Skip to main content

बिन्धास प्या!

लेखक सहज यांनी रविवार, 08/03/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा गोखलेसाहेबांची सुरेख कविता व गुत्यातील सहपेताडांनी असेच चढवले म्हणून मी प्यायला घाबरत नाही बिन्धास्त पितो..! चढली मला जास्ती, तर खुशाल लटपटतो..! लुडकणे आहे तसा, प्राणिजात स्वभाव सोबर रहावे वाटणे हा खोटा अहंभाव विदेशातली पिण्यासाठी असते अपुली धडपड त्यात झाली भाववाढ तर वाढते कि हो तडफड असेल जर हे खरे तर कशास लाजायचे मिळाली पहिल्या धारेची तरच व्होट द्यायचे घोट घेता हळुहळू डोळे मिटुन घेतो मावळताच रविराजा मी फुल्ल आउट होतो सुर्याने मावळावे म्या पामराने लुडकावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे...? पेताडांच्या हो जीवनाचा चिरंतन स्वभाव चैतन्याचा अभाव तिथे दारुचा ठेहराव पित नाही मद्याला तर, जगता कशाला...? रोज कमावताना शिल्लक बघता कशाला? जमेल तेवढी प्यायला नशेनी जगायचे पिण्यासाठीच जन्म आपुला का, कोरडे मरायचे....??? म्हणोत कोणी नशेबाज परि नाही लाजायचे.. हो हो! ढोसतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... बिन्धास प्यायचे....!!!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3262
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर. सहजराव भासतात तितके सहज नाही. म्हणोत कोणी नशेबाज परि नाही लाजायचे.. हो हो! ढोसतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... इथे पैकीच्या पैकी गुण दिले :) अवांतर : वृत्त,मात्रा, पाहावे लागेल :?

१० पैकी १० गुण विडंबनाला छुपे रुस्तुमगिरि म्हणुन ५ गुण वजा कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण परत स्वतःतील विडंबकाला मारणार नसल्याची कबुली दिल्याने अधिक २ गुण एकुण गुण १० :) --अवलिया

In reply to by अवलिया

>>कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण हे असे असेल तर आम्ही उत्तर पत्रिका तपासणार नाही. वृत्त / मात्रे यांना गुण नाही दिलेत ? -दिलीप बिरुटे (कोणत्याच तंबूत ,सॉरी कंपूत नसलेला )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते ३० चे ३५ करतात ना तसे आहे.... प्राध्यापक साहेब तुमचे बरे आहे. इथे आम्हाला संस्था (पक्षी : कंपु ) चालवायची आहे. समजुन घ्या !!! --अवलिया

अफलातुन्... सहज सुंदर विडबन..!! ओरिजिनल पेक्षा सुंदर !!!!!!! तुमच्या विडंबना मुळे मला भरपूर प्रतिसाद मिळाले... धन्यवाद.....

In reply to by चन्द्रशेखर गोखले

हा हा.. गोखलेसाहेबांचा प्रतिसाद मस्त :) सहजरावांची कविता छानच.. आता बिन्धास्त प्यावे म्हणतो ;) -- लिखाळ.

केशवसुमार विद्यालयात आणखी एक दाखला का? प्राचार्य खूश होणार! (शिपाई)बेसनलाडू

सहजरावांनी अगदी त्यांच्या नावाइतके सहज विडंबन केलेय. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सहज राव सहज "टाकताय"वाटतं.
विदेशातली पिण्यासाठी असते अपुली धडपड त्यात झाली भाववाढ तर वाढते कि हो तडफड
म्हनुन म्हंतो गांधीजींना स्मरुन 'स्वदेशी' वापरा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

लै भारी !! ज्याच्या कडे बाटली आहे... व जो 'सहज'पणे ती रिचवू शकतो तोच असे विडंबन लिहू शकतो ... नाय तर आम्ही लिहायला बसतो कविता तयार होते हत्या.... आम्ही लिहायला बसतो पाककृती.. पोहचतो हिमालयात.... =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D