Skip to main content

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 24/03/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही. त्यांना फक्त चमको नेतागिरी करायची आहे. आज शेतकरी समस्या म्हणजे, एमएसपी (गहू, धान, डाळी, ऊसाची इत्यादी). वीज माफी, कर्ज माफी. यासाठी धरणे, आंदोलने इत्यादी. कुठल्या हि वस्तूचा भाव 'मांग आणि पूर्ती' चा निर्दयी सिद्धांत ठरवितो. या कठोर सिद्धांताच्या विपरीत जाण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार नावाचा दैत्य जन्म घेतो. आपल्या शेतात काय लावायचे हे आज शेतकरी ठरवू शकत नाही. जगात अधिकांश देशांत किमान ३० टक्के शेतमाल प्रसंस्करीत होतो पण आपल्या देशात ७ टक्के हि नाही. शेतकरी शेतातील तैयार माल हि रस्ते,रेल्वे व वीज नसल्याने शीघ्र दूरवर पाठवू शकत नाही. दुसरे काही लावले तर योग्य भाव मिळणार नाही. मजबूरीने शेतकरी अत्यंत कमी पाऊस येणाऱ्या भागात हि जमिनीतून खोलवरून पाणी काढून ऊस, धान आणि गहू इत्यादी लावतो. परिणाम भरलेल्या गोदामांमध्ये गहू, तांदूळ सडतो आणि साखर कारखान्यांना सरकारी अनुदान मिळतात, कर्ज माफी मिळते. मोठे घोटाळे होतात. परिणाम महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट कोट्याधीश झाले व नेता हि झाले. स्वयंभू शेतकरी नेता हि आमदार आणि खासदार झाले. शेती असो व उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे. तीव्र्गतीने शेतमाल असो किंवा औद्योगिक माल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचला पाहिजे. आज एका ठिकाणी शेतकरी टमाटर, गोबी इत्यादी रस्त्यावर फेकतो किंवा शेतातच नांगर फिरवितो तर दुसरीकडे दिल्ली मुंबईत ग्राहकला तीच वस्तू ५० रुपये किलोच्या कमी भेटत नाही. कारण १००० किमी जायला ट्रकला किमान २-३ दिवस लागतात. रेल्वे वर एवढा ओझे आहे कि मालगाड्या दिवसातून १५० किमी हि चालत नाही. दुसरी कडे अमेरिकेत केलिफोर्नियाहून भाज्यांची गाडी न्युयॉर्क पर्यंत जाते. आपले दुर्भाग्य या स्वतंत्रता प्राप्त झाल्यावर अधिकांश सरकारांनी या बाबतीत जास्त लक्ष दिले नाही. भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी सरकारला सर्वप्रथम पायाभूत सुविधांच्या महत्वााची जाणीव झाली. सर्वप्रथम ग्रामीण रस्ते बनविण्याचे कार्य प्रधानमंत्री ग्रामीण योजनेच्या अखत्यारीत आणलें. आज लाखो किमी ग्रामीण रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे. देशातील रस्त्यांना जोडण्यासाठी सुवर्ण चतुर्भूज योजनेत कार्य सुरु केले. रस्त्यांचे रुंदी कारण हि सुरु झाले. मालगाड्यांसाठी स्पेशल कारीडोर परीयोजानेवर कार्य सुरु झाले. सरकार बदलली आणि १० वर्ष रस्ते आणि रेल्वेचे विकास कार्य जवळपास थांबले. कदाचित त्या सरकारच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. २०१४ नंतर पुन्हा सरकार बदलली. त्यावेळी ४००च्या वर रस्त्यांचे थांबलेले कार्य पुन्हा सुरु झाले. अनेक राज्य सरकारांच्या अधीन रस्ते अर्थात स्टेट हाईवे NH अंतर्गत आणले. रस्ते रुंद करण्याची गती वाढली. पूर्व -पश्चिम, उत्तर-पश्चिम रेल कारीडोर जोमात कार्य सुरु झालेले आहे. किमान २ कारीडोर पुढील २ वर्षांत पूर्णपणे सुरु होतील. हीच सरकार राहिली तर २०२४ पर्यंत चारी कारीडोर पूर्ण होतील हि आशा करता येईल. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हि पूर्ण होईल व मध्य महाराष्ट्रात रेल्वे हि पोहचेल. अर्थात हे सर्व झाले तर मालगाडी २४ तासांत १००० किमी व ट्रक हि ७०० ते ८०० किमी गतीने धाऊ शकतील. गावांत वीज पोहचली पाहिजे आणि २४ तास मिळाली पाहिजे. या बाबतीत हि उदासीनता होती. आता सर्व गांवात वीज पोह्चोविण्याचें कार्य शीघ्र गतीने होते आहे. विजेच्या बाबतीत भारताची रेंक जगात ७२ वरून २६ वर आली. अर्थात सरकार या बाबतीत निश्चितच गंभीर आहे. २४ तांस ग्रामीण भागात वीज मिळाली पाहिजे या कडे सरकारने अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची अजून आवश्यकता आहे. वीज असेल तर ग्रामीण भागात शीतगृहे उभारता येतील. त्या शिवाय खाद्य प्रसंस्करण उद्योग विशेषकरून छोटे व शेतकर्याने स्थापित केलेले उभे राहू शकत नाही. शेतकर्यांचे वीजेचे माफ करण्या एवजी स्वस्तात सोलर सयंत्र ग्रामीण भागात पुरविले पाहिजे. जेणेकरून शेतकरी वीजेच्या बाबतीत परावलंबी राहणार नाही. या पायाभूत सुविधांचा शेतकर्यांना फायदा कसा होणार.हा प्रश्न येणारच. शेतकरी आपला शेतमाल कमी खर्चांत जास्त दूर पाठवू शकतो. रस्ता वीज असेल तर ग्रामीण भागात हि खाद्य प्रसंस्करण उद्योग लागतील. शेतकरी आधी भाव ठरवेल आणि मग शेतात बियाणे पेरेल. एमएसपीची गरज भासणार नाही. आज रस्त्यांची आणी वीजेची समस्या काही अंशी दूर झाल्याने देशात खरोखर फूडपार्क निर्मित होऊ लागले आहेत. तेजपूर आसाम सारख्या जागी हि एक फूडपार्क सुरु झाला आहे. विदर्भात हि नागपूर येथे देशातील सर्वात मोठा फूडपार्क बहुतेक याच वर्षी सुरु होईल. अनेक देशी-विदेशी मोठ्या कंपन्या व अनेक छोट्या कंपन्या, शेतकरी समूह हि खाद्य प्रसंस्करण उद्योगात उतरत आहे. फ्रेट कारीडोर पूर्ण झाल्यावर या उद्योगाला अधिक गती मिळेल. या शिवाय मोठ्या शहरांच्या ५०० किमी परीधीत राहणारा शेतकरी हि शेतातच भाजी-पाला धुऊन चिरून शहरी ग्राहकांना पाठवू लागतील. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होईल. आपले दुर्भाग्य स्वत:ला शेतकर्यांचे हितैषी समजणारे, राजू शेट्टी सारखे शेतकरी नेता असो, मुंबईत शेतकरी मोर्चा काढणारे असो किंवा अण्णा हजारे यांच्या मुखातून पायाभूत सुविधांबाबत एक हि शब्द निघालेला मी ऐकला नाही. अर्थात यांना शेतकर्यांशी काही हि सरोकार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25367
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

का बुवा आयात करू नये? निर्यात करू द्यावी पाहिजे ती. आयात देखील करता यावी पाहिजे तेवढी.

In reply to by मार्मिक गोडसे

एखादा शेतीमाल महाग झाला तर तो न पिकविणारे अन्य शेतकरी व इतर गरीब उपभोक्ता यांच्या हिताची काळजी सरकारने घेणे अभिप्रेत असते. आपल्याकडे मुक्त बाजारपेठ अस्तित्वात नाही. प्रत्येक गोष्टीत manipulation असते.

मुळात लेखाचा रोख हा पायाभूत सुविधा उलब्ध करुन दिल्यास शेती व उद्योग दोघांनाही याचा फायदा होईल परंतु दुर्दैवाने याचे राजकारण होत आहे, हा आहे. त्यामुळे इथे सरकारी नोकरांचे पेंशन, महागाई भत्ता यांची सैनिक, शेतकरी व व्यापारी यांच्याशी करणे अप्रस्तुत आहे. प्रत्येकजण उदरनिर्वाहाचा मार्ग स्वतच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार स्वताच निवडत असतो. त्यातील फायद्यातोट्ाचा विचार करुनच. त्यामुळे कोणालाही एखादा पेशा स्विकारल्यामुले मिळणारे लाभ इतरांशी तुलना का करता. मुळात शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे हे वास्तव आहे. परंतु शेती हा अत्ावश्यक व्यावसाय असून त्याच्या विकासाकरीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देणे हे सरकारचे इतिकर्तव्यच ठरते. याबाबत दुमत नाही. परंतु शेतकऱ्यांनी देखील याबाबत व्यावसायिक दुष्टीकोन स्वीकारला पाहिजे. आधुनिक तंत्रजज्ञान न मार्केटींग याचा अभ्यास केला पाहिजे. सर्वच शेतकरी केविलवाणे व बापुडे नाहीत. बरेच शेतकरी हे यशस्वी व्यावसायिक आहेत. मुळात स्वातंत्र्योत्तर भारताला अन्नधान्याची गरज भागविणे आवश्यक होते परंतु हरीत क्रांतीनंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. त्यामुळे इतर देशांसारखा आता आपलादेखील शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यावसायिक झाला पाहिजे. आणि इथेच सरकारने अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारुन शेतीला एक व्यवसाय म्हणून भरभराटीस आणणे आवश्यक आहे.

In reply to by श्वेता२४

शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक झाल्यामुळेच तर ते आणखी तीव्र आवाज उठवत आहेत. कष्ट तर सर्वच क्षेत्रातील लोक करत असतात आणि कमीअधिक प्रमाणात मोबदला देखील तेवढाच मिळवत असतात. यात दुमत नाही. साधी शेतमजुरी करणारी महिला ५ तासाचे २०० रुपये मोजून घेते आणि ते पण आठवड्याच्या आठवड्याला. मग शेतकऱ्यांनी त्याने पिकवलेल्या माला चा रास्त मोबदला मागितला म्हणून काय झाले ? भले तो दयनीय शेतकरी असो किंवा यशस्वी शेतकरी.

In reply to by विशुमित

शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. मग शेतकरी कोणताही असो. इथे सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे. शेतीमाल हातात असणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या जागेवरच कळले पाहिजे कि त्याच्या शेतमालाला कुठे मागणी आहे आणि त्याला सर्वोत्तम भाव कुठे मिळू शकतो. आणि त्याला त्याचाा शेतमाल त्या ठिकाण पाठवून योग्य भआव मिळवता आला पाहिजे. यासाठीच पायाभूत सुविधा हव्यात. मग त्यात पाणी, रस्ते, गोदामे, वीज अगदी इंटरनेट सेवादेखील आली.

In reply to by श्वेता२४

मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे.>> ==>> रोगा पेक्षा इलाज महाभयंकर वाटतो. शेतकऱ्यांचा मधल्या साखळी वरती सुद्धा जास्त आक्षेप नाही आहे. तेच खरे डिस्ट्रीबुट करतात शेत मालाला. त्यांची जोखीम सुद्धा मान्य केली पाहिजे. भारतीय शेतकऱ्याचे मूळ काम उत्पादन करणे आहे, मार्केटिंग आणि डिस्ट्रिबुटिंग नव्हे. त्याने ते औटसोअर्स करणेच त्यांच्यासाठी इष्ट आहे. डिस्ट्रिब्युशन चे काम शेतकऱ्याने हाती घेतले की तो शेती सोडून दलाली सुरु करतो.

In reply to by विशुमित

शेतकऱ्याला गव्हाचे १६ रुपये मिळाले तर ग्राहक त्याच गव्हाला ३५ रुपये मोजतो. हे १९ २० रुपये कमी करणे शक्य आहे का?

In reply to by पैसा

ट्रान्सपोर्ट, लोडींग अनलोडींग, ट्रान्सीट लॉस, पिलफेरेज, माथाडी-कामगारांचे पगार, धान्य साफ करणे-वाळवणे , तेथील प्रोसेस लॉस, एक्सटेर्नल मार्केट फोर्सेस, गाळ्यांचे डेप्रीसिएशन, इंटरेस्ट कॉस्ट आणि सर्वात शेवटी प्रॉफिट मार्जिन. एवढे सगळे फॅक्टर असल्यावर रु. ३५ प्रति किलो च्या आसपास जाणारच ना. === रु. १६ पाहिजे ना. गाडी करून या आमच्या शेतावर. एकदम वर्षभराचे धान्य भरून घेऊन जा. ऍग्रो ट्रिप पण होईल धान्य पण स्वतः दरात मिळेल.

In reply to by विशुमित

मागे नाखु सुद्धा बोलले ते हेच. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात जास्तीत जास्त थेट व्यवहार होणे गरजेचे आहे.

In reply to by पैसा

काय सांगता येते की तुम्ही इतक्या लांबून आमच्या वस्तीवर आल्यावर मी म्हंटले रु. ३५ ने घायचे असेल तर घ्या नाहीतर चहापाणी/जेवण करून तुम्ही निघू शकता. (हा फायदा आहे शेताच्या बांधावर व्यवहार करण्याने. मला वाटते इथे भावनिक वगैरे वागण्यात काही हशील नाही आहे.)

In reply to by पैसा

जर तुम्ही काही कारणास्तव नाही आलात किंवा तुम्हाला तुमच्या गावा नजीकच रु.१६ ने गहू मिळाला तर मला दुसरा तिसरा पर्याय उपलब्ध पाहिजे ना. भले त्यांनी नफेखोरी केली तरी माझी अपेक्षित किंमत मला मिळ्ण्याशी मतलब. आणि माझी होल्डिंग पावर जास्त असेल तर घरीच खाईल गहू सगळा. पुढच्या वर्षी त्या जागी दुसरे पीक घेईन. ==== एथिक्स टू वे असेल तर ठरल्या प्रमाणे मी रु.१६ नेच तुम्हाला गहू देणार. पण कोणी चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर मोनोपॉली केलीच पाहिजे. ते करण्यासाठी स्ट्रॅटेजिकली माझ्या एरियात असाल तर दवाब आणणे मला सोपे जाईल.

In reply to by विशुमित

दवाब आणणे वगैरे तुमच्यासाठी नव्हते, व्यापारी-अडते -इतर दलाल यांच्यासाठी होते. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

निव्वळ भावनिक कोनातुन बघणे योग्य नाही. मोबदला मागणे एक गोष्ट आहे. मिळणे आजच्या परिस्थितीत शक्य आहे का? मधले अडते दलाल यांना बाजूला कसे सारता येईल, त्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल हे पाहावे लागेल. पायाभूत सुविधा, जोडधंदे, शेती आधारित उद्योग यावर जास्त लक्ष दिले तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे फायदे होतील.

