.com/politics/2018/04/23/karnataka-elections-abp-csds-opinion-poll-bjp-congress-jds
२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ८८ (८५-९१), भाजप ९२ (८९-९५), निजद + बसप ३५ (३२-३८) व इतर ९ जागा जिंकू शकतील.
३) टाईम्स नाऊ - व्हीएमआर
https://www.hindustantimes.com/india-news/karnataka-assembly-elections-two-opinion-polls-predict-hung-assembly/story-ns9mmGIaEFKw8NTBFX6LrO.html
२३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९१, भाजप ८९ व निजद + बसप ४० जागा जिंकू शकतील.
या तीनही अंदाजात काही समान गोष्टी आहेत. त्या म्हणजे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. २ सर्वेक्षणांनी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा दिल्या आहेत तर एका सर्वेक्षणानुसार भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवेल. पण दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या एकूण जागांमध्ये फारसा फरक नसेल. २०१३ मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना तब्बल १२२ जागा होत्या तर उर्वरीत दोन पक्षांना प्रत्येकी ४० जागा मिळाल्या होत्या. म्हणजे प्रथम व दुसर्या क्रमांकाच्या पक्षांच्या जागांमध्ये खूप अंतर होते. परंतु यावेळी तितके अंतर असणार नाही असा अंदाज दिसतो. तीनही सर्वेक्षणांनी पुन्हा एकदा निजदला तिसर्या क्रमांकाच्या जागा दिल्या आहेत. जर दोनही पक्षांना बहुमत मिळणार नसेल तर निजदला किंगमेकर या नात्याने प्रचंड महत्त्व येईल.
निजदला किंगमेकर होण्याइतक्या जागा मिळणार असल्या तरी त्या पक्षाला त्याचा फायदा कितपत उठविता येईल याविषयी शंका आहे. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना काँग्रेस (६५ जागा) व निजद (५६ जागा) मध्ये जेमतेम ९ जागांचा फरक होता. या संधीचा फायदा उठवून आपला मुख्यमंत्री करण्याची निजदला सुवर्णसंधी होती. परंतु निकाल लागताक्षणीच देवेगौडांनी आपले पत्ते उघड करून संधी घालविली. निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांनी जाहीर केले की निजद कोणत्याही परिस्थितीत सरकार बनविण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार नाही (भाजपला ८० जागा मिळाल्या होत्या). हे जाहीर करून देवेगौडांनी आपले इतर सर्व पर्याय स्वहस्ते बाजूला केले व त्यामुळे त्यांना नाईलाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला असता. देवेगौडांच्या जागी धूर्त मायावती असती तर मायावतीने कोणतीही घोषणा न करता दोन्ही पक्षांशी एकाचवेळी बोलणी करून डबलगेम खेळून शेवटी स्वतःच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. २००४ मध्ये देवेगौडा या खेळात नक्कीच कच्चे ठरले.
