Skip to main content

मोदी सरकार केव्हा सुरु करणार प्रचार

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 11/03/2018 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीला एक वर्षे राहिलेय २०१३ ला जसा जोरात प्रचार केला होता ( निर्भया ,उत्तराखंड ) अजून कुठेच जोर नाहीये मित्र पक्ष दुरावलेत नोटबंदी gst उद्देश्य चांगला होता पण धंधे बंद पडलेत परिणाम अजून दिसले नाही मुख्य मंत्रांच्या विडिओ गाणे ,आपल्याच सरकारचा चिक्की घोटाळा अर्थ संकल्प पण काही जोर नाही पुण्यात काँग्रेस ने निवडणुकी साठी फ्लेक्स बाजी सुरु केली आहे कुठे नेऊन ठेवलाय चाणक्य माझा

वाचने 51791
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

2014 चा प्रचार मोड अजुन चालूच आहे. प्रचार थांबलाच नाहीये.

In reply to by कपिलमुनी

राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(

In reply to by पगला गजोधर

कवापास्नं आस लावून बसलायसा, मोदी आणिबाणी लावल, ज्यूं सारखे काँसेंट्रस्शन कँप उघडेल, विरोधकांना जेलात घालील, लोकशाही कँसल करील,

राजकीय धागा असला तरी मूळ धाग्यातून निर्भया चे नाव काढावे. तो राजकारण आणि प्रचाराचा भाग नसावा

In reply to by कपिलमुनी

mi tase pan nav kadhu shakat kahi sampadak mandal nirnay ghetil pan nirbhaya yanchya nava cha upyog prahcarat kela hota 'bahut hua naari par atyachaar, abki baar Modi sarkar' tasech tyaweli sarv vartaman patra balatkarachyach batmya det hote https://www.ndtv.com/india-news/pm-modi-meets-with-nirbhayas-family-abo… Don’t forget Nirbhaya. Dont forget unemployed youth. Dont forget farmers committing suicide. Dont forget how our soldiers were beheaded. — narendramodi_in (@narendramodi_in) April 30, 2014 https://www.jansatta.com/trending-news/pm-narendra-modis-old-tweet-on-n…

सध्याची परिस्थिती बघता तिसरी आघाडी हळूहळू स्थापन होण्याची ह्यांना शक्यता वाटते. परवापर्यंत 'कोण कुठले कम्युनिस्ट' अशी अवस्था होती. परवाच्या मोर्च्याने 'ते अजूनही आहेत' हे कळले. १९९६-९७ साली तिसरी मोट बांधण्यात (माकपचे)हरकिशन सिंग सुरजीत आघाडीवर होते.आता कदाचित तसेच व्ह्यायची शक्यता वाटते.

तीसरी मोट बांधण्याची अजून आशा धरताय? बहुतेक म न से आणि उद्धवसेना हे मिळून तिसरी मोट बांधतील आणि हरकिशन सुरजीत याना पंतप्रधान , मायावती याना राष्ट्रपती , मुलायम याना अर्थ मंत्री , आणि लालू हे परराष्ट्रमंत्री , झोपा काढणारे देवेगौडा हे संरक्षण मम्त्री होतील. नारायण राणे बहुतेक कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून भाषण करत नाकात बोलत असतील

In reply to by विजुभाऊ

नारायण राणे बहुतेक कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून भाषण करत नाकात बोलत असतील
अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात....

अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात.... हा हा हा.

In reply to by arunjoshi123

अजिबात नको, मोदींनी काय वाट्टेल ते करावं, निवडणुका जिंकाव्यात! विरोधकांनी जसं राजकारण करायचं ठरवलं आहे तसंच उत्तर देण्यात यावं! लोक आपापल्या पूर्वग्रहदूषित नजरेने पार्टी विथ डिफरन्सेस मधले डिफरन्सेस ठरवतात, त्यामुळे धुतला तांदूळ बनण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत.

