Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २६

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 15/03/2018 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
राणे भाजपात दाखल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल. चला , राणे भाजपात नाही असे ठासून सांगणाऱ्याच्या आता कोलांट्या उड्या बघायच्या :)

वाचने 41198
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले, आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून.... :(

बिरबलाचे माकड पाण्यात बुडू नये म्हणून पोर पाया खाली घेते. तसे ह्यानी स्वत:च्याच पक्षाचे अध्यक्षपद पायाखाली दाबून भाजपाकडुन् ऑक्सिजन घेतला. मुख्यमंत्री फडणवीस पूर्वीच बोलले होते - राणे ही पक्षाची संपत्ती आहे ! http://abpmajha.abplive.in/mumbai/cm-devendra-fadanvis-on-eknath-khadse… संपत्ती वाढल्याबद्दल भक्तांचे अभिनंदन.

In reply to by जेम्स वांड

राणेला पक्शात अधिकृत प्रवेश दिल्याची बातमी प्रमुख वृत्तपत्रात आलेली दिसत नाही. खरोखरच प्रवेश दिला असेल तर ती भाजपचा घोडचूक ठरेल.

In reply to by बिटाकाका

राजकीयदृष्ट्या अमितभाई शहा कधीही आतबट्याचा व्हावहार करणार नाहीत, राजकीय दृष्टिकोनातून ह्याचा भाजपला फायदा नसता तर राणेंना घेतलेच नसते.

In reply to by जेम्स वांड

सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. ======================= नैतिकदृष्ट्या घोडचूक का म्हणावे ते कळत नाही. भाजपला उजवा पक्ष म्हटले जाते, शिवसेनेला उजवा पक्ष म्हटले जाते. शिवसेनेत ४० वर्षे काढलेल्या राणेंची विचारसरणी उजवीच असावी असा साधारण अंदाज आहे. त्यांना काँग्रेस संस्कृती मानवणारीच नव्हती पण बहुदा सत्तेत राहण्याच्या हिशेबाने ते काँग्रेसमध्ये गेले असावेत. चिरंजीवांनी मधल्या काळात चर्चेत राहण्यासाठी जे काही केले तो राणेंचा पिंड असावा असे मला वाटत नाही. ======================= सगळेच पक्ष एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत असतात, मग आधी तुम्ही ज्यांच्यावर चिखलफेक करत होतात त्यांना का घेतले म्हणण्यात काही मुद्दा नाही. राजकीय लाभ मिळणार असेल तर सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. फक्त सिद्ध गुन्हे किंवा वैयक्तिक गुन्हेगारी केसेस चालू असणाऱ्यांना पक्षांनी घेऊ नये असे मलातरी वाटते.

In reply to by बिटाकाका

सगळेच पक्ष अशा आयाराम गायरामांसाठी नैतिकता धाब्यावर बसवतात असे मला वाटते. हीच ती काँग्रेसी संस्कृती, आयाराम गयाराम जोजवणे, येनकेनप्रकारेण सत्ता घट्ट धरून ठेवणे, त्यासाठी पक्षांतरबंदी वगैरे रीतसर कायदे करून घेणे, हिलाच तर मुळापासून गाडायचं, भारतीय राजकारणाला एक सकारात्मक वळण लावायचं ह्या हेतूनेच तर जनतेने मोदींजींना भरभरून प्रेम दिलं होतं, आजही देतेय, हे किमान भाजपने तरी करणे मला उदास करून गेलं.

In reply to by जेम्स वांड

जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. ----------------------------------- माफ करा पण भारतीय राजकारणाला वळण लागण्याची शक्यता अजून २५ एक वर्षे तरी मला दिसत नाही. याला फक्त नेते नाही, मतदारही तितकेच कारणीभूत आहेत असे मला वाटते. "आपला माणूस" या बेसिस वर मतदान होत राहणार तोपर्यंत हेच होत राहील. ----------------------------------- ३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन, शक्यता तसूभरही नाही!!

In reply to by बिटाकाका

३.५ लाख मते आहेत ना कोळी समाजाची मग करू निषादला उभे, ब्राह्मणांची मते दूर जाऊ द्यायची नाहीत ना मग करू शुक्ला ला उभे हि असली विचारसरणी निवडणुकांमधून संपेल तो सुदिन बाडीस

In reply to by बिटाकाका

जोपर्यंत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळवणे एखाद्या पक्षाला शक्य होत नाही तोपर्यंत हे असलेच राजकारण करणे - मग ते मोदी असोत कि वाजपेयी - कुठल्याही नेत्याला अपरिहार्य आहे असे मला वाटते. बरेच लोक (माझ्यासहित) भाजपने २०१४ मध्ये विकास आधारित राजकारण करून विकासाच्या मुद्द्यावर (अच्छे दिन) बहुमत घेतल्याचे कायम अभिमानाने सांगत असत, २०१४ चे लोकसभा निवडणूक घोषणापत्र (भाजपचे) पाहिले तरी त्यात मंदिर मस्जिद वगैरे ठेवणीतल्या भाजपीय मुद्द्यांपेक्षा विकास आधारित मुद्दे जास्त दिसतात (असे एक निरीक्षण माझे) , जर तुमचं विधान ग्राह्य धरले तर २०१४ मधेही भाजपने जातीय राजकारण केले किंवा विकास सोडून राजकारण केले असा अर्थ निघू शकेल जो अजूनच क्लेशकारक आहे काका. :(

In reply to by बिटाकाका

पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले , एकही मुसलिम उमेदवार दिला नाही . लोकाना जात धर्म नको , विकास हवा आहे , असे बोलून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. आता हेच भाजपे बोलतात - लोकाना विकास नको म्हणे. जात हवी. भाजपाच्या गाढवावरून विकासाचे खोटार्डे कातडे सरकले , हे लोकान्नी ओळखले.

In reply to by manguu@mail.com

बघा! काळ सोकावतो तो असा, आतातरी माझ्या क्लेषाचे नेमके कारण तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ अश्या ह्या उदाहरणातून समजून यावे ही अपेक्षा. :(

In reply to by manguu@mail.com

पण भाजपाने तर मुस्लिम एरियातही हिंदू खासदार निवडून आणले..
हे खोटे आहे का? मग त्या त्या ठिकाणी त्यांनी पाठ थोपटवून घेतली तर दुखणे काय आहे? ------------------------------------------ एक तो घोडा बोलो या चतुर बोलो....तुमचे काय मत आहे ते सांगा उगा एक भाजप समर्थक काही म्हणाला कि भाजपे असं म्हणतात मग दुसऱ्या समर्थकाने काही वेगळं मत मांडलं कि (तेच) भाजपे तसं म्हणतात असला दुटप्पीपणा कशाला? ------------------------------------------ २७२ पलीकडे पोहोचण्यासाठी नुसत्या विकासाचं राजकारण पुरेसं नाही हे न कळायला मोदी शहा काही दुधखुळे नाहीत. पण जाहीर विकासाचं राजकारण आणि जागा वाढवण्यासाठी आतलं राजकारण त्यांनी केलं असावं असं आपल्याला वाटत नाही का? आणि केलं तर चूक काय? सपा-बसपा एकत्र येण्याचं कारणच काय होतं? ----------------------------------------- सध्याच्या युत्या/आघाड्या आणि अंधविरोधकांचं नकारात्मक राजकारण बघून माझं तर असं मत बनत चाललं आहे कि भाजप ने काय वाट्टेल ते करावं आणि जिंकावं. धुतल्या तांदळासारखं राहून/म्हणवून घेऊन काय मिळणार आहे? भाजप ने जशास तसे वागावे, जिंकावे आणि देशहिताचे निर्णय "लादावेत".

In reply to by बिटाकाका

तुमची मते असण्याचा तुमचा हक्क मान्य करून मी असहमती दर्शवून थांबतो. कारण भाजपचा हाय मोरल कंपास हेच भाजपचं यूएसपी होतं/आहे/राहील असा माझा ठाम विश्वास होता/आहे/राहील. संघाच्या मुशीतून तावून सुलाखून तयार झालेली राजकीय संघटना मोरल हाय ग्राउंड सोडणार असेल तर माझ्यामते ते दुर्दैवी आहे. असो...

In reply to by बिटाकाका

>>> सहमत, राजकीयदृष्ट्या घोडचूक म्हणण्यास सध्यातरी मुद्दे नाहीत. राणेमुळे कोकणातील १-२ मतदारसंघात फायदा होऊ शकेल. परंतु महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. राणे अत्यंत उपद्रवी आहे. त्याचे खरे ध्येय मुख्यमंत्रीपद आहे. भाजपत राहून राणे सातत्याने फडणवीसांना त्रास देत राहील. राणे व राणेपुत्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ज्याप्रमाणे लालूपुत्रांनी नितीशकुमारांना त्रस्त करून सोडले होते तसेच राणेपुत्रांमुळे फडणवीस त्रस्त होतील व त्यामुळे भाजपचा प्रतिमा अजून खराब होईल. हा निर्णय नैतिक व राजकीय दृष्ट्या चूकच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माझा हाच प्रश्न आहे श्रीगुरुजी. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अर्धापाऊण ब्राह्मण मते विरोधात गेली तरी भाजपला मोठा फटका बसू शकेल. हे विधान मोघम वाटते आहे, अनेक मतदारसंघ म्हणजे नेमके किती मतदारसंघ ? तिथली किती लोकसंख्या ब्राह्मण आहे, तिथले वोटिंग ट्रेंड काय होते, तिथली किती मते दुरावल्याने भाजपला मोठा फटका बसेल, शिवाय 'मोठा फटका' ची व्याख्या काय, हे मला पडणारे प्रश्न आहेत. अर्थात, तुमचा अभ्यास वादातीत आहेच, त्यामुळे तुम्ही जर नीट आकडेवारीसह साद्यांत पद्धतीने जर ह्याची उत्तरे देऊ शकले तर माझेही डाऊट क्लिअर होतील आणि मी ही नैतिक अन राजकीय अशी दोन्ही पातळ्यांवर भाजपने केलेली चूक आहे असे निःशंकपणे मान्य करून टाकेन

उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचा गड असलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाने जबरदस्त मुसंडी मारली. गोरखपूर लोकसभा मतदारसंघात २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच गोरक्षधाम मठाबाहेरील एखादी व्यक्ती निवडून आली आहे. यापूर्वी महंत अवैद्यनाथ आणि नंतर योगी आदित्यनाथ १९८९ ते २०१७ पर्यंत गोरखपूरचे खासदार राहिले आहेत. पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाकडून प्रवीणकुमार निषाद गोरखपूरचे खासदार झाले आहेत. प्रवीण हे अवघे २९ वर्षांचे असून ते लखनऊ येथील गौतम बुद्ध विद्यापीठातून २०११ साली अभियंत्याची पदवी घेतली आहे. त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारीविषयक गुन्ह्याची नोंद नाही. प्रवीण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे जमीन नाही. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रवीण यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे एमबीए पदवीही मिळवली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या प्रवीण यांनी सप अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत. प्रवीण यांची पत्नी रितिका या सरकारी नोकरी करतात. प्रवीण यांच्याकडे सुमारे ११ लाख रूपयांची संपत्ती आहे. यात ९९ हजारांचे कर्ज देखील आहे. प्रवीण आणि रितिका यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

In reply to by manguu@mail.com

उत्तर प्रदेशातील दोन जागा गमावल्यामुळे भाजपाचे लोकसभेतील संख्याबळ २७२ वर येऊन पोहोचले आहे. केंद्रात बहुमतांसाठी जितक्या जागा लागतात तितक्याच जागा आता भाजपाकडे आहेत. २०१४ मध्ये भाजपाने एकूण २८२ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी भाजपाला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची सुद्धा गरज नव्हती.

In reply to by manguu@mail.com

चान चान!! पण भाजप २७२ वर कशी पोहोचली ते काय कळलं नाय बगा! जरा इस्कटून सांगता का? -------------------------------------- माझ्या माहितीनुसार भाजप २७२ + १ सभापती महोदय + २ अँग्लो इंडियन असे २७५ वर असायला हवेत. २०१४ नंतर भाजप ने रतलाम (म.प्र.), गुरुदासपूर (पं.), अलवर आणि अजमेर (रा.), गोरखपूर आणि फुलपुर (उ. प्र.) या सहा जागा गमावल्या आहेत. एका जागेचा हिशेब लागत नाय, अजून कुठली पोटनिवडणूक बाकी आहे का ते बघावं लागेल.

In reply to by ray

बरोबर! भंडारा-गोंदिया बाकी आहे. पण ती या पोटनिवडणुकांसोबत का घेतली नाही काय माहित? कदाचित भाजप ०-४ झाली असती! ------------------------------------------- प्रफुल्ल पटेलांची भाजप जवळीक खटकल्याने पटोलेंनी "भंडारा" उधळला असेल काय? बहुतेक पटेल भाजपचे पुढचे उमेदवार असतील (अंधविरोधकांनुसार पवित्र होतील)!

http://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-pil-seeks-ed-probe-against… ही काय भानगड होती ? Mumbai: In what can cause serious problems for Narayan Rane, the new ally of BJP-led Nationalist Democratic Alliance (NDA), a criminal PIL has been filed in the Bombay High Court. The PIL has sought directions to the Enforcement Directorate to “reopen” a multi-crore money laundering case against Rane and his associate Avigna group head — Kailash Agarwal. The criminal PIL has been filed by journalist-turned-activist Ketan Tirodkar. In his petition, Tirodkar has stated, “I learnt from my sources in the last week of September that the Union Finance Ministry had directed the ED to stop the probe it initiated against Avighna group owner Kailash Agarwal & Neelam Hotels Pvt. Ltd. founder Narayan Rane. The ED was probing their money laundering operations.”

युपी मधल्या २ सिटमुळे राष्ट्रीय राजकारणावर फार फरक पडणार नाही. पण भाजपच्या अंर्तगत वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. योगींच्या मनात मठाचे स्वामी चिन्मयानंद यांचे नाव होते , ते डावलून शहांनी दुसरा उमेदवार दिला . यंदा बर्‍यच वर्षांनी मठाच्या बाहेरचा उमेदवार दिला गेला . आता योगींचा उमेदवार कापल्याने योगिंनी शहांचा उमेदवार पाडला की होम ग्रांऊड वर योगींना सेट्बॅक बसण्यासाठि दुसरा उमेदवार , ताकद न लावणे असे प्रकार करून त्यांना बॅकफूटवर जाण्यास मोदी- शहांनी भाग पाडले ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. आकडे : https://en.wikipedia.org/wiki/Gorakhpur_(Lok_Sabha_Constituency)#Electi… आकड्यांकडे नजर टाकली तर सप + बसप यांच्या मतात फार वाढ नाही , पण मोदी+ योगींचा करीष्मा या वेळी नव्हता आणि मतदानामध्ये घट झाली ही झालेलि घट भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे असे वाटते

In reply to by कपिलमुनी

ह्म्म.. म्हणजे भाजपाला ही निवडणूक जिंकायची नव्हतीच असं तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याची कारणे काय असावीत? केवळ अंतर्गत दुफळी हेच कारण असेल असे वाटत नाही. तसेही मोदींनंतर शहा हे पंप्रचे उमेदवार नक्कीच नाहीयेत. त्यामुळे हे नेमके असे का वागले हे समजणे कठीण

In reply to by आनन्दा

पण योगी असू शकतात. यूपी मधले ७० खासदार म्हणजे पंप्र पदाचे तिकिट मानले जाते. हा एक चर्चिला जाणारा तर्क आहे . माझे मत कमी झालेले मतदान ,विरोधी युती आणि अगरवाल सारख्या नेत्यांचे प्रवेश , विजय गृहित धरल्याने कमी पडलेले प्रयत्न ही कारणे आहेत

In reply to by आनन्दा

बिहारप्रमाणे इथेही विरोधी मते एकवटल्याने भाजप हरला. मायावतीला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात बसपने सपला पाठिंबा दिला. परंतु २०१९ मध्ये हे दोघे युती करतील का हे सांगणे अवघड आहे. विरोधी पक्शात पंतप्रधान इच्छुक अनेकजण आहेत. त्यांच्यात एकमत होणे अवघड आहे.

In reply to by कपिलमुनी

अशा चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत.
या वर्तुळांना काही इज्जत नाही उरली. निवडणूकीत पराभव होतच असतो.

In reply to by manguu@mail.com

खरे असेल तर धक्कादायक !! बुद्धी भ्रष्ट झालीय काय असले बोर्ड लावणार्‍यांची ?

In reply to by manguu@mail.com

एवढ्या बातम्यांच्या आधारावर घाईने निष्कर्ष काढणे श्रेयस्कर होईल असे वाटत नाही . अ‍ॅडीषनल डिटेल्सची गरज आहे असे वाटते.

In reply to by manguu@mail.com

घटना वाचली आहे मी पेपरमध्ये. ती धक्कादायक तर आहेच. तुम्ही ज्या बोर्डची इमेज इथे चिकटवलीय तो बोर्ड खरा आहे का हे मी विचारतोय. खरा असेल तर अजून धक्कादायक आहे असे मला म्हणायचे आहे.

In reply to by बिटाकाका

manguu@mail.com चा एक निराधार वक्तव्य कॉपीपेस्ट करणारा एक प्रतिसाद संपादकांनी उडवलेला दिसतोय. मी संदर्भासहीत उत्तर टाईपून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला तर मूळ प्रतिसाद गेला असे सांगून मिपा सॉफ्टवेअरने माझा देखील उपप्रतिसाद गिळला. असो.

इथे आणि इथे तुम्ही लिहिल्याप्रमाणे "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." सध्या आता प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि मुरलीधरन हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असे राज्याचे मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या दुव्यानुसार आणि वरती दिलेल्या दुव्याच्या माहितीनुसार राणे सध्या भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत . तर तूम्ही तुमच्या "राणे भाजपत आला तर मी व्यक्तिशः विशेषतः विधानसभेसाठी भाजपला मत देणार नाही." या मतावर ठाम आहात का ??

In reply to by श्रीगुरुजी

A day before filing his nomination papers for the Rajya Sabha elections, former CM Narayan Rane quit his own party, the Maharashtra Swabhiman Paksha. He has now joined the BJP. Rane told TOI he quit the Maharashtra Swabhiman Paksha as it would have been incorrect for him to be associated with two parties at the same time. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/narayan-rane-quits-own-…

In reply to by सुबोध खरे

हा विचार करून बघा न सर मग, म्हणजे तितका बाजूला काढला की उरलेला तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल, म्हणजे असे मला वाटतं बरंका डॉक्टर साहेब.

तटस्थपणा (ना नफा ना तोटा) किंवा थेट नफा सापडू शकेल
. शिंपल आहे वांड साहेब, शिवसेना व इतर प्रतिपक्षातील, उपद्रवमूल्य (राजकीय उपद्रवमूल्य नव्हे तर हमरीतुमरीवर वेळ आलीच तर रस्त्यावरचे उपद्रवमूल्य) असलेला मराठा नेता शहा साहेबानी पदरी बाळगलाय हो ...

Sharad Pawar, president of Nationalist Congress Party (NCP), which is part of the ruling alliance in Maharashtra told a Marathi news channel:“We are not a bunch of saints, and if we are going to get political advantage for giving reservations to Marathas and Muslims, then so be it.”हे साहेबांचे निर्लज्ज वक्तव्य होते. http://www.livemint.com/Opinion/76XE10XAWthbQgvyhHjnNN/Will-Maratha-and… यानंतर महा मोर्चा वगैरे प्रकरणे झाली. तेंव्हा काट्याने काटा काढावा या न्यायाने श्री नारायण राणे याना त्यांच्या समोर उभे करणे हा एक हेतू असू शकतो.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/arvind-kejriwal-apologies-to-… मी चुकलो, मला माफ करा – अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांची माफी मागितली. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. पंजाबमधल्या ड्रग समस्येवरुन केजरीवालांनी मजिठियांना टार्गेट केले होते. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता. केजरीवालांच्या आरोपांनी संतप्त झालेल्या मजिठियांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुन प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो असे केजरीवालांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मागच्यावर्षी केजरीवालांनी हरयाणाचे भाजपा नेते अवतार सिंह भडाना यांची माफी मागून विषय संपवला होता. २०१४ साली केजरीवालांनी अवतार सिंह भडाना यांना भ्रष्टाचारी म्हटले होते. या विधानाबद्दल भडाना यांनी सुद्धा केजरीवालांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

खोटे आरोप केल्यावर माफी मागायला लागली हे चांगले झाले.

आणि म्हणे "पार्टी विथ डिफरन्स" ... "चाल - चेहरा - चरित्र".... ब्ला ब्ला ब्ला .....

In reply to by पगला गजोधर

तुम्ही म्हणाल तेच डिफरन्सेस गृहीत धरायचे का? बरं मग एकदा लिस्ट करून टाका कि अमुक एक डिफरंट गोष्टी केल्या तरच पार्टी विथ डिफ्फरन्स नाहीतर नाही, कसे?

सगळे तसलेच रे गजोधरा. त्या 'आप'वाल्या अरविंदाकडून थोड्या अपेक्षा होत्या. दिल्लीत तो बर्यापैकी काम करतोय असे वाचले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, कानांचा इलाज करून घ्या, ह्यांच्या डोळ्यांचा पण इलाज करा. ================================ केजरीवालाने दिल्लीची पुरती वाट लावली आहे.

उद्देश हा अंध, संघ, भाजप विरोधकांनी नव्याने समजून घ्यावा या उद्देशाने हा प्रतिसाद लिहीत आहे. खरे तर मला देखील असा साक्षात्कार हल्लीच झाला आहे. असे बघा, सत्य जर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते तर एक दोन भागातच अंध भक्त झाले असते किंवा भक्त अंध झाले असते. पण तसे नाहीये. त्यामुळे जर हि मालिका भक्तांसाठीच जर राखीव ठेवली तर किती चांगले होईल. भक्त अनेक नव्या तऱ्हांनी हे धागे सजवतील. कधी नरेंद्र सूक्त, कधी नरेंद्र सप्तशतीचा पाठ, संकट मोचनासाठीचा अध्याय, आणि नरेंद्र आरती अशा गोष्टी नावारूपाला येतील. सवाई गंधर्व वगैरे ठिकाणी जसे रसिक एकमेकांना स्वतःला भावलेल्या जागा दाखवून एकूणच परस्परांचे भावविश्व समृद्ध करतात तद्वत इथे लोक या सरकारच्या अनवट गोष्टींचे आपल्याला समजलेले मर्म समविचारी लोकांना समजावून सांगतील. जसे नोटबंदी नंतरची काश्मीर शांतता, सर्जिकल स्ट्राईकनंतरचे पाकिस्तानचे मोडलेले कंबरडे, भ्रष्टाचाराची झालेली उचलबांगडी, डिजिटल इंडिया वगैरे गोष्टींमुळे महासत्तेचे वास्तव कसे उंबर्यापर्यंत आले आहे अशा गोष्टींची चर्चा होईल. तेंव्हा अंध विरोधकांना हे आवाहन आहे कि त्यांनी या मालिकेचे काही भाग भक्तांना महानुभाव घेण्यासाठीच मुक्त ठेवावेत.

In reply to by सर टोबी

भक्तांसाठी पेशल जागा या धाग्यावर कशी असणार ? ही मुम्बै लोकल आहे . इथे सगळेच येणार. भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही.

In reply to by manguu@mail.com

>>> भक्तांसाठी खास गाडी - राजधानी बुलेट ट्रेन श्रीगुरुजीनी एकदा चालवली होती .. पहिल्या वर्षी ... नंतर ती परत कधी दिसली नाही. पण त्यात विनातिकीट अंधद्वेष्टेच झुंडीने घुसुन जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत होते. तो धागा वर्षभर चालला आणि त्या अवधीत कागलकरला संपादकांनी १०-१२ वेळा हाकलून त्याचे सदस्यत्व नष्ट केले होते.

पण सरकारच्या/भाजपा च्या चुका कोणीतरी ईथे लिहितयत की... मग त्यावर दोन्ही बाजू हिरिरीने मत मांडत आहेत. ताज्या घडामोडी हा धागा काय फक्त सरकारला शिव्या घालायला हवा का?

तेलगू देसमने मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून ते सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला पाठिंबा देणार आहेत. बरोबर १९ वर्षांपूर्वी एप्रिल १९९९ मध्ये जयललिताने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याने केवळ १ मताच्या फरकाने सरकार पडले होते. त्यावेळी वाजपेयींनी जयललिताच्या blackmail पुढे मान झुकविली नव्हती आणि आज मोदी नायडूंच्या blackmail पुढे मान झुकवायला तयार नाहीत. कणखर बाणा दाखविल्याबद्दल मोदींचे अभिनंदन!