२०१८ मध्ये सुद्धा देवेगौडा भाजपला पाठिंबा द्यायची सुतराम शक्यता नाही. अर्थात त्यांचा मुलगा कुमारस्वामी वडीलांना धुडकावून भाजपशी युती करू शकतो (२००६ मध्ये कुमारस्वामीने भाजपच्या पाठिंब्याने २० महिने मुख्यमंत्रीपद मिळविले होते). जर काँग्रेस-निजद संयुक्त सरकार स्थापन झाले तर नवीन सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असणार नाहीत. सिद्धरामय्या पूर्वी निजदमध्येच होते. निजद सोडून काँग्रेसमध्ये गेल्याने देवेगौडांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सिद्धरामय्यांऐवजी नवीन मुख्यमंत्री आणायचा ही त्यांची प्रमुख अट असेल. २००४ मध्ये सुद्धा पाठिंबा देण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एम कृष्णा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. त्यांनी आपले पत्ते नीट खेळले तर त्यांना कुमारस्वामीला मुख्यमंत्री करता येईल. काँग्रेसला सिद्धरामय्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्यासाठी फारसे पर्याय शिल्लक नाहीत. त्यातल्या त्यात लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हाच एक चांगला पर्याय होऊ शकेल. खरगे फारसे वादग्रस्त नाहीत व केंद्रात त्यांचे भाजपच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुरळीत राहू शकतील. ते तयार नसतील तर कॉंग्रेसने धाडस करून नंदन नीलेकणींना मुख्यमंत्री करावे. २०१४ मध्ये नीलेकणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवून पराभूत झाले होते. त्यांची कॉर्पोरेट कार्यक्षमता वादातील आहे. ते मुख्यमंत्री झाले तर सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांमध्ये एक चांगला सकारात्मक संदेश जाईल (हाच वर्ग भाजपचा तगडा पाठीराखा आहे). अर्थात इन्फोसिसची जबाबदारी नुकतीच पुन्हा एकदा खांद्यावर घेतलेले निलेकणी परत राजकारणात येतील का याविषयी खात्री नाही. तसेच जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होत असलेल्या कर्नाटकात नीलेकणी हा ब्राह्मण चेहरा कितपत तग धरू शकेल याविषयी शंका आहे.
सिद्धरामय्यांनी मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात जातीय, प्रादेशिक व धार्मिक ध्रुवीकरण करून आपले आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेची सक्ती, कर्नाटक राज्यासाठी वेगळा ध्वज, क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणे, हिंदूंच्या हत्या करणार्या मुस्लिम गुन्हेगारांकडे दुर्लक्ष, लिंगायतांना वेगळा धर्म व अल्पसंख्याक अशी मान्यता अशा अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे हिंदू-मुस्लिम व हिंदूंमधील विविध जातींमध्ये फूट पाडून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना कितपत यश येईल ते १५ मे या दिवशी कळेलच.
एकंदरीत सध्याच्या अंदाजानुसार कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची चिन्हे असून अधांतरी विधानसभा होण्याची व काँग्रेस-निजद यांचे संयुक्त सरकार एका नवीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो सर्वाधिक मोठा पक्ष असतो, तो पक्ष नंतर लगेच होणार्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर नसतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे. यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे बघण्यासाठी मे २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.
याद्या
25779
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
छान विश्लेषन श्रीगुरुजी
कर्नाटकात मुस्लिम मोठ्या संख्येत नाहीत
चांगले विश्लेषण . हे वृत्त
दिशाहीन...
In reply to चांगले विश्लेषण . हे वृत्त by माहितगार
हम्म
शहरी मतदार
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी प्रचाराला उतरायच्या आधीच
In reply to शहरी मतदार by जेम्स वांड
ऐन वेळी मणि शंकर अय्यरांची
In reply to मोदी प्रचाराला उतरायच्या आधीच by बिटाकाका
१०१% मिळणार. मिपावरचंच सँपल
In reply to ऐन वेळी मणि शंकर अय्यरांची by माहितगार
फेसबूकच्या माध्यमातून
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्नाटकात भाजपच विजयी होणार
मोदींवर देशातील १००% जनतेचा
In reply to कर्नाटकात भाजपच विजयी होणार by डँबिस००७
भक्तांना नवा देश सापडला की
In reply to मोदींवर देशातील १००% जनतेचा by अभ्या..
जसा नेहरूला सापडला होता?
In reply to भक्तांना नवा देश सापडला की by विशुमित
भावड्या लंका तू लगेच कच खाऊ
In reply to जसा नेहरूला सापडला होता? by arunjoshi123
तो लकी माणूस भावड्याच्याच
In reply to भावड्या लंका तू लगेच कच खाऊ by विशुमित
अरे ए भाऊ!
In reply to मोदींवर देशातील १००% जनतेचा by अभ्या..
अभ्या आणि जेम्स वांड साहेब,
In reply to अरे ए भाऊ! by जेम्स वांड
ना तो त्यांचा आयडी आहे, ना
In reply to अभ्या आणि जेम्स वांड साहेब, by बिटाकाका
+१
In reply to ना तो त्यांचा आयडी आहे, ना by अभ्या..
माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा
In reply to +१ by जेम्स वांड
बस का काकाव?
In reply to माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा by बिटाकाका
दिलगिरी बिलगिरी नको काका,
In reply to माझी सगळ्यांकडूनच अपेक्षा by बिटाकाका
आक्खी जिंदगी फोडाफोड करून तेढ
In reply to दिलगिरी बिलगिरी नको काका, by अभ्या..
वा कलाकार वा
In reply to दिलगिरी बिलगिरी नको काका, by अभ्या..
कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल
In reply to +१ by जेम्स वांड
सांगितलं असतं
In reply to कागलकरांचं नाव घेऊन ट्रोल by arunjoshi123
भावाला खासगीत सांगतो.
In reply to सांगितलं असतं by जेम्स वांड
_/\_
In reply to भावाला खासगीत सांगतो. by विशुमित
2014 ची टक्केवारी
In reply to कर्नाटकात भाजपच विजयी होणार by डँबिस००७
याचा इथे काय संबंध?
In reply to 2014 ची टक्केवारी by कपिलमुनी
"देशातील जनतेचा १००% विश्वास
In reply to संबंध by कपिलमुनी
आणि भाजप भक्तांना पण..
In reply to "देशातील जनतेचा १००% विश्वास by बिटाकाका
फरक
In reply to "देशातील जनतेचा १००% विश्वास by बिटाकाका
जाऊ द्या हो काका
In reply to टॉमी नंतर मोती आला . by बिटाकाका
स्वाक्षरीशी सहमत.
In reply to धन्यवाद! by श्रीगुरुजी
Ruining India वाल्यांना २०१४
In reply to स्वाक्षरीशी सहमत. by manguu@mail.com
हाय राव मंगूश्री
In reply to स्वाक्षरीशी सहमत. by manguu@mail.com
छान
In reply to हाय राव मंगूश्री by जेम्स वांड
इतकं रिजिड असतोय
In reply to छान by manguu@mail.com
सगळ्या पृथ्वीचे राज्य...
In reply to छान by manguu@mail.com
त्यांच्यासाठी
In reply to सगळ्या पृथ्वीचे राज्य... by mayu4u
सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले
In reply to छान by manguu@mail.com
सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले
In reply to छान by manguu@mail.com
सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले तरी हिंदुत्वाच्या गटात मी कधीही जाणार नाही .घेतंय कोण हिंदुत्वाच्या गटात? तिथे येण्यासाठी एक किमान पात्रता लागते. ते येरागबाळ्याचे काम नोहे.ती कोणती?
In reply to सगळ्या पृथ्वीचे राज्य मिळाले by श्रीगुरुजी
कपिलमुनी,
In reply to संबंध by कपिलमुनी
आकडेवारी
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
चिल कपिलमुनी चिल.
In reply to आकडेवारी by कपिलमुनी
भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ??
बलात्कार प्रकरणात आरोपी
In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
तुम्ही तसले नाहीत म्हणौनच
In reply to बलात्कार प्रकरणात आरोपी by श्रीगुरुजी
का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच
In reply to तुम्ही तसले नाहीत म्हणौनच by अभ्या..
मस्तच बिटाकाका,
In reply to का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच by बिटाकाका
राजकारणात सगळेच क्षम्य असते
In reply to मस्तच बिटाकाका, by अभ्या..
सहमत आहे.
In reply to का प्रत्येक गोष्टीत बरोबरिच by बिटाकाका
जबरी!
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
ज्या देशातील भ्रष्टाचाराचे
In reply to सहमत आहे. by arunjoshi123
कपिलमुनी,
In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
तुमचे मत काय आहे ?
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
पॉर्न पाहणे वाईट असं
In reply to तुमचे मत काय आहे ? by कपिलमुनी
जर पॉर्न पाहणे वाईट नसेल तर
In reply to पॉर्न पाहणे वाईट असं by arunjoshi123
https://www.thenewsminute.com
In reply to कपिलमुनी, by arunjoshi123
https://www.thenewsminute.com/article/bjps-amit-malviya-tweets-video-cas... मुख्यमंत्री लाइव पॉर्नस्टार आहेत.बापरे, असा माणूस यांचा मुख्यमंत्री आणि त्याला दोन मतदारसंघातून तिकिट!!!!! यांच्या नेत्यावरही बलात्काराचे आरोप असताना त्याला २००९ आणि २०१४ मध्ये तिकिट दिले होते. तोच नेता २००० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असून सध्या त्याला जामिनावर सोडला आहे. सध्या हा यांचा स्टार प्रचारक आहे व २०१९ मध्ये हा यांचा नेता असणार आहे. (संपादित)विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या
In reply to भारतीय जनता पार्टी की पोर्न जनता पार्टी ?? by कपिलमुनी
ह्याच नियमानं राहुल गांधी
In reply to विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या by arunjoshi123
संपूर्ण लेखात केवळ जाती नि
ऑ!
In reply to संपूर्ण लेखात केवळ जाती नि by arunjoshi123
१. माणसाच्या अस्मिता सरकारी
In reply to ऑ! by जेम्स वांड
तुमची बरीच मते पटण्यासारखे तर्क देतात
In reply to १. माणसाच्या अस्मिता सरकारी by arunjoshi123
या पार्श्वभूमीवर जन्माने
In reply to तुमची बरीच मते पटण्यासारखे तर्क देतात by जेम्स वांड
अर्थातच!
In reply to या पार्श्वभूमीवर जन्माने by arunjoshi123
कारण निवडणूका
In reply to संपूर्ण लेखात केवळ जाती नि by arunjoshi123
संपादक कुठे आहेत?
+१००० सहमत
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
संपादकांनी दुसऱ्या एका
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
धन्यवाद संपादक मंडळी, फेथ
In reply to संपादकांनी दुसऱ्या एका by बिटाकाका
या धाग्यावर एक आयडी लोकांना
In reply to संपादक कुठे आहेत? by पैसा
ऑ
In reply to या धाग्यावर एक आयडी लोकांना by टवाळ कार्टा
=))
In reply to ऑ by पैसा
अजून
संपादक मंडळ _/\_
संमं चे आभार.
अभ्याश्री कधीपासून अश्या
काँग्रेसला विजयी करण्यासाठी एक तोडगा
छे कस शक्य आहे
In reply to काँग्रेसला विजयी करण्यासाठी एक तोडगा by रमेश आठवले
http://voiceofbengaluru.com
- To reduce the dropouts
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
काँग्रेसचा एवढाच जाहीरनामा
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
वरील वृत्तानुसार खांग्रेसी
In reply to http://voiceofbengaluru.com by श्रीगुरुजी
मालकांच्या संपादनांचा आणि
In reply to वरील वृत्तानुसार खांग्रेसी by विशुमित
<<मालकांच्या संपादनांचा आणि
In reply to मालकांच्या संपादनांचा आणि by arunjoshi123
काहीतरी अगम्य लिहायचे आभार.
In reply to <<मालकांच्या संपादनांचा आणि by विशुमित
नालायक हा शब्द असांसदिय नसावा
In reply to <<मालकांच्या संपादनांचा आणि by विशुमित
चांगली गोष्ट आहे की मग.
हि वेगळी आंतरजालीय शोध तुलना
गेल्या ३० दिवसांसाठीचा आलेख
In reply to हि वेगळी आंतरजालीय शोध तुलना by माहितगार
पेज व्ह्यूज तुलना
कन्नड गूगल शोध आणि कन्नड
ईतना सन्नाटा क्यों है भाई
सहीये !!
In reply to ईतना सन्नाटा क्यों है भाई by श्रिपाद पणशिकर
चला नावनोंदणि सुरु झालिय.
काही नाही. ९९ झालेले दिसले.