In reply to by arunjoshi123

असं का बोलता जोशीसाहेब ?लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचं सरकार नेहमीच मिळतं. आत्ताही मिळालंय. पुढेही मिळेल . मला विचारलंत तर २०१९ सत्ता मोदी साहेबांकडेच राहणार.

In reply to by A.N.Bapat

एखाद्या पोरीला लै मस्त/बेक्कार नवरा मिळाला मंजे तिच्या लायकीचाच आणि लायकीमुळेच मिळाला आहे असं नसतं. तसा मिळावा अशी अपेक्षा मी व्यक्त करत आहे. ============================= प्रत्येक गोष्टीमागे क्षुद्र स्वार्थाची कारणमिमांसा करणारांस क्षुद्र स्वार्थ सर्वतोपरि असणारेच नेते मिळावेत.

In reply to by manguu@mail.com

मोगाखां साहेब भारतात लोकशाही आहे. इथे कोणीही कॅबिनेट मध्ये जाऊ शकते. हिंदू ना डीवचन्या पेक्षा स्वतः ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा

त्यामुळे धुतला तांदूळ बनण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत
योग्य बोललास रे बिट्या. पण 'आम्ही सोवळे आहोत' हे दाखवण्याचे प्रयत्न भाजपावाल्यानी अगदी पक्षस्थापनेपासून केले.संघाचे काही मोजके लोक सोडले तर भाजपा/ईतर पक्षिय पुढार्यांचे खाजगी आयुष्य सारखेच बरबटलेले आहे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माईसाहेब, तुमच्याशी चक्क सहमत. आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? थांबा पाहून येतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

संघाबद्दल चार चांगले शब्द बोलल्यामुळे आम्ही आपल्या हळदी कुंकू कार्यक्रमा वर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहोत अखिल मिपा पितचष्मा धारण,संघविद्वेषी केवळ स्वाहाकार हाच शिष्टाचार समितीचे जागोजागी असलेले सदस्य

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगो माई....
संघाचे काही मोजके लोक सोडले तर भाजपा/ईतर पक्षिय पुढार्यांचे खाजगी आयुष्य सारखेच बरबटलेले आहे असे ह्यांचे मत.
असे म्हणालीस तर मग मला सान्ग तुझ्या 'ह्यान्चा' त्या बर्बटलेपणाचा एखादा अनुभव सान्गता येइल का ?? बरेच अनुभवी वाटतात तुझे 'हे'.

In reply to by विनोद१८

माईंचे हे, संघाच्या मोजक्याच लोकांतील असतील तर ? किंवा भाजप -भाजपेतर राजकीय पक्षातील नसतील तर ? ह्याची शक्यता तुम्ही तपासली होती का विनोदीजि ?

मोदी सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि आहेत हि , पण सध्या परिस्तिथी बघता वाढती महागाई , पेट्रोल चे दर जे जनसामान्यांच्या घातले विषय आहेत तेच मादी सरकारच्या भविष्याची वाटचाल दाखवत आहेत माझ्या मते तरी २०१९ ला पुन्हा देशात तरी मोदी सरकारच येईल पण जेव्हडे २०१४ ला त्यांना जनसामान्यांचा सपोर्ट मिळाला होता त्यापेक्षा खूपच कमी म्हणजे काठावर पास होऊन जेमतेम सरकार बनवू शकतील असे दिसतेय महाराष्ट्रात तरी मला फडणवीसांचे सरकार नकोय , शिवसेना तर नकोच नको ..... काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण नको वाटते ... मनसे हा एकुलता एक चांगला पक्ष आहे जो काही तरी करून दाखवण्याची हिम्मत करतो आणि करतो सुद्धा पण लोकांना फक्त त्यांची भाषण आवडतात आणि मत देताना आपल्या ठरलेल्या पक्षानेच मत देतात त्यामुळे २०१९ ला महाराष्ट्रात पण पुन्हा नको असलेले अच्छे दिन येणार असेच दिसतेय

In reply to by जेसीना

प्रतिक्रिया वाचली ग जेसीने. राज ठाकरेण्च्या ब्ल्यु प्रिंटचे काय झाले?एकतर मनसेचे धोरण नक्की काय ते कोणालाच कळत नाही. काही महिन्यांआधी पवारांची मुलाखत घेऊन दोघांनी एकमेकांची पाठ खाजवली. त्याआधी(२०१४) त्यांनी मोदींचे कौतुक केले.. गुजरातबद्दल चार बरे शब्द बोलले. नंतर अचानक घुमजाव करून नरसिंह राव, राजीव गांधी ह्यांची स्तुती चालू केली. प्रतिस्पर्धी विरोधी पक्षांचे,त्याच्या नेत्यांची उघडपणे स्तुती करून पायाव्र धोंडा मारून घ्यायचा नसतो हा साधा नियम राज ठाकरे का विसरतात हे न उल्गडणारे कोडे .. असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असे ह्यांचे मत.
तुमच्या हांच्या या मताशी तीव्र सहमती!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमच्या ह्यांच्या पायाचा फोटो टाका ना. त्या वर डोकं ठेऊन जीवन कृतार्थ करून घेईन म्हणतो. आणि तुम्हाला खास धन्यवाद बरका. तुमच्या ह्यांची मत आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल.

ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.

ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे आपल्या राजकारणात सगळेच ठग. दिवसा तावातावाने एकमेकांविरुद्ध भांडतील व रात्री एकत्र प्यायला बसतील.

In reply to by manguu@mail.com

ओ मंगूश्री! सीताराम केसरीला संडासात कोंडून त्याच्याकडून धाकदपटशाने राजीनामा लिहवून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला हसायचं नाहीतर काय त्यांच्याभोवती पंचारत्या ओवाळायच्या? -आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

राजिनाम्यावर सही घेतल्या त्याला पार्श्वभागावर लाथ मारून ऑफिसबाहेर अकबर रोडवर थोबाड फुटेल (फुटलं) इतक्या जोरात फेकला होता. ============================ लोकशाही लोकशाही म्हणून दिवसरात्र बोंबा ठोकणार्‍या पुरोगामी मिपाकरांना मोदी नको आहे, आणि इतका लज्जास्पद हुकुमशाही प्रसंग ज्याने घडवून आणला तो राहूल हवा आहे.

In reply to by arunjoshi123

ठगबंधन व बांबूबंबन या दोन नवीन (माझ्यासाठी नवीन) शब्दांची भेट घडवून आणल्याबद्दल, दोनही शब्दकर्त्यांचें आभार.

In reply to by मार्मिक गोडसे

काय गोडसे (तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?), मोदींनी बांबूचे कायदे रिलॅक्स केले कारण मुख्यतः त्यांना त्यांच्या सरकारच्या अपयशाबद्दल तुमच्यासारख्या बांबूवनमाळ्यांकडून चौकात पुरता मार खायचा होता, बरोबर आहे का लॉजिक?

तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?) ह्या संदर्भाने तुम्हाला प्रश्न केला होता.

In reply to by मार्मिक गोडसे

१९४७ ला महात्मा गांधींना मारलं म्हणून गोडसेला फाशी दिली ते योग्यच असावं. सरकारचा आणि न्यायालयाचा तो एक सुबुद्ध निर्णय मानायला पाहिजे नि मानतो. =========================== पण त्या काळात जे दहा लाख बंगाली नि पंजाबी मेले ते लेस हुमन्स नव्हते. ते सारे व्यवस्थित फुली इव्हॉल्ड होमो सेपियन्स होते. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अशा लोकांसही मरणोत्तर फाशी झाली पाहिजे अशी तीव्र इच्छा आहे.

In reply to by arunjoshi123

त्यांचे मरणोत्तर पत्ते कुठून आणायचे ? चित्रगुप्ताच्या डायरीतून का ? --------------------------- ठ्ठो करुन गोळी घालून शिक्षा द्यायची इतकी देशप्रेमी पद्धत माहीत होती तर त्यानाही तेंव्हाच ठ्ठो करायचे की ... आता मरणोत्तर फाशी द्या म्हणून गळा का काढायचा ?

In reply to by manguu@mail.com

मंगू, ब्रिगेडचे इतिहासकार (ज्यांचा तू एक दांडगा वाचक आहेस) १९४७ च काय इसवीसन पूर्व १९४७ चे सज्जन सज्जन ब्राह्मण उकरून काढता आणि त्यांना मरणोत्तर फाशी देता. नै का? लोकांना इतिहासातून उकरून फाशी द्यायची इच्छा ब्रिगेडीच का असावी? प्रत्येकालाच तो अधिकार आहे.

585,00,00,00,000 इतकी रक्कम प्राविडंट फंड अनक्ल्मेड सरकारी खाते मध्ये जमा. काँग्रेसचे नेते आणि आधार कार्डचे जनक नंदन निलकेणी सुद्धा असंच म्हणतात. फक्त ते काँग्रेसचं नाव न घेता असं म्हणतात, मोदी सरकारने ही इतकी प्रचंड रक्कम आधार कार्डला जोडल्यामुळे ती फ्रॉड लोकांच्या हातात गेली नाही आणि सरकारी खजिन्यात शिल्लक राहिली. निलकेणी ही राजकारणी व्यक्ती नाही, तर इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दांना खूप गांभीर्याने घ्यायला हवे. देशातील 80% लोकांना हे आकडे पाहून ही किती रक्कम आहे हे सांगताही येणार नाही. ही रक्कम आहे 58500 कोटी (585 अब्ज) म्हणजे अर्धा लाख कोटीहूनही अधिक. सामान्य माणसाला यात काही कळत नाही आणि मग ही रक्कम अगदी सहजपणे चोरांच्या खिशात जात राहिली आणि आम्हाला त्याचा कधी पत्ताही लागला नाही. -------------------------------------------------------------------------- पूर्वी प्रॉव्हिडंट फंड आधारला लिंक नव्हते, म्हणून त्यातले पैसे कुणीही चोर कढून नेत होते, हे म्हणणे अगदीच हास्यास्पद आहे. तेंव्हाही असे अनक्लेमड पैसे होतेच . ही रक्कम २०१४ नंतर एका रात्रीत आलेली नाही. लोकांचे अन्क्लेमड पैसे आहेत. आणि भक्त नाचत आहेत. म्हणे सरकारने पैसे वाचवले.

In reply to by manguu@mail.com

पूर्वी प्रॉव्हिडंट फंड आधारला लिंक नव्हते, म्हणून त्यातले पैसे कुणीही चोर कढून नेत होते, हे म्हणणे अगदीच हास्यास्पद आहे.
एल पी जी गॅस सिलिंडरच्या पैशाचंही असंच असेल, नै का?

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नुकतेच १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान दिले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असे त्यांनी मोदींना सांगितले आहे. ते चामराजनगर येथील निवडणूक रॅलीदरम्यान बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मोदींनी राहुल गांधी यांच्याबरोबरच सिद्धरामय्या यांना देखील आपल्या प्रचारसभेत टार्गेट केले होते. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करतात. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती. अशा टिप्पण्या करून मोदी एखाद्या ट्रोलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ---------------- एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.

In reply to by manguu@mail.com

मंगूश्री,
एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.
सारा देश एका माणसाच्या आजारपणाची खिल्ली उडवतोय. पैचान कोन! आ.न., -गा.पै.

भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. जाहीरनामा तयार करणाऱ्या टीममध्ये नारायण राणेंचा समावेश. जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विविध १७ समित्यांची रविवारी घोषणा केली. यात जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत खासदार नारायण राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे.