Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २६

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 15/03/2018 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)

वाचने 41198
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

बाकी विरोधी पक्ष पाठिंबा देत नाहीत तोपर्यंत अविश्वास प्रस्ताव पुढे सरकार नाही. कदाचित प्रस्तावच फेटाळला जाईल.

In reply to by बिटाकाका

प्रस्ताव पुढे जाईल असे दिसते. काँग्रेस, माकप, अण्णा द्रमुक, एमआयएम ने पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. काँग्रेस ४८ + अण्णा द्रमुक ३७ + टिडीपी १६ + माकप ९ + वायएसआर ८ + एमआयएम १ = ११९ जणांचा पाठिंबा आहे. यात तृणमूल ३४ आणि शिवसेना १८ यांचे काय होतेय हे पाहणे रोचक आहे. ----------------------------------------------------- भाजपचे स्वतःचे २७४ सदस्य असल्याने सरकारला कुठलाही धोका दिसत नाही पण निवडणूक येऊ घातल्याने वातावरण तयार करून मित्रपक्ष फोडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून चालल्याचे दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी

In reply to by manguu@mail.com

हे तुमचे एखाद्या पक्षाचे समर्थन करायचे निकष आहेत का? असतील तर तुमचा आवडता पक्ष कोणता? नसेल तर फक्त भाजप विरोध हा तुमचा अजेंडा असण्यामागचे कारण काय? --------------------------------------------- इतरत्र फुसके बार काढून मग प्रतिसाद इग्नोर मारला जातो तसा इथेही मारला तरी काही हरकत नाही.

In reply to by manguu@mail.com

अतिरेक्याना विमान देणारी..
हे नविनच. भाजपानं सरकारी विमानावर तुळशीपत्र ठेवलं??????????????? ================================================== अफगाणिस्तानात काय पदयात्रा काढायची होती का? भाजप द्वेष्ट्यांचा आय क्यू लैच भारी असतो.

In reply to by श्रीगुरुजी

विशेष राज्याचा दर्जा देवू असे आधी बोलून मग भाजपे वचन विसरले. चंद्राबाबूनी कैकयीच्या आवेशात मोडू नका वचनास नाथा , असे स्पष्टपणे सांगितले. अविश्वास ठरावाचा प्रस्तावही मांडायचे ठरवले. म्हणजे कणखर बाणा बाळगल्याबद्दल अभिनंदनास भाजपा/ मोदी/ शहापेक्षा चंद्राबाबूच अधिक पात्र आहेत ना ?

In reply to by manguu@mail.com

कसला डोंबलाचा विचार. पुढील वर्षी आपली वाट लागणार याचा अंदाज आल्यावर आपल्या नाकर्तेपणाचे खापर दुस-यावर फोडण्याचाच हा प्रकार.

In reply to by manguu@mail.com

हाहाहा, आश्वासन (दिले असेल तर) पूर्ण होणार कि नाही हे समजायला ३-४ वर्षे लागतात होय, छानय! इथे अंधविरोधक वाहिल्या वर्षीपासूनच फेकूगिरी वगैरे म्हणून नाचत आहेत, त्यांच्याकडून काहीतरी शिकून घ्यायचं ना चंद्राबाबूंनी! --------------------------------------------------- मग आता विशेष राज्याचा दर्जा पुढच्या वर्षी देणार का कोणी? काँग्रेस? कि तिसरी आघाडी?

बिहारमधील पोटनिवडणक राजदने जिंकल्यावर विजयी मिरवणुकीत "भारत तेरे तुकडे होगे", "पाकिस्तान झिंदाबाद" अशा घोषणा देत असतानाच्या चित्रफिती व्हायरल झाल्यात. भाजपला विरोध करण्याच्या धुंदीत आपण कोणाला समर्थन देतोय याबद्दल ना खंत ना खेद.

In reply to by श्रीगुरुजी

काय झाले त्यांचे ? जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ?

In reply to by श्रीगुरुजी

३० वर्शे मठाची सत्ता असताना कधी दिसले नाहीत. आता एकदमच उगवले ?

