वाटाडे भाग 4
कासारी नदीचे पात्र सापडेना !
गेलावडे धरण व कासारी नदीचे जुने पात्र...
महाराजांच्या वाटाड्यांनी ठरवलेला मार्ग कासारी नदीच्या मांजरे खेड्याच्या आसपास (सध्याच्या नकाशात ती जागा गेलावडे धरणाचा बांध असलेली दाखवली जाते.) पात्राला पकडले की गजापूरला (नकाशात धरणाच्या पाण्यात बुडलेला) मार्ग जायला सोपा होता. तेथून पुढे विशाळगडाच्या समोरील दरीत उतरून जर तेथील भागात सिद्दीच्या सैन्याचा तळ असेल तर त्याला कसे चकवायचे आणि विशाळगडावरच्या गडकऱ्याला खालून हमी देऊन दरवाजे उघडायला भाग पाडायचे अशी आव्हाने स्वीकारायची होती.
जाना था जापान! पहुंच गये चीन!! पण झाले ते बरे झाले...!!!
वाटाड्यांच्या मतभेदाची कारणे- कांही वाटाड्यांच्या म्होरक्यांच्या मते सोनुर्ले नंतर बुरंबळला जाऊन तेथून मांजरेच्याजवळ नदीला पकडता येईल तर काहीं म्होरक्यांचे मत पडले की येलवडेच्या पठारावरून (सध्याच्या) करणजोशी गावापाशी, खाली उतरून (सध्याच्या) कांटे गावाजवळ जरी तो मार्ग लांबचा असला तरी कासारी नदीचे पात्र नक्की येईल. एकदा नदीपात्र धरले की पुढचा गजापूरला जायचा मार्ग सोईचा होईल. (आजच्या 3डी व अन्य आधुनिक उपकरणांनी उपलब्ध नकाशाच्या सोईवरून दोन्ही बाजूच्या वाटाड्यांचे म्होरके त्याकाळात नकाशा न पाहता बरोबरच बोलत होते हे लक्षांत येते. ) खालील नकाशातून दोन्ही वाटा कासारी नदीवरील सद्याच्या गेलावडे धरणाच्या त्या वेळच्या नदीच्या पात्राकडे कशा नेतात. ते कळेल. 1.जवळचा मार्ग बुरंबळकडून मांजरे गावाकडे वरून... 2. खालून वळसा घालून नदीपात्राच्या बाजूने ... 1.
2. कांटे गावाकडे जाण्याच्या शक्यता गुगल नकाशा दाखवतो.
पण घडले भलतेच!
(जर वरीलपैकी पहिल्या पर्यायातून ते गजापूरच्या वाटेला लागले असते तर किंवा दुसरा लांबचा मार्ग महाराजांनी घेतला असता तर त्यांना गजापूरच्या माळावर पोहोचायला जो जास्त वेळ लागला असता तोवर सिद्दीचे सैन्य त्यांच्या शोधात गजापूरच्या उघड्या माळावर समोरासमोर आले असते. मैदानातील लढाईत सैन्याची कमी संख्या, तुटपुंजे शस्त्रबळ, जास्त संख्येच्या सैन्याशी मुकाबला व्यर्थ जाऊ शकले असते. पण महाराजांचा जथ्था चुकीने पांढरेपाणीकडे पोहोचला व नंतरच्या सैन्य मांडणीतून लढ्याचे चित्र बदलून गमिनीकाव्यात रुपांतरित झाले. ‘अडचणीतून संधी शोधतो तो सिकंदर ठरतो’ असा निष्कर्ष निघतो) वाटाड्यातील लोकांची एक वाक्यता नसणे आणि लोंबत्या ढगांच्या गर्दीतून हवी ती वाट न सापडल्याने जंगलातील चढांच्या अरुंद पायवाटेने पुढे सरकत जाताना ‘आपण ठरवलेल्या जागी जाणाऱ्या रस्त्याने जात नसू’ असे वाटून देखील पर्याय नसल्याने पुढे जात राहून एखादा पठारी प्रदेश आला की आढावा घेऊ असे ठरवून महाराजांचा जथ्था हळूहळू पुढे सरकत असावा. असे करता करता महाराजांचा जथ्था पांढरे पाणी या पठारी प्रदेशात पोहोचला असावा. तोवर आणखी वेळ टळून सकाळचे 9 ते 10 वाजले असावेत. वाटाडे चूक का बरोबर हा विचार बाजूला ठेऊन आता इथून पुढे कसे जायचे? यावर वरिष्ठ सैन्य पदाधिकारी व महाराजांच्यात मसलत होत असावी. तोवर किती सैनिक बरोबर आले? किती वेगवेगळ्या कारणांनी पोहोचू शकले नाहीत? याची तपासणी करायचे काम महाराजांच्या सरदारांनी करून कमीत कमी 25 ते 30 जणांना इथे पर्यंत येता आलेले नाही असे ठरले. ते वाट चुकून किंवा चुकवून मधून निघून गेले असावेत किंवा जखमी होऊन पुढे यायच्या अवस्थेत नसावेत असे मानले गेले. काही तरीही कसेबसे बरोबर आले तरी त्यांना विश्रांती व मलमपट्टीची गरज असावी म्हणून जमेल तसे सैन्याच्या बरोबर राहा म्हणून महाराजांनी दिलासा दिला असेल. जर तोतया शिवाजी सापडला गेला असेल तर सिद्दीचे घोडदळ कधीही आपल्याला शोधत येऊ शकते याची धास्ती शिवाजी महाराजांना असावी. या भागातून थोडे पुढे गेले की कासारी नदीचे उगमाचे पात्र लागते त्यात लपायची सोय होऊ शकते. असे माहिती काढता समजले असावे. म्हणून तिथेच थांबावे आणि मुकाबला करावा किंवा दोन भाग करून एकाने लपून राहायचे व महाराजांनी या खिंडीच्या पात्रात न उरता उताराच्या अन्य वाटेने गजापुरच्या जायला निघायचे. असे दोन पर्याय महाराजांना असावेत असे मिलिट्री कमांडर मानतात. कासारी नदीच्या उगमापाशी आल्यावर, समोरच्या दूरदृष्यात सखोल भागातील कासारी नदीचे वळणदार पात्र, गजापुरच्या खेड्याचा भाग त्यापलिकडे विशाळगडाचा डोंगरमाथा वगैरे पाहता वाटाड्यांची उपयुक्तता संपल्यात जमा झाली असावी. बाजी प्रभूंच्या नेतृत्वाखालची पथके भातशेतीच्या खाचरातून चालायला, कामाला तरबेज व जास्त काटक म्हणून संखेने जास्त असावीत. त्यांच्या बरोबरच्या अन्य सरदारांना बाजी प्रभूंची वरिष्ठता (सिनियॉरिटी) व अनुभव मान्य असल्याने बाजीप्रभूंना खिंडात लपून हल्ला करायच्या मोहिमेवर निवडणे महाराजांना सोपे गेले असावे. उरलेल्यांनी महाराजांच्या बरोबरच्या खास पलटनीशी संपर्कात राहून पुढची वाट धरावी असे ठरवले गेले असावे असे मिलिटरी कमांडरांना वाटते. आपापल्या पथकांना शस्त्रे व अन्य बरोबरच्या सामानाची वाटणी करून ते लगेच डोलीकरांना बरोबर घेऊन निघाले असावेत. (सध्याच्या काळात याला ‘रोड क्लियरन्स पार्टी’ म्हणतात. पुढे जाऊन मागावून येणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती वा सैन्याला वाटेत दगाफटका न होण्यासाठी वाटा सुरक्षित करणे हे त्यांचे काम असते.) महाराज बाजींच्या बरोबर थांबून जर खिंडीत आपल्या सैनिकांना शत्रूच्या सैन्याने वरून व खालून दाबून धरले तर खिंडीतून बाहेर पडा व मोकळ्या जागेच्या ठिकाणी आपापली शस्त्रे, विशेषतः दांडपट्ट्याचे पथक उभे करून शेवटचा प्रहार करत रहा. आम्ही विशाळगडावरील परिस्थिती पाहून प्रवेश केला की ताबडतोब तोफांच्या आवाजाची खूण करून सुखरूप असल्याची बातमी देतो. पावसाचे मान पाहून धूर करता आला तर ते पाहतो. आपण शेवटपर्यंत खिंडीतून शक्यतो बाहेर पडून नका. जोवर शेवटचा शिपाई आहे तोवर सिद्दीच्या सेनेला सिवाचे सैन्य कासारीनदीच्या पात्राच्या खिंडीतच लपले असेल याची खात्री वाटत राहील. सिद्दीला मी (सिवा) पण इथेच असू शकतो याची खात्री वाटून तो विशाळगडाच्या वाटेला जायचे टाळेल. असे विचार करून महाराज बाजींचा निरोप घेऊन निघाले असतील. बाजींच्या बरोबर पुन्हा भेट होईलच असे नाही असे वाटून भावपूर्ण गळाभेट होणे स्वाभाविक वाटते. ... महाराजांनी जाण्यापूर्वी जखमी सैनिकांची विचारपूस करून म्हटले असावे की पांढरे पाणी पासून पुढील वाटेत बसा... जर पाठलाग करणाऱ्या सैन्याने त्यांना पकडून विचारले तर, ‘हो आम्ही शिवाजी महाराजांबरोबरच होतो पण जखमी झाल्याने त्यांनी आम्हाला इथेच सोडून दिले. आमची योजना कासारी नदीच्या पात्रात लपायची होती असे महाराजांनी आम्हास सांगितले होते’. असे सांगायला सांगितले असावे. काही परत जाणाऱ्या वाटाड्यांना मुद्दाम तिथे थांबायला लावून, ‘चला आम्ही तुम्हाला त्या कासारी नदीचे उगम पात्र दाखवतो’ म्हणून पाठलाग करणाऱ्या सैन्याला बरोब्बर त्या दरीत उतरवायला भाग पाडले असावे. त्यासाठी वेगळे जादा कामाचे पैसे त्यांना चुकते केले गेले असावेत. घोड्यांच्या दलाच्या धावण्यातून दुरून उधळलेला मातीच्या रंगाची धूसर धूळ, टापांचे कानात बसलेले आवाज यातून पाठलागावरील सैन्य आसपास आले असावे असे वाटून विविध शस्त्रे व इतर सामानाची वाटणी करून बाजींबरोबरच्या सैन्याला दोर शिड्या, पाण्यात पडले तर पकडायला गळ, गोफणींच्या दगडांच्या पिशव्या व बाणांचे गठ्ठे दांडपट्ट्यांच्या जोड्या वगैरे शस्त्र संभार बाजींच्या सैन्याला जास्त दिले गेले असावे. गडाचे दरवाजे फोडायची वेळ आली तर म्हणून पहारी, घण, जादा तलवारी, यांनी भरलेल्या बुट्टीडोल्या घेऊन महाराज सटकले असावेत. या दरम्यान बाजींच्या एका पथकाने नदीच्या पात्रात उतरायला पाठवलेल्या सैनिकांनी एक धबधबा लागतो तो पार केला तर खूप लांबवर घळ आहे त्यात लपता येईल असे काही वाटाड्यानी सांगितले तसे ते खरोखर आहे अशी खात्री करून सर्वांनी दोर शिड्यांच्या मदतीने धबधब्याची वाट उतरायला सुरवात केली असावी.सिद्दी मसूदच्या हालचाली
त्याने बरोबर आणलेल्या वाटाड्यांच्या सोबत काही मराठ्यांची पथके बरोबर होती. पहाट झाल्यावर वाटेवरच्या वस्त्यातील लोकांशी ते गावच्या भाषेत संपर्क करून ते मजल दर मजल करत पुढे येत असावेत. अशा लोकांना पैसे देऊन ऩंतर त्याच वाटेवरू येणाऱ्या सैन्याला आम्ही गजापूरच्या बाजूला गेल्याची बातमी व वाट सांगा म्हणून तयार केले गेले असावे. सिद्दीचा जावई मसूद विशाळगडावर सिवा पोचलाच तर तिथे त्याला पकडायला हवा म्हणून त्यांच्या पथकामागाऊन येणारे बरेच मोठे घोडदळाचे व पायदळाचे सैन्य एकत्र जाण्यासाठी वाट पहावी असे ठरवून असावा. पुढे सरकताना त्याच्या सरदारांना वाटेत जखमी पडलेले मावळे सापडले असावेत. त्यांची दमलेली व जखमी हालत पाहून ते जे सांगतायत त्यावर विसंबून राहावे असे वाटले असावे. त्या शिवाय त्यांनी सिवाला इथवर घेऊन आलेले वाटाडे पकडल्यावर त्यांच्या तोंडून देखील जर सांगतायत की शिवा कासारी नदीच्या पात्रात लपला आहे तर आणखी पुढे न जाता याच नदीच्या पात्रात उतरून शिवाजीला पकडून किंवा मारून नेता येईल असा आपापसात विचार करून घोडदळातील सैन्याला खाली पात्रात उतरवले असेल. मागावून निघालेली पायदळाची आणखी कुमक 2 ते 3 तासाच्या नंतर तिथे पोहोचली असेल तोवर दुपारचे 12 वाजून गेले असावेत. लढाईची वेळ आली आहे. आता आपली उपयुक्तता संपली आहे. जर आपण त्यात सापडलो तर जीवंत राहायची खात्री नाही असा असा रागरंग पाहून उरलेल्या वाटाड्यांनी, संधी साधून जंगलाच्या झाडीतून पसार व्हायला सुरवात केली असावी.वाटाड्यांची संगत लेखमाला भाग 4 समाप्त.
... प्रत्यक्ष लढ्याचे आयोजन कसे केले असावे? ते यापुढे...
याद्या
5543
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
मस्त
धन्यवाद
In reply to मस्त by अभिदेश
आपले माहितीपूर्ण
उत्कृष्ट माहिती!
उत्कृष्ट धागा. एकेका
फारच छान लिहीत आहात.
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वाचनीय
महाराज बाजींच्या बरोबर थांबून
विषय रोचक पण
आज सविस्तर प्रतिसाद देतो.
दुर्गविहारी,
In reply to आज सविस्तर प्रतिसाद देतो. by दुर्गविहारी
हे आपण कोणत्या पुस्तकात वाचले
In reply to दुर्गविहारी, by गामा पैलवान
आठवत नाही.
In reply to हे आपण कोणत्या पुस्तकात वाचले by दुर्गविहारी
ऐतिहासिक पुरावे
In reply to आठवत नाही. by गामा पैलवान
विषयांतर होऊ नये
जे आजही प्रत्यक्ष करता येईल...