टवळी आणि सटवी
माझ्या कडे असलेला गावां च्या नावांचा डाटाबेस देवी नावांसाठी चाळत असताना
नंदुरबार जिल्ह्यातील तर टवळाई (जि नंदुरबार महाराष्ट्र ) नावाच्या गावाने गमंत म्हणून लक्ष गेले (आपल्या मिपाकर टका काकांची आठवण नसती झाली नवल होते , टका काका हा. घ्या ) . पण अगदी वेगळ्या अनपेक्षित शब्दामागे आई देवी शब्द मिळू शकतात म्हणूनच खरेतर डाटाबेस बघत होतो . टवळाई अजून कुठे सापडतात पाहण्यासाठी पिनकोड डाटा घेतले तर एकदम दूर मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात मिळाले .
टवळी नावाची आणखी जराशी गावे असावीत पण देवता म्हणून येतात का याची खात्री दुजोरा मिळाल्या शिवाय करणे संभव नाही . ( तवली इंग्लिश स्पेल्लिंग बऱ्याच गावांच् नावांच्या प्रत्यायात येते पण त्याचीही खात्री करणे संभव नाही )
शब्दार्थ शोधण्यासाठी ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग वरील दाते कर्वे कोशाचा आणि आंजावर उपलब्ध मोल्सवर्थ शब्द कोशाचा आधार घेतला .
दाते कर्वे कोशानुसार टवळं - न . म्हणजे समई , दिवा किंवा पळीचें तोंड , चाडें ( यांत तेल व वात असते ). हृदयटवळा दीपकु । - मुआदि २६ . २१६ . तुतारीचा टोंकाचा भाग ; चुनाळयाचा , तपकिरीच्या डबीचा , डब्याचा अर्धा भाग ; दुहेरी शिंपीचें
अर्ध ; वाटीच्या आकाराचें भांडयाचें अर्ध ; गोफणींत दगड ठेवावयाची जागा .
टवळी नारळाच्या करवंटीचा काढलेला तुकडा , ढलपी . २ ओलाण दिव्यामध्यें ज्या खोलगट तबकडींत तेलबात घालतात ती ; पितळी पंती . ३ डोक्याचा पुढचा भाग ; कपाळ . ४ ( बायकी टवाळ स्त्री ) एक प्रकारचा शिवीचा शब्द . ५ जोंधळा किंवा ऊंस यांतील एक प्रकारचें बांडगूळ . [ का . टवळी ]
तर एकूण मूळ शब्दात नकारात्मक काही नाही पण टवळी शब्दात एकदम अर्थ बदलतो दाते कर्वे कोश टवळी अमावस्या अवंस - स्त्री . १ आषाढी अमावास्या ; या दिवशीं टवळयांची म्हणजे दिव्यांची पूजा करितात . २ अभद्र किंवा अपशकुनी स्त्री असा एकदम ३६० अंशात बदलेला वेगळा अर्थ देते . एकूण आपल्या देशात विघ्नकर्त्या शक्तींनी विघ्ने आणू नयेत म्हणून त्यांचेही पूजन होत असे त्यातीलच एक कथित शक्ती राहिली असण्याची शक्यता दिसते.
तवा, तवली , (तवक) तबक हे शब्द सपाट स्वरूपाच्या भांड्यांसाठी परिचित आहेत , तवकणे , ताव खाणे हि क्रियापदे संतप्त होणे कोप पावण्याच्या जवळच्या अर्थाने येताना दिसतात . समई , दिवा यांचे वात समोर येणारा मुखासारखा भाग शिवाय तवा या तप्त होणाऱ्या गोष्टी त्यामुळे टवळी म्हणजे कोप पावणारी स्त्री शक्ती असे झाले असेल का ? (टवळीतील टव शब्दाचा प्रवास ठाव , थांग याच्याशी समांतर असण्याची शक्यता असू शकेल का ? पण मग तसे असेल तर कोप शब्दार्थाशी संबंध कमी होण्याची शक्यता निर्माण होते) पण केवळ कोप पावण्याच्या वैशिष्ट्यावरून अभद्रता अथवा शिवी इथं पर्यंत शब्दार्थाची मजल जाणे सहसा कठीण वाटते . टवाळ हा शब्द सहसा उठवळ या अर्थाने येत असावा .
सटवी हे सुद्धा देवीचे नाव आहे . मी आता पर्यन्त सतावणे या शब्दावरून सटवी शब्द येत असेल असे गृहीत धरता होतो आणि कदाचित तसेच असेलही पण टवळी शब्दातील टव नंतरचा ळ गाळून पडला आणि अनेक शब्दाची सकारात्मक बाजू दाखवण्यासाठी स हा उपसर्ग येतो तसे सटवी शब्दा बद्दल झाले नसेल ना अशी शंका येऊन गेली . अर्थात हे पूर्ण चूकही असू शकते (चभूदेघे) खासकरुन मुल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी मुलाचा मृत्यू होऊ नये म्हणून वेगळ्या कारणासाठी सटवीची पुजा केली जाते असे दिसते. सट शब्दाचा संबध शष्टी तिथीशी लावला गेल्याचे दिसते .
** टवरा, टवरी, टवरकी , टवरचाळ हे टवळी आणि टवळा शी उच्चार साधर्म्य असलेले शब्द मोल्सवर्ध आणि दाते कर्वे दोन्ही शब्द कोशात जवळपास एकसारख्या अर्थाने दिसतात. टवरा : पु. ( कों . ) टंवका ; उडालेला तुकडा ; विशेषत : तोडलेला , फाडलेला इ० भाग .; टवरकी स्त्रीपु . उनाडटप्पूपणा ; बदफैली ; भटकेपणा ; टवाळकी . टवरी - वि . भटक्या ; उनाड ; विषयी ; बदफैली ; उनाडटप्पू
** मोल्सवर्ह शब्द कोशातील टेव , आणि टिवळी हि उच्चारणान्चे शब्द काहीसे जवळचे वाटतात
* * तवलीन - या थब्दाचा पंजाबीतील अर्थ भक्तीत लीन असा असावा. संबंध असेल असे नाही पण आंजावर दिसले म्हणून नोंदवून ठेवत आहे एवढेच
** वीणकर राहिलेल्या साळी समाजात टवळ हे आडनाव दिसते - बहुधा व्यवसाय निष्ठ काही अर्थ असेल त्यामुळे उपरोल्लेखीत चर्चाविषयाशी संबंधाची शक्यता कमी वाटते.
** तव हि अक्षरे असलेला ताविषी हा शब्द ऋग्वेदात बहुधा त्वेष सारख्याच अर्थाने येत असावा. तावीज शब्द मार्गे अरेबीकउफार्सी करत उर्दूत आलेला . यांचा संबंध असण्याची शक्यता कमी असली तरी नोंद घेणे हा लेखाचा उद्देश्य आहे म्हणुन नोंदवले
* आधी सांस्कृतीकरणाच्या रेट्यात आणि आता आधुनिकीकरणाच्या रेट्यात महाराष्ट्री संस्कृतीतील विस्मरणात जात असलेल्या काही लोक देवतां बद्दलची आधीची एक चर्चा धागा दुवा राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे हा धागा लेख सर्वसाधारण चर्चेसाठी काढला होता यात हिंग्लजा देवी आणि संबंधीत स्थलनामांबद्दल चर्चा आहे.
याद्या
8870
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
दाजीपूरच्या जंगलात उगवाईचं
छान
टका काका
वर्धा येथील एका गावात 'गाढव
__/\__
In reply to वर्धा येथील एका गावात 'गाढव by मनिम्याऊ
सोमजाई,वाघजाई या माणगाव महाड
सितला /शीतला देवी भारतभर
In reply to सोमजाई,वाघजाई या माणगाव महाड by कंजूस
वाघजाई कोकणात सगळीकडे आहेत.
In reply to सितला /शीतला देवी भारतभर by माहितगार
येडेश्वरी
उस्मानाबाद जिल्ह्यातील
In reply to येडेश्वरी by चौकटराजा
येरमाळ्याच्या येडाईदेवीचे खूप
In reply to उस्मानाबाद जिल्ह्यातील by माहितगार
सटवी ही षष्ठीच
शिळासप्तमीची_कहाणी
In reply to सटवी ही षष्ठीच by पैसा
सॉरी खालील नावाची गावे आहेत
In reply to शिळासप्तमीची_कहाणी by माहितगार
यातले एक फक्त नंदुरबार बाकी
In reply to सॉरी खालील नावाची गावे आहेत by माहितगार
कोल्हापूर जिल्ह्यात एखाद दोन
In reply to यातले एक फक्त नंदुरबार बाकी by माहितगार
सटवाया नावाची गावे ओरीसात
In reply to सॉरी खालील नावाची गावे आहेत by माहितगार
सौंच्या मते