Skip to main content

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 08/04/2018 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने 133864
प्रतिक्रिया 336

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हो , हे एक राहिलेच
मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह्या निमित्ताने त्याला इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

"ह्या निमित्ताने tyaalaa इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे. का बरे जाणून बुजून एकवचन? तुच्छता आणि तिरकसपणा आस्तिकानाच नव्हे तर कोणाही ज्न्यानी व्यक्तीस शोभादायक नाही. असो. व्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच.

In reply to by राही

परस्परसन्मानाचे संकेत पाळावेत हे पटतं खरं. पण यनांस त्यांच्या अर्हतेपेक्षा अनेक पटींनी उत्तम संबोधले जाते. यना हे व्यक्तिगत उल्लेख करून अतिशय सभ्य भाषा वापरतात मात्र एका विशीष्ट वर्गाचा उल्लेख करतात ते अत्यंत हिन दर्जाची, हिणकस, असंसदीय, चूकीची आणि त्वेषात्मक भाषा वापरतात. या वर्गाचं नीच मूल्ये असल्याचं पूर्वीचं कोणतेही रेप्यूटेशन नाही. ================================= धिस रेसिप्रोकेशन इज जस्टीफाइड अनलेस प्रिवियस टेक्स्ट इज मॉडरेटेड.

In reply to by प्रसाद गोडबोले

आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही.
हे जे स्फुट रुपांतर आहे ते (म्हणजे याचं मूळ ल्लेखन) नास्तिकाचं एक क्लासी वर्णन आहे. ते कसे आपल्याकडे थोरपणा घेत असतात. स्वस्तुतीमधे कशी त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते याची मार्कस यांनी मस्त मज्जा घेतली आहे. क्लास अपार्ट.

In reply to by अंतरा आनंद

प्रतिसाद आवडला यनावाला यांच्या विषयी आदर आहेच. पण आक्षेपही आहे तो असा की ते एका मर्यादेपर्यंतच क्रिटीकल इन्व्हेस्टीगेशन करतात त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो. मग ते गृहीतकांवर विसंबुन मांडणी करतात. उदा. राष्ट्रवाद त्यांनी पुर्णपणे विदाउट इन्व्हेस्टीगेशन स्वीकारलेला दिसतो असे प्रथमदर्शनी तरी वाटते. दुसर त्यांची टेक्नीक एथोज पॅथोज लोगोज हा क्रम आदर्श आहे अधिक प्रभावी आहे ते सरळ लोगोज पासुन सुरुवात कर तात ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत. इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही. सांगायचे असे की तुम्ही अगोदर एथोज ने कनेक्ट व्हा हे गरजेचे आहे. ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत कोणीतरी फार दुरवरुन येतो इतर कुठेच इमोशनली कनेक्ट नाही काहीतरी बॉम्ब ( इमोशनल सांस्कृतिक म्हणा ) टाकुन जातो त्याने हेट्रेड विरोधभाव विनाकारण निर्माण होतो, गोंगाट इतका वाढतो की जे कोणी रीसेप्टीव ओपन असतील नविन वेगळ्या विचारासाठी ते ही डिस्टर्ब होतात मला इतकच म्हणायच आहे की त्यांनी स्ट्रॅटेजी बदलावी अधिक ह्युमन अधिक मोकळी अधिक भावपुर्ण करावी अंगिकारावी असे मला आपले सुरुवातीपासुन वाटते अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित

In reply to by मारवा

यनावालांनी आपण सर्वज्ञ आहोत असा दावा कधी केला आहे? त्यांच्या चिकित्सेला मर्यादा असणारच. किंबहुना त्यांची आस्तिकता-नास्तिकता संदर्भातील मांडणी त्यांच्या या विषयावर केलेल्या चिकित्सेचाच परिपाक असावी. त्यांनी इतर कुथल्यातरी बाबतीत घेतलेल्या भुमिकेतील(जसे राष्ट्रवाद) कच्चे दुवे त्यांच्या आस्तिकता-नास्तिकता या विषयवरील मतांना कसे निष्प्रभ करतात? दुसरे एक, या धाग्यावर अवांतर ठरेल असे, राष्ट्र ही संकल्पना चिकित्सातीत असू नये याच्याशी सहमत आहे. मात्र, इतर अस्मिता टोकदार न होऊ देण्यासाठी स्थीर समाज उभा रहावा यासाठी राष्ट्राची चौकट अतिनिकडीची असते असे सध्या तरी दिसते. राष्ट्र ह्या संकल्पना थोडी विसविशीत झाली की आतापर्यंत तरी असे आढळले आहे की इतर अस्मिता टोकदार होतात, त्या अस्मितांचे रिलिजन्स बनतात. अरब मुस्लिम राष्ट्रांत धर्म असेल किंवा तमिळनाडूत भाषा असेल किंवा अमेरिकेत कॅपॅटलिझम असेल. एकसंधत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र नावाच्या फिक्शनवर विसंबून राहावे लागते. अर्थात राष्ट्रवादाचा रिलिजन होऊन मग त्याची देखिल कर्मकांडे होतात व बहुसंख्याकांना अंकित करण्यासाठी राष्ट्रवाद वापरला जातो असे म्हणता येईल. बराच गुंतागुंतीचा असा हा विषय आहे, मला नीट मांडता येत नाहीये खरं तर.

In reply to by मारवा

त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो.
+१ ==========================
ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत. इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही.
आय थिंक धिस इज ओके. असं असलं तरी व्यक्तिगत जीवनात त्यांना एक सामान्य व्यक्ती म्हणून कल्पणं सोपं आहे. ====================
ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत
नि
अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित
असं काही नाही. ते आपल्यासारखेच नि सज्जन असावेत असं कल्पणं अजिबात अवघड नाही. -------------------- पाश्चात्य माध्यमांत स्व चं जे नास्तिकी चिंतन असतं ते कधी कधी अंगावर काटा आणतं. यना अजिबात असलं काही करत नाहीत. त्यांचेवर नको ते आरोप नको. ====================================== कोण्या ही आस्तिकाने ईश्वररहित विश्वाची संकल्पना समजून सांगायला पाहिजे. हे यना अजिबात करत नाहीत. नसलेला कायदा पाळायचा गचाळ आग्रह करत लेख पाडत बसतात.

In reply to by अंतरा आनंद

अंतरा आनंद आपल्या प्रतिसादाने माझ्या धाग्याचं सार्थक झालं. धन्स.....! आणि प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन करतो...! -दिलीप बिरुटे

In reply to by अंतरा आनंद

मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आता बोला.काय अवस्था येऊन ठेपलीय नास्तिकतेवर! दुसरा कोणी मिळाला नाही का? आपल्या मिपावरच यनांना हजारदा चित करतील इतके उत्कृष्ट नास्तिक आहेत. यनांना काहीतरी वैचारिक लेवल आहे का? मी त्यांना मागच्या ६-७ धाग्यांवर कितीतरी प्रश्न केलेत, त्या उत्तरांतील छछोरता पाहून चार्वाकाबद्दल कीव येतेय. ================================== तसे राजीव साने पण कंसेप्च्यूअली गंडलेलेच आहेत, पण त्यांचं पॉप्यूलर अपिल थोडं जास्त आहे. ते बरेच अस्पेक्ट कवर करतात, पण अजून तरी फ्रेमवर्क बद्दल बोलताना आढळले नाहीत. ============================================= बाय द वे यना, वयाने ज्येष्ठ आहात म्हणून पुरस्कार देणे- मिळणे हे धार्मिक वर्तन झालं. अशाच तर प्रकारे घाणेरड्या धार्मिक परंपरा रुजतात.

In reply to by अंतरा आनंद

खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला,
नास्तिकांचा पण आपापला धर्म असतो का? लोक धार्मिक नि नास्तिक एकत्र असतात का? काय चाललंय काय? सॉलिड कंफ्यूज करतात राव हे लोक!

In reply to by अंतरा आनंद

"निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद देण्याची गरज, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण, म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे."
वाह! फार आवडले.. यनावालांचे अभिनंदन.
राजीव साने यांनी "धार्मिक बाबतीत मूल्यचिकित्सा आणि त्यातून इहवादाकडे वळवण्यासाठी नास्तिकांनी प्रयत्न करण्याची गरज" अधोरेखीत केली होती त्याबाबतही, अश्या तर्‍हेने कोणाची मतं बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या पद्धतीत बसत नसल्याचंही सहस्त्रबुद्धे या अजून एका संस्थापक सदस्यांनी आभारप्रदर्शनात सांगीतलं.
सहस्रबुद्धेंचेसुद्धा अभिनंदन..

In reply to by अंतरा आनंद

इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात.
हे एक तद्दन निर्बुद्ध विधान आहे. कोणत्याही सामाजिक मंचावर केलेल्या विधानांवर लोकांनी प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे द्यायची असतात. माझं तितकं ज्ञान नाही अशा सफाया देण्याऐवजी असले विषयच छेडायचे नाहीत. राळ उडवणे म्हणजे भलते सलते अर्थ काढून प्रपागंडा करणे. यनांच्या एकाही वाक्याचा कोणी भलता अर्थ काढलेला नाही. उलट यनांनी त्यांच्या अज्ञानातून, संस्कारांमुळे, जे काय ते, सश्रद्ध लोकांबद्दल जी अवार्च्य विशेषणे वापरली आणि त्यावर मिपाकर नास्तिक जसे मूग गिळून गप्प आहेत ती नास्तिकी चळवळ कोण्या उपटसुंभाच्या हाती पडत आहे याची नांदी आहे. समजा अस्तिक, सश्रद्ध लोकांनी त्यांच्या बौद्धिक, ज्ञानिक, वैचारिक, इ इ मर्यादांमुळे स्वीकारलेली विचारसरणी चूक जरी असली तरी त्यांना संबोधण्याची एक संसदीय पद्धत असते. अशा बेजबाबदार लोकांना पुरस्कार देणे, वर विनम्र म्हणणे वर त्यांना प्रश्न विचारणारांना राळ ऊडवणारे म्हणजे अति आहे.

नमस्कार मंडळी, साहित्य समाजाचा आरसा असतो असं आम्ही एक पारंपरिक वाक्य नेहमी वापरतो. त्यात जरासा बदल करुन म्हणतो की मिपा समाजाचा आरसा आहे, समाजात जे जे दिसतं त्याचं चित्रण इथे उमटतं. नास्तिक चळवळीच्या निमित्ताने समाजमनाचं प्रातेनिधिक प्रतिसाद इथे बघायला मिळाले. रुढीप्रिय सामान्य लोकांचा रोष, आक्रोश, चीड, त्रागा आणि भाषेवरील गेलेलं भान इथे अनेक प्रतिसादांतून दिसलं. देवाळू का देव खतरेमे पडल्याप्रमाणे त्याच्यासाठीचे अनेक युक्तीवाद इथे चर्चील्या गेले. अनेक विचार नसलेल्या देवाळुंच्या झुंडी इथेही दिसून आल्या. विज्ञानाला अनेक शोध लागले नाहीत पासून देवाचा शोध लागल्याच्या आनंदातले प्रतिसादही मजा देऊन गेले. अनेकांनी चळवळींचं स्वागत केलं, काही अपेक्षा चळवळींकडून व्यक्त केल्या. नास्तिकत्व म्हणजे काय याबद्दलही अगदी शेवटी काही प्रतिसाद दिसले. नास्तिक परिषदेतील सहभागी झालेले अंतरा आनंद यांचा एक उत्तम प्रतिसाद आणि प्रा.य.न.वालावलकर यांना २०१८ चा चार्वाक पुरस्कार मिळाल्याची बातमी मला धाग्याचा आनंद देऊन गेला बाकी, प्रतिसादचर्चेच्या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह करावा वाटला. काही प्रतिसादात चक्रधर स्वामींच्या महानुभाव संप्रदायाबद्दल काही टीपा दिसून आल्या. या पंथाने खरंच काहीएक बदल करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरी आहे की पारंपरिक उपासना आणि अवडंबरच्या निमित्ताने एक वेगळा पंथ म्हणून महानुभाव संप्रदायाचा विचार केला तरी अनेक गोष्टी त्यांनी त्यात मानल्या ज्यात पंचकृष्ण आणि सुत्रपाठ हा एक भाग आहेच. देवताभक्तीबरोबरच त्यांच्या प्रित्यर्थ होणारे तीर्थक्षेत्र, व्रतदान, रुढ मार्ग चक्रधरांनी निषिद्ध ठरविले, इतकेच काय व्यक्तीची निष्ठा अनेक ठिकाणी विभागणारे अनेक प्रकारचे धर्म, ग्रामधर्म, जातीधर्म, कुलधर्म चातुवर्ण, हे सर्व चक्रधरांनी अमान्य केले. विषमता निर्माण करणारा धर्म त्यांना मान्य नव्हता, हे स्पष्ट दिसते. देवाळू संप्रदाय त्यांनी पूर्ण नाकारला नाही. आणि लोकांनाही त्यातला अवैदिकता, वर्णाश्रम विरोध, मुर्तीपुजेला प्रतिबंध, दैवतांचा अधिक्षेप, जातीभेदाला अमान्यता, या गोष्टी तत्कालीन समाजमनाला मान्य न होणाया होत्या त्यामुळे तो काळ पाहता पंथ अप्रिय झाला असे म्हणावे लागते. इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, पारंपरिक देव धर्म आणि संस्कृती नाकारुन नव्या पंथाचे अनेक प्रयत्न झाले. मुर्तीपूजा नाकारुन पाद्य पुजा करणारा दत्त संप्रदाय आपणास दिसतो. परंतु त्याला कारण त्यावेळची सत्ता होती असे दिसते. यादवांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर अडीचशे वर्ष हिंदु धर्माला फ़ार मोठी शिथीलता आली होती. देवळांची मोडतोड, तीर्थक्षेत्रांचा विंध्वस, जत्रा, उत्सव यांना प्रतिबंध अशामुळे लोक गोंधळुन गेलेले होते. मुस्लीम राजवटीचे सर्व काही चांगले वाटू लागले होते. चढाव, दाढी वगैरे ठेवणे, मुस्लीम पेहराव करणे, अगदी मराठी स्त्रीयांनी गोशा पडद्याच्या चाली उचलल्या, आडनावं अनेकांनी बदलून घेतली मुस्लीम गुरु करु लागले, पिरांना नवस करु लागले, उरुसात हिंदू नाचू लागले. दत्तासारख्या हिंदु दैवताला मलंग वेषात कुत्री बरोबर घेऊन फिरावे लागले हे सर्व हिंदु धर्माला शिथीलता आल्यामुळे झालेले आपणास इतिहासात दिसते. आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया. आजूबजूची काही भयानता पाहता, नास्तिक चळवळ ही काळाची गरज असणार आहे, असं माझं व्यक्तीगत मत आहे. बाकी, माझ्याक्डून चर्चा इथे थांबवत आहे. आपणास चर्चेची दारं खुली आहेत. माझ्याकडून नाशिककरांच्या, पुणे, मुंबैच्या नास्तिक चळवळीला तहेदिलसे शुभेछा. चर्चेत सर्व सहभागी मिपाकरांचे विशेषतः विषयावर मुळ विषय समजून प्रतिसाद लिहिणार्‍या सर्व मिपाकरांचे, वाचकांचे, संपादकांचे, मालकांचे मनपूर्वक आभार मानतो. :) -दिलीप बिरुटे (आभारी) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया. गंमत आहे. कालच हे म्हणाले होते की फार पूर्वीच आस्तिकांचा दारूण पराभव झालेला असून नास्तिकांचा दणदणीत विजय झाला आहे. पण आज म्हणताहेत की "आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.". वैचारिक गोंधळ असाच असतो का?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी ते जे काय म्हणतात ते "ते म्हणतात म्हणून" सत्य असतं. हे लोक काहीही म्हणतात आणि ते सर्व सत्य आणि इष्ट मानायचं. ----------------------- मी वर जो एक धाग्याच्या मूळ विषयावर म्हणून प्रतिसाद दिला आहे तो यांना झेपलेला पण दिसत नाही. त्यावर यांना भाष्य देखील करावं वाटलं नाही यातच यांचा सगळा बुद्धीप्रामाण्यवाद दिसून येतो.

य.ना वालावलकरांची चार्वाक पुरस्कारासाठी निवड ही अत्यंत उचित आहे. कठोर नास्तिक म्हणून जालावरील मंडळींना त्यांचा परिचय आहेच. सगळ्यांची मते ही सारखी असणार नाहीच. मतभिन्नतेचा आदर आहेच. यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि. तो भाग अंशात्मक असतो. यनावालांच्या मताशी सहमत असणारे अनेक लोक आहेत त्यांचा आक्षेप मतांपेक्षा मते व्यक्त करण्याच्या पद्धती विषयी. आक्रमते विषयी आहे. अंनिस ची सुरवात ही मानवीय नास्तिक मंच अशा नावाने झाली होती. पण ती तशा पद्धतीने रुजेना म्हणून बदल केला व अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे नाव धारण केले. तसेच धोरणात ही बदल केले.

In reply to by प्रकाश घाटपांडे

कठोर नास्तिक म्हणून
नास्तिक कठोर (मंजे कट्टर) असतो तरी का? ---------------------- यनावालांना चार्वाक पुरस्कार देणे म्हणजे चार्वाकाला बदनान करणे आहे या कठोर मताचा मी झालो आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि.
सर्व मते कुणाचीच कुणाला पटत नसतात. पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.

In reply to by arunjoshi123

पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.
नास्तिकांनाही प्रतिष्ठा असू शकते म्हणता ?? __ ट्रोलअलर्ट

In reply to by पगला गजोधर

प्रतिष्ठा काही अस्तिक, वा अज्ञेय लोकांची मालमत्ता नाही. ========================= बा द वे, मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे.

In reply to by arunjoshi123

मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे. हैला, बोला तो क्या बोला, अजोभाय ! यक्दम बैलका डॉळाचा. =))

In reply to by arunjoshi123

पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.
पण त्यांनी ते मांडणे हे त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे.आपल्याला पटणे न पटणे हा आपल्या स्वातंत्र्यचा भाग आहे. आणि नास्तिकी विचारांमधे विभिन्न छटा असतातच की! त्या अस्तिकांमधेही असतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला आणायचं मधे? कोण म्हणतंय त्यांना विशिष्ट विचार मांडायचं स्वातंत्र्य नाही म्हणून? पण पुरस्कार, तो हि थेट चार्वाकाच्या नावाचा, द्यायला काही आगा पिछा बघावा कि नको?

In reply to by arunjoshi123

अहो चार्वाकाच्या नावाने दिला म्हणूनच तो उचित वाटतो.त्यांनी नास्तिकते च्या प्रसाराचे काम हिरीरीने केले नाहि का? तो काही विवेकचूडामणी पुरस्कार नाहीये.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माझा जो काही जालावरचा अनुभव आहे त्यामधे आपले सारे प्रतिसाद संतुलित आढळले आहेत. तुम्ही स्वतःस नास्तिक मानता का नाही माहीत नाही, पण मानत असताल तर तुम्हाला चार्वाक पुरस्कार द्यायला हरकत नाही. तुमचं ज्ञान खूप आहे. भाषा अतिशय नम्र आहे. तुमच्याशी होणारा संवाद अत्यंत अर्थपूर्ण असतो. तुमचं लॉजिक पण सॉलिड असतं. शक्यतो बायस नसतात. ---------------------------- यनांची नास्तिकता प्रामाणिक आहे म्हणून तुम्ही पुरस्कारचं समर्थन, इ करत असाल, पण प्रकाशजी ये सरासर गलत है। यना डजन्ट नो अ‍ॅनिथिंग अबाउट एथिझम.

बहसंख्यासाठी 'ईश्वर' हा सगळ्यात स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. काही लोकांना काही वेळा आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते. काहींना ती अजिबात लागत नाही. गरज वाटली तर वापरायची नाही गरज वाटली तर नाही वापरायची शिंपल आहे. मला त्याचा थेट विवेकी असण्याशी काही संबंध वाटत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते.
. हे ५०% विधान आहे, उरलेले आपली जागृत सदसदविवेक्बुद्धी दमन करून आंधळी ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते. जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...

In reply to by पगला गजोधर

जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...
अस्तिक लोकांनी केलेली? ======================== जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत. ========================= सबब नास्तिकतेचा पुळका आलेल्यांनी अगोदर नास्तिकतेचा इतिहास वाचावा.

In reply to by arunjoshi123

जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत.
जे तथाकथित आस्तिक लोकं एथनिक क्लीन्सिंगच्या नावाखाली हत्याकांड करतात, "त्यांना" तुम्ही सरळ "नास्तिक" म्हणून प्रॉडाक्ट लेबल चेंज करून खपवत आहात, तर धन्य आहे तुम्ही सर. बा द वे "एका हातात पवित्र पुस्तक व दुसऱ्या हातात तलवार" लोकांना तुम्ही धर्मावर निष्ठा असलेले आस्तिक मानतात का ? नै तुमचा व श्रीगुरुजींच्या फार विशेष लळा आहे त्या लोकांबद्दल...

In reply to by पगला गजोधर

ही सगळी पैदावळ नास्तिक आहे. आणि त्यांचा खुनशीपणा आणि नास्तिकपणा योगायोगाने नव्हते. त्यांच्या वर्तनाची प्रेरणाच नास्तिकता होती. http://listverse.com/2010/06/05/10-people-who-give-atheism-a-bad-name/

In reply to by arunjoshi123

जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत. अगदी बरोबर. पण एक अपवाद आहे. तो म्हणजे शांततेच्या धर्मातील आस्तिक.

चला , ह्या धाग्याच्या निमित्ताने परत एकदा प्रतिसाद संपादन सुरु झाल्याचे दिसले ! तर्री संपली , एक्स्ट्रा सेव फरसाण अन पाव खाऊन पोट ही भरले ! आता थंडगार ताक मागवुयात ! आस्तिकनास्तिकपाव संपुन मिसळपाव (काही काळापुरते का होईना पण) परत सुरु झाले असे मानायला हरकत नाही :) - मार्कस ऑरेलियस vi veri veniversum vivus vici

In reply to by प्रसाद गोडबोले

भुंकुन काम होत नसेल, तर चावा घ्यावा लागतो. गाय मारणार्याला अटकाव केला नाही तर, नंतरच वासरे मारली जातात. (मार्कस ऑरेलियस तुमच्यासाठी ही प्रतिक्रिया नाही, दुसऱ्या/ री साठी आहे)

बाकी कायपण म्हणा आपल्याला नास्तिकांच्या फलकांवरचं अक्षरवळण ( = फॉण्ट ) लै आवडलं. सनातन प्रभात सारखं वाटतंय! -गा.पै.

ब्राइट्स अथेइस्ट कोन्फरन्स मध्ये झालेल्या व्याख्यानांचा दुवा रोचक आहे https://www.facebook.com/Wethebrights/videos/889730854485089/ राजीव सानेंचा याच संदर्भातील लेखाचा दुवा https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=2061815880811358&id=1… इंटरेस्टींग आहे अवश्य बघा वाचा

In reply to by मारवा

तर्कशुद्ध वाटतं नसलं तरी लोकं धर्माला-प्रथेला का चिटकुन राहतात, नास्तिकं का होतं नाहीत, हे कळेल या लेखा वरुन.

बरंचसं ( कदाचित सगळंच) डोक्यावरून गेलं. पण प्रतिसाद वाचून करमणूक मात्र छान झाली.

चर्चा चांगली रंगली अाहे. दोन्ही बाजूंकडून जी हमरीतुमरी सुरू अाहे, ते पाहून एक विचार मनात अाला. मला असे वाटते, की श्रध्दावान असणे किंवा नसणे असा लेख हवा होता. श्रध्दा या शब्दाला एक सकारात्मक रंग अाहे, पण तूर्त मला अाधिक चांगला शब्द सुचत नाही, म्हणून ‘प्रश्नच न विचारण्या एवढा, शंकाच न येण्याएवढा अभंग विश्वास’ असा बिनरंगी अर्थाने मी श्रध्दा हा शब्द खाली वापरलाय. ज्या अास्तिकांवर कोरडे अोढले जात अाहेत, त्यांचे धर्माशी किंवा देवाशी किंवा परंपरांशी फक्त एकच नाते अाहे, ज्यामुळे त्यांना दुसर्या बाजूवर तुफानी हल्ला चढवलाय. पण गंमत म्हणजे नास्तिकांचेही या गोष्टी ‘नाहीतच’ या भावनेशी नेमके तेच नाते दिसते अाहे! हे नाते म्हणजे श्रध्दा! याच लेखात एके ठिकाणी अजो यांनी अशी प्रतिक्रिया दिली अाहे, की जगातले अनेक मानवसंहार नास्तिकांनी केले. खरेही अाहे ते, पण ते संहार खरे तर अनुयायांच्या नेत्यांनी सांगितलेल्या कल्पनांवर असलेल्या श्रध्देमुळे अनुयायांनी केले. उदा. नाझी किंवा माअोवादी साम्यवादी अनुयायांची त्यांच्या तत्वांवर जी श्रध्दा होती, ती तंतोतंत प्रचंड हत्याकांडे, छळ इ. करणार्या धार्मिक मूलतत्ववाद्यांसारखीच होती. फक्त श्रध्देचा विषय वेगळा होता. नाझी किंवा माअोवादी यांचे अाचरण धार्मिक नसले तरी ते प्रचंड पोथीनिष्ठ, अापल्या नेत्यांवर, त्यांच्या उपदेशांवर एखाद्या निस्सिम ईश्वरोपासकाएवढीच श्रध्दा ठेवणारे होते अन् एकदा हा श्रध्देचा (इथे मात्र खरोखरच वेगळा शब्द हवा होता) विषाणू अात शिरला, की तो काहीही करवू शकतो. त्या अर्थाने नाझी, साम्यवाद, नास्तिकता हेही धर्मच अाहेत. मला स्वत:ला प्रश्न पडतो, की माणूस हा इतका क्षुल्लक शारिरिक, मानसिक, बौध्दिक क्षमता व मर्यादित अायुष्य असलेला प्राणी अाहे अाणि जग हे इतकं अाफाट गुंतागुंतीचं, अनेक चलांनी (व्हेरिएबल्स) चालणारं अाहे, की कोणीही संत, नेते, धर्मग्रंथ झाले तरी त्यांना हा सगळा व्यवहार ‘अाकळणे’ शक्य नाही. असे असताना कसे काय कुणाला वाटू शकते की माझा धर्म, विचारधारा, संस्कार, परंपरा, संस्कृती ही श्रध्दा ठेवण्याइतकी परिपूर्ण असेल? त्यातली तत्वे त्रिकालाबाधित सत्य असू शकतील? त्यामुळे इथे तावातावाने वाद घालणार्या दोन बाजू दिसत असल्या तरी मला ते अगदी एकसारखे वाटतायत - श्रध्दावान!

In reply to by शाम भागवत

अभंग विश्वास, म्हणजे जो सहसा भंग पावत नाही, त्या विश्वासाच्या विपरीत नविन माहिती मिळाली तरी, असा अर्थ मला अभिप्रेत होता. निष्ठा हा शब्द जर तोच अर्थ दर्शवत असेल, तर चालू शकेल. पण तो मला जरासा कृती करायला लागणारी उर्जा पुरवणारा शब्द वाटतो अाणि विश्वास हा बराचसा मनाची किंवा अाकलनाची स्थिती दाखवणारा शब्द वाटतो. शब्द एक असोत, पण तुंम्हाला मी काय म्हणतोय ते समजले असावे.

In reply to by स्वधर्म

आल लक्षात. निष्ठा शब्द नाही चालणार. दॄढ विश्वास चालेल.

In reply to by स्वधर्म

नात्सी हे क्रिस्टिअन धर्माला सर्वश्रेष्ठ मानणारे आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते. कम्यूनिस्ट हे धर्म मानीत नाहीत हे नात्सींकडून घडलेल्या कम्यूनिस्टांच्या हत्येचे एक कारण होते. नात्सींचा ज्यूद्वेष कुप्रसिद्ध आहे. आर्यरक्ताचा त्यांना टोकाचा दुरभिमान होता. या विचारधारेला नास्तिक कसे मानता येईल? धर्माच्या नावावर नरसंहार करणाऱ्यांमध्ये नात्सींचे नाव ठळकपणे उठून दिसते

