✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

असेहि एकदा व्हावे

ख — खिलजि, Mon, 04/09/2018 - 16:58
नष्ट केलेल्या डोंगराचेही स्मारक व्हावे तत्कालीन पक्षाचे नाव त्यावर असावे उदघाटन सोहळ्याची गाथा लिहावे डोंगर दर्या खोरे फक्त पुस्तकातच उरावे असेही एकदा व्हावे नदीजोड प्रकल्पात मस्त हात धुवून घ्यावे नवीन काहीतरी समोर आणून जुन्यावाणीच हादडावे स्वतःच्या कर्तृत्वाचेच फक्त ढोल बडवावे लोकांना परत नव्याने चुना लावावे असेही एकदा व्हावे रस्ते पुन्हा नव्याने उखडावे त्याच जोमाने परत बांधावे काळ्या कंत्राटदारांना दुसऱ्या नगरात वसवावे त्या नगरातही जोमाने हादडावे होतच होते आधीही ,, असेही पुन्हा एकदा व्हावे कधी हात व्हावे , कधी कमळ व्हावे कुठे शिवधनुष्य तर कुठे आप व्हावे एकूण काय कसेही बघा खाणाऱ्याचे नेहेमी बाप व्हावे सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
5279 वाचन

💬 प्रतिसाद (14)

जमलयं की.

अभिजीत अवलिया
Mon, 04/09/2018 - 17:00 नवीन
जमलयं की.
  • Log in or register to post comments

:D:D:D:

खिलजि
Mon, 04/09/2018 - 17:02 नवीन
धन्यवाद मित्रा
  • Log in or register to post comments

अगे आयोव, ऍट अ टाइम , एवढे

पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 17:03 नवीन
अगे आयोव, ऍट अ टाइम , एवढे पक्षी एका फटक्यात ?? :)
  • Log in or register to post comments

अगे आयोव

खिलजि
Mon, 04/09/2018 - 17:05 नवीन
अगे आयोव, म्हनजे काय प ग भौ
  • Log in or register to post comments

अग आई ग ! Mama Mia

पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 17:31 नवीन
अग आई ग ! Mama Mia
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

ओके

खिलजि
Mon, 04/09/2018 - 17:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

अशा कविता जरा जपुनच ! ;-)

दुर्गविहारी
Tue, 04/10/2018 - 18:23 नवीन
अशा कविता जरा जपुनच ! ;-)
  • Log in or register to post comments

हॉट कविता !!

सस्नेह
Tue, 04/10/2018 - 19:29 नवीन
हॉट कविता !!
  • Log in or register to post comments

कसेही करून खा हीच संस्कृती

एस
Tue, 04/10/2018 - 20:08 नवीन
कसेही करून खा हीच संस्कृती झाली आहे प्रत्येकाची. बाकी कोण कुठल्या पक्षात आहे ह्याने आता तर काहीच फरक पडत नाही. इकडचा वाल्या तिकडं गेला की वाल्मिकी होतोय. चांगलंय. बाकी कविता आवडली. खून माणुसकीचा असो वा पर्यावरणाचा; तोही सेलिब्रेट करावा, झालं.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार ....

खिलजि
Wed, 04/11/2018 - 18:40 नवीन
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार .... अजूनहि डोंगर फोडले जात आहेत ... डोळ्यादेखत खारफुटीच्या नाश केला जात आहे .... हे सर्व थांबू शकते जर सरकारने मनात आणले तर .... पण नाही .. आता काय तर मिठागरांवर डोळा आहे ... गिधाडं आहेत सारे .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

तुम्ही निवडणूक लढून व जिंकून,

पगला गजोधर
Wed, 04/11/2018 - 19:26 नवीन
तुम्ही निवडणूक लढून व जिंकून, यामधे बदल घडवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

हा प्रतिसाद जपून ठेउन बर्याच

टवाळ कार्टा
Wed, 04/11/2018 - 20:48 नवीन
हा प्रतिसाद जपून ठेउन बर्याच ठिकाणी चोप्य चोप्य-पस्ते केला जाईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

जबराट !

मदनबाण
Wed, 04/11/2018 - 20:53 नवीन
जबराट !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार
  • Log in or register to post comments

प ग भाऊ ....

खिलजि
गुरुवार, 04/12/2018 - 13:40 नवीन
प ग भाऊ .. अहो निवडणूक लढवायला काय त्यात ? लढवू कि ... पण पक्षाचं नाव मात्र तुम्ही ठरवा.. हि एक नम्र विनंती ... मला कि नाही हि कविता टाकल्यावर एक प्रश्न पडलाय ... तो हा कि आपण ( अर्थात सरकार ?) ... असा एखादा उपग्रह पाठवू शकतो का .. कि ज्यात क्लोरोफिल डिटेक्टर असेल .. नाही म्हणजे होईल काय कि खरंच किती हिरवीगार झाड अस्तित्वात आहेत आणि त्याअनुषंगाने प्रदूषणाची पातळी किंवा त्याची गुणवत्ता याचे निकष तरी निदान समोर येतील ... इथे वृक्षारोपणाचे भरगोस कार्यक्रम होतात पण त्यामधील किती झाडे जगतात हा वादाचा प्रश्न आहे ... अजून एक मागे फक्त एकदाच पेपरमध्ये बातमी वाचली होती .. कि खारफुटीच्या जंगलात आफ्रिकन ग्रासचा भयानक विळखा ... ह्या अश्या बातम्या फक्त एकदाच वाचायला मिळतात .. परत नाही ... हे असं चाललंय सगळं .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा