Skip to main content

बाकी ते रुसणेच खरे....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/03/2009 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे ते लाजणे गालात आठविता गं रात्र सरे शब्द ओलावणे ओठात स्मरण्यां दिवस ना पुरे तु नसशी कवेत आता बघ अशांत मन झुरे बांध वेदनांचा तुटेना शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे मन विसरु पाही तुला मज सुन्न एकांत सावरे पुन्हा डोकावणे स्वप्नात जखमांचे ते भान ना उरे अन थांबलेले डोळ्यात आसवांचे वाहते झरे लटके ओशाळणे तुझे बाकी ते रुसणेच खरे विशाल कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 1354
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे... अस काही तरी आठवले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

यूं रूठो ना हसीना, मेरी जान पे बन जायेगी! क्रान्ति