In reply to by राही

या प्रतिसादात जे एकूण अज्ञान आहे ते कोणत्याही निष्पक्ष इतिहासकारास कायमचे कोमात घालील. ====================================== १. नाझींनी अगोदर कमुनिस्ट नसलेल्या पश्चिम आशियातल्या ख्रिश्चन देशांवर हल्ला केला, त्यांना जिंकले तेव्हा त्यांना खुरापत करायला रशिया उरला होता. (युके बेट असल्यामुळे, स्विटझर्लँड उंच असल्यामुळे, इ ते वाचले पण हल्ल्यांनी भंड आणलाच होता.). १.१ मुळात तुम्ही हे विसरताय की नास्तिक होते म्हणून (हो ते अगदी अस्संच आहे.) हिटलर, मुसोलिनी, आणि स्टॅलिन यांचा लिखित सहकार्याचा करार होता. जपानचा राजा स्वतःच देव आहे म्हणे हा एक वेगळा भाग आहे. पण हे सगळे तथाकथित आभाळातला देव नाकारणारे होते. १.२ दुसर्‍या महायुद्धात देव न मानणार्‍या दानवांचा पराभव झालेला आहे. १.३ जे धार्मिक विरोधक असतात त्यांना तो नावडता धर्म "आपल्या घरी" नको असतो. वा धर्मांतर करायचं असतं. ख्रिश्चन तर ऑब्सेस्ड असतात यासाठी. हिटलरचं तसं नव्हतं. त्याला ज्यूंना तिकडे अरबास्तानात पाठवायचं नव्हतं. ख्रिश्चन तर करायचंच नव्हतं. फक्त मारून टाकायचं होतं. १.४ ================================= २. हिटलर ख्रिश्चन धर्माचा पक्का द्वेष्टा होता. पण नास्तिकांची चलती असल्यामुळं असं म्हणता येत नाही. काय म्हणता येतं ते पहा. https://en.wikipedia.org/wiki/Religious_views_of_Adolf_Hitler
the wide consensus of historians consider him to have been irreligious, anti-Christian, anti-clerical and scientistic.[1]
भाषांतर अधिकांश इतिहासकारांच्या मते हिटलर हा अधार्मिक, ख्रिश्चन धर्माचा विरोधक, पुजार्‍यांचा विरोधक, आणि ज्यू-द्वेष्टा होता ------------- लक्षात घ्या इथे ख्रिश्चन विरोधक असा शब्द वापरला आहे. ======================================== हिटलर नास्तिक नव्हता आणि असला तरी नास्तिकता त्याच्या हिंसेमागची प्रेरणा नव्हती हे सिद्ध करायला धडपडणारी पुस्तके हौशी नास्तिकांनी टनांनी पाडली आहेत आणि त्यांना कुत्रे भीक घालत नाही. ============================================ सोशल डार्विनीझम आणि युजेनिक्स बद्दल कधी वाचा. धर्म (म्हणजे पाद्री लोक) जगातल्या अनेक वंशांच्या प्राणांची करुणा भाकत तेव्हा नास्तिक लोक ती न जुमानता ते वंश नष्ट करत. या डार्विनवाद्यांचा एवढा पगडा होता कि हार्वड आणि स्टँफर्ड या त्यांनी काढलेल्या विद्यापीठांत मुलाखती न घेता कवट्यांची मोजमापे घेऊन प्रवेश देत. अनेक युजेनिक्सवादी हिटलरच्या अत्यंत जवळचे होते नि त्यांचे मते अनेक निकृष्ट स्पसिस जगातनं नष्ट व्हायला हव्या होत्या. हिटलर, इ स्वतःचे मते आणि तत्कालीन जर्मन आणि अनेक युरोपीयन शास्त्रज्ञांचे मते अजिबात क्रूर इ नव्हते. पोल्ट्रीतल्या कोंबड्या मारणारी माणसं बाईट असतात का?

In reply to by राही

आणि पराकोटीचे वंशश्रेष्ठत्ववादी होते.
आणि याला आस्तिकांशी नि धर्माशी जोडणे पराकोटीचे डोके फिरवणारे आहे. ---------------------------------- युरोपात वंश (रेस) हा शब्द १८०० (कि १७००) पूर्वी नव्हता. असला तरी माणसांचे सोडून बाकीचे प्रकार सांगायला वापरला जात असे. त्यानंतर डार्विन साहेबांनी सजीवांचे वर्गीकरण केले तेव्हा हा शब्द वापरला. सर्वायवल ऑफ फिटेस्ट चे बरेच अर्थ काढले गेले. त्यात एक "अधिकृत" अर्थ होता कि युरोपीय लोक सर्वात सुस्थितीत आहेत तर ते सर्वात श्रेष्ठ असावेत. यात दोन समस्या निर्माण झाल्या: १. नेहमी प्रत्येक युरोपीय विद्वान भारतीय साहित्यास कोट करत असे इतकी भारतीय ज्ञानाची जगन्मान्यता होती. २. भारत अगदी अलिकडेपर्यंत प्रचंड श्रीमंत देश होता. भारतीयांना जातींचा गंड देणे आवश्यक होते म्हणून आणि य दोन गोष्टींवर उपाय म्हणून आर्यन इव्हेजन थेरी काढण्यात आली. आणि काही सवर्ण भारतीयांना ओके करण्यात आले. -------------------- लवकरच वंश हा कंसेप्ट फोफावला. चर्चने भूमिका घेतली कि हि "आपल्यासारखीच माणसे" आहेत तेव्हा येन केन प्रकारे त्यांना ख्रिश्चन बन्वू. पण शास्त्रज्ञांना/नास्तिकांना या रेसेसची म्मनुष्य म्हणून कदर नव्हती. सजीव म्हणून होती. =============================== कृपया अज्ञानातून उपजलेला, नास्तिकांचे पाप झाकणारा, धर्मविरोधी अपप्रचार थांबवा.

In reply to by arunjoshi123

आपले डोके फिरत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. डार्विनला मध्ये आणण्याचे कारण नव्हते. सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट ची संकल्पना काळाच्या ओघात टिकून राहून काही बदलांसह टिकून राहिली आहे. विकीच्या अनेक लिंका आहेत. आपण म्हटल्याप्रमाणे टनावारी साहित्य लिहिले गेले आहे. विकीवर सोयीस्कर लिंका बाजूने आणि विरुद्ध अशा अनेक असतात. आर्यन इनवेजन थिअरी जरी मागे पडली असली (अजूनही इनवेजन ऐवजी माय्ग्रेशन शब्द वापरून भाषाशास्त्रज्नांमध्ये त्यावर वादविवाद चालतात.) तरी ती भारतीयांना जातिगंड देण्यासाठी खोडसाळपणे निर्माण केली गेली हे म्हणणे बरोबर नाही.या माय्ग्रेशनला पुरातत्वाचा आधार अजूनपर्यंत मिळालेला नसला तरी लिंग्विस्टिकचा आधार आहे. त्यावरूनच मुख्यत: ती मांडली गेली. धार्मिक मूलतत्ववादी आपल्या धर्माच्या लोकांनासुद्धा मारत सुटतात हे नेहमीचे आहे. किंबहुना आपल्याच धर्मामधला विचारभेदही त्यांना सहन होत नाही. आम्ही सांगू तोच देव आणि तोच धर्म अशी त्यांची भूमिका असते. असो. ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर आपल्याशी चर्चा कधीच थांबवली आहे. आपले ललित लेखन वारंवार वाचावयास मिळावे ही शुभेच्छा.

In reply to by राही

अापल्या चर्चेत अास्तिकता ही देव अाणि धर्माच्या बाबतीत अाली अाहे. त्या अर्थाने नाझींनी जे क्रूरकर्म केले ते देवाच्या किंवा धर्मावरील श्रध्देपायी केले असे मानता येणार नाही. काही नाझी धार्मिक असतीलही कदाचित, पण बायबल किंवा येशूची अाज्ञा म्हणून त्यांनी संहार केला नाही. त्यांचा ज्यू द्वेष हा वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्देतून अाला होता अाणि तीच त्यांची हत्याकांडामागची प्रेरणा होती. इतक्याच मर्यादित अर्थाने ते नास्तिक होते असे म्हणायचे होते. बाकी त्यांची वंशश्रेष्ठत्वावरील श्रध्दा ही एखाद्या धार्मिक मूलतत्ववाद्यासारखीच होती. असो, माझा मूळ मुद्दा अास्तिक-नास्तिक ऐवजी श्रध्दा असलेले व नसलेले याबाबत अाहे. या दृष्टीकोनातून बघितले तर खूप रंजक वर्तणूक पहायला मिळते.

शिळ्या कढीला ऊत आणणारी चर्चा. त्यापेक्षा हेमंत राजोपाध्यांचे लोकरंग मधील सदर वाचा. वेळेची बचत आणि ज्ञानात भर.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

++११ सदर सदर उत्कृष्ट आहे केवळ.. खुपदा थांबून, विचार करून जरा अदमास घेऊन पुन्हा वाचावे लागते. जबरदस्त लिहितात राजोपाध्ये.


नास्तिक कोणाला म्हणायचे आणि नास्तिक पना म्हणजे काय ह्या विषयी. च नास्तिक लोकांत गोंधळाचे वातावरण आहे. नास्तिक जाणून बुजून स्वतःला बुध्दी pramanyavadi, विज्ञान निष्ट असली विशेषण लावून घेतात. नास्तिक पना आणि वरील दोन्ही गोष्टी ह्याचा तरी मला कुठेच संबंध दिसला नाही. चोकस वृत्ती आणि अण्यात गोष्टी विषयी कुतूहल हाच विज्ञानाचा पाया आहे. त्या साठी नास्तिक असण्याची गरज नाही अस्तिक लोक सुद्धा चोकास आणि चिकिस्तक वृत्तीचे असतात. आता पर्यंत जे शोध लागले आहेत त्या मध्ये काही अपवाद सोडले तर आस्तिक लोक च जास्त आहेत. देव किंवा ईश्वर न मानने म्हणजे नास्तिकता आहे का? धर्म न मानने म्हणजे नास्तिकता आहे का? असे असेल तर गोंधा भारता मधील उद्योग क्षेत्रातील यशस्वी सर्व उद्योगपती मध्ये जास्त भरणा अस्तीक लोकांचाच आहे देव मानल्या मुळे त्यांचे काहीच नुकसान झाले नाही . तशीच परिस्थिती सर्व क्षेत्रात आहे. मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात. एक ठराविक धर्म ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही त्याच धर्माचा छुप्या पद्धतीने समर्थन करण्याचा एक छुपा अजेंडा नास्तिक लोकांचा आहे अशी खूप लोकांना rast shanka aahe

In reply to by Rajesh188

"मग हे नास्तिक लोक आस्तिक लोकांना देवाच्या भरवश्यावर राहणारे व प्रयत्न n करणारी लोक अशी व्याख्या आस्तिक लोकांची का करतात." जेव्हा जेवहा "अस्तिकाला" विचारले कि बाबारे हे असे का? किंवा जरा समजावून सांग...काही तर्क आहे का मागे .. तर बरेचदा यावर अगम्य उत्तरे मिळतात - हे असेच असते विश्वास ठेवा - अनेक पिढ्या असे चालत आहे म्हणून सत्य असलेच पाहिजे - तुम्ही असे का विचारता म्हणजे तुम्ही नास्तिक आणि धर्म विरोधी आहत असे धुडकावून दिले जाते या पेक्षा हि वाईट म्हणजे समोर असेलेली जिवंत माणसाचं प्रामाणिक प्रयत्नावर शंका घेतली जाते.. उदाहरण एखादी व्यक्ती नोकरी शोधात आहे प्रयत्न चालू आहेत आणि यश येत नाही तर त्याला जर कोणी " श्रद्धाळू" म्हणाला कि " असरे बघ तू अमुक अमुक नबाब ला गुरु मानले नाहीस / अमुक ठिकाणी प्रार्थना केली नाहीस " म्हणून असे मग तो बेकार असलेलं आधीच वैतागलेला माणूस चिडतो आणि विचार करतो आरे माझ्य प्रयत्नांना काही किंमत आहे कि नाही ? माझा तरी असा अनुभव आहे कि लहानपणी सर्वसाधारण मध्यमवर्गिय मराठी हिंदू कुटुंबात जे संस्कार, घरातील मर्यादित कर्मकांड यात वावरलो.. तरी जसे वय आणि अनुभव वाढत गेला तसे " इंग्रजीत ज्याला agnostik " म्हणतात त्याकडे तशी वृत्ती झाली.. आणि जरी अगदी करमाड नास्तिक नसलो तरी अस्तिकतेचा उबग आणि त्यातील फोल पण जाणवू लागला... पण त्याचा बरोबर एक राजकीय आणि सामाजिक अभयास म्हणून कि काय धर्म / सर्वधर्मसमभाव यातील रस वाढत गेला

