Skip to main content

कर्नाटक विधानसभा निवडणुक - मे २०१८

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 24/04/2018 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक विधानसभा निवडणुक १२ मे या दिवशी आहे. निकाल १५ मे या दिवशी जाहीर होतील. कर्नाटक विधानसभेत २२४ आमदार असून बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज आहे. कर्नाटकात ३ मुख्य पक्ष आहेत. काँग्रेस, भाजप व निधर्मी जनता दल. या तीन पक्षातच मुख्य लढत आहे. निजदचे फारसे आमदार निवडून येत नसले तरी दक्षिण कर्नाटक व म्हैसूर च्या आजूबाजूच्या भागातील वोक्कलिंग मतदारांमध्ये या पक्षाला चांगले समर्थन आहे. या निवडणुकीसाठी निजदने बसपशी युती केली आहे. इतर सर्व राज्यांप्रमाणेच कर्नाटकमध्ये सुद्धा जातींचे प्राबल्य आहे. लिंगायत (१७%), वोक्कलिंग (१२%) या दोन प्रमुख जाती आहेत. त्या व्यतिरिक्त मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. दलित व ब्राह्मण यांचाही काही प्रमाणात प्रभाव आहे. केरळला लागून असलेल्या मेंगलोर मध्ये ख्रिश्चनांचा प्रभाव आहे. निजदचे अध्यक्ष देवेगौडा वोक्कलिंग आहेत. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा लिंगायत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागासवर्गीय आहेत. निजद पक्षाला मिळणारी बहुसंख्य मते वोक्कलिंगांची आहेत. मागील ३ निवडणुकीमध्ये या पक्षाची कामगिरी तिसर्‍या क्रमांकाची होती (२००४ मध्ये ५६ जागा, २००८ मध्ये २८ व २०१३ मध्ये ४०). भाजपने २००४ मध्ये ८०, २००८ मध्ये ११० तर २०१३ मध्ये फक्त ४० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने २००४ मध्ये ६५, २००८ मध्ये ८० तर २०१३ मध्ये १२२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. मागील ८ दिवसात ३ वृत्तसंस्थांनी आपल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज जाहीर केले. त्यानुसार यावेळी कर्नाटकात अधांतरी विधानसभा येण्याची शक्यता असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. १) इंडिया टुडे - कार्वी https://www.financialexpress.com/elections/karnataka-assembly-elections… १३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९६ (९०-१०१), भाजप ८२ (७८-८६), निजद + बसप ३९ (३४-४३) व इतर ५ (४-७) जागा जिंकू शकतील. २) एबीपी - सीएसडीएस https://www.bloombergquint.com/politics/2018/04/23/karnataka-elections-… २३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ८८ (८५-९१), भाजप ९२ (८९-९५), निजद + बसप ३५ (३२-३८) व इतर ९ जागा जिंकू शकतील. ३) टाईम्स नाऊ - व्हीएमआर https://www.hindustantimes.com/india-news/karnataka-assembly-elections-… २३ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणानुसार काँग्रेस ९१, भाजप ८९ व निजद + बसप ४० जागा जिंकू शकतील. या तीनही अंदाजात काही समान गोष्टी आहेत. त्या म्हणजे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. २ सर्वेक्षणांनी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा दिल्या आहेत तर एका सर्वेक्षणानुसार भाजप काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवेल. पण दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या एकूण जागांमध्ये फारसा फरक नसेल. २०१३ मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना तब्बल १२२ जागा होत्या तर उर्वरीत दोन पक्षांना प्रत्येकी ४० जागा मिळाल्या होत्या. म्हणजे प्रथम व दुसर्‍या क्रमांकाच्या पक्षांच्या जागांमध्ये खूप अंतर होते. परंतु यावेळी तितके अंतर असणार नाही असा अंदाज दिसतो. तीनही सर्वेक्षणांनी पुन्हा एकदा निजदला तिसर्‍या क्रमांकाच्या जागा दिल्या आहेत. जर दोनही पक्षांना बहुमत मिळणार नसेल तर निजदला किंगमेकर या नात्याने प्रचंड महत्त्व येईल. निजदला किंगमेकर होण्याइतक्या जागा मिळणार असल्या तरी त्या पक्षाला त्याचा फायदा कितपत उठविता येईल याविषयी शंका आहे. २००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना काँग्रेस (६५ जागा) व निजद (५६ जागा) मध्ये जेमतेम ९ जागांचा