हॅलो, नमस्कारम, सतश्री अकाल, सलामालैकुम, नमस्ते.
भाईयो, बहनो और बडे बच्चो जो खुदको इन्सान समझते.
अॅमेझॉनसे लेकर फ्लिपकार्टतक, स्नॅपडिलसे लेकर इबेतक.
हर कोई चीज मौजूद है अपने पास आसमान लेकर खाकतक.
मेरे प्यारे मिपावासीयो, जरा देखा भी करो इस नये बिझनेसको.
हर चीज यहांपे लाजवाब और बेहतरीन, जैसी चाहिये जिसको.
.....
चलो भैय्या आपकी पेशे खिदमत आहे नवनवीन प्रॉडक्ट. फक्त तुमच्यासाठीच.
हि बेहतरीन चीज आहे स्वआरतीमशीन
स्वआरतीमशीन
आपल्यापैकी काही जण असतात त्यांना सतत स्वतःचे कोडकौतुक व्हावेसे वाटते, किंबहुना आपण त्यासाठीच जन्मास आलोय असे वाटते, त्यासाठी किती कष्ट करता आपण. कौतुक करणेबल काहीतरी करायचे, भाटांची फौज गोळा करायची, त्यांचे लाड पुरवायचे, आपले कौतुक करतील म्हनून त्यांचेही कौतुक करत राहायचे, एक ना दोन.. बस्स्स, गेला तो जमाना. आता हि क्रांतीकारी मशीन आणा, सारे कष्ट विसरुन जा. फक्त ह्याचा सेल्फरेड मोड ऑन करा आणि गळ्यात अडकवा. लगेच एक आरतीचे ताट, दोन सुरेख चायनाएलीडीवाल्या निरांजनासहित तुम्हाला ओवाळायला सुरु करेल. अधून मधून स्वस्तुतीपर गाण्याची धून कानी पडायचीही सोय. आपण टेकसॅव्ही असाल तर गोप्रो कॅमेर्यासहीतही हे मशीन उपलब्ध आहे. तुमची ही साग्रसंगीत आरती व्हिडिओमार्फतही शेअर करु शकता. जुन्या नोकीया बीएलफाईव्हसी बॅटरीवरही चालणारी हि मशीन लाईफटाईम वॉरंटीसह उपलब्ध आहे. आरतीचे विषय बदलण्याचेही मोडस उपलब्ध.
किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
...................................................................................
तुमच्या लाईफमध्ये क्रांती घडवेल एक नवीन शोध, आस्तिकनास्तिकमीटर.
आस्तिकनास्तिकमीटर
सांगा तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक? दररोज सकाळी उठले की हाच प्रश्न उभा राहतो ना समोर? हैराण झाला आहात ना ह्या यक्षप्रश्नाने? रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत आणि मिपा लॉगॉफ करेपर्यंत छळणार्या ह्या प्रश्नांना आता सामोरे जा खंबीरपणे. फक्त हे मशीन ऑन करा आणि आपला हात त्यावर ठेवा. मशीनच्या डायलवर त्वरीत पर्सेंटेज यायला सुरु होईल. अजो पासून यना पर्यंत सर्व पर्सेंटेजसहीत हे मशीन तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक हे दाखवेल. आस्तिकतेकडे काटा फारच वळत असेल तर मशीनचे प्राडॉ सेटिंग ऑन करा. काटा त्वरीत सेंटरला येईल. अल्फा, बिटा, क्रिप्टा, मार्वा सारखे इंडिकेटर लागत राहतील. ते सतत तुमची सिम्युलेशन प्रोसीजर चालू ठेवतील पण ह्या मशीनची रेडीएशन्स लवकरच तुम्हाला स्थिर करतील. एकदा तुम्ही बॅलन्सड झालात की आत्मविश्वासाने जगाशी चार हात करायला बाहेर पडाल. दिवसातून एकदा फक्त ५ मिनिटे ह्यासाठी द्या आणि स्थिरबुध्दीसह अवर्णनीय मानसिक शांतीचा अनुभव घ्या.
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
अजोकीबोर्ड
ह्या मशीनसोबत मिळवा एक अ जोकी बोर्ड. बिल्कुल मोफत मोफत मोफत. ह्या किबोर्डाने आपला टायपिंगचा स्पीड तर वाढेलच शिवाय बोटात आलेली ताकद स्वतःला जाणवायला लागेल. नेहमीच्या टायपिंगपेक्षा चारपट वेगाने करा कामे आणि त्या मजबूत बोटांना लावा दुसर्या कोणत्यातरी कामाला. हैना कमालकी बात.
आजच बुक करा आस्तिनास्तिकमीटर आणि अ जोकी बोर्ड.
किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
........................................................................................
देखिये अब अलग नजरीयेसे. बदलो अंदाज बदलेगा नजारा, यही है नमोचष्मेका नारा.
नमोचष्मा
पेट्रोल भरताना हळहळतंय तुमचं मन? टॅक्सचे रिटर्न भरताना कळवळतंय तुमचं मन? गॅस न विजेची बिले भरताना जळजळतंय तुमचं मन?
भय्या अब अच्छे दिन है तो मूड बना लो अच्छा. आंखोपर चढा लो नमोचष्मा.
खिलखिलाते कमलकी आकारका ये चष्मा मचा रहा है पूरी दुनियामे धूम.
हा स्मार्टचष्मा घाला, डाव्या कानावरील लाल बटण ऑन करा. सारी दुनिया कशी सुरळीत चालू असेल. कामगार, कंपन्या, उत्पाद्न आणि ग्राहक. सारे कसे खुशहाल. गिअरच्या सिंहाची बघा कशी आहे चाल. ना आंदोलने ना भाववाढ, सगळे कसे छान छान. उंचावेल तुमचीच मान.
उजव्या कानावरील हिरवे बटण दाबा. नैसर्गिक शांतीचा आयुर्वेदिक मोड कानाशी हळूहळू स्वदेशी स्वदेशी असा मंत्र चालू करेल. डोळ्यासमोर नयनरम्य हिरवळीवर चरणार्या लाखो गोमाता आणी त्यांची करोडो वासरे दिसत राहतील. नुसत्या एका दर्शनाने तेहतीस कोटीचा लाभ पहा कसा अगणित होऊन जाईल. लाखातले हिशोब विसरा आता, देशप्रेमाच्या अॅपमध्ये अब्जावधी पुण्यकॅश जोडा. ह्या खास चष्म्याच्या काचा पुसण्यासाठी आम्ही देत आहोत अगदी फ्री फ्री फ्री मिनरांजलि वॉटरच्या दोन बाटल्या.
किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
........................................
हे प्रॉडक्ट आता तुम्ही घरबसल्या मागवू शकता. बस एक बटन दबानेकी देर है.
एक मिसकॉल करा कुठल्याही नंबरला (त्याचा परत आला तर बोलत बसा, नाही आल्यास तुमची वस्तू घरी पोहचणार ह्याची ग्यारंटी.)
पंधरा लाखातून ह्या वस्तूंची किंमत अदा करायची खास सोय.
तुमचे सारे लिंक्ड अकाउंट आम्हाला लिंक करा आणि आम्ही ते सारे पाहून तुम्हाला कशाची गरज जास्त आहे ते पाठवून देऊ.
........................................
ह्या आठवड्याच्या बिगडील नंतर लवकरच घेऊन येत आहोत काही नवनवीन प्रॉडक्ट, जे बनवले आहेत फक्त तुमचाच विचार करुन. आणि उपलब्ध असतील फक्त मिपाबाजारातच..
तर चला मंडळी...त्वरा करा...मर्यादित साठा असल्याने आपली मागणी आजच नोंदवा... तुम्हास उत्पादन भलेही न का मिळेना....कुणाचा तरी बाजार तर उठेल.....
.........................................
(ह्या वस्तूंच्या उत्पादनासाठी काही तज्ञांचे विचार कारणीभूत असले तरी त्यांना ह्याची रॉयल्टी मिळणार नसलेने फारसे मनावर घेऊ नये. बाजार उठवण्याकडे लक्ष केंद्रीत करावे हि नम्र विनंती.. पक्षी चुकभूल देणेघेणे ;) )
काहीच नाही तर सुख दुखतंय म्हणून (उदा मला बोटीवर, पाणबुडीवर, विमानात ऑनसाईट जायला मिळालं नाही, जेमतेम १०००-१२०० फूटाचंच घर आहे, मिपावर टी आर पी मिळत नाही, नवीन नवीन ड्यू आयडी घेतली कि आयडी ब्लॉक होते इ इ
नावाचं यंत्र विकसित करून पाहिजे चालू की?
माझी कलाकारी सुमार असल्याने साधारणपणे आराखडा असा
टोपी साधारणपणे बांधकाम कामगारांना असते तशी, दोन मोठ्ठे बल्ब लावून आणि एक नामजप यंत्र सारखी जोडणी.
कार्य हेच किं मित्रमंडळी बरोबर असताना खाता पिता कचकावून विरोध आवाज करणारा /दिसणारा लालभडक बल्ब
विरोधकांना भेटताना हिरवा बल्बचा प्रकाश आणि फारच कुणी छेडलं तर बघा हं सोडुन जाईन तुम्हाला असं तुतारीच्या पार्श्वसंगीतावर चालू पाहीजे म्हणजे पाहीजेच
भैजा फ्राय नाखु बिनसुपारीवाला
प्रतिक्रिया
हा हा हा
सतत विरोध
Pagination