Skip to main content

तू घरात नसताना ...

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही जरा रेंगाळतच पडलो होतो बिछान्यावर बरेच लोळून झाले पण झोप काही आली नाही आख्खी चादर लपेटून घेतली अंगाला पण तुझ्या मिठीची सर काही आली नाही तूझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही - अडाणि.
Taxonomy upgrade extras

वाचने 2584
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वा सुंदर कविता :) ह्या कवितेमुळे संदिपची 'नसतेस घरी तु जेंव्हा' आठवुन गेली ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

असेच म्हणतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by परिकथेतील राजकुमार

नसतेस घरी...ची आठवण झाली. नभ फाटून वी़ पडावी, कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अडाणी कुठे गेलेय तुमची ती ? माहेरी का ? कविता छान आहे.

तुझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही! खूप छान कल्पना! क्रान्ति

परदेशी गेलीय... ओफीसच्या कामासाठी... प्रतिक्रीयेबद्दल सर्वांचे आभार. अफाट जगातील एक अडाणि.