फरक होता. या संधीचा फायदा उठवून आपला मुख्यमंत्री करण्याची निजदला सुवर्णसंधी होती. परंतु निकाल लागताक्षणीच देवेगौडांनी आपले पत्ते उघड करून संधी घालविली. निकाल लागल्याच्या दिवशीच त्यांनी जाहीर केले की निजद कोणत्याही परिस्थितीत सरकार बनविण्यासाठी भाजपला पाठिंबा देणार नाही (भाजपला ८० जागा मिळाल्या होत्या). हे जाहीर करून देवेगौडांनी आपले इतर सर्व पर्याय स्वहस्ते बाजूला केले व त्यामुळे त्यांना नाईलाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला असता. देवेगौडांच्या जागी धूर्त मायावती असती तर मायावतीने कोणतीही घोषणा न करता दोन्ही पक्षांशी एकाचवेळी बोलणी करून डबलगेम खेळून शेवटी स्वतःच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. २००४ मध्ये देवेगौडा या खेळात नक्कीच कच्चे ठरले. २०१८ मध्ये सुद्धा देवेगौडा भाजपला पाठिंबा द्यायची सुतराम शक्यता नाही. अर्थात त्यांचा मुलगा कुमारस्वामी वडीलांना धुडकावून भाजपशी युती करू शकतो (२००६ मध्ये कुमारस्वामीने भाजपच्या पाठिंब्याने २० महिने मुख्यमंत्रीपद मिळविले होते). जर काँग्रेस-निजद संयुक्त सरकार स्थापन झाले तर नवीन सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असणार नाहीत. सिद्धरामय्या पूर्वी निजदमध्येच होते. निजद सोडून काँग्रेसमध्ये गेल्याने देवेगौडांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सिद्धरामय्यांऐवजी नवीन मुख्यमंत्री आणायचा ही त्यांची प्रमुख अट असेल. २००४ मध्ये सुद्धा पाठिंबा देण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एम कृष्णा यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. त्यांनी आपले पत्ते नीट खेळले तर त्यांना कुमारस्वामीला मुख्यमंत्री करता येईल. काँग्रेसला सिद्धरामय्यांच्या जागी नवीन चेहरा आणण्यासाठी फारसे पर्याय शिल्लक नाहीत. त्यातल्या त्यात लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हाच एक चांगला पर्याय होऊ शकेल. खरगे फारसे वादग्रस्त नाहीत व केंद्रात त्यांचे भाजपच्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुरळीत राहू शकतील. ते तयार नसतील तर कॉंग्रेसने धाडस करून नंदन नीलेकणींना मुख्यमंत्री करावे. २०१४ मध्ये नीलेकणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवून पराभूत झाले होते. त्यांची कॉर्पोरेट कार्यक्षमता वादातील आहे. ते मुख्यमंत्री झाले तर सुशिक्षित मध्यमवर्गीय मतदारांमध्ये एक चांगला सकारात्मक संदेश जाईल (हाच वर्ग भाजपचा तगडा पाठीराखा आहे). अर्थात इन्फोसिसची जबाबदारी नुकतीच पुन्हा एकदा खांद्यावर घेतलेले निलेकणी परत राजकारणात येतील का याविषयी खात्री नाही. तसेच जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होत असलेल्या कर्नाटकात नीलेकणी हा ब्राह्मण चेहरा कितपत तग धरू शकेल याविषयी शंका आहे. सिद्धरामय्यांनी मागील ५ वर्षात मोठ्या प्रमाणात जातीय, प्रादेशिक व धार्मिक ध्रुवीकरण करून आपले आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. कन्नड भाषेची सक्ती, कर्नाटक राज्यासाठी वेगळा ध्वज, क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणे, हिंदूंच्या हत्या करणार्‍या मुस्लिम गुन्हेगारांकडे दुर्लक्ष, लिंगायतांना वेगळा धर्म व अल्पसंख्याक अशी मान्यता अशा अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे हिंदू-मुस्लिम व हिंदूंमधील विविध जातींमध्ये फूट पाडून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना कितपत यश येईल ते १५ मे या दिवशी कळेलच. एकंदरीत सध्याच्या अंदाजानुसार कर्नाटकात कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळण्याची चिन्हे असून अधांतरी विधानसभा होण्याची व काँग्रेस-निजद यांचे संयुक्त सरकार एका नवीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो सर्वाधिक मोठा पक्ष असतो, तो पक्ष नंतर लगेच होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर नसतो असा १९८३ पासूनचा इतिहास आहे. यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे बघण्यासाठी मे २०१९ पर्यंत वाट पहावी लागेल.

वाचने 25807
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

कारण निवडणूका जातीधर्मांपलिकडे नेऊ इच्छीणारे ते स्वतंत्र भारतातील एकमात्र नेतृत्व आहे.
वाचून मनोरंजन झाले.. धन्यवाद

In reply to by पैसा

वरतून अजून अश्लाघ्य प्रकार म्हणजे एकाने तुम्हाला कुत्रा म्हणल्यावर त्याला वळून कुत्रा म्हणणे, हे म्हणजे तू गाढवाचे शेण खाऊन माझ्यावर थुंकतोस तर मीही खेचराचे खाऊन तुझ्यावर थुंकणार अश्यातली गत वाटते, किंवा कुत्रं तुम्हाला चावलं तर उलट कुत्र्याला चावण्याचा प्रकार वाटतो, ग्रेसफुली फाट्यावर मारणे ही कला एकंदरीतच मराठी आंतरजालावरून लुप्त पावते आहे का काय! किती ती खुमखुमी एकमेकांची भोंड जिरवायची, श्या! Sad crying smiley face

In reply to by पैसा

संपादकांनी दुसऱ्या एका धाग्यावर कुणाचातरी गुलाम की काय शब्द उडवला म्हणजे संपादक आहेत पण इथे ते फिरकले नाहीत. ********************* टॉमी मोती वगैरे बोलणाऱ्या सभासदांना मी सुज्ञ आयडी समजत होतो पण हाय रे दैवा....वैचारिक पातळी खूप खालची दिसली वरच्या प्रतिसदांमध्ये. आणि एकदा नाही तर परत परत दिसली. जर संपादक लक्ष देत नसतील तर काय भूमिका घ्यावी बरे? म्हणजे जाऊद्या म्हणून सोडून द्यावे?

In reply to by पैसा

या धाग्यावर एक आयडी लोकांना कुत्रे म्हणत आहे. Disgusting.
असहमत....कोणीही दुसर्याला कुत्रे म्हटलेले नाहीये

In reply to by पैसा

=))

प्रचाराला मिसळपाववर जोर चढला असला तरी कर्नाटकात अजून मोदींच्या सभा अजून सुरू झालेल्या नाहीत. असो. बेळगावी-गदग मतदारसंघांमध्ये मजा आहे. तेथील (कु)प्रसिद्ध जारकीहोळी कुटुंब- अनेक साखर कारखाने,शैक्षणिक संस्थांवर मालकी आहे. कुटुंबाताले दोघे कॉंग्रेसमध्ये तर एक जण भाजपामध्ये तर आधी कुणीतरी जनता दलात. गेले २० वर्षे जारकीहोळी कुटुंबातील सदस्यच निवडून आला पाहिजे हे बघितले जाते.! मग तो जनता दलाचा असो,वा कॉण्ग्रेसचा वा भाजपाचा. आणी मिसळपाववर 'तो खांग्रेसी तर तो भक्त' अशी भांडणे चालू असतात.! http://www.newindianexpress.com/states/karnataka/2018/apr/09/in-belagav…

समतोल कारवाई बद्दल मनःपूर्वक अभिनंदन अन आभार

In reply to by रमेश आठवले

त्याना मुसलमानांना गोन्जरयची, ख्रिश्चन लोकाना आन्जारयची सवय! काँग्रेस म्हनजे अल्पसन्ख्यान्कान्चा मसीहा. ते देवळात गेले तर साक्षात इन्द्रदेवान्चे आसन डळमळायला लागेल.. सेक्युलर धाय मोकलून रडतील.. पण कल्पना मस्त आहे. करतील हे राजकारणी कांहीही करतील...

http://voiceofbengaluru.com/post/838/ वरील वृत्तानुसार खांग्रेसी जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासने - - 4% reservation to minority Muslims in Government appointments - The State government has introduced various developmental schemes to promote and uplift minority communities such as Muslims, Buddhist, Jains, Christians, Sikhs, and Parsis to bring them on par with other communities - To reduce the dropouts among 60,000 minority students, we propose construction of 1000 Maulana Azad schools - We will setup Maulana schools in every taluk - Madrasa board will be established to manage affairs of Madrasas regarding employment, self-employment and skilling - Support WAQF by developing their 300 commercially potential properties in the next five years and Constitution of Wakf Properties Development Corporation - Soft loans will be provided to minorities to set up quality education institutions through KMDC upto Rs. 5 Crores for those institutions who provide collateral security at 4% interest - Insurance Scheme to cover the health and children’s education of minority Auto and Taxi drivers

In reply to by श्रीगुरुजी

- To reduce the dropouts among 60,000 minority students, we propose construction of 1000 Maulana Azad schools
साठ पोरांची एक शाळा मंजे लक्झरी आहे कि राव.

