तर दोस्तानु,
प्रत्येकाची रुची वेगवेगळी असते. छंद वेगवेगळे असतात. अस्मिता वेगवेगळ्या असतात. तसंच प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. सर्वसाधारणपणे मी स्वतःला एक सामान्य माणूस मानतो. आपल्यापैकी अनेक मिपाकर देखील असंच मानत असणार असं वाटतं. पण आपल्यापैकी प्रत्येकास प्रसिद्ध, मोठ्या लोकांवद्दल एक कुतुहल असतं. (साहेबांच्या केबिनमधे देखील कोणी बिनकामाचा एक तास जास्त बसला तर इर्ष्या वाटते.). म्हणजे इतकं कि थेट त्यांचेशी भिडायची, भेटायची, वैयक्तिक ओळख करून घ्यायची, इ इच्छा होते. अर्थात आपण ती दाबून टाकत असतो. बिस्मिल्ला खानांची शहनाई ऐकताना त्यांनी एकांतात वाराणसीच्या घाटावर खास आपल्यासाठी एक राग गायला असता तर मजा आली असती असा विचार येऊन जातो. सचिननं आपल्या बॉलवर चौका मारला तर .... अडानी आपल्याला त्याच्या चार्टड फ्लाइटमधे बसवून आला तर ... रामदेवने आपले हातपाय पकडून एक आसन शिकवलं तर... शारुखने आपल्याला एक कश* दिला तर... पण असं कधी होत नाही. तरीही सर्वच जण आपल्यासारखे अभागी नसतात. आणि आपणही स्वतःस समजतो तितके अभागी नसतो.
--------------------------------------------------------------------------------------------
या संदर्भात या धाग्यावर मिपाकरांचा एक सर्व्हे घ्यायचा माझा उद्देश आहे. प्रत्येकाला सिरियल नंबर, आपल्याला भेटलेल्या "प्रसिद्ध" माणसाचं नाव, ० ते १०० या रेंजमधे "भेटीच्या जवळीकतेचा" एक स्कोअर, आणि ब्रिफ डिटेल्स लिहायचेत. अधिक डिटेल्स लिहिणे इज एंकरेज्ड.
याबद्दलच्या सर्वसाधारण गाइडलाईन्स अशा:
१. मोठा माणूस, प्रसिद्ध माणूस हा तुमच्यामते वा काही विशीष्ट लोकांच्या मते वा जनतेच्या मते मोठा वा प्रसिद्ध असला पाहिजे. उदा. सुधीर चौधरी वा राजदीप सरदेसाई तुमच्या डोक्यात जात असला नि (दुर्दैवाने) तुम्हाला भेटला असला, तरी त्याच्या उल्लेख करायचा. नावडता म्हणून उल्लेख टाळायचा नाही.
२. खेळ, राजकारण, सिनेमा, व्यवसाय, उद्योग, वकीली, धर्म, कला, समाजसेवा, अर्थशास्त्र, साहित्य, सोशल मिडिया, गुंडगिरी, सिविलायझेशनची अनेक इतर क्षेत्रे, पुरस्कार विजेते, इ इ इ इ काहीही क्षेत्र चालेल.
३. प्रसिद्धी ही "तुमच्यामते" असली पाहिजे. मग नगरसेवकाचे देखील नाव तुम्ही लिहू शकता.
४. प्रसिद्धीचे ऐवजी तुम्हाला थोरपण आढळले आहे तर ते देखील गृहीत धरू शकता. उदा. आदिवासी क्षेत्रात ५०० शाळा उभारणाराचे नाव कोणालाच माहित नाही पण तुम्ही त्याला भेटला आहात, तर अवश्य उल्लेख करायचा. जगात, देशात, राज्यात, विभागात, जिल्ह्यात, तालुक्यात व्यक्ति 'सामान्य माणसाच्या जिभेवर ' असलाच पाहिजे असं नाही. कर्तृत्ववान नि प्रसिद्धीपरांमुख असला तरी चालेल. कदाचित या धाग्यावर अनेक नविन महान लोकांची माहीती होईल.
५. तो माणूस आत्ता जिवंत हवा असं नाही. पण अजून उत्क्रांत वा उत्पन्न व्हायचेयत ते लोक टाळावेत.
६. जुनी अतिमहान माणसे (म्हणजे टिळक, गांधी, टागोर, नेहरू, सावरकर, पटेल, बोस, इ स्तरावरचे) तुमच्या पालकांना, पॅरेंट-इन-लॉज ना भेटली असली तरी उल्लेख करायला हरकत नाही.
स्कोअरिंगः
७. प्रत्येक भेटीचा जवळीकतेचा स्कोअर टाकणे आवश्यक आहे. नाहीतर ती एंट्री गृहित धरली जाणार नाही. जितकी खास भेट तितका स्कोअर जास्त.
८. सर्वसाधारणपणे ५ ते १० म्हणजे तुम्ही सामान्य प्रेक्षक म्हणून मैफल ऐकली असणे, राजकीय भाषण ऐकले असणे. पण थेट तुमचा संबंध कमी. नंतर ऑटोग्राफ घेतला असेल, एखादे वाक्य बोलले असेल तर स्कोअर वाढव्वा.
९. तुमची एकमेकांची ओळख असेल, नाव माहित असेल, हून बोलावले असेल, चांगला परिचय असेल तर स्कोअर ७० पेक्षा जास्त असावा.
१०. अगदी घरी सहकुटूंब बोलावून खाऊ पिऊ घालून ठेवून घेऊन निवांत गप्पा अनेकवार झाल्या असतील तर ९५ ते १०० स्कोअर द्यावा.
११. कामाच्या निमित्ताने अनेक भेटी झाल्या असतील, गहन चर्चा असतील तर ८० च्या आसपास स्कोअर येईल असं वाटतं. मिटींग मधे तुम्ही एक कोपर्यातले भागीदार असाल तरी स्कोअर कमी.
१२. बस, ट्रेन, विमान यांच्यात शेजारी बसल्याने गप्पा, हँडशेक झाल्या तर २० ते ४० असा स्कोअर. नुसतं गल्लीतून जाताना नजरानजर झाली तर कमी.
१३. महान व्यक्तिमत्त्वाची भेट घेऊन विद्युतचुंबकीय क्षेत्रात आल्याप्रमाणे एकतर्फी भारावून जाऊन प्रचंड सद्द्गतित इ इ झाला असाल, पाया पडला असाल, मिठी मारली असेल तर स्कोअर तुमचं तुमी ठरवा.
१४. चप्पल, शाई इ इ फेकलं असलं तर ते ही तुमचं तुम्ही स्कोअर ठरवा.
१५. ५ च्या पटीत स्कोअर देणे टाळा. इतर ८० आकड्यांचे देखील महत्त्व आहे.
१६. काही नावे विसरली असाल तर नवा प्रतिसाद द्या.
१७. इथे प्रतिसाद देणे हि फुशारकी नव्हे वा उलट स्वतःची झाकली मूठ उघडणे नव्हे. शक्य तितका प्रांजळ प्रतिसाद द्या.
१८. ज्या व्यक्तिंचं नाव देणं अनुचित असेल वा कायदेशीर नसेल तिथे काहीतरी सूचक लिहा.
१९. काही काही गंमतशीर, वा महत्त्वाच्या वा भावनिक भेटीचे वृत्तांत लिहाल तर अजूनच रंगत येईल.
२०. जो कोणी ज्याला कोणाला भेटला, भेटली तेव्हा काय करायला पाहिजे होते यावर इतर वाचकांचा टोमणा असेल तर अवश्य लिहा.
२१. मोठ्या लोकांकडून सोशल मिडीयावर (टिवी, रेडिओ, फोन ऑर फ्रेंड, पत्र, इ इ इ) प्रतिसाद किती जास्त मिळतो याप्रमाणे ० ते ४० स्कोअर असेल. फक्त सोशल मिडीयावरचे रिलेशन असेल तर जास्तीत जास्त ४० स्कोअर, मग तो माणूस तुमचा नवरा/बायको का बनणार असेना भविष्यात.
२२. भीमसेन जोशी आणि शेजारसेन दोषी या दोघांच्या मैफिली पहिल्या रांगेत बसून १-२ तास ऐकल्या तर स्कोअर समानच. शेजारसेन तितके प्रसिद्ध नाहीत म्हणून कमी स्कोअर द्यायचा नाही. नावात सगळं आलं, नाव लिहिलं कि कळेल कि किती मोठी हस्ती आहे. स्कोअर हा फक्त जवळीकता मोजण्यासाठीच आहे, व्यक्तिचे मोठेपण मोजण्यासाठी नाही.
----------------------------------------------------
अजून काय शंका असतील तर सांगा. मी जितक्या अडचणी पटकन इमॅजिन करू शकतो तितक्या लिहिल्यात.
------------------------------------------------------
हा धागा खर्या माहितीचा असला तरी फुल टू टाईमपास असावा.
---------------------------------------------
वशिलेबाजी इ इ मागताना धाग्याचा संदर्भ देऊ नये.
-------------------------------------------------------------
साईड बिझनेस म्हणून लोकांनी मोठ्या लोकांच्या जवळच्या लोकांकडून ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगीतल्या तर अजून मजा येईल.
------------------------------------------------------------------------
जवळीकता हा भावनिक, वैयक्तिक विषय आहे. स्कोअर कसा द्यावा याचे नियम केवळ मार्गदर्शनपर आहेत. बाकी आप की मर्जी!!
===============================================
*त्या पवित्र संवैधानिक इशारों के साथ.
वर्गीकरण
वाचने
15872
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेलेब्रिटी मिपाकर
मी पण....त्यात तुसुद्धा आलास
In reply to सेलेब्रिटी मिपाकर by कपिलमुनी
सर्वे चे नियम वाचायला थोडा
सर्वेचे नियम बंधनकारक नाहीत.
सर्वात पहिला प्रतिसाद (म्हणजे
मस्त धागा,
त्यांच्या पायाला हात लावला
In reply to मस्त धागा, by उपेक्षित
मोठ्या लोकांचे पाय
In reply to त्यांच्या पायाला हात लावला by arunjoshi123
श्या!
एक सामान्य माणूस
नवा प्रयोग आवडला.
सर्व्हे पूर्ण झाल्यावर मला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबनत्याच्याकरता धागा बंद
In reply to सर्व्हे पूर्ण झाल्यावर मला by मदनबाण
नको... वाचतोय ना ! :)
In reply to त्याच्याकरता धागा बंद by arunjoshi123
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Super Masss (Sema Masss) :- | Rakshasudu |त्याला जोंग्याला पाठवायचे
In reply to नको... वाचतोय ना ! :) by मदनबाण
आता आरशात
हुरुप
इंदिरा गांधीचा कारचा
( मोठ्यांच्या छोट्या मजेदार
In reply to इंदिरा गांधीचा कारचा by कंजूस
मी एका
मत .
मल्लिका शेरावत - ४० (एक शून्य
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला
:))
In reply to कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला by सस्नेह
रवी शास्त्रीची पुतणी तन्या
In reply to कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला by सस्नेह
मी १२ वीत असताना लक्ष्मी रोड
अजो'ज एनालिटिका ?? ;-)
लेख वाचलास का टवाळ कार्ट्या?
छान
मँगु राजपालपेक्षा विनोदी
जवळून भेट आणि वन टू वन किमान
मिपा प्रशासन
मिपासंपादक किसी सेलीब्रीटी से
In reply to मिपा प्रशासन by कपिलमुनी
हाबिनंदन रे टक्या
In reply to मिपासंपादक किसी सेलीब्रीटी से by टवाळ कार्टा
किमान या धाग्यावर सर्वच नकोशे
In reply to हाबिनंदन रे टक्या by पैसा
धाग्याला प्रतिसाद दिल्यामुळे झालेली जवळीक चालेल ना?
चालेल, चालेल.
In reply to धाग्याला प्रतिसाद दिल्यामुळे झालेली जवळीक चालेल ना? by चामुंडराय
पाडगावकर
अरे काय काका, इतकंच लिहून
In reply to पाडगावकर by चित्रगुप्त
अजो, काय भन्नाट आयडिया आहे
सिने कलाकार :
विशुमितजी,
In reply to सिने कलाकार : by विशुमित
दवणिय भाषा प्रविण, छोटी सो
मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन
त्यांच्या आग्रही उपदेशावरूनच
In reply to मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन by सुबोध खरे
मंगेश पाडगावकरांना देखील मिपा
In reply to त्यांच्या आग्रही उपदेशावरूनच by arunjoshi123
:O. हि आणि वरील काही याद्या
In reply to मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन by सुबोध खरे
स्वाक्षरी घेण्याचा छंद असल्याने खुपच नामवंतांच्या
दुर्गविहारीजी, मानलं ब्वॉ
In reply to स्वाक्षरी घेण्याचा छंद असल्याने खुपच नामवंतांच्या by दुर्गविहारी
आरे वाह्ह्ह...!!
In reply to स्वाक्षरी घेण्याचा छंद असल्याने खुपच नामवंतांच्या by दुर्गविहारी
भारीच..
In reply to स्वाक्षरी घेण्याचा छंद असल्याने खुपच नामवंतांच्या by दुर्गविहारी
ग्रेट-भेट
त्यासाठी एक वेगळा धागा काढावा
In reply to ग्रेट-भेट by shashu
धाग्याला मस्त रंग चढला आहे.
प्रसिद्धी
कधीपासून झालीय हि लागण...
In reply to प्रसिद्धी by तिमा
मस्त धागा
मोठ्या लोकांबाबत मी काहीच
पण तुम्ही बोलतात तर तुमची
In reply to मोठ्या लोकांबाबत मी काहीच by विवेकपटाईत
मिस इंडिया-युनिव्हर्स, आणि