In reply to by manguu@mail.com

जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ? अशा फिती कितीका असेनात , विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस असताना हिंदुबहुल भागात भाजपे का हरले म्हणे ? ---------------------- या दोन्ही प्रश्नांची तुमची उत्तरे सांगाल का? का परत हवेतच बाण? ती फीत सापडली आहे यावर काहीच बोलणे नाही, तिथेच कशी सापडली म्हणे? काहींच्या काही! ---------------------- विकास , संघ , हिंदुत्व इ इ फुल्ल्ल्ल हिंदुत्वाचा डोस चालत नाही किंवा मोदी वेव्ह वगैरे नाही माहित होतं तर सपा बसपा युती का झाली?

In reply to by manguu@mail.com

जिथे भाजप्यांची नाके आपटतात नेमके तिथेच अशा फिती कशा सापडतात ?
अरे भाऊ, किशनगंज, अरेरिया बद्दल तुला काई माहिती आहे का? =============================================== आणि तू स्वतः कधी गेलाय का जे एन यू मधे? मी स्वतः आय आय एफ टी मधून एम बी ए केलं आहे जे जे एन यू पासून १ कि मी वर आहे. मी तिथे खूपदा गेलो आहे. (तिथली कँटीन मस्त आहे.) तिथली घाण चुक्षुरवे पाहिली आहे. असह्य भारतद्वेष (बाकी असोच) पाहिला आहे. त्यावेळी कोण्याचंही नाक आपटलं नव्हतं. ============================== जे एन यू असं जगातलं एकमात्र कँपस असावं जिथे अ‍ॅलम्नायला पण आत घेत नाहीत. =================================== तू ना अगोदर काश्मिर. ईशान्य भारत, जे एन यू, किशन्गंज, इ इ स्वतः फिरून ये. ====================================== तुला भाजपला मत द्यायचं नाही तर नको देऊ. तू म्हणतो म्हणून मी ही नाही देणार. पण बरगळायचं बंद कर. हा प्रश्न काही तिथल्याच स्थानिक लोकांच्या दूरगामी अस्तित्वाचा आहे. सुरक्षेचा आहे. तू आणि तुझा पक्ष तुमच्या पद्धतीनं सोडवा. पण गाढवासारखं एखादा प्रश्नच नाही असं म्हणू नकात. ============================ बाय द वे, भारताचं खरंखुरं विभाजन करायचं सामर्थ्य जे एन यू मधे आहे आणि ते ते बर्‍याच अंशी वापरतात देखील.

In reply to by arunjoshi123

असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.

In reply to by manguu@mail.com

धन्यवाद. =========== आमच्या कॉलेजच्यावेळी विद्यार्थ्यांची गुंडगिरी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, कॉलेजात संप घडवून आणणे, अंमली पदार्थांची व्यसने, राजकीय विरोध, सामाजिक चळवळींचे तिथल्या राजकारणात दिसणारे प्रारुप आणि भारतद्वेष यांच्यात नक्की भेद करता येत नसे. तितकी अक्कल नव्हती. हे सगळं आम्हाला सारखंच वाईट वाटायचं. आज मला इतर गोष्टी तारुण्यसुलभ, इ इ वाटतात. पण भारतद्वेष आजही खुपतो. बाकी संघविरोधी शैक्षणिक वातावरणात शिकल्यामुळं आम्ही काही तिकडे तक्रार केली नाही. आज मात्र पाठींबा आहे. ================= मला काही तुमचा राग असायचा प्रश्न येत नाही. आणि तक्रार करायचं कर्तव्य माझं एकट्याचं नाही. तुमचंही आहे. आज जितका मी परिपक्व आहे आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे तितका तेव्हा असतो तर बर्‍याच जणांना जेलमधे घातलंही असतं. आज जे मी तुम्हाला 'काहीही फालतू बरगळू नकोस' असं लिहितो ते मला परवडतं. त्या काळात नसतं. ===================== बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता, तर किती पोलिस तक्रारी केल्यात? का लोका सांगे...?

