मुळ प्रेरणा गोखलेसाहेबांची सुरेख कविता व गुत्यातील सहपेताडांनी असेच चढवले म्हणून
मी प्यायला घाबरत नाही
बिन्धास्त पितो..!
चढली मला जास्ती, तर
खुशाल लटपटतो..!
लुडकणे आहे तसा,
प्राणिजात स्वभाव
सोबर रहावे वाटणे
हा खोटा अहंभाव
विदेशातली पिण्यासाठी
असते अपुली धडपड
त्यात झाली भाववाढ
तर वाढते कि हो तडफड
असेल जर हे खरे तर
कशास लाजायचे
मिळाली पहिल्या धारेची
तरच व्होट द्यायचे
घोट घेता हळुहळू
डोळे मिटुन घेतो
मावळताच रविराजा
मी फुल्ल आउट होतो
सुर्याने मावळावे
म्या पामराने लुडकावे
याला काय गड्यानो,
कोणी पाप म्हणावे...?
पेताडांच्या हो जीवनाचा
चिरंतन स्वभाव
चैतन्याचा अभाव
तिथे दारुचा ठेहराव
पित नाही मद्याला तर,
जगता कशाला...?
रोज कमावताना शिल्लक
बघता कशाला?
जमेल तेवढी प्यायला
नशेनी जगायचे
पिण्यासाठीच जन्म आपुला
का, कोरडे मरायचे....???
म्हणोत कोणी नशेबाज
परि नाही लाजायचे..
हो हो! ढोसतो मी, असे
छाती ठोकुन सांगायचे...
बिन्धास प्यायचे....!!!!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3246
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
मूळ कविता
१० पैकी १०
च्यायला हे मार्कही धरावे लागतात का ?
In reply to १० पैकी १० by अवलिया
ते ३० चे ३५
In reply to च्यायला हे मार्कही धरावे लागतात का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिन्धास प्या !!!!!!!
हा हा..
In reply to बिन्धास प्या !!!!!!! by चन्द्रशेखर गोखले
दारु ही
दारुही
In reply to दारु ही by सर्केश्वर
चला
हाहाहा
बिन्धास्त प्या...... ह्याचीच वाट बघत होतो.
सहज विडंबन!
बेष्ट
वा वा
लै भारी