-कर्मकांडात अडकू नये -समाजाला आणि स्वतःला आनंद देणाऱ्या आणि दुसऱ्याला त्रास ना होणाऱ्या प्रथा पाळाव्यात त्या करिताना निसर्गाचे नुकसान होणार नाही याची काळजी घावयी - जमेल तसे तर्क वापरून जगावे पण हे करताना बरेचदा चांगला आणि वाईट यात एक धूसर सीमारेषा असते / येते आणि ती कुठे आहे किंवा नाही हे ठरवणे कठीण होते उदाहरणार्थ - करोडो चा कारभार असणाऱ्या "बुवा" लोकांना/ इवजल्लिकल ख्रिस्ती चर्चेस ( मुख्य धारावही चर्च नाही तर "स्वतःचाच ब्रँड काढलेले चर्च नावाचे उद्योग) मी कडाडून विरोध करतो पण त्याच वेळेला एक मनात शंकेची पाल चुकचुकते ती म्हणजे असा या "बुवा बिझिनेस " मुळे लोक अंधश्रदेहपोटी का होईना जे पैसे गोळा करतात त्यातून काहीतरी समाजउपयोगी काम होत असेल कि ! - सार्वजनिक उत्सव सार्वजनिक ठिकाणी करूच नयेत असा नास्तिक पण जसा चुकीचा वाटतो तसेच या उत्सवमुळे कधी कधी त्रास होतोही आणि नासिर्गिक संपत्तीचे नुकसान आणि गैरउपयोग होतो ते हि चुकीचे हे हि पटते .. दुर्दैव ( याला नास्तिक शब्द सापडत नाहीये ) असं कि लोक टोकालाच जातात...

In reply to by चौकस२१२

चौकससेठ, तुम्ही योग्य मांडणी करत आहात. (काही मुद्दे पुसट आणि संधिग्ध असूनही )आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकाच वेळी चारही बाजूंनी विचारांची गर्दी + लिखाणाची घाई + देवनागरी टंकलेखांत "आपोपाप" शब्द घुसडले जातात ( मी ज्या ठिकाणाहून लिहून इथे चिकटवतो तिथे) आणि एकूण तपासायचा आळस आणि त्यातून होणारे असंख्य ध चे मा ! ( आता हे लिहिताना बघा आळस चाय ऐवजी "आलास " झाला होतं

म्हणजे असं कि मंदिर झाले काय कि नाही यात माझ्यसारख्याला काहीही फरक पडत नाही कारण मी तसा नास्तिक आहे असे म्हणूयात पण एक सामाजिक न्याय म्हणून हिंदूंच्या मनातील हे मंदिर झाले पाहिजे याला माझा पाठिंबा आहे मग मी आस्तिक कि नास्तिक?

नास्तिक जन अतिरेकी असतात, नास्तिक जन तर्काधारावर लोकांच्या आनंदावर विरजण आणतात, यात अडकून नास्तिकत्वाची चळवळ पाहू नये. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या तर्कावर देव असतो का नसतो यावर उत्तर शोधावं. नास्तिकांचा गट सुद्धा धर्म या कल्पनेच्या विरोधात असेलच असं नाही. अनेक नास्तिक सुद्धा धर्म ही संकल्पना आता value addition देत नाही, जर धर्माचे काहीही उपयोग कुठल्याही काळात होते, तर ते आता संपले आहेत असं बोलायला बरेचशे नास्तिकही बिचकतात. त्यांचा तर्क केवळ देवाचे अस्तित्व अमान्य करून का थांबतो काय माहीत !

देव ही संकल्पना जशी सिद्ध करता आली नाही तसेच देव नाही हे सुद्धा सिद्ध करता आलेलं नाही. पण देव नाकारला तरच विज्ञान पुढे जावू शकत म्हणून विज्ञान ती संकल्पना नाकारते गरज म्हणून तसे गृहीत धरणे गरजेचं आहे. जड स्वरूप आणि सुध्म स्वरूप ह्या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास केला तर परत एकच पातळीवर येतात मग ते सजीव असू नाही तर निर्जीव.

माझं आणि हिंदू धर्माचे , आस्तिक/ नास्तिकतेचं नातं १०५ आहे म्हणजे असे कि बाहेरून अन्याय होत असेल तर कौरव पांडव एकत्र १०५, परंतु अंतर्गत १०० वेगळे ५ वेगळे असे हिंदू समाजावर ( धर्म हा समाज असे मानून ) कारण नसताना जो अति दाव्यानी या समाजाला आणि देशाला त्रास दिला आणि देत आहेत त्याचाशी लढताना मी हिंदुत्ववादी होतो पण ते झाल्यावर जर इतर कडव्या भक्त हिंदुत्ववाद्यांच्या पंक्ती ला बसलो तर त्यांना माझे विचार डावे वाटतील इतकी मला त्यान्चाय धार्मिकते बद्दल आणि कर्मठते बद्दल चीड असते. काय बिघडतं नाही केली तर ? आज कोट्यवधी लोक जगात हे मानत नाहीत आणि त्यांच्याही जीवनात तशीच सुख आणि दुःख असतात कि.. पूजा घालून जर सगळे सुजलाम सुफलाम होत असते तर आज भारतात एवढे प्रश्न नसते? आस्तिक नास्तिकतेचं उदाहरण द्यायच झालं तर .. फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा का ठेवली असे म्हणणाऱ्याना मी वैचारिक रित्या ठोकून काढेन ( जरी मनात हे पटत असलं कि पूजा नाही केली तरी चालेल) आणि त्याच श्वासात मी पूजेचे समर्थन करणाऱ्यांना हे कडवे पणाने विचारेंन कि कशाला पाहिजे पूजा ? थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो

In reply to by चौकस२१२

थोडक्यात काय दोन्ही कडून मार मिळतो
याच कारण लोकांना द्वैतात अडकायला आवडत. जर तुम्ही आमच्या बाजूचे नसाल तर तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात हे बुद्धीमांद्य सर्रास पहायला मिळते.

प्राडॉ सरांचे अभिनंदन केले पाहीजे. धागा चर्चा दिडवर्षानंतरही चालू आहे यातच धाग्याच्या उद्दीष्टाचे यश सामावले आहे.