In reply to by श्रीगुरुजी

वरील वृत्तानुसार खांग्रेसी जाहीरनाम्यातील काही प्रमुख आश्वासने ->> ==>> तिकडे आमच्या भावाचा "नालयाकसत्ता" हा शब्द संपादित केला पण "खान्ग्रेस्स" शब्द संपादक मंडळाच्या डोळ्याखालून गेला नाही का ? इथून पुढे ज्याला पक्षीय ओकाऱ्या काढायच्या आहेत त्याने आपल्या स्वतःच्या भिंतीवर कराव्यात. मिपा हे सभ्य लोकांचे संकेतस्थळ आहे. सं.मं ला विनंती आहे त्यांनी हा शब्द संपादित करावा आणि सदस्याला विशेष समज देऊन कारवाई करावी. ==== मालकाची विशेष सूचना: बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे. ====

In reply to by विशुमित

मालकांच्या संपादनांचा आणि विशेष सुचनेचा काही एक संबंध नाही. एक चायना बॉर्डर आहे एक पाकिस्तान. =================== बा द वे, संस्थळास अमान्य असणार्‍या सर्व शब्दांची एक सूची मिळाली तर बरं होईल. नालायक हा एक सामान्य शब्द आहे असा आमचा समज होता.

In reply to by arunjoshi123

मालकांच्या संपादनांचा आणि विशेष सुचनेचा काही एक संबंध नाही. एक चायना बॉर्डर आहे एक पाकिस्तान.>>> ==>> काहीही हा भावा. काहीतरी अगम्य लिहायचे आणि हरणे दाखवायची तुझी जुनी खोड मला माहित आहे. बा द वे, संस्थळास अमान्य असणार्‍या सर्व शब्दांची एक सूची मिळाली तर बरं होईल.>>> ==>> मी तरी एक सुचवलं आहे खान्ग्रेस्स= काँग्रेस, बाकी इतरांनी सुचवत राहा. वाटल्यास कोणीतरी सेपरेट धागा काढा. नालायक हा एक सामान्य शब्द आहे असा आमचा समज होता.>>> ==>> तुझ्यासाठी म्हणून तर प्रतिसाद टाकला.

In reply to by विशुमित

नालायक हा शब्द असांसदिय नसावा निश्चितच. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर १७ मेच्या लोकसत्तेतील संपादकियाचे शिर्षक होते: 'नालायकांचे निर्दालन' कुठल्याही पक्षाला एवढा खरपूस मार पडलेला त्यानंतर किंवा पुर्वीही पाहिले नाही. अपवाद: रझा अकादमीने केलेल्या दंगलीनंतर राष्ट्रवादी पक्ष आणि मुस्लिम मूलतत्ववादी यांच्याविरोधात आलेला अग्रलेख, 'अधर्मवादी राष्ट्रविरोधी'.

कोणता शब्द अधिक शोधला जातो या बद्दल हिंदी किंवा इंग्रजीतील आंतरजालीय तौलनीक शोध काही वेळा फसवे असू शकतात, , जसे नरेंद्र मोदींबद्दलचे इंग्रजी शोध हे केवळ पतप्रधानपदावर असल्यामुळे भारत देश विदेशातून नाव शोधल्याने सुद्धा नाव शोधले जाऊ शकते पण कन्नड लिपीतल्या मधल्या sh शोधात शब्दांच्या स्थानिक लोकप्रयतेचा अल्प अंदाज येण्यास मदत होऊ शकते . खाली नावांचे कन्नड रूपांतर देता आहे सिद्धरामय्या ( कर्नाटकचे सध्याचे काँग्रेस मुख्यमंत्री ) ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ गुगल ट्रेंड निळा रंग रेषा आलेख येडियुरप्पा (कर्नाटक माजी मुख्यमंत्री भाजपा ) ಬಿ.ಎಸ್. ಯಡಿಯೂರಪ್ಪ गुगल ट्रेंड लाल रंग आलेख रेषा देवेगौडा ( कर्नाटक माजी पंत प्रधान जनता दल एस ) ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ गुगल ट्रेंड पिवळ्या रंगाची आलेख रेषा राहुल गांधी ( काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधान इच्छूक ) ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ गुगल ट्रेंड हिरव्या रंगाची आलेख रेषा सोनिया गांधी (माजी काँग्रेस अध्यक्ष ) ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ गुगल ट्रेंड जांभळी रंग आलेख रेषा नरेंद्र मोदी ( सध्या पंतप्रधान भाजपा ) ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ गुगल ट्रेंड नुसार सिध्दरामय्या वर मग राहुल गांधी बाकी सर्व सपाट दिसताहेत , (कन्नड भाषा विकिपीडिया ट्रेंड कदाचित वेगळा आहे तो थोड्याच वेळात देण्याचा प्रयत्न करतो ) गुगल ट्रेंड मध्ये नाव लेखना मध्ये बदल करून पाहिल्यास जरासा फरक पडू शकतो मला कन्नड लिपी येत नसल्याने मी फारसे प्रयत्न केले नाहीत इतर कुणास येत असल्यास प्रयत्न अथवा क्रॉसचेक करावे उपरोक्त कन्नड चुकल्यास चूभूदेघे https://trends.google.com/trends/explore?date=today%201-m&q=ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ,ಯಡಿಯೂರಪ್ಪ,ದೇವೇಗೌಡ,ರಾಹುಲ್%20ಗಾಂಧಿ,ನರೇಂದ್ರ%20ಮೋದಿ हे आलेख दुवे अथवा चित्र मला नीट शेअर करता आलेले नाही , इतर कुणी मदत केल्यास स्वागत असेल

हा कन्नड विकिपीडिया पेज व्ह्यू दुवा आहे https://tools.wmflabs.org/pageviews/?project=kn.wikipedia.org&platform=…ಬೆಕ್ಕು|ನಾಯಿ सध्याचे ಬೆಕ್ಕು|ನಾಯಿ शब्द ( उंदीर । मांजर ) काढून स्पेस देऊन खालील लेखांचे शब्द टाकून पाहावे लागतील खाली नावांचे कन्नड रूपांतर देता आहे सिद्धरामय्या ( कर्नाटकचे सध्याचे काँग्रेस मुख्यमंत्री ) ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ येडियुरप्पा (कर्नाटक माजी मुख्यमंत्री भाजपा ) ಬಿ.ಎಸ್. ಯಡಿಯೂರಪ್ಪ देवेगौडा ( कर्नाटक माजी पंत प्रधान जनता दल एस ) ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ राहुल गांधी ( काँग्रेस अध्यक्ष पंतप्रधान इच्छूक ) ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ सोनिया गांधी (माजी काँग्रेस अध्यक्ष ) ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ मोदी ( सध्या पंतप्रधान भाजपा ) ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ पेज व्ह्यू क्रमांक क्रमांक १ मोदी (आलेख रेषा पोपटी) क्रमांक २ सिद्ध रामय्या ( आलेख रेषा गुलाबी लाल ) क्रमांक ३ येडियुरप्पा (आलेख रेषा पिवळी ऑरेंज ) क्रमांक ४ देवेगौडा (आलेख रेषा जांभळी ) क्रमांक ५ राहुल गांधी (आलेख रेषानिळी ) क्रमांक ६ सोनिया गांधी (आलेख रेषा ऑलिव्ह ग्रीन )

कन्नड गूगल शोध आणि कन्नड विकि पेज व्ह्यूज मधील मोठ्या फरकाचे कारण तेवढे लक्षात आले नाहीत -सहसा एवढा फरक पडत नाही - पण गूगल ट्रेन्ड अधिक व्यापक म्हणून अधिक विश्वासार्ह वाटतो .

चला नावनोंदणि सुरु झालिय. EVM च्या नावाने ज्यांना ज्यांना गळा काढायचा आहे चला बिगि बिगि नाव नोंदवा. राजमान्य राजश्रि नव तरुण बुध्दिवादि नेते ह्यांच्या बँ कॉक प्रवासाचे तिकिट बुक झाले असेलच. रडणार्या रुदालि आणि रडे वाहिंन्यावर जमतिलच. कोणाला जास्त त्रास झाल्यास डॉ. घुंघरूसेठ ह्यांचे चालते फिरते मोहल्ला क्लिनिक, चिल्लम ऐ सर कुप्ता ह्या पँथॉलॉजिस्ट सोबत असेलच. काळजी नसावि.

चला नावनोंदणि सुरु झालिय. EVM च्या नावाने ज्यांना ज्यांना गळा काढायचा आहे चला बिगि बिगि नाव नोंदवा.
बहुदा ह्याची वेळ या निवडणुकीत विरोधकांवर येणार नाही. कारण निवडणुक आयोगाने ह्या निवडणुकीत VVPAT मशीन सर्वत्र लावल्या होत्या.