In reply to by पैसा

निव्वळ भावनिक कोनातुन बघणे योग्य नाही. मोबदला मागणे एक गोष्ट आहे. मिळणे आजच्या परिस्थितीत शक्य आहे का?>>> ==>> भावनिक वगैरे कोणी आता राहिले नाही आहे. साधा चावी बनवणारा दोन कानस मारण्यासाठी रु.१०० घेतो शेतकऱ्याला ते का शक्य नाही ? मधले अडते दलाल यांना बाजूला कसे सारता येईल, त्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल हे पाहावे लागेल.>> ==>> शेतकऱ्याला ही साखळी तोंडाने परवडणारे नाही आहे. सगळे अडत्यांच्या माथी मारणे हे सोलुशन नाही आहे. पायाभूत सुविधा, जोडधंदे, शेती आधारित उद्योग यावर जास्त लक्ष दिले तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे फायदे होतील.>> ==>> पायाभूत सुविधा- त्या पैकी एक शीत गृह. आजच्या घडीला याची मतेदारी फक्त गुजराथी मारवाड्यांची आणि काही प्रमाणात बड्या जमीनदारांच्या आहे . जोड धंदे- दगड व्यवसाय सर्वात भारी जोड धंदा होता पण आजच्या घडीला दुधाला भाव नाही आहे. कुकुटपालन मध्ये खूप जोखीम आहे. त्यासाठी खूप मोकळे पटांगण लागते. शेळीपालन, वराहपालन, शहामृग पालन आणि तत्सम पालन - चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला सदरात मोडते. शेती आधारित उद्योग- ३ वर्ष झाले माझे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अजून १० % पण यश नाही आले. (येईल बहुदा ३-४ वर्ष्यात.)

In reply to by श्वेता२४

प्रत्येकजण उदरनिर्वाहाचा मार्ग स्वतच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार स्वताच निवडत असतो. त्यातील फायद्यातोट्ाचा विचार करुनच.>>> ==>> ज्याला शेती आहे त्याच्यासाठी हा निर्णय घेणे थोडे अवघड आहे. ज्याला वावार हाय त्याला माझे म्हणणे लगेच समजेल.

एकिकडे शेतकऱ्यांनी त्याने पिकवलेल्या माला चा रास्त मोबदला मागितला म्हणून काय झाले ? भले तो दयनीय शेतकरी असो किंवा यशस्वी शेतकरी. असे म्हणता व दुसरीकडे मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे.>> ==>> रोगा पेक्षा इलाज महाभयंकर वाटतो. शेतकऱ्यांचा मधल्या साखळी वरती सुद्धा जास्त आक्षेप नाही आहे. तेच खरे डिस्ट्रीबुट करतात शेत मालाला. त्यांची जोखीम सुद्धा मान्य केली पाहिजे. भारतीय शेतकऱ्याचे मूळ काम उत्पादन करणे आहे, मार्केटिंग आणि डिस्ट्रिबुटिंग नव्हे. त्याने ते औटसोअर्स करणेच त्यांच्यासाठी इष्ट आहे. डिस्ट्रिब्युशन चे काम शेतकऱ्याने हाती घेतले की तो शेती सोडून दलाली सुरु करतो. असेही म्हणता. मुळात शेतकऱ्याचा फायदा हे मधले लोकच जास्त लाटतात त्यामुळे दुहेरी तोटा होतो. एक म्हणजे शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही व ग्राहकांनादेखील जास्त पैसे मोजायला लागतात. तुमही दोन्ही बाजूने बोलत आहात व दोन्ही विधाने विसंगत आहेत.

प्रतिसादाबाबत सर्वांना धन्यवाद. १. या वयात मराठी सुधारणे मला जमणार नाही. दिल्लीत हि तरुण पोर मुझे शब्दाच्या जागी मेरेकू शब्द , वाट लगादी इत्यादी शब्द सहज वापरतात. २. पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर शेतकर्याला निर्णय घ्यायला अधिक विकल्प राहतील. ३. सरकारला वोट बँक ची चिंता असते. शहरी ग्राहक आणि मिडियाला महागाई फक्त खाण्या पिण्याच्या वस्तू आणि पेट्रोल डीजेल मध्ये दिसते. ६५ पैसे सिनेमाचे तिकीट ४० वर्षांत ६०० रुपयांचे झाले. कुणी आवाज केला का? तूर्त सरकार खाद्य पदार्थांच्या किमती कमी ठेवण्यासाठी काहीही करू शकते. ४. सरकार msp कर्जमाफी वीज माफी यातच शेतकर्यांना झुलवत ठेवते. हेच करत अनेक पुढारी आमदार खासदार होतात. ५. शेतकर्याला स्वत:ची उन्नत स्वत:च करायची आहे आणि विषम परीस्थित हि मार्ग शोधायचा आहे. एवढेच. बाकी PMOत १८ वर्ष होतो आता नाही.