In reply to by arunjoshi123

बाय द वे, तुम्ही इथे जे एकूण काही मोदी, भाजप, संघ, अभाविप इ इ बद्दल विष ओकता फारच आक्षेपार्ह बोलता आहात. तुम्हाला मार्ग सुचवला , तर मलाच उलट बोलत आहात. तुम्ही जे बोलतात गुंडगिरी , व्यसन , राजकारण ते कितेव्तरी कॉलेजात होते.

In reply to by manguu@mail.com

कास्मिरपासून नागापर्य्ंत सगळ्या फुटिर पक्षाना मिठ्या मारणारी, गोवा , पूर्व राज्यात गोमांस खायला पर्मिशन देणारी, अतिरेक्याना विमान देणारी.. भाजपा ताठ कण्याची !!!! एक्स रे काढून बघा गुरुजी
हे विष नाहीतर काय आहे? अतिरेक्यांना काश्मिरमधून काबूलला पायी नेतात का? तुम्ही भाजपला शौर्य नसलेली म्हणा, सत्तेचा हव्यास असलेली म्हणा आणि त्यासाठी फुटीरवादी शक्तींना खुश करणारी म्हणा. तुम्हाला यातून भाजप ही अतिरेकीप्रेमी आहे असंच म्हणायचं आहे ना? ================ अतिरेक्यांना विमान दिलं तर कुठे पोलिस कंप्लेंट केली होतीत? गोमांसाची कंप्लेंट कुठे केलीत? ======================= अक्कल नसेल तर माणसानं गप्प बसावं. भाजपची सत्ता मणिपूरमधे यायच्या आधी मणिपूर सतत १२० दिवस जळत होतं. पेट्रोल ३०० रु. गॅस २०० रु. https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/lpg-price-… ज्या दिवसापासून भाजप दोन्हीकडे युतीत सत्तेत आली, त्या दिवसापासून लोक इम्फाळ ते कोहिमा स्कूटरवर जात आहेत. काहीही दंगा झालेला नाही. फूटिरांना मिठ्या मारल्यात त्या तिथे अभूतपूर्व शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून. तुमच्यासाठी सन्मानाची भाषा करण्याची आमची निश्चितच इच्च्छा आहे. पण अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. -------------------- तुमचा भाजपशी राजकीय मतांतर असणं अत्यंत सन्मान्य आहे. मोदीला २०१९ मधे २ काय १ च जागा मिळो. तुमच्या तोंडात घी शक्कर. अ‍ॅडवान्समधे अभिनंदन. पण त्यात विष, विखार नको. थोडं वास्तव पण पहा. सुयोग्य तितकीच टिका करा. नाही तर मग संघावाले चेकाळून तितकीच घाणेरडी टीका काँग्रेसच्या चांगल्या माणसांवर करतात. कशाला संभाषणाचा दर्जा घसरवायचा?

In reply to by manguu@mail.com

अरे भावा, मी वर दिलेली लिंक पाहा. त्यात एका गॅस सिलिंडरची किंमत ३००० रुपये लिहिली आहे. तो काळ काँग्रेसचा. लिंक देऊन आजची (भाजपच्या शांतीपूर्ण काळातली) पेट्रोल प्राईस का सांगतोस? ब्लॉकेडच्या काळातली पाहा. गूगल जमत नाही का ? मी खाली लिंक देतो. वाच. http://www.nagalandpost.com/ChannelNews/Regional/RegionalNews.aspx?news… =========================== तरीच म्हटलं, भाजपद्वेष (विरोध नव्हे) करायला एक विशिष्ट किमान निर्बुद्धता आवश्यक आहे. ======================== आणि अशा ब्लॉकेडस तिथे पवित्र काँग्रच्या काळात एकूण किती झाल्यात ते पण वाच मंजे त्यांचं महत्त्व कळेल. मग फुटीर , मिठ्या म्हणत गावभर फिर.

In reply to by arunjoshi123

अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही! --------------------------------------- maguuu तुमच्या ओळखीचे असतील तर, चालुद्या!

In reply to by बिटाकाका

अरुण जोशी सर, पटलं नाही म्हणून सांगतो, तुमच्याकडून त्रागायुक्त भाषेची बिलकुल अपेक्षा नाही, एकेरी तर नाहीच नाही!
तुमची अपेक्षा नॉर्मल, रास्त आहे. ======================= माझ्या प्रतिक्रिया अचानक नाहीत. त्या बर्‍याच दिवसांच्या निरीक्षणानंतरच्च्या आहेत. ========================== सभ्यता, औपचारिकता, शिष्टाचार इ इ आपल्या मूळ उद्देशापेक्षा महत्त्वाचं असू शकत नाही. अनेक लोकांना पात्रतेप्रमाणेच वागवणे इष्ट असते. द्वेषबुद्धीला सन्मानाने वागवणे आत्मघातक असते.

In reply to by arunjoshi123

अख्ख्या काश्मिरच्या मतदारांना, नागालँडच्या मतदारांना, लोकशाही मार्गाने बनलेल्या पक्षांना, त्यांच्या आकांक्षांना तुम्ही फुटीर म्हणून संभावता तेव्हा सन्मान द्यायची इच्छा मरून जाते. असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा. ( तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल. )

In reply to by manguu@mail.com

तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो . दोन्ही तुमच्याकडेच ठेवले तरी चालेल.>> ==>> यासाठी +1

In reply to by विशुमित

विशुमितराव, ह्या मंगूच्या या मानसिकतेला प्रोत्साहन देऊ नकात. सन्मानच काय माणूस पेटला तर त्याला कोणाच्या कशाचीच गरज पडणार नाही. पण म्हणून काय आपल्याला लोक किती सन्मान देतात याला काहीच मूल्यच नसावं का? जे लोकांत आपण संवाद करत आहात तिथे ते तुम्हाला काय मानतात याचा तुम्हाला फरकच पडत नसला तर सामाजिक संवाद नासून जाईल. ============ आणि माझ्या सन्मानाची व्यक्तिशः त्यांना गरज आहे असं मला म्हणायचंही नव्हतं.

In reply to by manguu@mail.com

हाहाहा, विरोधाभास तर बघा, विरोधी पक्षवाले काय भाजपच्या सन्मानावर जगात आहेत काय? मग कशाला अपेक्षा?

In reply to by manguu@mail.com

असेच आहे तर भाजपावाल्यानीही इतर पक्ष , त्यांचे नेते व त्यांची कारकीर्द ह्यांचा सन्मान ठेवावा.
अर्थातच. ठेवतातच कि. कोणाचा नाही ठेवला? ===================================== तुम्ही भाजपचं राहूच द्या. संघावाले कम्यूनिस्ट, काँग्रेस, बसपा, लीग यांचादेखील (मंजे तत्त्वतः आणि काही काही नेत्यांचा) सन्मान ठेवतात. फायजे असेल तर मी लिंक देतो. कालच मी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. आंबेडकरांचा वारसा कसा श्रेष्ठ आहे आणि तो आज कोणाकडे आहे याबद्दल काल मी एका संघावाल्याचं भाषण ऐकत होतो. यूट्यूबवर. भाषणाअंती तो म्हणाला कि आंबेडकरांचा हा वारसा आज त्या सर्व लोकांकडे आहे ज्यांकडे त्यांना अभिप्रेत असलेलं देशप्रेम आहे, विचार आहेत, संस्कृती आहे, तत्त्वे आहेत, इ इ. अर्थातच इथे "ज्यांकडे" मंजे संघाकडे असंच त्याला म्हणायचं होतं. मला वाटलं इथे तो भाषण संपवेल. पण तो पुढे असं म्हणाला कि दक्षिणेतील अनांबेडकरी चळवळ आणि उत्तरेतील आंबेडकरी चळवळ यांची आजची फलितं पाहीली तर आंबेडकरांचा खरा वारसा बहुजन समाजवादी पक्षाकडे आहे असं म्हणता येईल. असं नाव घेऊन संघावाला आंबेडकरांचा वारसा त्यांच्या विरोधात युती करणारांना देतात हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. ह्यांचेच संस्कार भाजपवाल्यांकडे आहेत असं तुम्हीच म्हणत असता.

In reply to by manguu@mail.com

तसेही व्यक्तिश: ना तुमच्या सन्मानावर जगतो ना तुमचे जोडे घालून फिरतो .
याचा मला देखील आनंद आहे. ईश्वर आपणांस असेच ठेवो. =============== एक राजकीय विचार म्हणून किंवा एक अयशस्वी सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा अजून काही म्हणून भाजपला मत देऊ नका असं सांगायचे शेकडो मुद्दे आहेत. त्यांचा आधार घ्या. पण अव्वाच्या सव्वा काहीही बरगळत कमी जा. ========================= तुमच्यासारख्या लोकांनी भाजपविरोधाची इज्जत घालवलीय. भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय? ========================= बाय द वे, त्या अतिरेक्यांना कंचे जोडे घालून कंच्या रस्त्यानं पायी श्रीनगरवरून काबूलला न्यायचं होतं? फार उत्सुकता लागून राहिलिय.

In reply to by arunjoshi123

भाजपसमर्थक इतका अभ्यास आणि लॉजिक घेऊन येतात आणि त्यांना टोटल चित करणारा एकही अभ्यस्त मुद्दा तुम्ही मांडू शकत नाही मंजे काय?>>> ==>> यासाठी -१

In reply to by arunjoshi123

मांगु यांच्या प्रतिसादातील विखार तुम्हाला सहन झालेला दिसत नाही. तुमच्या या प्रतिसादात तत्कालीन पंतप्रधानांबद्दल काय प्रेम उतू चालले होते? हा घ्या तुमचा प्रतिसाद:

In reply to by सर टोबी

त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादाच्या वर नेहरूविरोधकांवर टिका करताना (श्रीगुरुजींनी नेहरूंना -१०० दिले म्हणून) मी खालील प्रतिसाद दिला. इथे मी थेट नेहरूंच्या विरोधकांना अतिद्वेष (म्हणजे विखारापेक्षा खतरनाक काहीतरी) नसावा असं म्हटलं आहे. ============================================ त्याच धाग्यावरचा हा उतारा वाचूक मला नेहरूंचा विखार आहे असं तुमच्यासारखा सुबुद्ध डावाच म्हणो जाणे.
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो. कंपनीचे चेअरमन "चीप, मीन" असू शकतात, पण त्यांच्यात काहीही चांगलं नाही असं कसं? नेहरूंमधे सत्ताहव्यास एकिकडे आणि देशाचे हित काँप्रो करणारा भाबडेपणा दुसरीकडे होता म्हटलं तरी त्यांनी केलेल्या कार्यांत बरिच चांगली पण असणार ना? तुम्हाला -१०० (सर्वस्वी दुर्गुणी?) मार्क्स द्यावेत असा वाटणारा मनुष्य १५ वर्षे निवडून कसा आला? लोक इतके मूर्ख होते? किंवा इतर शब्दांत माझे, तुमचे पणजोबा इतके मूर्ख होते? हा त्या काळातल्या त्यांना नेते मानणार्‍या सर्व खासदारांचा अपमान नाही का? नेहरूंना एकही मार्क न देण्यातलं अनौदार्य आणि मोदींना २१ कलमी दोष देणे यात गुणात्मक फरक आहे का? (नाही असं माझं मत आहे. नाहीच असा दावा तुमच्यासाठी नाही, आहे का असा प्रश्न आहे.). त्यांच्या विचारसरणी आपल्याला मान्य नसणं वेगळं, त्याच्या चुका दिसणं वेगळं मात्र त्यांची त्यांचि जी काही विचारसरणि आहे तिच्याशी देखिल त्यांची प्रामाणिकता नव्हती याची खात्री असणं विचित्र आहे. पहा, एकूणात, मला देखिल नेहरू द्वेष (तसलं कैतरि) आहे, मात्र -१०० वैगेरे नाही हो.
================================== मूळात मला मोदीविरोधकांचा विखार आहे या गृहितकाने तुम्ही माझा विखार माझ्या लेखनात शोधत आहात. जीवनभरासाठी शुभेच्छा.

In reply to by arunjoshi123

असह्य भारतद्वेष तुम्हाला दिसला तर रीतसर पोलिस केस करायची की . किंवा निदान संघ , अभाविप अशा हिंदुरक्षक संघटनाना तरी सांगायचे . माझ्यावर राग काढणे , हे उत्तर नव्हे.

बिहार मधील ऐका गावातल्या चौकाला मा श्री नरेद्र मोदी यांच नाव दिल्याच्या कारणावरुन ऐका वरीष्ठ नागरिकाची शीर धडावेगळ करुन हत्त्या करण्यात आली! भारतात हळु हळु मोघल हुकुमत परत येत आहे !!

In reply to by डँबिस००७

चौकाला एका माणसाने बळजबरीने नाव दिले, ही मोगलाई की त्याबद्दल त्याचे मुंडके उडवले ही मोगलाई ?

In reply to by manguu@mail.com

याच न्यायाने घटनेत जबरदस्तीने सेक्यूलर शब्द घुसडला म्हणून इंदिरा गांधीचे मुंडके उडवले गेले असते तर ती मोघलाई असली नसती, शब्द जबरदस्तीने घुसडले हीच मुघलाई असली असती, बरोब्बर?

पुर्ण देशा तल्या प्रत्येक गोष्टीला एकाच गांधीच नाव देण्याची ६५ वर्षांची मोगलाई च होती ! हे मान्य केल्या बद्दल अभिनंदन !!

In reply to by डँबिस००७

मी एका माणसाचे नाही म्हटले एका माणसाने असे म्हटले. चौकाला नाव द्यायला तिथल्या लोकल म्युन्सिपलमध्ये ठराव करतात व मग नाव देतात. एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच. पण त्यांचं नाव चौकाला आहे , तर ह्यांचंही हवेच , म्हणून एका माणसाने अधिकार नसताना बोर्ड लावणे , हे चूक. ( मोगलाई हा शब्द का वापरायचा ? मोगलांच्या काळात मोगल हेच म्युन्सिपल कौन्सिल होते ना ? )

In reply to by manguu@mail.com

हाहाहा, हेच सुरुवातीला करायचं असतं हो! अंधविरोध काहीही करायला लावतो माणसाला!! यामुळेच, भक्त, गुलाम, चाटु, आपटार्ड असणे केव्हाही वाईट!!

In reply to by manguu@mail.com

छान, छान!! अंधविरोधाची पुढची पायरी गाठल्याबद्दल हार्दिक हबिणंदन!!! --------------------------------- थोडक्यात, उद्या एखाद्याने पालिकेकडून परवानगी न घेता चहाचा गाडा वगैरे लावला की गळे कापले जावेत याला तुमचे समर्थन आहे काय?? तुमच्या आवडत्या सरकारच्या काळात अच्छे दिन बद्दल तुमची अपेक्षा अशी आहे होय, छानय! -------------------------------- ते पालिकेचा नियम असताना विंग्रजीमध्ये फलक लावणाऱ्यांचं तुमच्यामते काय करायचं असतं? देशात कायदा नावाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव असणारच! ------------------------------- नेहरू सगळ्यांना आवडतात आणि मोदी सगळ्यांना आवडत नाहीत याची काही आकडेवारी? की आपलं नेहमीप्रमाणे हवेत गोळ्या?

In reply to by बिटाकाका

गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही. त्याना कायद्याने शिक्षा दिली जाईल. तसेही न्यायप्रिय भाजपाचेच शासन आहे. विश्वास ठेवावा. गोमांस प्रकरणातील हत्यांचे भाजपे नक्कीच समर्थन करणार नाहीत. तसेच ह्याही प्रकरणात हत्यांचे समर्थन अ-भाजपे लोक कधीही करणार नाहीत. नेहरुंच्या काळात मोदी नव्हते.

In reply to by manguu@mail.com

तुम्ही तुमचाच उत्स्फूर्त प्रतिसाद परत वाचा वरचा! असो, तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्ट केल्याने परत प्रतिवाद करण्यात फायदा नाही. पण अंधविरोधच अशा उत्स्फूर्त प्रतिसादाना कारणीभूत असतो असे मला वाटते.

In reply to by manguu@mail.com

गळे कापण्याचे समर्थन केलेले नाही.
अर्थातच नाही केलं तुम्ही. तुम्ही फक्त इतकंच म्हणालात कि मोदीचं नाव ठेवणं हे गळा कापण्यापेक्षा अधिक अन्यायकारक आहे.

In reply to by manguu@mail.com

एक गांधी , एक नेहरु सर्वानाच आवडले तर प्रत्येक गावात त्या नावाचे चौक , रस्ता , शाळा असणारच.
नेहरू हा अहिंसावादी (बोस, मुखर्जी, गांधी सोडून ??) स्टॅलिन होता. किम जोंग उत्तर कोरीयात फार प्रसिद्ध आहे तसा होता. यांचे सर्वांचे मुखवटे हळूहळू उतरताहेत.

भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी अलिकडे इंडियन सायन्स काँग्रेसच्या व्यासपीठावरून खालील प्रमाणे दावा केला.
....Even Stephen Hawking said, our Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2.
कोणती थेअरी कुणाला कशापासून सुपीरीअर वाटते ते ठरवण्याचा ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा अधिकार आहेच पण Stephen Hawking चे नाव वापरले गेल्याने काही मंडळी बुचकळ्यात पडली असावीत. Stephen Hawking असे म्हणाल्याचा स्रोत संदर्भ काय असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पत्रकारांना तुम्हीच शोधून काढा असे सांगितले डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीच्या स्रोताचा अंदाजा किमान एका लेखकास आल्याचे या लेखावरुन वाटते आहे. बेसिकली कुणी तिसर्‍याने फेसबूकवर stephen-hawking/ च्या नावाने पान बनवून स्वतःचे मत मांडले ते stephen-hawking चे समजून कोणत्याच्शा हिंदू विचराने प्रेरीत वेबसाईटवर आले आणि ते डॉ. हर्ष वर्धन यांच्या वाचनात कुठून तरी आले असावे . एनी वे त्या फेसबूक पेजचा दावा काय आहे ?
Vedas might have a theory superior to Einstein’s law E=MC2. The Satapatha Brahmana 7-1-2-23 and Gayatri Mantra talk about Universe being threefold (triloka): Prithvi (Earth), Antariksha (the space in between) and Dayu (Heaven). Krishna Yajurveda 23.12 (7-4-45) 43 Pannam-18th Anuvakam-45th Panasa suggests the existence of a softer intermediate space called Pilipila. Modern science says the matter and energy are interchangeable but the Vedic science says there is Pilipila in between.the two.(Ref: Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007). Both Vedic and modern science agree upon a continuous dance of creation and annihilation of particle energy everywhere in the universe - Siva tandavam as per Hindu mythology, Rigveda discusses this cycle in detail. Vedic View: The Universe rotates, shaped like an egg. Modern View: The Universe is still and it resembles the surface of a sphere.
या बद्दल मिपा जाणकारांची काय मते आहेत ?

In reply to by माहितगार

असे बिनबुडाचे दावे करणाऱ्या मंत्र्यांना सरळ मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात यावा. सत्यपाल सिंह, हर्षवर्धन हे उच्छशिक्षित लोक विनापूरावा असले दावे करतात तेव्हा खरच किव येते. --------------------------------- वेद महत्वाचे असतीलही पण असा दावा करताना पुरावे सज्जड पाहिजेत.

In reply to by माहितगार

त्या फेसबुक कराने दावा Modern Science in Vedas- 1 and 2 by Dr. Sakamuri sivaram Babu and Arjunadevi-Guntur-A.P.India published in 2007) इथून घेतला आहे. लेखक Dr. Sakamuri sivaram Babu ह्यांची त्यांच्या बायोडाटावरून रसायनशास्त्रातील पिएचडी दिसते आहे.

In reply to by माहितगार

The Indian Express spoke to Dr. Sakamuri Sivaram Babu, whose theory Vardhan referred to Friday, who said he was not aware of the minister’s comment since he was working on his book on the Yajurveda. “According to the research paper I wrote in 2007, there is an intermediate stage between the Yajurveda and the Atharvaveda which suggests that energy cannot directly convert into matter. There is an intermediate stage. So what I proposed was a modification from the Einstein theory to a Vedic theory,” he said. Babu said he had forwarded this research paper to Hawking who replied with an endorsement. As proof, he showed the text of the fake Facebook post. He wrote a second research paper which he said was published in the the Vedic Science Journal in 2013. Babu approached Hawking again: “Later I asked him (Hawking) to comment on my other paper for which he expressed his inability due to health reasons. Initially, he commented himself for my first paper,” he added. “Both times we were not able to connect with Hawking. The only reply we received was an email which was not directly related to us,” said K.V. Kirshnamurthy, former chairman of I-SERVE. The website states that I-SERVE is “recognised by DSIR, Government of India, as a Scientific and Industrial Research Organisation and is registered under FCRA, Ministry of Home Affairs in September 2008. इंडीयन एक्सप्रेस : Written by Sowmiya Ashok | Imphal | Updated: March 17, 2018 7:31 am

राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी

In reply to by manguu@mail.com

ईव्हीएम मशीन हाताळणे/घोळ घालणे अवघड जात असावे बहुतेक. त्यापेक्षा मतपेट्या पळवणे सोपे असावे, कौशल्य असेल म्हणून? ------------------------------------------- मोदींच्या बाजूने बोलून मोदींच्या मतांमधील वाटा मिळू शकत नाही. जे काही खेचायचंय ते मोदीविरोधी मतांमधून! मग काय, द्या मोदींना शिव्या! अंधविरोधकांना काही लागत नाही. राज ठाकरे हे त्या विरोधी मतांमधील नवे वाटेकरी आहेत असे मला वाटते.

राज ठाकरे यांचे वक्तव्य - मोदी हटाव मतदान पुन्हा पेपरवर घेण्याची विरोधकांची मागणी

दिनेश कार्तिक हा एक गुणी खेळाडू आहे, पण धोनी नामक वादळापुढे झाकोळून गेला आणि सतत दुसर्‍या फळीतला विकेटकीपर अशीच त्याची ओळख राहिली. ह्या खेळीने त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.

ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.राष्ट्रवादी , खांग्रेसबरोबर आणि मनसे राष्ट्रवादी बरोबर, काय युती आहे ?

In reply to by जयन्त बा शिम्पि

ज्याचे अस्तित्व महाराष्ट्रात ,ज्यांच्यामुळे होत्याचे नव्हते झालेले आहे, ते त्यांच्याबद्दल असेच म्हणणार.
शिवसेने ने उष्टवून फेकलेल्या पत्रावळी, चाटणार्या पक्षाच्या समर्थकांनी, जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये ढुंकून पहा, 70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत.. कठीण काळात पक्षा बरोबर असलेल्याना सतरंज्या उचलायला ठेवलंय....

In reply to by पगला गजोधर

70 % उमेदवार काँ, राष्ट्र काँ, शिवसेना मनसे मधून आयात केलेत..
याचा स्रोत देणे, कोणत्या निवडणुकीत, कोण कोण वगैरे. --------------------------------- डेटा नसताना फेकाफेकी करणे हि जुनीच मोडस ऑपरेंडी आहे असे एक निरीक्षण आहे.

In reply to by बिटाकाका

गुजरात विधानसभेत काही होते म्हणे. https://www.ndtv.com/india-news/gujarat-election-results-2017-5-congres… आता ते महाराष्ट्रात शिवरायांबद्दल अपशब्द वापरलेले ते कोण , तेही दुसर्या पक्षातून आले ना ?