✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?

व — विशाल कुलकर्णी, Tue, 04/24/2018 - 17:29
कोण अपुला कोण परका ओळखावे मी कसे? काळजाचे प्रश्न अवघड समजवावे मी कसे? कोरड्या रस्त्यात स्वप्नांचे विखुरले पंख कां, जखम ओली, तप्त रुधिरा आवरावे मी कसे? हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे, रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे? ऐक वेड्या ओळखीचे चोर दिसती साजरे या घडीला माणसांना पारखावे मी कसे ? स्वार्थ सत्ता द्वेष मत्सर माणसांचे सोयरे बंधुभावाचे नगारे वाजवावे मी कसे ? शांतचित्ताने विशाला आळवावे राघवा दांभिकांचे दंभ फुसके जोजवावे मी कसे? © विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
1946 वाचन

💬 प्रतिसाद (2)

कविता आवडली.

एस
Tue, 04/24/2018 - 18:38 नवीन
कविता आवडली.
हासऱ्या त्या लेकराचे हरवले हसणे कुठे, रक्त त्या डोळ्यातले सांगा पुसावे मी कसे?
हे कडवे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

हो मला पण

श्वेता२४
Wed, 04/25/2018 - 12:29 नवीन
एस यांच्या अभिप्रायाशी सहमत. खुपच छान गुंफलीय कविता. अजुन वाचायला आवडेल. पुकप्र.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा